विणवनी

जेव्हा गावातील मुलगी शहरात शिक्षणासाठी जाते

आई गंआई गंरडू नको
तुझे शब्द ए्कुन लक्षात ठेवीन
कॉलेजला मी जाईन शिकून मोठी होईन
तुझे नी बाबांचे स्वप्न पूरे करीन॥१॥

कॉलेजात जाईन प्रत्येक विद्यार्थीनीला/विद्यार्थाला
 बहिण /भाऊ मी मानीन
कॉलेजात जाताना आशिर्वाद दे मजला
 तुझ्या आर्शिवादाचे सार्थक करीन

वाईट गोष्टी पासून दूर मी राहीन चांगल्या गोष्टी मी शिकून घेईन

कोणाची वाईट संगत धरणार नाही इज्जतीचा पंचनामा करणार नाही 

आई विश्वास ठेव माझ्यावरी गं नाही मोडणार मी शब्द तुझा गं

देवा कडे मी करते प्रार्थना तूचा व्हावी आई माझी 
जन्मोजन्माची 
आदल्या जन्माच आई पुण्य हे माझं तुझ्या सारखी आई या जन्मी लाभली 

आई गं आई गं रडू नको तुझे शब्द ऐकूनी लक्षात ठेविन