रेसिपी इन मराठी रबडी

रबडी

             रबडी                                                        साहित्य: १ लिटर दूध ४-५ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टेस्पून दूध मसाला ( ह्यात जायफळपूड, वेलचीपूड,थोडे केशर व सुक्या-मेव्याची पूड असते.तुम्ही हवे असल्यास सगळे वेग-वेगळे घालू शकता) सजावटीसाठी पिस्त्याचे काप चिमूट्भर केशर चांदीचा वर्ख (ऐच्छिक).                                                                     कृती:- एका नॉन-स्टीक भांड्यात दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे. दूधाला उकळी येऊन वर साय जमा व्ह्यायला लागली की , चमच्याने सायीला भांड्याच्या कडेला लावत जावे. जेव्हा-जेव्हा साय दूधावर यायला लागेल तसे-तसे ती कडेला लावावी. आच मंदचं असावी नाहीतर साय करपेल. दूध बर्यापैकी आटले असे वाटले की कडेची साय हळू-हळू चमच्याने काढून दुधात मिसळावी. त्यात दूध-मसाला घालून अजुन थोडे आटवून घ्यावे. दूधाला दाटपणा आला की त्यात थोडी-थोडी करुन साखर मिक्स करुन घ्यावी. गॅस बंद करून रबडी पूर्ण गार होऊ द्यावी, गार झाल्यावर रबडी जरा घट्ट वाटेल. सर्व्हिंग बाऊलमध्ये रबडी घ्यावी व त्यावर पिस्त्याचे काप घालावे. चिमूटभर केशर व चांदीचा वर्ख लावून घ्यावे.                  आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा स्वस्थ राहा. मस्त खा.