बाळ की करिअर !! भाग - ३

woman empowerment marathi cinema marathi movie marathi woman feminist feminism

घरात घडलेल्या  प्रसंगापासून शांताबाई अगदी शांत झाल्या होत्या. आजपर्यंत घरात कोणालाही एक शब्द सुद्धा न बोलू देणाऱ्या शांताबाईना  आपल्या सुनेकडून शब्दांची चांगली चाप बसली होती. आजपर्यंत असणारा दरारा एका क्षणात नाहीसा झाला.

शांताबाई आधीच वयस्कर असल्यामुळे तब्येत सुद्धा सांभाळणं भाग होतं. तो  दिवस असाच निघून गेला.. घरात आनंदाची लाट आली आणि सासूबाईंमुळे ज्या वेगाने आली होती त्याच वेगाने नाहीशी झाली. 

घरातलं  वातावरण अजूनही विस्तरलेलं नव्हतं.

निकिता आपल्या खोलीच्या खिडकी बाहेर चंद्राकडे बघून विचारात गुंतून गेली होती.  आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रश्न तिला सतावत होता. ह्या एका निर्णयावर तिच्या आयुष्याचे पुढचे टप्पे ठरणार होते.

एका बाजूने शांताबाईचा अबॉर्शन ला विरोध आणि दुसरीकडे सासूबाईंचा आपल्या निर्णय घेण्याचं  दिलेलं स्वातंत्र्य ह्या दोघात ती अडकून बसली होती. 

सासूबाईंचा असा प्रतिसाद निकिता ला अजिबात अपेक्षित नव्हता त्यामुळे आपण कितीही नाही म्हटलं तरी मूल होऊ द्यावंच लागणार होतं हे निकिता ला ठाऊक होतं. पण सासूबाईंचा असा प्रतिसाद बघून ती अजूनच पेचात पडली.

सकाळी उठून पहिले माहेरी जाऊन आईला आणि तिच्या मोठ्या बहिणीला सांगेन असा तिने ठरवलं आणि झोपी गेली. 

सकाळी लवकर उठून आवरुन शांताबाईच्या पाय पडायला गेली. शांताबाई मात्र अजून झोपेतून उठल्या नव्हत्या. दुरूनच नमस्कार करून ती माहेरी निघाली..

" अग बाई , कोण आलं बघ "! - अंकिता म्हणाली 

" अग आज कसाकाय अचानक? एक फोन तर करायचा", सगळं ठीक ना बेटा ?? निकिता ची आई म्हणाली 

" हो ग आई,  सगळं ठीक आहे ... आधी मला मस्त गरम गरम चहा दे बरं " 

आई ने तिघींसाठी चहा बनवला आणि बाहेर असलेल्या  झोपाळ्यावर त्या तिघी जणी बसल्या .

निकिताच्या आईने  न राहवून  पुन्हा विचारलं , निकिता सगळं ठीक आहे ना ?"

हो ग आई सांगते.. चहा चा एक घोट घेत तीने बोलायला सुरवात केली..

काल मी आणि कुशल दवाखान्यात गेलो  होतो , आणि डॉक्टर बोलले की मी आई होणार आहे !

"काय??" खरंच ?? मी आजी होणार ? निकिता च्या आई च्या आनंदाश्रू आले ..

" अग आता काळजी घ्यायला हवी, आणि कितवा महिना ?" कोणता डॉक्टर ??

अगं आई थांब .. तिला पुढे बोलू दे .....- अंकिता म्हणाली.

निकिता ने घरात काल  घडलेली संपूर्ण घटना आई आणि अंकिता ला सांगितली. 

आणि ते ऐकून आई चा खुललेला  चेहरा पुन्हा कोमेजून गेला. 

" मग काय करायचं ठरवलं आहेस"?

" काल पर्यंत वाटत होता की ऍबॉर्शन करून टाकुयात, पण सासूबाईंचं  बोलणं ऐकलं आणि वाटलं कि आपल्याला घरात इतका स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचं म्हणून चुकीचा निर्णय घेतला तर मीच जबाबदार राहणार आणि शांताबाई ची तब्येत पण आता खराब च होत चालली आहे दिवसेंदिवस आणि मागे त्यांनी मला बाळाबद्दल सांगितलेलं अगदी लक्षात आहे माझ्या.."

" चहा चा कप ठेऊन ती आईच्या कुशीत येउन बसली.. झोका हळू हळू झुलत होता

" आई , मला काय करू काहीच समजत नाही.. एका बाजूला मी पाहिलेली स्वप्न.. लहानपणापासून तूला माहितीये की  हे हॉटेल उभं करण्याचं माझा स्वप्नं .. त्यासाठी मी किती मेहनत आणि कष्ट घेतलेत "

आणि हॉटेल साठी जमीन ३ महिन्याचा आत नाही घेतली तर जमिनीचा मालक ती दुसऱ्याला विकुन द्यायचं म्हणतोय."

