नात माझच : माझ्या मनाशी .

every one have soul... every one have friend to ourself..

जायचं कुठं,तेच समजत नाही ???

म्हणजे माझा मत च मलाच कळत नाही???

माझे फ्रेंड्स करत आहेत,म्हणजे ते चांगलंच असेल ना मी पण तेच करते..

मला हा ड्रेस कसा दिसतोय ग?? म्हणजे मला कळत नाही की मला काय चांगलं दिसतंय ते….

खरच,अवघड आहे ना?????

"आता,परिस्थिती तीच आहे सगळीकडे,लक्षातच येत नाही स्वतःला काय पाहिजे,आपल्याला काय करायचं आहे ,बाहेरचा आवाजच एवढा आहे की मनातील आवाजच ऐकू येत नाही..

स्वतःच्या मनातील आवाज ऐकू जिथं येत नाही तिथं दुसऱ्याच्या मनाची साद काय कळणार ना!!

दिवस -रात्र, दुसऱ्याचा विचार करायचा,ते काय म्हणतील ,याचाच विचार करायचा,आलेले मॅसेज,फोटो & व्हिडिओ मध्ये किती वेळ जातो याच गणित ज्याचं त्याला चांगलं माहीत असते…

मग सुरवात होते ते,फक्त आणि फक्त उघड्या डोळ्यांनी आणि मिटलेल्या अंधाऱ्या स्वप्नाची… फक्त आणि फक्त आपण कसे असावे आणि काय करावं याच फक्त दिवा स्वप्न पाहायचं आणि त्याच स्वप्नात कधी गाठ झोप लागते ते पण कळतं नाही, दिवसामागून दिवस जातात आणि किती तरी वर्ष पण निघून जातात,राहतात त्या फक्त स्वप्नाच्या आठवणी ,ज्या नीट जगून पण देत नाहीत आणि नीट विसरून पण जात नाहीत…

भविष्यातील येणारा प्रत्येक दिवस हा,फक्त रोज हेच सांगणारा ठरतो,"स्वप्नांमध्ये रमून जाण्यापेक्षा ,ती पूर्ण करण्यात ,त्याची कृती करण्यात जर वेळ घालवला असता,तर काही तरी आज हातात असले असते.. पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच हातात उरत नाही..

हे सगळं कोणाच्या बाबतीत होत,माहीत आहे..ज्यांची स्वप्न तर मोठी असतात पण त्याना नक्की माहीत नसते त्यांना काय हवंय आयुष्याकडून…

काहीशी धूसर अशी स्वप्न, स्वप्न तर आहेत पण नीट दिसत नसतात…

आयुष्य ही एकदाच मिळणारी गोष्ट,ती भरभरून जगायची असते,येणार प्रत्येक दिवस वेगळा आहे आणि हो तो एकदा गेल्यावर परत येणार पण नसतो,हे पण तेवढच कटू सत्य..

स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी,बाहेरचा आवाज कमी असलाच पाहिजे असं नाही.. 

स्वतःच्या मनाचा आवाज फक्त तेव्हाच ऐकू येतो ,जेव्हा आपण आपल्या मनाशी संलग्न झालेलं असतो.. 

एकरूप झालेले असतो..

आपल्या मनाने घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो,फक्त तो ऐकायला आला पाहिजे..

स्वतःच स्वतःशीच एक नात बनवायचं, ज्या मध्ये स्वतःला शोधायचं ,काय हवं आणि काय नको, हे फक्त आपण च पाहायचं..आपलं मन आपणच जपायचं..मनाच्या विरोधात गेलं तर आपण कधी खुश नाही राहू शकत,हे तेवढच त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते पटवून घेतलं पाहिजे…

मनाशी घट्ट नात झालं मग,सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळून जातात..

जगण्याचं ध्येय, ठरवलं पाहिजे,नाहीतर आपण चालत राहतो आणि आपल्याला समजतच नाही की नक्की कुठे जायचंय..आणि नकळत आपण भरकटतो आणि मग शेवटी ध्येय तर मिळालेलं नसते पण मन मात्र थकलेलं असते…

बेभान धावणाऱ्या मनाला वेळीच लगाम घालायचं असतो..

योग्य सवयीने आणि योग्य ध्येयाने..

जगण्याची अशी पण एक वेळ येती,जेव्हा

click to more read...