गेल्या भागात आपण पाहिले की रेशम कविताची एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या कांद्या पोह्याचा कार्यक्रम होणार होता. फोटोत पाहिलेला मुलगा तिला आवडला होता आणि तो आज येणार होता .आता पाहू पुढे.
कविता हसता हसताच रडू लागली.रेशमला आई रडते आहे पाहून खूपच वाईट वाटले. ती लगेच उठली आणि आईचे डोळे पुसू लागली. आणि म्हणाली
"अगं ! आई काय झाले? का रडते आहेस? आई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "तुला नाही कळणार गं .माझ्यासाठी तू खूप मोठी जबाबदारी आहे. तुझ्या बाबा नंतर तुझ्या लग्नाची जबाबदारी ही माझीच आहे. तुझे बाबा नेहमी म्हणायचे
" माझ्या मुलीला मी राजकुमार शोधणार आणि राजकुमार शोधण्याच्या आधीच ते देवा घरी गेले. आज ते असते तर किती बरं झालं असतं ना रेशम? त्यांची खूप आठवण येते. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे तुझे चांगल्या मुलाशी लग्न व्हावं."
" माझ्या मुलीला मी राजकुमार शोधणार आणि राजकुमार शोधण्याच्या आधीच ते देवा घरी गेले. आज ते असते तर किती बरं झालं असतं ना रेशम? त्यांची खूप आठवण येते. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे तुझे चांगल्या मुलाशी लग्न व्हावं."
आईच्या डोळ्यातून येणारे पाणी काही थांबता थांबेना. तिला बघून रेशमही रडायला लागली. मीनल देखील भाऊक झाली ; पण तिने दोघींचा मूड फ्रेश कण्यासाठी इतकंच म्हटले " रेशम असा रडका चेहरा घेऊन गेलीस तर अमित आणि त्याच्या घरचे तुला पाहून दारातुनच पळून जातील . हे ऐकून कविता आणि रेशम दोघीही हसू लागल्या. कविता रेशमच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली "रेशम, पाहुणे येणारच असतील. तू तयार हो"
मीनल म्हणाली "काकू , डोन्ट वरी मी त्याच्यासाठीच तर आले आहे. अशी तयार करते ना मी रेशुला की अमितची तिच्यावरून नजर हटणारच नाही बघा."
रेशमला आता मात्र रहावलं नाही. तिने जोरात पुन्हा तिला चिमटा काढला.
कविताला या दोघींकडे पाहून हसू येत होतं . "तुम्हा दोघींचं चालू द्या , मी जाते मला भरपूर काम आहेत."
रेशम तयार होत असताना तिच्या डोक्यात अमितचे विचार चालू होते.
विचारात गुंतलेली रेशम पाहून मीनल तिला म्हणाली, अगं रेशम किती विचार करणार आहेस अमितचा आता आयुष्यभर विचारच करायचा आहे.
रेशम लटक्या रागातच तिला म्हणाली मिनू आता जर तू काही बोललीस ना तर याद राख.आल्यापासून तू मला चिडवत आहेस आणि काय ग आईसमोर काय म्हणते मुलीला मुलगा पसंत आहे तू ना माझी मैत्रीण कमी आणि दुश्मन जास्त शोभतेस बघ.
मीनल म्हणाली, "अगं रेशम ते मी मस्करी करत होती आणि शेवटी तुझ्या मनातलं कळलं तर पाहिजे ना काकूंना, चल आता चेहरा नीट कर बरं छान असा हसरा चेहरा कर म्हणजे माझे जीजू आल्या आल्या लग्नाची मागणीच घालतील"
रेशम लाजली.
बेल वाजली अमित आणि त्याचे आई-वडील आले होते. तिथे रेशमचे हातपाय गार पडले होते. असे प्रॉपर कांदे पोहेचा कार्यक्रम वगैरे तिला जरा दडपण झाले होते. आईने रेशमला आवाज दिला रेशम बाहेर आली. अमितने रेशमला पाहिले त्यालाही ती पहिल्या नजरेतच पसंत पडली. अमितच्या आईने रेशमशी गप्पा मारल्या. आईने रेशम आणि अमितला एकांतात बोलण्यासाठी पाठवले. रेशम अमितला रूममध्ये घेऊन गेली. अमितनेच रेशमशी बोलायला सुरुवात केली.
अमित : "रेशम तुला दडपण आलेलं दिसत आहे"
रेशम "नाही.. असं काही नाही."
अमित म्हणाला तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे ते रेशम. विसरून जा की मी तुला बघायला आलेलो आहे.असं समज मी मित्र आहे तुझा .मित्र म्हणून गप्पा मारू शकतेस.
रेशमला हे ऐकून बरे वाटले.
अमितने " तू छान दिसते"
म्हणून कॉम्प्लिमेंट दिली.
म्हणून कॉम्प्लिमेंट दिली.
अमितने विषय काढला "रेशम तुझ्या काही अपेक्षा काही छंद असतील तर तू मला सांगू शकतेस"
रेशम:"छंद असा काही नाही ,पण मला निसर्गाशी एकरूप व्हायला आवडते"
अमित:"मलाही निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये फिरायला आवडते आणि मला चार लोकांमध्ये मिळून मिसळून रहायला ही आवडते. हा माझा छंद आहे आणि मी गाणं सुद्धा म्हणतो पण बाथरूम सिंगर आहे इतकच"
रेशम पुढे बोलू लागली "अमित माझ्या बाबा नंतर मी आणि माझी आई असा आमच्या दोघींचा परिवार आहे आणि लग्नानंतर ..."असे म्हणत रेशम जरा दोन क्षण शांत बसली"
तिच्या चेहऱ्यावर असे दिसत होते की तिला खूप महत्त्वाचे काहीतरी बोलायचे आहे. अमितला ते जाणवलं .
अमित तिला धीर देत म्हणाला
" तू बिनधास्त बोल तुला जे वाटतंय"
" तू बिनधास्त बोल तुला जे वाटतंय"
रेशम पुढे बोलू लागली अमित माझं लग्न झाल्यावरही माझ्या आईची जबाबदारी मी घेणार. जो ही तिचा खर्च असेल तो मी उचलणार" हीच माझी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा जो मुलगा पूर्ण करेन मी त्याच्याशीच लग्न करणार. हे ऐकताच अमित क्षणभर शांत बसला. रेशमला वाटले अमित ही अट मान्य करणार नाही. ती त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती.
अमित म्हणाला माफ कर रेशम ही अपेक्षा आम्हाला मान्य नाही . असे म्हणत तो बाहेर निघून गेला. रेशमला आतून रडू येत होतं . खरंच ही खूप मोठी अपेक्षा होती का? स्वतःच्या आईची जबाबदारी घेणे. ती रूममध्ये शांत बसून राहिली.
बाहेरून मिनू आली आणि तिला पाठून घट्ट पकडले. म्हणाली "अभिनंदन रेशु"
क्रमशः
लिखाण करायला तेव्हाच बरं वाटतं जेव्हा वाचक प्रतिसाद देतात..तुमच्या कंमेंटची मी जरूर वाट पाहीन.कशी वाटली कथा लाईक ,कमेंट ,शेअर करून सांगायला विसरू नका. पोस्ट माझ्या नावासहित शेअर करावयास हरकत नाही आणि मला फॉलो करायला विसरू नका. असेच लेख, अशाच कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा. अश्विनी कुणाल ओगले. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा