जणू समुद्रासारखं..
समुद्रातील लाटांसारखं
कितीही संकटे आली तरी
नव्या जोमाने नव्या आनंदाने
पुन्हा किनाऱ्यावर येणारं....
तुझं माझं नातं
जणू समुद्रासारखं..
समुद्रातील शिंपल्यांसारखं
अन् शिंपल्यातील मोत्यासारखं
एकमेकांत निखळपणे फुललेलं
एकमेकांसाठी आयुष्यभर गुंफलेलं....
तुझं माझं नातं
जणू सुगरणीच्या खोप्यासारखं
नाजूक धाग्यांनी विणलेलं
तरीही अतूटतेने बांधलेलं
आयुष्याच्या वेलीवर अगदी
सहजतेने झुलणारं....
तुझं माझं नातं
जणू पावसातल्या मातीसारखं..
श्वासांना मुग्ध करणारं
पुन्हा-पुन्हा अनुभवावसं वाटणारं...
तुझं माझं नातं
जणू एका लेखणीसारखं..
शब्द शब्द वेचून
कवितेतून व्यक्त होणारं..
तुझं माझं नातं
जणू मधुर संगीतासारखं
राग,लय,सूर,ताल यांनी
मंत्रमुग्ध असणारं..
तुझं माझं नातं
जणू सूर्य अन् चंद्रासारखं..
तेजस्विता आणि शीतलतेच दर्शन देणारं..
तुझं माझं नातं जणू कोसळणाऱ्या धबधब्यासारखं उंचावरून खाली पडलं तरी खळखळून हसणारं...
असं हे तुझं माझं नातं अनोख्या मैत्रीचं,सुखाच्या छत्रीचं मनाला भावणारं, सर्वांना हवहवसं वाटणारं !!.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा