रिलेशन्स..५

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे .. हे कुणी समजवायचं आणि कुणाला..? अपवाद आहेतच .. पण सारासार विचार करण्याची बुद्धीच गहाण ठेवली असेल तर कुणीही काहीही करु शकत नाही..
...प्रत्येकाच्या आयुष्यांत नात्यांबद्दलचे आडाखे आणि त्यांना सांभाळण्या बाबतचे नीती नियम वेगळे आहेत.. ज्या समाजात रहातो आहोत .. समाजाला एका संस्कारात बांधून ठेवण्याचा विचार या मागे आहे.. सध्याची परिस्थिती पहांता लग्न संस्थांवरचा विश्वास उडत चाललाय..पटत नसेल तर एकमेकां सोबत रहाण्याचा प्रश्नच येत नाही.. लग्न तरी कशाला करायचं..? ही मानसिकता दिसते.. जबाबदारी नको कुठलीच,गुंतवणूक कशाचीच नको हे जरी मान्य केलं तरी ही काही प्रश्न अनुत्तरीत रहातात.. आर्थिक स्वातंत्र्या मुळे कुणाचंच काही देणं लागत नाही आहोत आणि आमचं स्वातंत्र्य आम्ही कसं ही उपभोगू हा एक विचार झालाय..यात निव्वळ शारिरीक आकर्षण आणि थ्रिल हाच भाग जास्त दिसतो..आणि या साठी कोणत्याही सामाजिक नियमांना तिलांजली द्यायची तयारी असते..समाजांत वावरतांना मात्र सज्जन पणाचे मुखवटे घालून वावरणं बिनदिक्कत असतं..
याचे गंभीर परिणाम घरच्यांना आणि यांच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो.. कारण आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिक नाही ,एकनिष्ठ नाही हे समजलं की फक्त मरण यातना भोगणं हेच बाकी उरतं ..आपल्या पुढच्या पीढी कडून ही कोणतीच अपेक्षा ठेवू शकणार नाही मग.. स्वतःच प्रामाणिक नाही आहोत आपल्या मुलांवर काय संस्कार करणार तुम्ही ?.. मल्टीपल रिलेशनशिप्स हा वेगळाच मुद्दा या निमित्ताने समोर आला..
माझ्या नुकत्याच लिहीलेल्या रिलेशनशिप या लेखावर एक अनुभव शेयर करती आहे.. Inbox मध्ये एकीनं मला हा अनुभव तीचा स्वतःचा सांगितला..
जर समाजाची मानसिकता पुरुषांना पाठीशी घालणं अशी असेल तर भयंकर आहे हे.. म्हणजे व्यभिचाराचं समर्थन जर घरचीच वयस्कर मंडळी करत असतील तर ईतरांनी काय बोलायचं..?

दोन वर्ष लग्न झालेली स्त्री.. दोन मुलं पदरांत आणि नवऱ्याच्या खूप मैत्रीणी आहेत.. तो मल्टीपल रिलेशनशिप्स मध्ये आहे.. हे लग्ना नंतर समजणं.. आणि खूप समजावून ही सुधारण्याची बातच नाही. सध्या पुर्वीच्या ex शी संपर्कात आहे तो..
बेमालूम सगळं चालु आहे ..

सासू सासरे मुलाचीच बाजू घेताहेत.. इंटलअँक्युअल आहे तो काही विशेष नाही दुर्लक्ष कर म्हणताहेत ..
हे तर आकलना पलीकडे आहे.. म्हणजे याचा अर्थ असा होतो बुद्धीवंतांनी कसं ही वागावं त्यांना मुभा आहे.. पण हेच यांची सून वागली असती अशी तर खपवून घेतलं असतं का..? किंवा जावई वागला असता असा तर या आई वडीलांना चाललं असतं का हे..?
मानसिकता समजण्या पलीकडे आहे ही.. काही विचारच करु शकत नाही.. एकतर कोणत्याच नात्याला न्याय देऊ शकत नाही तुम्ही.. स्वतःच्या क्षणिक सुखा साठी किती जणांची आयुष्य उध्वस्थ करता आहात याची कल्पना न केलेलीच बरी..
मुख्य वडीलधारी ,आणि जवळची मंडळी ही या सगळ्याला पाठींबा देतांत हे कळण्या पलीकडे आहे..
समाजाचे कोणतेच नियम नितीमत्तेचे आपल्याला लागू नाहीत हेच यांतून दिसून येतं..
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे .. हे कुणी समजवायचं आणि कुणाला..? अपवाद आहेतच ..
सगळी कडे हेच चाललंय असं म्हणणार नाही मी दुटप्पी वागण्याची चीड यावी असंच आहे हे.. स्त्री पुरुष दोघंही अशी वागू शकतात वागत असतील ही .. यांत जेंडर स्पेसिफीक नाही..
कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यांत काहीही बोलण्याचा अधिकारच नाही कुणालाच. ज्यानं त्यानं स्वतःचे निर्णय घ्यावेत...पण हा अनुभव शेअर करावांसा वाटला.. वाचकांनी अभिप्राय जरुर द्यावेत.. सूचनांचं स्वागत असेल..
©लीना राजीव.


🎭 Series Post

View all