नाते आमचे सासू- सूनेचे नव्हे तर निखळ मैत्रीचे

प्रस्तुत कथेमध्ये मी एका सासूने सुनेच्या आनंदासाठी घेतलेले बदलाचे पाऊल व त्यातून घडलेली नवीन मैत्री याबद्दल सांगितले आहे.

गोष्ट छोटी डोंगराएवढी# नाते मैत्रीचे

 "अग नूतन काय हे? जीन्स का घातली आहेस? आणि काय ग त्यावर असा वेगळाच टॉप का घातलास?"

" अग मम्मा it\"s a style,you know! अग पण मी काही शरीर प्रदर्शन तर करत नाही ना ?"

"हो ग अंगभर कपडे घालतेस बाई तू! पण सर्व वेस्टर्न स्टाईलचे!मान्य आहे की आम्ही तुला आधीपासून मॉडर्न राहण्याची सूट दिली,पण नूतन तुझं आता लग्न ठरलंय."

" So what mumma?"

"  अग बाई तुझी ती आज्जेसासू,खूप कडक आहे.तुला माहित आहे का ?तुझ्या सासूचा पदर  अजूनसुद्धा खाली पडत नाही,त्यांच्या घरात."

" ए मम्मा,प्लीज तू आता असं नको म्हणू,की तुला लग्नानंतर रोज सासरी डोक्यावर पदर घेऊन साडीत वावरावं लागेल."

"अग पण तू आता साडी तर नाही निदान पंजाबी ड्रेस तरी घालायला सुरू कर. तुला तर दिवसभर नाईट पॅन्ट आणि टॉप ची सवय आहे.जरा सवयी बदल म्हणजे नंतर लग्न झाल्यावर तुला जड जाणार नाही."

" ए आई प्लीज,I am a working woman. मला माझ्या मर्यादा समजतात.मला कळत कधी कुठले कपडे घालायला हवेत ! तसही बाहेर जाताना मी अशी स्टायलिश जीन्स घातली तर काय प्रॉब्लेम आहे? Listen मी अभिला या बद्दल आधीच कल्पना दिली होती.इथे मी माझी जन्मदाती फॅमिली   सोडून अभिच्या फॅमिली मध्ये कायमची जाणार आहे हे किती मोठं sacrifice आहे.मग मी माझे संस्कार जपत हवे ते कपडे केव्हाही घालू शकते ना? Sorry mumma I can\"t make it!"

असे बोलून नूतन शॉपिंगला निघून गेली.

     नूतन तशी हुशार होती,पण स्वतःच्या आवडी - निवडी  आता आपल्याला जरा बदलाव्या लागतील,हे तिला मान्यच नव्हते.त्यामुळे नूतनच्या आईला खूप टेन्शन आले होते.

नूतन शॉपिंग मॉल मध्ये आली.नेमकं तिथे तिला अभि ( नूतन चा होणारा नवरा) भेटला.

" Hey, नूतन!"

" Hi अभि! एकदम सरप्राइज दिलेस तू!"

" ऐक ना आता तुला आमच्या घरी यावं लागणार आहे."

"अरे आज ,आता? कशी काय अभि? "

" अग तू बस..तुझ्यासाठी घरी एक सरप्राइज आहे."

नूतन आणि अभि,अभिच्या घरी  म्हणजे नूतन च्या सासरी पोचतात.

नूतन ची आज्जेसासू मात्र नूतनच्या कपड्यांवरून खूप भडकते.

" काय कपडे घातलेस ग नूतन? जीन्स आणि काय तो टॉप? बाई बाई, काय हे शिकलेल्या मुलींचे खुळे लक्षण! अग तुला आम्ही इथे तुझा लग्नाचा घागरा बघायला बोलवले आणि तू हे कपडे घालून आलीस? पाश्चात्य संस्कृतीचे? शी.."

तेवढ्यात अभि ची आई म्हणजे नूतन ची सासू म्हणाली,

" नूतन तू तुला हवे ते कपडे घालू शकतेस.आताही आणि लग्नानंतरही.मी आजवर माझ्या अनेक इच्छा मारत आले पण  तू मात्र आधी होतीस तशीच लग्नानंतर स्वच्छंदी रहा,तुला हवं ते कर.मी तुझ्या पाठीशी आहे.कारण मला माहित आहे प्रत्येक शिकलेल्या मुलीला आपल्या मर्यादा,संस्कार ठाऊक असतात."

" मम्मी तुम्ही खरच ग्रेट आहात.हो मी अशीच माझे संस्कार जपत स्वच्छंदी राहणार, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी म्हणजे माझ्या नवीन best friend साठी.आजपासून आपले नाते  सासू- सूनेचे नव्हे निखळ मैत्रीचे आहेत."

दोघी छान हसल्या आणि नूतनच्या आज्जेसासूला आपली चूक समजली.

 वाचक हो, प्रत्येक मुलीला जर आपण आपली मुलगी मानून सासर म्हणजे तीचं माहेरच बनवलं तर! कारण ती सुद्धा तिची अत्यंत प्रिय फॅमिली कायमची सोडून सासरी आलेली असते. मग  तिने कुठले कपडे घालावे ,कसे बोलावे हे तिचं तिलाच ठरवू दिलं तर ती आपोआप संस्कार जपत सासर हे माहेर समजू लागते,आणि नवीन कुटुंबातील प्रत्येक नात्यात ती आपुलकीचा ओलावा निर्माण करते.खरंय ना?

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे







🎭 Series Post

View all