Nov 30, 2021
कविता

मरणासन्न हयातीची आर्जवे

Read Later
मरणासन्न हयातीची आर्जवे

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


"मरणपंथाला लागलेल्या समाजाच्या स्पंदनाचा इ.सी.जी."
-डॉ.अनिल कुलकर्णी
डॉ. चंदू पवार यांच्या \"मरणासन्न हयातीची आर्जवे\"या कवितासंग्रहातील वास्तवात भेडसावणाऱ्या दुःखाची दाहकता मन विषण्ण करतें. सध्याचं वर्तमान केवळ अस्वस्थ करत नाही तर उद्ध्वस्थ करतं. अणू विषाणूंच्या समस्येने सध्या मानवजातीला भेडसावले आहेच. जगणे व त्यासाठीचा संघर्ष हेच जीवनाचे अंतिम लक्ष ठरत आहे. जगणे हीच प्राथमिकता झाली आहेे.
एका अदृश्य शक्तीमुळे मानव जात आज मरणासन्न झाली आहे जीवन आणि मृत्यू मध्ये पुसटशी रेषा उरली आहे. जगणे,जगणे राहिले नाही जगणे इतके नकोसेझालेआहेकीमृत्यूलाकवटाळणेसुकरझालेआहे
आर्जवे तरी किती करायची, कुणी दखलच घेत नसेल, काही बदल मनासारखा होतच नसेल व अस्तित्व टिकवण्यासाठी  झगडावंच लागत असेल तर, अशा नैराश्यातून एक प्रकारची उद्विग्नता मनात येते,आणि ती व्यक्त होते.
असंच सभोवतालच्या नैराश्यमय परिस्थितीमधून सुचलेलं आणि योग्य शब्दात शब्दबद्ध केलेलं डॉ.चंदू पवार यांचं कसब वाखाणण्याजोगं आहे. कविता ते जगले आहेत असं वाटतं. एक एक कविता तावून-सुलाखून अनुभवातून निघालेली बावनकशी कलाकृतीआहे.
मूल्यांचा ऱ्हास होतो तेव्हा व मूलभूत प्रश्नाला जेंव्हा बगल दिली जाते तेव्हां माणसे केवळ अस्वस्थ होत नाहीत तर उद्ध्वस्थ होऊन जातात. आर्जवे जेव्हा कोणी ऐकत नाहीत तेव्हा आयुष्य मरणासन्न्नच भासतं. प्रत्येकाचं दुःख वेगळं, दुःखाचा पोत वेगळा, जात वेगळी, त्याच्यावर मात करण्याची त-हा वेगळी असते.
कविता तुमची नसतेें
कविता दुःखाची असतें
कविता वेदनेची असतें
तिच्यामुळे तुमची ओळखअसते. 
आयुष्य मरणपंथाला लागले आहे, देवही बंदिस्त आहेत, आर्जवे करायची तरी कोणाला. दुःख विकत घ्यायला कोणाला आवडत नाही, अनेकांना करमणूक म्हणून दुःख पाहायला आवडतं. एखाद्या जुन्या गाडीची जाहिरात असते, आहे त्या स्थितीत विकणे आहे, त्याप्रमाणे चंदू पवार यांनी टिपलेली दुःख आपल्या समोर ठेवली आहेत. वास्तवाला मुलामा देता येत नाही, कल्पनेला मुलामा देता येतो. आपल्यासमोर वास्तव शब्दांचा अर्थपूर्ण निरोप घेऊन कवी डॉ.चंदू पवार येतात. राखेतून जसा फिनिक्स पक्षी अवतरतो तसं दुःख ही आपल्या जाणिवा प्रगल्भ करूअवतरतं,दुःखाची उकल करण्याला प्रोत्साहित करतं. मरणासन्न आयुष्याच्या स्पंदनाचा इ.सी.जीच आपल्यासमोर डॉक्टर चंदू पवार यांनी जैसे थे सादर केलाआहे.
