स्वतःचे प्रतिबिंब

I wrote about my life in short words.

           या जगात प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यांचे गुण, अवगुण वेगळे आहेत. सगळ्यांचे आपले काही स्वप्ने आहेत. प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. तसचं माझही आहे. माझही व्यक्तीमत्व वेगळं आहे.

       माझं नाव ऋषिकेश मठपती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की माझं हे नाव डॉक्टरांनी मला दिलं होतं.  मी माझ्या कुटुंबातील सर्वात लहान आहे. लहानपणी ' छान छान गोष्टी ' हे पुस्तक आम्हाला अभ्यासाला होती. मला तर वाटतं की ते अभ्यासाला नसून गोष्टीतील बोध समजण्यासाठी होतं. त्यात कित्येक गोष्टी आम्ही झोपताना वाचत होतो. त्यातले गोष्टी वेगवेगळे बोध आम्ही घेत होतो. त्यानेच कदाचित मला गोष्टीची आवड निर्माण झाली. त्यानंतर मला गोष्टी लिहिण्याची उत्सुकता निर्माण झाली. शाळेत असताना शंभर पानी वहीमध्ये मी कथा लिहायचो. माझ्या कल्पनांना कागदावर उतरताना पाहत मला मज्जा वाटायची. एकदा हि गोष्ट माझ्या एका मित्राला कळलं आणि तो माझी ती वही दुसऱ्यांना दाखवला. वर्गात थोडी चर्चा झाली. त्या वेळी मुलींशी बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. माझ्या कथेची चर्चा मुलींमध्येही होऊ लागली. माझी ती वही ते घरीही घेऊन जाऊ लागले. वर्गात थोड का होईना प्रसिध्द झालो होतो.

      त्यानंतर जसं अभ्यास वाढू लागलं , तसं गोष्टीची ओढ ही कमी होऊ लागली. त्यानंतर शाळा संपली , अकरावी बारावी वर्ष ही संपलं. त्या वर्षात काही वेळच मिळालं नाही. बारावी संपल्यानंतर जेंव्हा मी ग्रेजूएशन मध्ये गेलो. तेंव्हा माझ्या आयुष्यात पुस्तकांचा प्रवेश झाला. कॉलेजमध्ये लायब्ररी होती. तिथून पुस्तक घ्यायचो आणि तिथेच वाचून परत द्यायचो. त्याकाळी कित्येक नवीन मित्रमैत्रिणी भेटले. त्याच्यासोबत कित्येक क्षण अनुभवले. त्या क्षणातले आठवणी तर मनात अजून आहेत. त्याकाळी काही ताण नव्हता , फक्त मित्र आणि मैत्रिणी सोबत केलेली मस्ती आठवते. त्याच क्षणातून मी कित्येक कथांचे घटनाही लिहिलो. शेवटच्या वर्षी खुपजण दुरावले.

        मला पुढील शिक्षण घ्यायचं होतं. पण ते माझ्या शहरात न घेता दुसरीकडे घेण्याचं ठरवलं. त्यासाठी परीक्षा दिली आणि माझ्या मिळालेल्या मार्कानुसार मला सांगलीतील विलिंग्डन कॉलेज येते जागा मिळाली. त्या शहरात माझ्या ओळखीचे कोणीच नव्हते , ना माझ्या नातेवाईक मधले होते. अडमिशन घेत असताना माझे बाबा सोबत आले होते. तेंव्हा ते मला विचारले ,' खरचं तुला इथे एम. एससी करायचं आहे?' तेंव्हा मी म्हणालो,' हो, मला इथेच करायचं आहे.' अडमिशनच्या वेळीच मी काही आपल्याच वयातील मुलांशी ओळख करून घेतली. ते सुध्दा एम. एससी करण्यासाठीं आलेले होते. तेही इथे राहण्यासाठी व्यवस्था करू पाहत होते आणि त्यांची थोडीफार ओळखीही होती. त्यांच्यामुळेच माझंही व्यवस्था झाली.

     आम्ही सगळे एकाच रूममध्ये राहू लागलो. कॉलेजला जाण्यापूर्वी मेसला जाऊन जेवण करणे, लेक्चर करणे , त्या लेक्चर मधून ब्रेक झाला तर चहा पिणे, लेक्चर संपल्यावर रूमवर येणे , त्यानंतर गप्पा गोष्टी आणि दंगामस्ती करणे हे आमचं दिनक्रम झालं होतं.

