Login

रेसिपीज इन मराठी व्हेज कटलेट

Veg cutlet

व्हेज कटलेट                                                                   मुलांना आवडतात त्या भाज्या आणि अगदी नावडत्या भाज्या असतील तर त्यासुद्धा घालून करता येतील असे व्हेज कटलेट .                                                          साहित्य : दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरं एक वाटी कोबी अर्धी वाटी गाजर पाव वाटी फरसबी अर्धी वाटी फ्लॉवर एक वाटी बीट दोन मोठ्या आकाराचे बटाटे (सोलून , चिरून पाण्यात घालून ठेवा .) (आवडीप्रमाणे आणि आवडत्या प्रमाणात भाज्या ) एक वाटी मिळून वाफवलेले मक्याचे दाणे आणि मटार दोन मिरच्या सात - आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं ( आलं , लसूण , मिरचीची पेस्ट किंवा बारीक चिरून ) पाऊण चमचा गरम मसाला गरजेप्रमाणे मीठ दोन चमचे चाट मसाला एक चिज क्युब कोथिंबीर जाड किंवा पातळ पोहे मिक्सरला फिरवून त्याची पूड चार चमचे पाव वाटी रवा ( जाड किंवा बारीक ) तेल - कटलेट भाजून घेण्यापूरते.                                                                कृती: तापलेल्या लोखंडी कढईत तेल घ्या . तेल तापले की त्यात जिरं घाला . जिरं फुटल्यावर त्यात गाजर , मटार आणि मक्याचे दाणे सोडून वर दिलेल्या बाकीच्या भाज्या चिरून आणि बटाट्यातलं पाणी काढून घेऊन नुसत्या बटाट्याच्या फोडी घाला . आलं , लसूण , मिरची घालून परतून घ्या . झाकण ठेऊन सात - आठ मिनिटं वाफवून घ्या . सात आठ मिनिटांनी झाकण काढून वाफवलेले मक्याचे दाणे , मटार आणि गाजर घाला . झाकण ठेवून परत सात - आठ मिनिटांसाठी वाफवून घ्या . भाज्या वाफल्य आहेत ह्याची खात्री करून मीठ , गरम मसाला , चाट मसाला घालाआणि ढवळून घ्या . मिश्रण गार करन मॅशर च्या साहाय्याने एकजीव करून घ्या . चीज आणि कोथिंबीर घाला . कटलेट बाईंडिंग साठी बारीक करून घेतलेले पोहे घाला . एकत्र करून मुलांना आवडेल तो आकार कटलेटला द्या . रव्यात मीठ घालून मिक्स करून घ्या आणि त्यात कटलेट घोळवून तव्यावर ठेऊन , तेल सोडून , दोन्ही बाजूनी भाजून घ्या . तयार झालेल्या कटलेटवर कीसलेले चीज घालून चटणी किंवा सॉसबरोबर खायला घ्या .                                                    टीप : आलं , लसूण , मिरची आणि भाज्या ह्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता .                        आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा स्वस्थ राहा.मस्त खा.

0