रेसिपी इन मराठी कलाकंद

कलाकंद

           कलाकंद                                                        साहित्य: 500 मिली फुल फॅट दूध ,एक कप दूध पावडर, पाव कप साखर ,चार मोठे चमचे तूप ,काजू आणि पिस्त्याचे काप, केसर.                                                            कृती: मंद आचेवर एका जाड बुडाच्या कढईत दोन चमचे तूप आणि दुध टाका. एक सारखे ढवळत रहा. अर्धे आटल्यानंतर त्यात दूध पावडर टाका. पुन्हा एक सारखे ढवळत रहा. दाटसर मिश्रण तयार होईल. सर्व बाजूने राहिलेले तूप सोडा. साखर घाला आणि परतून घ्या. एक ते दोन मिनिटे छान हलवून घ्या. गॅस बंद करा. त्यानंतर एका स्टीलच्या ताटाला तूप लावून त्यावर ते मिश्रण एकसारखे थापून घ्या. काजू पिस्त्याचे काप आणि केशर वरून घाला. सुरीच्या सहाय्याने चौकोनी तुकडे कापा आणि गार झाल्यानंतर काढून घ्या.               आवडल्यास लाईक नी कॉमेंट नक्की करा. स्वस्थ राहा. मस्त खा.