विघ्न हरणारा "विघ्नहर्ता"

Poem For Ganesha

झाली जय्यत तयारी स्वागताची बघा,
रंगवुनी हा श्रावनसरींचा सोहळा...
हिरव्या शालूने नटली धरणीमाय,
तिचे खुलवते रूप जणू भासे स्वर्ग हा आगळा...

वेध लागिले होते मनाला,
झालीया आज मनाची जणू तृप्ती...
स्वर्गसुखाहूनही हर्ष असे हा वेगळा,
भासे जणू झालीया मज मोक्षाची ही प्राप्ती...

कानात डुल, माथी असे रत्नजडित मुकुट,
अन शोभे कपाळी लाल गंधाचा विजयी टिळा...
गळ्यात मोत्यांची माळ अन हाथी असे सुवर्णकंकण,
रेशीम वस्त्रावर उठून दिसे पायात चांदीचा हा वाळा...

मनमोहक आरस अन मंत्रोच्चाराच्या तालात,
विराजुनी "प्रथमेश" आमचा हरपले जणू माझे भान...
सजले मोदकांचे तबक, अन पेटली समईची वात,
सगळ्यांच्या मनात असे या "मनोमयाचे" मानाचे स्थान...

मुकुटावरी विराजे हिरव्यागार दुर्वांची जुडी अन,
कंठी शोभे बघा गर्द लाल जास्वंदाची माळ...
चरणांपाशी उभे तैनात आमचे लाडके मूषकराज,
असे तयांची साथ सदा "गणरायाला", लोटले आता अनेक काळ...

मन जाणिणारा तू "मनोमय", विघ्न हरणारा "विघ्नहर्ता",
६४ कलागुणांचा हा "उमापुत्र", अनेक सिद्धींचा हा "सिद्धीदाता"...
कृपेचा तू आहेस "कृपाकर", बुद्धीप्रिय हा माझा "बुद्धिविधाता"...
सेवेत तुझ्या धन्य होईल जीवन माझे, जनकल्याणाचे व्रत तुझे "देवव्रता"...

- Sweety-Aishwarya Deshmukh.