नाते - नवरा बायकोचे ..

Husband And Wife Are Made For Each Other


\"जन्मोजन्मी हा चं नवरा मिळू दे\"
अशी प्रार्थना स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला करतात.
खरचं प्रत्येकीला चं वाटतं असतं का ..? \"जन्मोजन्मी हा चं नवरा मिळावा \" असे.
खुप कमी स्त्रिया असतील ज्यांना असे वाटतं असेल .
कारण अनेकांना तर या जन्मातचं इतका त्रास असतो की पुढच्या जन्माचा त्या विचार चं करीत नसणार..

असे म्हणतात की लग्नाच्या गाठी देवाने बांधलेल्या असतात. कधीही न पाहिलेल्या अनोळखी व्यक्ती शी नाते जोडले जाते.अरेंज मॅरेंज
ठरविताना आई वडील आपल्या मुलीसाठी चांगले चं स्थळ शोधतात. कर्तबगार मुलगा,पैसाअडका,घरची परिस्थिती वगैरे वगैरे आणि त्यात ही नात्यातला किंवा कोणी ओळखीचा जेणे करून स्थळ माहितीतील असावं आणि आपली मुलगी सुखात रहावी हा चं हेतू ..

आता तरी काळ बदलला आहे निदान मुला मुलींची आवड तरी विचारतात. एकमेकांना आवडत असतील तरचं लग्न जमवतात.लग्न जमवल्यापासून लग्न होईपर्यंत दोघांना ही एकमेकांना समजून घेण्यास वेळ मिळतो.स्वभाव, सवयी,आचार-विचार समजतात.
पूर्वी तर दोघांनी एकमेकांना पाहिलेले पण नसायचे ,मोठ्यांनी ठरवले तसे ..
लग्नानंतर नात्यांमध्ये आता सारखी मोकळीक नव्हती. एकत्र कुटुंब, मोठ्यांचा धाक ,पिढ्यानपिढ्या चालत आलेले संस्कार बायकांनी \"पती हा चं परमेश्वर\" या प्रमाणे वागणे.घरात पुरुषाचे वर्चस्व, महत्त्वाची कामे,व्यवहार पुरुष मंडळी नीं करायचे,स्त्री ने फक्त घरातील कामे चं करावीत .त्यामुळे बायको ही फक्त हक्काची गुलाम ! स्त्री ही मर्यादेत आणि बंधनात चांगली दिसते ,यातचं तिची शालीनता दिसून येते वगैरे या गोष्टी सांगून तिला रूढी,परंपरा ,संस्कार, शालीनता या चौकटीत ठेवले जात असे.
"चूल आणि मूल\" एवढाचं मंत्र तिला शिकवला जात असे.
स्त्रियां ही हे सर्व मान्य करून संसार करीत राहिल्या.
पूवी सती,केशवपन यासारख्या अनिष्ट प्रथा होत्या .नवरा गेला तर बायको ही सती गेली तर ती पुण्यवान असा समज होता.नवरा गेल्यावर केशवपन करणे,तिने कोणतेही अलंकार घालू नये कोणत्याही सण समारंभाला जाऊ नये अशी अनेक बंधने होती. पूर्वी बालवयात लग्न होत होती आणि बालवयातच नवरा गेला तर तिने बालविधवा म्हणून चं आयुष्य जगावे.
म्हणजे नवरा गेल्यानंतर बायकोच्या आयुष्याला अर्थ चं नसायचा .
तिचे चं काही तरी वाईट कर्म म्हणून ती विधवा झाली असे म्हटले जायचे.
पूर्वी माणसे एकापेक्षा जास्त पत्नी करत असतं विशेषतः राजे महाराजे.
बायको मेल्यानंतर पुरुषाला पुनर्विवाह करता येत असे ,एकापेक्षा जास्त बायका करण्याचा अधिकार होता.म्हणजे बायकांना कधीही स्वतः साठी जगता आले नाही .
अगोदरही आणि आताही स्त्रियांना अन्याय, अत्याचार सहन करावा लागत आहे.
असे म्हणतात की बायका सहनशील असतात आणि त्यामुळे चं कुटुंब टिकून राहते.म्हणजे स्त्री आणि सहनशीलता असे समीकरण चं बनले आहे...
आणि अन्यायाविरुद्ध कोणी आवाज ही उठविला तरी त्या स्त्रीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
पूर्वी स्त्रीचे जीवन पूर्णतः परावलंबी होते त्यामुळे तिला आधाराची गरज भासत असे आणि म्हणून ती सर्व सासरवास,अन्याय ,शारीरिक व मानसिक त्रास सहन करून सासरी चं राहत असे.
पण आता स्त्री अनेक गोष्टींत स्वावलंबी बनत आहे त्यामुळे तिला अगोदर सारखी आधाराची गरज नाही .
आता अनेक कायदे निघाले आहेत त्यामुळे ती अन्यायाविरुद्ध लढू शकते.
पूर्वी खुप तुरळक घटस्फोटाच्या घटना होत असतं.
पण सध्या घटस्फोटाचे प्रमाण खुप वाढत आहे.
स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली म्हणून..