आई ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला "

" हे बघ, तुझ्या सासूबाईंनी तुला निर्णय घ्यायचं  स्वातंत्र्य दिलं , तुझ्यासाठी त्या शांताबाई शी भांडल्या ते फक्त तू अबॉर्शन  करावं म्हणून नाही तर तुझ्या आयुष्यात तुला निर्णय घ्याचा अधिकार आहे म्हणून"

"  हो आई, पण त्यामुळे मला अजूनच पेचात पडल्या सारखं होतंय,, आता माझा निर्णय चुकला तर आयुष्यभर मला त्याचे परिणाम भोगावे लागणार "

" स्वातंत्र्य आणि जबाबदारी सोबतच येतात निकिता" - " तुला तुझ्या आयुष्यात काय करायचं हा  संपूर्णपणे तुझाच निर्णय असेल.

तुला करिअर इतकच महत्वाचं असेल तर शांताबाईंना समजावून, घरच्यांना विश्वासात घेऊन तू ऍबॉर्शन चा एक विचार करू शकते.. 

आणि दुसरा म्हणजे तू मूल जन्माला देणार आहेस ते तुझ्या आनंदासाठी, तुझ्या मातृत्वाच्या अनुभवासाठी,  जन्माला घातलेल्या जिवाने समाजाला योगदान द्यावे ह्या साठी... ह्या साठी नाही कि शांताबाई ना नातू हवा आहे म्हणून...

मातृत्व म्हणजे सगळ्यात मोठी शक्ती जी देवाने फक्त स्त्रेयांना दिली. आज तंत्रज्ञानामुळे  निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जाऊन आपण नियम तोडतो पण जी गोष्ट देणगी म्हणून मिळतीये तिला नाकारनं म्हणजे निव्वळ मूर्खपणा .

तुझ्या सासूबाई ह्यासाठी नाही लढल्या तुझ्यासाठी कारण त्यांना मूल  नकोय, त्यान्ना एका स्त्री ला स्वतंत्रपणे विचार करू देता यावा यासाठी. ऍबॉर्शन हे त्यांचा उद्धेश्य नसेल पण फक्त शांताबाई च्या म्हणण्यानुसार तू मूल  जन्माला  देशील आणि त्या जीवाला मातृत्वाचा स्पर्श मिळणार नाही.. आयुष्यभर तो तुझा मुलगा नाही तर एक म्हाताऱ्या जीवाचा हट्टापायी जन्मला आलेला एक व्यक्ती म्हणून जिवंत राहील.मानसिकरीत्या ..तुला मूल हवं जरी असलं तरी हे मूळ फक्त शांताबाईंच्या समाधानासाठी आहे हे तुझ्या मनाच्या कोपऱ्यात आहे.. म्हणून तू ह्याचा स्वीकार करायला  तयार नाही आणि करिअर ची ढाल वापरून तू परिस्थितीपासून पळून जाण्याचा विचार करतेय..

स्त्री म्हणजे मायेचा सागर, हा मायेचा सागर कसा बरं आपल्या पोटाच्या गोळ्याला दूर करेल.?

पण आज काल तुझे मॉडर्न विचार ह्या मातृत्वाला नाकारत असतील तर मी सुद्धा तुझ्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. माझा सांगण्याचं उद्द्येश हाच आहे कि करिअर तुला महत्वाचं असेल तर तुझं करिअर कर .. मूल  हवं असेल तर जन्म दे.. पण फक्त लोकांच्या दबावाखाली मूल  जन्माला देणार असली तर मीच ऍबॉर्शन करायला सांगेन 

हे सगळं ऐकून निकिता च्या डोळ्यात कधी पाणी आलं तिलाच समजल नाही. आपल्या आईच्या सांगण्याने आपल्या मनातल्या   विचारांचा गुंता सुटला आणि तिला तीचं उत्तर मिळालं  होतं.

" तुला खरं सांगू आई ... मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मला हे मूल  हवं होतं. पण मी मानसिकरीत्या तयार नव्हते आई होण्यासाठी कारण मी फक्त एक बिसनेवुमन होते जिला फक्त आपला बिसनेस च आपला सर्वस्व वाटत होतं. 

पण आज सकाळी उठल्यावर मला आपल्या पोटात एक जीव आहे ह्याची जाणीव झाली आणि नकळत जगात अस्तित्वात नसलेल्या बाळाबद्दल कुतूहल, प्रेम आणि काळजी वाटू लागली.. आणि तुझे हे शब्द ऐकल्यावर ह्या सगळ्या गोष्टी मनात किती गुंता करून होत्या हे समजलं.

" मग आता जमिनीचं काय? ती जमीन अशीच जाऊ देणार?

" हा हा .. अग नाही.... अजून ३रा महिना आहे अजून ६ महिन्यात प्लॅन .. आणि बाळ एक वर्षाचं होईपर्यंत हॉटेल च बांधकाम होईल आणि मग पुन्हा....."

" पुन्हा काय,, दुसरं मूल???"० अंकिता म्हणाली 

" निकिता ला हळूच अंकिता च्या पाठीत ठपका मारला "

तिघी जणी हसायला लागल्या आणि कपातला  चहा मात्र गार झाला होता..

🎭 Series Post

View all