रेड वाइन...स्पर्धात्मक रहस्यं लघुकथा

अर्धा तासानंतर सुहा घरी आला. डोअर बेल वाजवली पण बराचवेळ झाला तरी निकीने दरवाजा उघडला नाही. मग तो

निकी त्या दिवशी खूप खुश होती, तिच्या आणि सुहाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. तिने आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं.

सकाळी उठल्याबरोबर सुहाने तिला anniversary च्या शुभेच्छा दिल्या, संध्याकाळी लवकर येतो मग बाहेर जाऊ असं सांगून सूहा आवरून ऑफिस मध्ये निघून गेला. निकिने त्या दिवसाचा प्लॅन एक्झिक्युट करायला घेतला. सगळं आवरून ती बाहेर गेली. सुहासाठी छान शर्ट घेतला. येताना हॉटेल मध्ये संध्याकाळ साठी जेवणाची ऑर्डर दिली. डिलिव्हरी प्लेस, टाईम सगळं फिक्स केलं..

घरी आल्यावर पुढची तयारी करायला घेतली, हॉल आणि बेडरूम छान डेकोरेट केली. हॉल मध्ये मस्त हार्ट शेपचे balloon’s लावलेत, टेबल वर दोन  कँडल्स ठेवल्या, त्या मधोमध हार्ट शेपचाच केक ठेवला. एक रेड वाइन ची बॉटल आणि दोन वाइन ग्लासेस ठेवले.

 बेड वर रेड रोझच्या पाकळ्या टाकल्या, मंद लायटिंग लावली, एकदम रोमँटिक वातवण तयार केलं. मग स्वतः तयार झाली. रेड सिल्कची साडी. गळ्यात छान नाजूक मंगळसूत्र, केस कुरळे करून मोकळे सोडलेले. नाजूक निकी अजूनच छान दिसत होती. तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले.

निकीने सुहाला फोन केला, मी अर्धा तासात येतो. म्हणत त्यांनी फोन ठेवला. तिने सगळ्या घरात रूम फ्रेशनर मारले.

अर्धा तासानंतर सुहा घरी आला. डोअर बेल वाजवली पण बराचवेळ झाला तरी निकीने दरवाजा उघडला नाही. मग तो स्वतः कडच्या चवीने दार उघडून आत गेला. आतली तयारी बघून वाटलं की अजून काही सरप्राइज असेल. त्याच्या हातातली बॅग खाली ठेवली, आणि तिच्या साठी घेतलेलं गिफ्ट घेऊन आत गेला. आता त्याच्या साठी खरंच सरप्राइज होतं, असा की ज्याचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता.

त्याची खूप सुंदर बायको बेड वर निपचित पडलेली होती, रक्ताच्या थारोळ्यात, तिचा खून झाला होता, अगदी निर्दयी पणे, तिचा गळा कापला होता, पोटात खुपसलेला चाकू तसाच होता.

हे बघून सुहाचा जीवच गळाला. त्यानी स्वतः ला सावरत पोलिसांना फोन केला. थोड्यावेळात पोलिस आले. सुहा ने सगळं सांगितलं की कसा तो आत आला आणि त्यांनी काय बघितलं.

पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना हॉल मध्ये टेबल वर एक वाइनने अर्धा भरलेला ग्लास दिसला. पण तिथली बॉटल मात्र उघडलेली नव्हती. ह्याच त्यांना नवल वाटलं, घरात जबरदस्ती घुसल्याच्या खुणा नव्हत्या, सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या, म्हणजे खुनी ओळखीचा असावा. त्यामुळे सुहावर पण संशय होता त्यांचा, पण तपासात त्याच्या विरोधात काही सापडले नाही.

घरातून मिळालेल्या ग्लास वर काहीच सापडले नाही. आठ महिने उलटून गेले पण काही सूत्र हाती लागत नव्हते.

सुहा हळू हळू सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता. निकीच्या माहेरचे पण सत्य स्वीकारू लागले होते. घरच्यांच्या आग्रह खातर सुहा दुसऱ्या लग्नाला तयार झाला. साखर पुडा झाला.

पण सुहाच्या मनात अनेक प्रश्न अजूनही होते, असं कोण आला असेल ज्याच्या साठी निकीने दार उघडलं. काय झालं असेल त्या अर्धा तासात? का झालं असं? काय दोष होता तिचा, आणि माझ्या न जन्मलेल्या बाळाचा.?

निकी दोन महिन्यांची प्रेग्नंट होती, सुहाला हे पोलिसांनी सांगितले, पोस्ट मार्टेम नंतर.

एक दिवस पोलिसांना काही सूत्रे हाती लागली. तपास परत जोमाने सुरू झाला, आणि सत्य सगळ्यांच्या समोर यायची वेळ आली, ते एकूण सगळ्यांनाच धक्का बसणार होता.

पोलिसांनी घरातील सगळ्यांना स्टेशनला बोलावले. खुनी इथे जमलेल्यांपैकीच आहे.

शेवट आला होता, सत्यावरून पडदा उठवायची वेळ आली होती. पोलिसांनी त्या व्यक्ती कडे बोट दाखवलं. सगळे आश्चर्याने बघत होते. कोणाला विश्वास बसत नव्हतं की हीच ती व्यक्ती आहे जिने हे सगळं केलं...!

