Feb 24, 2024
वैचारिक

रिलेशन्स..७

Read Later
रिलेशन्स..७

#रीलेशन्स
संवादाचं थांबणं एका निश्चिततेकडं नेत आपल्याया ...
आपली गरज संपलीय हे कळायला कीती वेळ घेतो आपण ..? इतकं अगतिक होणं ही आपली खरंच गरज असते ...?
कुणाला नको असणं हे जिव्हारी लागतंच पण ते मान्य करणं जास्त क्लेश दायक असतं...
जोडून ठेवणं एखादयाला जमेनासं होतं तेंव्हा आपल्यातल्याच वैषम्याची उजळणी करतो आपण..आपलंच चुकत असेल काहीतरी हे उगीचच गृहीत धरायचं... पण कदाचित तुमची मैत्री स्विकारणंआणि निभावणं इतका त्याचा आवाकाच नसावा हे का आपण स्विकारत नाही ..मैत्री निभावणं समोरच्यालाच जमलं नाही तर तो दोष तुमचा कसा ...?
कोणतीही वस्तू घेतांना दहा वेळा विचार करणारे आपण मैत्री बाबत व्यावहारिक का नसतो ...?
गरज वाटली करायची ,गरज संपली सोडायची इतका सरळसोट विचार दूसरी व्यक्ती करत असेल तर तुझ्या असण्या नसण्याचा मलाही काही फरक पडत नाही ही भूमिका आपलीही असावी ...
जशास तसं वागणं इथे तरी जमावंच ...
हा लेख लिहीण्या मागचं कारण हे आहे की संवाद सोडलाय म्हणून हतबल होणारे कीती जण असतील ईथे ..अगदी कोषात जाता न तुम्ही ...? काही बरोबर होत नाहीये आपल्या सोबत ,सगळं संपलंय ईतकी पराकोटीची भावना ती ही कुणासाठी ...? की ज्याला तुमच्या असण्या नसण्याचाच फरक पडत नाही ...तुमच्या भावनांशी काहीही देणं घेणं नाही ..कदाचित इतर ठीकाणी संवाद साधले असतील ही त्याने कींवा तीने इतपत साशंकता .. तुमच्या भावनांशी खेळणं ..तुमच्याही आणि ईतरांच्या ही.. Victim card खेळणं स्वतःचं.. तुम्हाला option कींवा time pass म्हणूनच पहाणं....हा तर सर्रास चालणारा प्रकार.. मग तुम्ही कशाला थांबता ..? कशासाठी ससे होलपट ..? ईतके असहाय्य आहात ..? ईतके अगतिक आहात ..?
जगणं का सोडायचं असल्या निर्र्थक लोकांसाठी ..?आयुष्य थांबत नाही कुणासाठी,सुंदर आहे ते ...जगा हवं तसं ...तुमचं आकाश तुमचं आहे जमीन घट्ट आहे ..तुमची माणसं तुमच्या सोबत आहेत...का नाकारता जगणं ...? खूप सोप्पं आहे का हे नाही मुळीच नाही ..पण तुमच्या स्वाभिमाना पुढे ही कींमत मोजणं अत्यंत क्षुल्लक आहे ...
सहज स्विकारा ..थोडे दिवस कठीण जाईलही ..पण एका आश्वस्थ ,निरामय जीवनाची सुरुवात स्वतःचा स्वाभिमान ,आत्मसन्मान जपून होत असेल तर जगण्यातलं खरं मर्म कळलंय तुम्हाला ...
त्याग असावा ,करावा ही जर खरीच गरज असेल तर,जोडण्याचा प्रयत्न करावा ही पण तो ही मर्यादेतच ...कुठेतरी समोरच्याला ही तुझ्या शिवाय जगू शकतो ,हे जाणवून द्या ...कुणी कुणासाठी थांबत नाही ...ती गरजही नसते ..आत्मनिर्भर तुम्ही होत जाता ..आभासाचे,संभ्रमाचे चक्रव्यूह जेंव्हा भेदत जाता .. तुमचं असणं महत्वाचं आहे ...तुमचं कोसळणं नव्हे....
आणि ते ही अशा व्यक्ती साठी जो ईतरां बरोबर तुम्हालाही भावनिक आणि मानसिक अस्थिरता देतो आहे.. स्वतःचा स्वार्थ या पलीकडे आयुष्याकडे कधी ही पाहीलेलं नाहीये.. अशा नात्यांतून निश्चयानं बाहेर पडा.. toxic रीलेशन्स ही फक्त आणि फक्त क्लेशदायक असतांत..
स्वतःवर प्रेम करणं आणि आहे ती परिस्थिती स्विकारणं हाच जगण्याचा खरा मूलमंत्र..
कुणालाही दोषी धरु नका.. नियती वर सर्व सोडून देणं योग्य..
©लीना राजीव .
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//