रिलेशन्स..

नातं सांभाळतांना प्रगल्भता बाळगावी लागते..सांभाळून घेणं आणि विश्वास असणं एकमेकांवर.. तडजोड करायची मानसिकताच नसेल तर नातं कोणतंही टिकणं कठीण..


#रिलेशन्स...५
४/६/२०२१

नात्यांतली गुंतागुंत सोडवतांना प्रत्येकाची गणितं फार वेगळी असतात..बेरीज वजाबाकीचा ताळमेळ लागणार नाही हीच शक्यता जास्त..
एकमेकांत गुंततो किती आणि एकमेकांना गुंतवतो किती..?
समजणं कठीण तसं..
तसं पाहीलं तर व्यवहारच असावा का हा..?
माझं देण ईतकंय तुझ्यावर त्याची परतफेड केलीस तरंच खरंय प्रेम म्हणजे मुद्दल म्हणून भावनांची वसुली पुरेपुर करणार व्याज ही आठवणीचं चक्रवाढ करणार..
सौदे सगळे..कावेबाजींचे.. पण स्वतः काही द्यायची जबाबदारीच नाही....नाही शिल्लक रहात काहीच..सगळंच शून्य..कोणतंही नातं सांभाळतांना प्रगल्भता (maturity ) तितकीच लागते.. सांभाळून घेणं आणि समजावून घेणं ..परस्परांवर विश्वास ठेवता येणं..एकमेकांच्या मतांचा आदर राखणं..स्वतः ही बदलायची तयारी हवी..
यांत होतं हे की,आप मतलबीपणाचे कित्येक शूल वागवतो आपण..
किती वेळ देतो आहोत एकमेकांना समजून घेण्या साठी..? किती स्पेस देतो आहोत..? शांत होणं आणि शांत वाटणं यातला फरक करु शकत नाहीए..
सतत च्या कुरबुरी आपलेपणाची जाणीव बोथट करत जातात.. उसवत जाणं इतकंच होऊ शकतं..
हे टाळायची संधी दरवेळेला मिळेलच असं नाही.. आहे ते टिकवता येणंही कठीण होतं..
भावनातिरेकाची कोणतीही किंमत समोरच्याला नसते तेंव्हा ते नातं तकलादू किती आहे हे न समजता येणं हाच मूर्खपणा आहे..
अलगद सोडवून जमलंच नाही तर , निदान समजंसपणानं निरोप घेणं .. कबूल तुमचा वेळ घेतला या नात्यानं पण अनुभवानं शहाणं होणं ते ही जमत नसेल तर खूप काही शिकायचं बाकी राहिलंय हे नक्की..
घुसमटी पेक्षा मोकळा श्वास केंव्हा ही चांगलाच..
©लीना राजीव.

🎭 Series Post

View all