की अजून काही कारण ?
खरे पाहता लग्न म्हणजे एक पवित्र बंधन,
पती पत्नीचे एक अतूट नाते....
अरेंज मेरेंज असो वा लव्ह मेरेंज लग्न झाले म्हणजे नवरा बायको हे नाते दोघांनीही छान निभवायचे असते.
नवरा बायको नात्याला संसाररुपी रथाची चाके म्हटली आहेत.
मगं रथाची दोघेही चाके चांगली मजबूत असावीत ,दोघांनाही सारखेचं महत्त्व असावे.
एक जरी चाक कमकुवत असेल तर रथ डगमगू शकतो.
नवरा बायको यांचे नाते मित्रमैत्रीणीसारखे असावे.
दोघांत प्रेम आणि विश्वास असावा.प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा.
सुखात,दुःखात एकमेकांना आधार द्यावा.
बायको जसे नवऱ्याच्या नातेवाईकांना मानपान देते,त्यांची सेवा करते मगं नवऱ्याला ही बायकोच्या नातेवाईकांना मानपान देणे योग्यचं ना ?
अनेक ठिकाणी बायकोला आणि तिच्या माहेरच्या व्यक्तींना हीन तेची वागणूक दिली जाते .
प्रत्येक पुरुषाने समजले पाहिजे की संसारात जितके महत्त्व नवऱ्याला तितकेचं महत्त्व बायकोलाही! बायकोकडे फक्त एक गुलाम,उपभोगायची गोष्ट म्हणून बघू नये तर ती एक व्यक्ती असते,तिलाही मन असते,भावभावना असतात. ती गृहलक्ष्मी असते.ती सुखी समाधानी तर चं घरात सुख शांती राहू शकते...
तिच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
बायकोला मारण्यात,अत्याचार करण्यात कसला पुरुषार्थ ?
स्त्रियांना जेव्हा जेव्हा पराक्रम,शौर्य करण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी संधीचे सोने केले.
इतिहासात स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्त्री जातीचा मान उंचावला आहे.
आजही अनेक स्त्रिया घर संसार सांभाळून आपआपल्या क्षेत्रात कार्यरत आहे.
बायको आपल्या पेक्षा जास्त कर्तृत्ववान असेल तर लगेचं नवऱ्याच्या पुरूषार्थाला,अहंकाराला ठेच पोहोचते.प्रत्येक नवऱ्याला वाटते बायको ही सर्वचं गोष्टीत आपल्या पेक्षा कमी असावी .पण असे का ?
आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा बायकोला आनंद असतो ,अभिमान वाटतो मगं नवऱ्यांना बायकोच्या कर्तृत्वाचा आनंद का नको?
बायको घरातील कामे करून आपली नोकरी, व्यवसाय सांभाळते मग नवऱ्याने घरातील कामात तिला मदत केली तर बिघडले कोठे?
हळूहळू आता परिस्थिती बदलत आहे.
अनेक ठिकाणी बायकोचा आदर केला जातो,तिच्या शी प्रेमाने वागले जाते,कामात ही मदत केली जाते.
अशी कुटुंब म्हणजे खऱ्या अर्थाने मेड फॉर इच अदर् ...
काही ठिकाणी बायकाही आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा ,सवलतींचा गैरफायदा घेत असतात.त्यामुळे सर्वांनाच त्रास होत असतो .मगं अशी उदाहरणे देवून बायकांना
नवऱ्यांचे टोमणे,उपदेश ऐकावे लागते.
नवरा आणि बायको दोघांनी ही आपले अधिकार,आपली कर्तव्यं,आपल्या मर्यादा समजून वागले पाहिजे. तरचं संसार सुखाचा होतो.बायको ही पतिव्रता म्हणून चांगली वाटते तसे नवरा हा ही तशा योग्यतेचा असावा.
प्रत्येकाला चं आपल्या मनासारखं सर्व भेटत नाही, काही आशा,अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे संसारात कधीतरी वादविवाद होत असतात. पण त्यातून ही मार्ग काढायचा असतो.अगदी घटस्फोट आणि इतर टोकाच्या भूमिका घेणे ही बरोबर नाही. इतरांनी कोणीही आपल्या संसारात कितीही विघ्ने आणली तरी नवरा बायकोने एकमेकांची साथ सोडू नये, दोघांनीही आपल्या गुणांच्या सोबतीने आदर्श संसार करावा.
तरचं विवाह संस्था टिकणार आणि भावी पिढीला विवाह संस्थेचे महत्त्व समजणार.

नवरा बायकोचे नाते म्हणजे...
\"तुझे माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना\"