रेसिपीज इन मराठी रवा उत्तप्पा

Recipe

          रवा_उत्तप्पा                                                         अगदीच घरच्या साहित्यात होणारा झटपट छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी पटकन धावून येईल असा हा पदार्थ. चला तर पाहूया अगदीच चटपटीत न शॉर्ट रेसिपी...                                                            साहित्य:- 1 कप बारीक रवा.  1/2 दही 1/4 चमचा खाण्याचा सोडा. एक मध्यम कांदा एक टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ                                                                   कृती:- दही व रवा व्यवस्थित फेटून घ्या आता बॅटर चा घट्टपणा पाहून पाणी थोडे थोडे करून इतपत मिक्स करा की बॅटर सहज पडेल पण तार धरणार नाही कारण उत्तप्पाचे बॅटर डोस्या पेक्सा घट्टसर असते...आता मीठ व सोडा मिक्स करा व 10 मिनिट सेट होण्यासाठी ठेवून द्या. दुसरीकडे एक मध्यम कांदा टोमॅटो कोथिंबीर व 4-5 मिरच्या एकदम बारीक कट करून ठेवा. आता तोपर्यंत बॅटर सेट झाले असेल डोश्याचा तवा किंवा साधा लोखंडी सुद्धा घेऊ शकता गरम होण्यासाठी गॅस वरती ठेवा व चमचाभर तेल ओता टिशू पेपर असेल तर त्याने किंवा अर्धा कांदा घेऊन त्याने तेल एक सारखे करून घ्या. बॅटर तव्यवर्ती टाका हँडल ला फिरवून तवा हाथमध्ये घेवून गोल आकार द्या किंवा उलथण्याने करा. 10 -20 सेकंद डोस सेट होऊ द्या व मग मिरची टोमॅटो व कांदा कोथिंबीर एक मागून एक एक सर्वत्र पडेल असे टाका मग उलथण्याने सर्वत्र थोडा दाब द्या म्हणजे कांदा टोमॅटो पडणार नाहीत..मंद आचेवर 5-6 मिनिट भाजा मग चमचाभर तेल डोस्यावरती व बाजूने टाकून डोस व दुसऱ्या बाजूने पण खरपूस भाजून घ्या... गरमागरम डोस्यांचा चटणी sauce सोबत आस्वाद घ्या किंवा गरमगरम नुसते पण लगेच फस्त होतात बरे...                     आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा. स्वस्थ राहा.मस्त खा.