Jan 23, 2021
माहितीपूर्ण

सण वार आणि पदार्थांची रेलचेल

Read Later
सण वार आणि पदार्थांची रेलचेल

गणपती बाप्पा आले की रोज काहीतरी गोड करत असतो आपण... हा बाप्पा कोणाकडे दिड दिवस, कोणाकडे पाच तर कोणाकडे दहा दिवस आता रोज गोड काय करायचं?? असा प्रश्न आपल्याला पडतो नाही का?? तर अशाच दोन गोड रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे... दोन्ही गुजराती गोड पदार्थ आहेत.... आणि जोडीला एक तिखट पदार्थ...

पहिला पदार्थ आहे मक्याचा शिरा....

सध्या मका म्हणजेच कणीस याचा सीझन आहेच... तर या पासून आपण कटलेट, भजी, भाजी असे बरेच तिखट पदार्थ बनवतोच, आज मी तुम्हाला या पासून शिरा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे...

साहित्य-

एक वाटी मक्याचा कीस
साखर एक वाटी
तुप 2 चमचे
वेलची पावडर १ चमचा
केसर सिरप २ चमचे
सजावटी साठी ड्रायफ्रुटस

आता आपण कृती बघूया...

मक्याचे दाणे काढून मिक्सरला बारीक किस करून घ्यायचा...त्यानंतर एका पॅन मध्ये तुप टाकून त्यात तो किस टाकायचा..एक वाफ घेऊन थोडे भाजायचे मग त्यात एक वाटी साखर टाकायची.. आणि एक वाफ घ्यायची, ५ मिनिटात छान एकसंध होऊन गोळा झाले की केसर सिरप टाकून १ मिनिट हलवायचे... मग् गॅस बंद करून त्यात वेलची पावडर आणि ड्राय फ्रुटस घालून परत सर्व मिश्रण एकत्र झाले की एका प्लेट मध्ये काढून छान सजवायचे... आपला शिरा तयार...

२. गुळपापडी... ह्याला सुखडी असे पण म्हणतात...

साहित्य--

बारीक चीरलेला गुळ--- १ वाटी
गव्हाचे पिठ- १ वाटी
साजुक तुप-- १ वाटी
काजू बदाम पावडर १_ वाटी
वेलची पावडर
आणि जायफळ
सजावटी साठी ड्रायफ्रुटस


आता आपण कृती बघूया...

एका कढईत तुप टाका... पातळ झाले की त्यात गव्हाचे पिठ टाकून छान भाजून घ्यायचे... रंग बदलला की त्यात काजू- बदाम पावडर टाकायची, १ मिनिट मिश्रण हलवत राहायचं आणि मग् गॅस बंद करून कढई खाली एका स्टॅन्ड वर ठेवायची त्यात बारीक चिरलेला गुळ टाकून, गुळ विरघळे पर्यंत हलवत राहायचे... मग् त्यात वेलची पावडर टाकायची...आणि थोडे जायफळ किसुन टाकायचे... आणि मग् एका ट्रे मध्ये तुप लावुन ते मिश्रण ओतायचे आणि त्याच्या वड्या पाडायच्या... वरून ड्रायफ्रुटस टाकून छान सजवायचे तुमची गुळपापडी तयार....आणि ही छान टीकते...


३. थालीपीठाचे तुकडे.....

हा पदार्थ माझे लग्न होईपर्यंत मला माहिती नव्हता..माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी... दरवर्षी गणपतीला आमच्याकडे हा पदार्थ आम्ही आवर्जुन करतो... कारण नैवेद्य, आणि येणारे पाहुणे यामुळे गोड
पदार्थ हे होतातच... पण गोड खावून कंटाळा आला कि तोंडात टाकायला काहीतरी तिखट/ चमचमीत हवे... अशा वेळेस या पदार्थाकडे आपोआप हात जातो...आमच्या कडे गणपतीला येणार्या प्रत्येक व्यक्तीला अगदी आवडणारा हा पदार्थ आहे...

साहित्य----

थालीपीठ भाजाणी मोठ्या ४ वाटी
तिखट 4-5चमचे (आम्ही बेडगी वापरतो)
हळद 2 चमचे
मसाला 2-3 चमचे
मीठ चवीनुसार
सुके खोबरे, जिरे, लसूण हे मिक्सरला फिरवून घेणे,
तेलाचे मोहन... आणि किंचित सोडा..
घट्ट पीठ भिजवून ते थापुन त्याचे तुकडे करायचे आणि तेलात तळायचे....
छान 8 दिवस टिकतात...

वरती दिले आहे ते प्रमाण तुम्ही तुमच्या चवी नुसार बदलु शकता...

थालीपीठ भाजाणी आपल्या कडे असते...हल्ली बाहेर सुद्धा मिळते... तरीपण खाली त्याचे घटक सांगत आहे...

भाजाणी मध्ये वापरले जाणारे घटक-----

तांदुळ २की,  मूगडाळ १०० ग्रॅ, उडीदडाळ १०० ग्रॅ, चणाडाळ २०० ग्रॅ, ज्वारी १ की, बाजरी ५०० ग्रॅ हे सर्व भाजून ते दळणे...

कशा                  वाटल्यया रेसीपी नक्की      सांगा...


©  अनुजा धारिया शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...