     काही दिवसातच मला नवीन मित्रमैत्रीण भेटले. दत्ता , जयदीप , उमेश ( आम्ही त्याला मास्तर असं म्हणायचो, कारण तो शिक्षक होताच , त्याप्रमाणे वागतही होता.) अक्षय , पूनम , समृध्दी , प्रणाली ,अपर्णा हे एका अनोळखी शहरात माझ्या कुटुंबातील सदस्यासारखे होते. अजून कित्येक मित्र आणि मैत्रिणी झाले. त्यांच्यामुळेच मी माझ्या घराबाहेर राहून हे जग कसं असतं? या प्रश्नाचं उत्तर भेटलं. काही दिवसाने मला परत लिहिण्याची ओढ निर्माण झाली. फर्स्ट इयरला असतानाच मी लिहायला सुरुवात केली.
  
      माझ्या घरात दोन मातृभाषा बोलले जातात. एक म्हणजे मराठी आणि दुसरं म्हणजे कन्नड. त्या दोन्ही भाषेचा प्रभाव माझ्या लेखनातून दिसू लागली. माझी पहिली कथा मलाच वाचावं असं वाटलं नाही. त्यानंतर कित्येक कथा वाचलो , पुस्तक वाचलो , मग आता कुठ थोडस लिहायला जमत आहे.

      बघता बघता एम. एससी कसं संपलं कळलच नाही. शेवटची परीक्षा घरीच संपली. कारण कोरोनामुळे कॉलेज बंद होते, पण परीक्षा तर द्यावी लागणार होती . म्हणून शासनाने घरीच बसून ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.  शेवटच्या पेपर संपल्यावर निर्माण होणारे आनंदाचे क्षण आम्ही अनुभवलीच नाही.

    एम. एससीच्या आधी मी शिकवणी घेत होतो. त्यातच मला शिकवण्याची गोडी निर्माण झाली. म्हणून मी बी. एड साठी आमच्या शहरातच एडमिशन घेतलो. पण कोरोना काही गेलेला नव्हता. म्हणून माझे दीड वर्ष ऑनलाईन मध्येच गेले. हळू हळू सर्वकाही सुरू व्हायला लागलं. त्यात कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग कॉलेजला जायची हुरहूर परत निर्माण झाली.

    उरलेल्या तीन महिन्यात मी कॉलेजची लाईफ जगलो. पण या वेळी शिक्षक म्हणून जगलो. त्यात एक नवीनच मज्जा आहे. कित्येक मॅडम आणि सर मला भेटले . त्यांच्या माझ्या जीवनात हातभार लागला.

    ते तीन महिने संपताच मी एका शाळेत शिकवण्यासाठी रुजू झालो. मुलांमध्ये राहून त्यांची परिस्तिथी जाणून त्यांना शिकवण म्हणजे एक वेगळेच कार्य असतं. एका पिढीला घडवणं हे खूप मोठं कार्य आहे. त्याचा मी भाग झालो हे माझं भाग्य. पण या सर्वात मी माझे छंद ही जोपसले. मी लिखाण तर करतच होतो, पण मला अजून एक छंद होता . ते म्हणजे बुद्धिबळ.. बुद्धिबळ आणि गणित यांचं नात खूप वेगळं आहे. म्हणून मला बुद्धिबळ खूप आवडतं. त्यात माझ्यात नवीन कौशल्य निर्माण झाली.

      शाळेत शिकवत असताना आमच्या संस्थेच्या शाळेमध्ये स्पर्धा होती. त्यात शिक्षकसुध्दा सहभागी झाले होते. मी बुद्धिबळ या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलो. माझं हे छंद मला एक नवीन व्यक्तिमत्व देऊन गेलं.

     माझं सध्याचं वय २६ आहे. माझं कुटुंब मला आधीपासून सपोर्ट करत आलेलं आहे. या वयात मी माझं आत्मचरित्र लिहितोय. थोडसं वेगळं वाटतंय, पण त्यातही थोडीशी मज्जा आहे.

     आपल्या जीवनात कुटंब सोडून एकजण अजून असतं जे आपल्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करत. ती व्यक्तीही मला लाभली . माझ्या सुखात साथ देणं, माझ्या दुःखात मला सांभाळणं, आजारी पडल्यानंतर आई नंतर तिचं व्यक्ती आपली काळजी घेऊ पाहत असते. मी खूप ऋणी आहे त्या व्यक्तीचं....

    खूप काही क्षण जगायचं आहे. अजून सुखाचे क्षण अनुभवायचे आहेत. इतक्यात आत्मचरित्र लिहिणं जरा लवकरच होईल. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते थोडक्यात माडण्याचा प्रयत्न मी केला. सर्वकाही मांडू शकलो नाही. पण तुम्हाला माझं आयुष्य वाचून कसं वाटेल , याची थोडीशी उत्सुकता असेल.

धन्यवाद

*********************************

ऋषिकेश मठपती