Feb 26, 2024
नारीवादी

रेशम भाग १

Read Later
रेशम भाग १


ही कथा आहे रेशमची, जी आपल्यातलीच एक आहे.सुंदर स्वप्न पाहणारी, चार चौघांमध्ये मिळून मिसळून राहणारी आणि आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी ; पण तिच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि तिचं सारा आयुष्य बदलून गेलं.

\"रेशम ऐकलंस का?" आईने आवाज दिला.
रेशम आईकडे गेली.
"काही काम होतं का आई"?
आईने मोबाईल मधील एका मुलाचा फोटो तिला दाखवला आणि म्हणाली बघ तुला कसा वाटतो हा ? त्याचे शिक्षण वगैरे सर्व चांगलं आहे. निर्व्यसनी आहे. रेशमने एक नजर त्या मुलाच्या फोटोकडे पाहिले. मुलगा छान दिसत होता आणि त्याचे शिक्षणही रेशमला आवडले.

रेशमला आज पहिल्यांदाच मनापासून मुलाची प्रोफाइल आवडली होती.
तिला तशी अनेक स्थळ येत होते ; पण हवं तसं स्थळ तिला मिळत नव्हतं. काही ना काही प्रॉब्लेम येत होता. तसं तर तिला जास्त अपेक्षा नव्हत्या. तिला फक्त मुलगा शिक्षित आणि निर्व्यसनी हवा होता.


आई रेशमला म्हणाली "मुलगा तर चांगला दिसतो बघ. शिक्षणही चांगलं आहे आणि निर्व्यसनी आहे आणि घरामध्ये आई-वडील तो आणि एक लहान भाऊ आहे. रेशमला तिचं म्हणणं पटलं.

"तू म्हणत असशील तर मी ह्याला घरी कांदेपोहेच्या कार्यक्रमाला बोलावते चालेल ना?" कविता

रेशमही हो म्हणाली .आईने त्याच्या घरी फोन लावला. मुलाचे नाव अमित होते. आईने येत्या रविवारी अमितला आणि त्याच्या परिवारास घरी बोलावले.


अमितला आईने बोलावलं तर होतं पण; इथे रेशमला खूपच भीती वाटत होती. का कोणास ठाऊक? खरंतर तो तिला आवडला होता ;पण तरीही मनात एक भीती दाटून आली होती. कसा असेल ?कसा बोलेल ?काय होईल? लग्न जमेल का ? असे अनेक प्रश्न तिच्या मनाला भेडसावत होते.

दिवसभर ऑफिसमध्ये कसाबसा तिचा दिवस निघून जायचा आणि घरी आली की अमितचे विचार डोकावायचे. दोन दिवस बाकी होते अमितला यायला. कधी नव्हे ते तिने अमित येणार म्हणून खरेदी केली होती  तिने लाल रंगाचा ड्रेस घेतला होता. त्याच्यावरती साजेशे असे झुमके घेतले होते . मुळात तिला ट्रॅडिशनल लूक आवडत नव्हता; पण खास अमित साठी तिने तयारी केली होती. तिला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते ;कारण कधी नव्हे ते ती न पाहिलेल्या व्यक्तीसाठी खूप विचार करत होती.

बघता बघता रविवार कधी आला कळले नाही. रेशम सकाळपासूनच उत्सुक होती. आज तिची खास मैत्रीण मीनल तिच्यासाठी आली होती.

मीनल आणि रेशम दोघीही रूममध्ये बसून गप्पा मारत होत्या. रेशमची आई कविता आली. मीनल तिला सतत चिडवत होती. आता मैत्रिणी म्हटल्यावर रेशमने तो मुलगा आपल्याला खरंच आवडला असल्याचे तिला सांगितले होते; म्हणून ती सतत जीजू येणार जीजू येणार करून तिचे कान खात होती.

कविताला पाहून मीनल म्हणाली
" काकू, मुलीला मुलगा आधीच पसंत आहे बरं का" हे ऐकून रेशमने तिला जोरात चिमटा काढला आणि म्हणाली
"किती लबाड आहेस गं , तू जरा शांत बस ना. काहीही बोलत राहते. दोघांची मजा मस्ती बघून कवितालाही हसू अनावर झाले.

क्रमश: 

कसा वाटला पहिला भाग आवडला असेल तर लाईक, कंमेंट, शेअर करा..मला फॉलो करा.©®अश्विनी ओगले.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..

//