नातं जेव्हा फुलपाखरू होत तेव्हा

Give time to every relation so that it will fly like butterfly

नातं  जेव्हा फुलपाखरू होत तेव्हा

नातं  म्हणजे असत तरी काय ?

भावंडांचं एकमेकांशी,पतीच पत्नीशी,

आईवडीलांच मुलांशी,आजीआजोबांच नातवंडाशी,

ही झाली सगळी रक्ताची नाती,जी जोडतात कुटुंबात सगळ्यांना एकमेकांशी,

या व्यतिरीक्त माणुसकीच नातं,मैत्रीचं नातं,आपुलकीचं नातं,

अश्या सगळ्या नात्यांनी,विणलं जातं समाजाचं जाळ,

जसं मधमाशी विणते,ना मधाच्ं मोहोळ,

या सर्व नात्यांना असते अपेक्षांची झालर,

पूर्ण झाल्या अपेक्षा तर मिळते साखर,

नाही पूर्ण झाल्या तर मनात भरत कापर्ं,

या नात्यांना वेळ दिला पाहिजे समजून घेण्यासाठी,

नात्याला फुलण्यासाठी,बहरण्यासाठी,

मधमाशीच्ं फुलपाखरात रुपांतर होते ,

तशीच नातीही बहरतात,

कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देतात,

एकमेकांच्या निर्णयाचा आदर करतात,

फुलपाखरांसारखी स्वछंदी बनतात,

नात्यांशिवाय जीवनाला अर्थच उरत नाही,

नाती जपताना जो आनंद मिळतो,

त्याची तुलना स्वर्गीय सुखाशीही होत नाही.

  रुपाली थोरात