तिने तिचा गुन्हा कबूल केला. ...

मी आणि निकी बहिणीच नव्हे तर चांगल्या मैत्रिणी पण होती. एकत्रच एका शाळेत गेलो, कॉलेज पण सोबत केलं. आमचं एकमेकांशिवाय पान हलत नव्हतं, नंतर निकीच लग्नं झालं आणि आमच्यात दुरावा आला. ते मला सहन होत नव्हतं.

त्या दिवशी निकी मला बाहेर भेटणार होती, आम्ही सुहा साठी शॉपिंग करणार होतो, नंतर घरी जाऊन मी तिला decoration मध्ये मदत करणार होते. मी CC TV मध्ये दिसली नाही कारण एक तर ती आधी मला बाहेर भेटली, नंतर केक वितळणार हा बहाणा करून मी तिच्या आधी तिच्या घरी गेले, ती जेवणाची ऑर्डर देऊन आणि आमच्या साठी लंच घेऊन घरी आली. त्यामुळे निकी आल्यानंतरच्या फुटेज मध्ये मी दिसले नाही. मग आम्ही सगळी तयारी केली, तेव्हा निकीने ती प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. तयारी करताना आम्ही आमच्या आवडीची थोडी रेड वाइन घेतली जी मी माझ्या सोबत आणली होती. आम्ही दोघी अशी वाइन नेहमीच घेत होतो, तिच्या लग्नाच्या आधी. तिने ते ग्लास धून ठेवले.

मला तिला सुंदर मरण द्यायचं होतं. म्हणून मी सगळी तयारी करू दिली, आणि तिचा व सुहाचा फोन झाल्यावर पाहिले तिचा गळा कापला, आणि नंतर पोटात चाकू खुपसला. त्या बाळाचा पण मला राग येत होता. नंतर मी तिथे बसून आमची आवडती रेड वाइन घेतली, ग्लास पुसून ठेवला. दार लावून वर गच्चीत जाऊन बसले. पोलिस आले त्यांनातर् सोसायटीच्या बाहेर पडले. त्यामुळे परत माझ्यावर संशय आला नाही, करणं साधारण दोन तासांनी मी बाहेर गेले. मला ग्लोव्हज घालून काम करायची सवय आहे, त्यामुळे तिला त्यात काही वेगळं वाटलं नाही, आणि म्हणून माझे फिंगर प्रिंट्स पोलिसांना कुठे सापडले नाहीत.

ती सांगत होती, पोलिसांनी तिला तरी ही ती पूर्ण गोष्ट सांगत नाहीये असं बोलले, तिला थोडं धमकावून बोलायला भाग पाडलं. त्यावर ती म्हणाली. निकी माझी सगळं काही होती, पण मी ज्याच्यावर प्रेम केलं तिच्या पेक्षा जास्त त्याच्याशीच तिने लग्नं केलं, वरूनंत्याच्या बाळाची आई होण्याचं स्वप्न बघत होती. म्हणून मी तिला मारलं. मी तिला हे सांगणार त्या आधीच तिचं सुहाशी लग्न ठरलं आणि सगळं संपलं.

पोलिसांच्या खुल्यासा वरून जेव्हा त्यानी CC TV परत बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी संशयास्पद बाई दिसली. तिने तिचा चेहेरा ज्या दुपट्यानी बांधला होता. तसाच दुपट्टा आम्ही क्षिप्रा कडे बघितला. हा निव्वळ योगायोग असू शकतो पण तरी, त्यानंतर त्यांनी क्षिप्रा वर नजर ठेवली. त्यात तिची डायरी त्यांना सापडली. आणि सगळं सत्य बाहेर आले.

सुहा सगळं ऐकून हदरलाच. शिप्रा असं कसं वागलिस तू...? तुझ्यावर इतका विश्वास ठेवला निकीने, आमचं लग्न ठरलं तेव्हा मला वाटलं तुम्ही दोघी चुलत नाही सख्या बहिणी आहात.

मी किती मूर्ख, निकी गेल्यावर तू दिलेल्या आधाराला काळजी समजलो आणि तुझ्याशी लग्नाला तयार झालो. पण तो तुझा फक्त डाव होता. तू फक्त निकीचाच नाही तर आमच्या सगळ्यांचाच खून केला आहेस.

क्षिप्राच्या घरच्यांनी तिला कठोर शिक्षेची मागणी केली.

क्षिप्राला केल्याला कृत्याचा पस्तावा होत होता. पण आता तिच्या मैत्रिणीचा जीव परत येणार नव्हता. .....

शेवटी अपराध हा अपरधाच असतो, त्याला क्षमा नसते, रागात, इर्षेत माणूस चूक करतो आणि मग आयुष्यभर भोगतो. 

धन्यवाद

प्रिय वाचक मित्रांनो, ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे, आणि फक्त मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, ह्या कथेचा वास्तविक तेशी काहीही संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

ह्या कथेतून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की,  सावध राहा, अपराधीक भावनेला जन्म न देता, घडलेल्या गोष्टीवर पाणी टाका आणि पुढे सरका. परिस्थिती आहे तशी स्वीकारली तर अशे गुन्हे घडत नाही.

कथेला नक्की लाईक द्या, त्यामुळे  हुरूप वाढून सुंदर कथा सादर करायला प्रेरणा मिळते