शब्दांत मांडता येतं का तुला..? खूप प्रयत्न केला मी...नाही जमतंय..खरंच ईतकं वरवरचं नातं नाहीच हे.. मनातलं ओळखणं जेंव्हा उमजून घ्यायची सवय लागते ते असतं हे.. नातं मैत्रीचं..
कुठे जपायचं..?कसं जपायचं..? कधी आणि किती वेळ हा प्रश्न आगंतुका सारखा असतो मग..
मी ओळखते तुला यापेक्षा मला समजतेस /समजतोस तू..
खूप साधं गणित मांडलंय मी काही लपवून ठेवण्या सारखं वाटत नाही..जीथे.. आपण स्वतःचे असतो ..पारदर्शी..प्रामाणिक..
एक असा कोपरा जिथे मनातलं सगळं सांगण्याची मुभा आहे.. जज करत नाही कुणी ..आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही कधीच..किती ही चुकलो तरी सांभाळून घेणारं आहे कुणीतरी हा अढळ विश्वास ज्यावर आयुष्य तरावं..
आयुष्याचा भरंवसा नाही पण मी आहे तुझ्या बरोबर काहिही झालं तरी ही ही ग्वाही देणारं कुणीतरी..तो हात मैत्रीचा घट्ट धरुन ठेवणारं विश्वासाचं कुणीतरी..
ही श्रीमंती नात्यांतली मिळवलीय केंव्हाच.. आज कशाचीच अपेक्षा नाही.. आयुष्य या मैत्री मुळे बहरलंय..
अनुभवानं शिकतो माणूस.. शहाणाही होतो.. एका तरल नात्याची सुरुवात तेंव्हाच सुरु होते जेंव्हा ओळखणं हे उमजणं होतं.. एकमेकांसाठी असणं हे गरजेपेक्षा सहजतेनं होतं ... अपेक्षा असतातच ...असाव्यातच..
दोन चार सहा माणसं ईतकी विश्वासाची असतात.. त्याचं सोबत असणच सुखावह..
मैत्रीचा मुलामा वरवरचा नसतो झिरपलेला असतो आत काळजा पर्यंत..
स्वार्था पलिकडे पहाणारं असतं
हे सगळं. कारण माझ्या साठी फक्त अस हे हक्कानं सागण्याची मुभा असते तीथे..
समोरच्याची कैफीयत ऐकण्याची जबाबदारी ही स्विकारलेली असते ..आनंदानं..
माझे कित्येक कोसळणारे ऋतु सांभाळतंय कुणीतरी सांभाळेल कुणीतरी हे वाटणं जाम भारीय..
©लीना राजीव.