Mar 01, 2024
वैचारिक

रिलेशन्स..२

Read Later
रिलेशन्स..२
बायकोचा मित्र किंवा नवऱ्याची मैत्रीण कसं वाटतं ऐकायला दचकलांत ..? कारण नाही खरं तर ..काय हरकत आहे..??तुम्हाला मित्र मैत्रिणी असूच शकतात मग नवऱ्याची मैत्रीण जर तुम्ही स्त्री असाल तर
किंवा मित्र बायकोचा accept करु शकत नाही..? कारणं काय असावीत..?भावनिक गुंतत जावू ही भीती..?की अगदीच स्पष्ट बोलायचं तर संयम आणि मर्यादा पाळल्या जाणार नाहीत याची भीती.. बोलूया मग यावरही ..काय हरकत आहे..
जर तुम्हाला लपवून आपल्या जोडीदारा पासून affairs करता येतात तर बोलायला स्पष्ट हे घाबरता..?कुणाला ..? विधि निषिध बाळगायचं नाहीच हे जर ठरवलंच असेल तर ही भीती तरी का मनांत असावी..?
बरं नवरा समजून घेत नाही ,खूप कुचंबणा होतीय ..हीच कारणं देत रहाणार आहात..? किंवा बायको रखरख करते घरांत थांबावसंच वाटत नाही माझ्या भावनिक ,शारीरीक गरजा पुर्ण करु शकत नाही कदाचित बौध्दिकही .. म्हणून मी बाहेर आधार शोधते किंवा शोधतो.. व्यभिचाराचं समर्थन करता आहात असं वाटत नाही तुम्हाला .. माझं प्रेम किती पवित्र आहे हे कुणाला सांगता आहात..??
जोडीदाराचा विश्वासघात करुन तुम्ही किती दिवस सुखी रहाणार आहात..?बरं जो स्वतःच्या जोडीदाराशी प्रामाणिक नाही ,एकनिष्ठ नाही तो तुमच्याशी तरी किती दिवस एकनिष्ठ राहील कींवा ती ही प्रामाणिक राहील याचा विचार केलाय कधी..?
एकविसावं शतक आहे मी माझा माझ्या सुखाचा विचार का करु नये ही एक मानसिकता दिसते..करा ना कोणी नाही म्हणत नाही पण समाजानं नियम घालून दिलेत ते पाळावेत ही कीमान अपेक्षा इथे रहाणाऱ्या प्रत्येकाची आहे... चांगला मित्र असणं किंवा एखादी खूप जवळची मैत्रीण असणं गैर कुठे आहे..? कोणी विरोध करुही नये.. जो पर्यंत मर्यादा पाळता आहात.. मग तुम्ही कोण ठरवणारे ह्या मर्यादा ..?आमचं आयुष्य कुणीही दखल द्यायचा प्रश्नच येत नाही ..आम्ही समर्थ आहोत निभावून न्यायला हा ही कल दिसतो .निभावून न्याल ही पण काही वेळेला सामाजिक प्रश्न उद्भवतील तेंव्हा..?
अनौरस संततीचा प्रश्न...ती जबाबदारी कुणाला तरी घ्यावीच लागेल..समाजमान्य नातंच नसेल तेंव्हा या नात्याचं स्वरुप काय असेल..?
काही वेळेला भावनिक मानसिक गरज असते ..तो आधार कोणी देत असेल तर ओढ वाटणारच पण आपल्या संस्कृतीत अजूनही मान्यता नाही याला.. संस्कार वैगरे मान्यच नसतील बुरसटलेल्या कल्पना आहेत या असंच म्हणणं असेल तर प्रश्नच उरत नाही ..पण मग तुमची मुलं हाच स्वैराचाराचा मार्ग अवलंबतील तेंव्हा काय होईल याचा ही विचार करावा..
ही माझी वैयक्तिक मतं आहेत .. जेंव्हा हे लेख लिहायचं ठरवलं तेंव्हा बरेच वेळा वाचकांनी स्वतःचे अनुभव आणि त्यांवर काही लिहीता येईल का हा आग्रह धरलेला..
तटस्थपणे दोन्ही बाजू नाण्यांच्या पहायचा प्रयत्न मी केलाय..
कुणाच्या तरी आग्रहा खातर लिहीते आहे असं समजा हवं तर...कारण जोडीदार स्वतःचा आपल्याशी प्रामाणिक नाही किंवा एकनिष्ठ नाही ही जी बोच आहे ती एखाद्याचं आयुष्य उध्वस्थ करु शकते...एकदा विश्वास गमावलांत की पुन्हा तो मिळवू शकत नाही हे सत्य आहे..
वाचकांचे अभिप्राय अपेक्षित आहेत.. मनमोकळा संवाद घडावा ही अपेक्षा आहे..कुणीही पर्सनल घेऊ नये ..सध्या सगळीकडेच परीस्थिती आहे ही..
लेखनातूंन सामाजिक स्थित्यंतराचा मागोवा घेणं आम्हा लेखकांचं काम आहे...

इथे जबाबदारी घेण्याची तयारी नाही ,कर्तव्याची जाणिवच नाही फक्त मौज मस्ती साठी एकत्र येणं.. खरंच गरज आहे याची..?
friends with benefits ( मतलबी दोस्ती ), live in relationship ,dating , hooking up हे सगळे प्रकार सध्या अगदी सहज घेतले जातात..commitment द्यायची तयारीच नाही.. शारिरीक गरजा पुर्ण करणं इतकंच ध्येय .मानसिक आणि भावनिक आधार मिळू शकतो का अशा रीलेशन्स मध्ये..? थोडे दिवस जात असतील ही मजेत पण नवीन जोडीदाराचा शोध घेत हिंडायचं कितपत योग्य आहे हे..?
शेवटी नात्यातली भावनिक,मानसिक स्थिरता कुणीतरी एकच देऊ शकतं तुम्हाला जी व्यक्ती तुम्हाला समजून घेऊ शकते..
स्वतःचं सुख फक्त पहायचं स्वार्थी पणानं इतकंच साध्य आहे यात..आपण काय मिळवतो आहोत आणि काय गमावतो आहोत याच भान जेंव्हा येईल तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल..तुमच्यावर विश्वास ठेवणारं आस पास कुणीही नसेल.. सतत संशय एक दुसऱ्यावर घेत रहाणं यापलीकडे काहीही होणार नाही.. स्वतः तुम्ही एकनिष्ठ नाही तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा करुच शकणार नाही.. मानसिक आजारांना निमंत्रण तुम्हीच देता आहात .. आयुष्यातली भावनिक आणि मानसिक स्थिरता गमावून बसणं याची किंमत कोणती मोजता आहात हे ही पहावंच..

©लीना राजीव.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//