कवीने स्वता:च्या लेखणीशीच संवाद साधला आहे.
कसं जमतं गं लेखणी तुला
असं मौन राहून व्यक्त व्हायला?
बोचलेल्या शल्याला उपसून 
कागदावर रक्त व्हायला? 
लेखणीशी भावनिक संवाद साधत कवी स्वतःच्या जखमांचा हिशेब मांडतो. स्वतःच्या हरवलेल्या बालपणाविषयी कवी म्हणतो. 
खरं तर कत्तली केल्यात
 मी माझ्याच अंतरी 
उगवलेल्या मृगजळी सुखाच्या...
पाहू बहर येतील का कुण्या पिकांचे? 
युगानुयुगे खंगत पडलेल्या काही जाचक रूढीच्या जीवघेण्या प्रथां मुळे समाजाच्या कोपर्‍यात निपचित पडलेल्या या दुर्लक्षित व्यथा कवी आपल्या शब्दात असे मांडतो.
सगळं अंधारून आलं आहे 
भोवताली उजेड दाखविण्या
 शब्दांचे काजवे आहेत
देण्या हास्य त्यांच्या गाली पानोपानी मांडलीआसवे आहेत
केवळ पाझर फुटावा 
इथल्या निर्दयी समाजाला म्हणून त्या मरणासन्न हयातीची ही शब्दरूपी आर्जवे आहेत..
९६ पानात ९६ कविता आहेत.
१)व्यथे ची आर्जवे २)मरणासन्न हयात३) ठिगळातल्या जखमा ४)गळफासातल्या माना अशा चार विभागात कवितेची विभागणी आहे. पीळ या कवितेत अनेकांना आतड्याला पिळ पडेपर्यंत जगण्यासाठी काम करावं लागतं, याचा लेखाजोखा आहे, पण श्रीमंत केवळ हातात कॉफीचा पेला घेवून त्याचा आनंद घेतात हे वास्तव आहे. 
\"देव\" या कवितेत देव मंदिरात नसून मंदिराच्या बाहेर भीक मागणाऱ्या मध्ये देव आहे. हे कवीला जाणवते. दुःख जगणारे कवीच व्यथा मांडूशकतात. 
\"दहन \"या कवितेत
किती किती अजूनही सहन करायचं \"
कशाकशाचं सीमोल्लंघन करायचं
 कुठवर नाहक जाचक परंपरेचं वहन करायचं 
सांगा ना कोणत्या रावणाचं दहन करायचं?
कवीचं दुःख केवळ वैयक्तिक नाही तर वैश्विक दुःखाचा कोलाज कवी आपल्या समोर साकार करतो. 
\"रद्यी\" या कवितेत काल-परवाची वर्तमानपत्र आज रद्दी झाली
मानवी स्वभावाचा हा.. वापर, गरज, आवड संपली की शेवटी रद्दीत जमा.. हे जिवनाचं वास्तव कवी आपल्या समोर मांडतो.
\"कल्लोळ\" या कवितेत
आजवर जे सोसलं, पोसलं आहे जे जगलं आणि भोगलं आहे 
शब्दातीत होऊन 
एक एक ओळ आहे 
तूम्ही कविता म्हणू शकता त्यांना
पण 
तो निव्वळ मुक्या  अंतरीचा कल्लोळ आहे... 
आमुचा प्याला दुःखाचा 
डोळे मिटून प्यायचा
याची जाणीव आपल्याला प्रत्येक कवितेत जाणवते, हे डॉ. चंदू पवार यांचे यश आहे. दुःख पेरत पेरत त्यांनी प्रगल्भ जाणिवेचे नंदनवन फुलवलं आहे. 
मरणासन्न हयातीची आर्जवे       डॉ.चंदू पवार ज्ञान सिंधूू प्रकाशन                             किंमत१२५ रू.

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr.Anil Kulkarni. Pune

Retd.

Ex -Director Education Dept.