रिलेशन्स..६

हाकेला साथ देणारी मोजकीच असतात पण ती मिळवणं ही तुमच्या स्वभावावर अवलंबुन आहे..किती आपलेपणानं आत्मियतेनं एखाद्याला आयुष्यात सामिल करुन घेता ह्यावर ही..
एका ठराविक लयींत जाणारं आयुष्य स्वतःच्या निर्णयांवर ठाम असतांना ही तो योग्य आहे की नाही याची ग्वाही देत नसेल तर विचार व्हायला हवा..
दिशाहीन भरकटणं होऊ नये या साठी आपण स्वतःचा विचार आधी करायला हवा.. स्वार्थ निश्चितच नाही हा..जो पर्यंत स्वतःवर प्रेम करु शकत नाही स्वतःचा आदर स्वतःच ठेवून घेऊ शकत नाही तुमची होणारी भावनिक ,मानसिक कुचंबणा कुणीही थांबवू शकत नाही.. Self love..हा शब्द ईथे योग्य वाटतो..

आत्मसन्मान ( Self respect )आणि आत्मप्रौढी (Self pride , Self esteem ) या दोहोंत एक पुसटशी सीमा रेषा आहे. आपला आत्माभिमान समोरच्याला आपला ईगो (अहंकार ) वाटू शकतो शक्यता नाकारता येत नाही..पण तो नाईलाज नसावा..
कोणतंही नातं सांभाळतांना तुमची अगतिकता ही हतबलता असू नये.. नाकारलं जाणं हे खरोखर आत्मक्लेशाचं जिवंत उदाहरण ..उध्वस्थ होत जाणं भावनिक आणि मानसिकही ..समोरच्याच्या वैयक्तिक आयुष्यांत ढवळाढवळ ,त्याला आपण सर्वार्थाने नको आहोत हे माहित असूनही .तेंव्हा फक्त किंमत करुन घेणं होतं .मी खूप परखडपणे लिहीती आहे पण सत्य हे नाकारु शकत नाही कुणीच.. प्रत्येकाला आपल्या आयुष्यांत कुणी असावं कुणी नसावं त्याचं स्थान आपल्या आयुष्यांत कोणतं आणि कसं असावं हे ठरवण्याचा पुर्ण अधिकार आहे..
जो तुम्हालाही आहे.. त्याचं सोबत असणं नसणं, याचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो आहे आणि का व्हावा..?
स्वतःचं जगणंच तुम्ही मान्य करत नाहीये मग.. जीवघेण्या स्पर्धेच्या नादांत जो तो जगण्यातलं सुख हरवून बसलाय..प्रत्येक दिवस कसा ढकलायचा याची चिंता ,आपल्या माणसांसाठी काही करु शकत नाही आहोत ह्याचं ओझं ..अशा वेळी समजून घेणं आणि ठराविक स्पेस देणं अपेक्षित असतं..
तुमचं सुख ,समाधान हे कोणत्या गोष्टींवर अवलंबुन आहे याचा विचार शांतपणाने करायला हवा..आपले कौटुंबिक,नातेवाईक ,मैत्र यांना जपणं ही यांत येतं.. हाकेला साथ देणारी मोजकीच असतात पण ती मिळवणं ही तुमच्या स्वभावावर अवलंबुन आहे..किती आपलेपणानं आत्मियतेनं एखाद्याला आयुष्यात सामिल करुन घेता ह्यावर ही..
कुणीही सर्वज्ञ नाही असूच शकत नाही ..जे जगतोय त्याचा पश्चात्ताप होऊ नये ईतकंच..स्वतःचे मार्ग स्वतःच निवडायचे आहेत ती जबाबदारी ही स्वतःचीच..
इथे बरेच जण ईतरांना जज करतांना दिसतात.. स्वतःची नाती टिकवता येत नाहीत तो उद्वेग ईतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं यांत होतो..खरं तर वैचारीक प्रगल्भता वयानुसार यावी ही साधी गोष्ट आहे पण स्वतःही दुःखी रहायचं ईतरांना ही दुःखी करायचं जरा याचाही विचार व्हावा..
एकमेकांसाठी असणं हे यांना आयुष्यांत कधीच जमलेलं नसावं..पण बदल घडवता येतात..सतत नकारात्मक विचार करणं सोडून द्यावं..अध्यात्मिकतेकडे वळतांना स्वतः कितपत त्याचा अनुभव ईतरांना देतो आहोत..हे ही एकदा तपासावं..

शेवटी एकच सांगावंस वाटतं..स्वतःतले दोष आधी पहा, नाती जपा , एकमेकांना सांभाळून घ्या .. एकदा निसटून गेलेला क्षण पुन्हा आयुष्यात येणार नाही हे ही शांतपणाने स्विकारा...
ईतरांना गृहीत धरणं ,नावं ठेवणं सोप्पंय स्वतःला कधीतरी आरसा ही दाखवावा..
जगाला वेगवेगळे मुखवटे घालून फसवतां येतं एकवेळ स्वतःला फसवणं जमतंय का पहा..
©लीना राजीव.





🎭 Series Post

View all