रिअल लाईफ आणि सोशल लाईफ

A middle aged woman trying to hide her lonliness behind the curtains of social media. She has a different joyful life on social media but a lonly person within !

" चल, मी निघते.सात ..साडे -सात पर्यंत येईन घरी,बाय!"स्कूटी घेतली आणि मी निघाले. आज मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीला, मोनिकाला भेटायला निघाले. साधारण सतरा - अठरा वर्षांपूर्वीची आमची ओळख. आम्ही दोघी इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स एकत्र करत होतो.कोर्स संपला नंतर जॉब आणि लग्नं ह्या आप-आपल्या मार्गाने आमची वाटचाल सुरू झाली.त्या नंतर कॉन्टॅक्ट कमी झाला, नाहीच खरं तर.पण हल्ली सोशल नेटवरकिंग साईट्स मुळे कित्येक जुने मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटले. काही जणं प्रत्यक्षात भेटली तर काहींना फक्त मेसेज किंवा फोन झाले.

मोनिकाशी  ३-४ महिन्यान पूर्वी  सोशल मीडिया वर पुन्हा भेट झाली. खूप छान वाटल जुन्या मैत्रिणीला पाहून, अर्थात प्रोफाइल फोटो मध्ये! आहा.... काय दिसतं होती त्या फोटो मध्ये ती ,देखणी, नितळ कांती, रेखीव नाकी डोळी, सडपातळ बांधा.कित्येक लाइक्स त्या फोटोला आणि कौतुकांचा वर्षाव होता कमेंट बॉक्स मध्ये. मी देखील फोटो पाहताच लगेच लाईक बटण दाबले.पूर्वी तशी चारचौघिंन सारखीच दिसायची, राहायची पण आत्ता त्या फोटो मध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिच्या प्रोफाइल वर एक फेर फटका मारला तेव्हा माहिती मिळाली की लग्ना नंतर मोनिका लंडनला रवाना झाली. १० वर्ष तिथे वास्तव्य करून नुकतीच पुन्हा माय देशात, पुण्यात परतली होती.

काही दिवस आम्ही फक्त फोन आणि मेसेज वरच बोललो पण आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. तिने तिच्या घरी येण्यासाठी मला निमंत्रण दिले. मला प्रचंड उत्सुकता होती तिला पुन्हा भेटण्याची. तिचे फोटो पाहून तर कोणाला ही हेवा वाटावा असे तिचे राहणीमान, दोन मुलांची आई आहे, असं फोटो पाहून वाटणार देखील  नाही.ते "संतूर मम्मी" म्हणातात ना बास अगदी तशीच ही सौंदर्यवती. बहुदा ती नियमित संतूर साबण वापरत असावी!

तिने दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचले, प्रभात रोड, पुणे येथील सगळ्यात पॉश, उंच पंचविस मजली इमारती समोर. स्कूटी पार्क करून मी लिफ्टने बाविसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटची बेल वाजवली. समोरून एका मध्यम वयाच्या महिलेने दार उघडून माझ स्वागत केलं ह्या सासूबाई असतील का मोनिकाच्या ? माझ्या मनात आलं. पण विचारणार कसं?

मी आत येताच मला लक्षात आलं की हे घर मोनिका, एका इंटेरियर डिझायनरचे आहे. अत्यंत सुंदर, सुबक अश्या शोभेच्या वस्तू ठीक ठिकाणी ठेवल्या होत्या, इनडोअर हिरवी गार झाडं ठेवली होती. खोलीच्या मधोमध एक भव्य झुंबर लटकवले होते.त्याच्या दिव्यांच्या लखलखाटाने सगळी खोली उजळून निघाली होती. मधोमध मारबलचे गोलाकार छोट टेबल त्यावर एक सुगंधित लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ फुलदाणी मध्ये मोहक दिसत होता. हे सगळं पाहून माझे डोळे सुखावले. खोलीत उज्वया बाजूला एक मोठी गणपतीची मूर्ती विराजमान होती. चांदीची असणार नक्कीच!नऊ सीटर सोफ्याच्या एका कोपऱ्यात बसून मी ती भव्य वास्तू माझ्या डोळ्यांन मध्ये साठवत होते. मला देखील अश्याच सुंदर घरात राहायला आवडेल. असं घर कोणालाही आवडेलच!

मोनिका :"हॅलो, सो सॉरी टू कीप यू वेटींग! अगं नेमका मिहिर चा माझ्या नवऱ्याचा, कॅल होता, त्याच्या कडे सकाळ झाली ना... तिथे लंडनला. उठल्या उठल्या कॉल करतो मला!"

मी:" हॅलो....मोनिका .... नो प्रोब्लेम! तू सजवलेलं घर पाहण्यात मी रमले होते."

मोनिका :"हाहाहा, धन्यवाद! सीताबाई पाणी दिलं का ??

( ओह्, त्या दार उघडून स्वागत करणाऱ्या सासूबाई नाहीत हे लक्षात आलं)

मी: "खूपच सुंदर घर आहे ग!"

मी: "मोनिका, अगं बर नाहीये का तुला?"

मोनिका: " नो, आय एम फाइन का ग असं विचारतेस ??"

मी: " खूपच दमलेली वाटतेस. डोळे पण तुझे खोल गेल्यासारखे वाटले! आज सकाळचा तुझा फोटो पाहिला, खूप सुंदर दिसत होतीस त्यात ! मी तर तुझ्या सगळ्या फोटोंना लाईक करते.... हाहाहा!"

मोनिका : "ओह....तो... अगं सेल्फी खूप छान, एकदम सॉलिड येतात ह्या माझ्या फोन मध्ये....बघ ना....ये आपला फोटो काढून शेअर करू आपण सोशल मीडिया वर, बघ ना कसे लाइक्स आणि कमेंट येतील! मला तर फार मस्त वाटत ! मी तर खूप एन्जॉय करते माझे सोशल मीडिया लाईफ!"

मी : " सोशल मीडिया लाईफ?? म्हणजे ते काय अस्त ?"

मोनिका: "अगं काय, चॅटिंग करणे, फोटो काढून पोस्ट करणे, ग्रुप्स मध्ये काही पोस्ट शेअर करणे ! काय सांगू तुला असे नुसते लाइक्स अँड कमेंट चा पाऊस पडतो  तेव्हा काय आणि कसं वाटत ...सुख! एक नशा आहे तो"

मी: " पण वेळ कसा काढतेस तू?" म्हणजे  दोन मुलं आणि घर सांभाळणे वगैरे ?"

मोनिका : "अगं मुलं काय ते त्यांच्या विश्वात आणि मी माझ्या. नवरा माझा, तो तर तिथे कित्येक मैल दूर! लंडनला असतो!माझं तर तिकडे रहात होते तेव्हा देखील असच आयुष्य होतं. मुलं शाळेत गेली आणि नवरा ऑफिसला गेला की मी निवांत माझा वेळ घालवत असे सोशल मीडियावर.

मी: " पण, हे असं खोट्या विश्वात रमायच म्हणेज....??"

मोनिका : "ए खोट कुठलं ग? समोर दिसणारी आपली जवळची माणसं जेव्हा दूर जाऊ लागतात, तेव्हा हीच दूर असणारी आणि प्रत्यक्षात न  दिसणारी माणसं खूप जवळची वाटतात!

मी : "म्ह्णजे, मला नाही कळलं!"

मोनिका : " अगं एकटेपणा खूप वाईट ! भरलेल्या घरात राहून देखील जर तुम्हाला एकट वाटत असेल तर काय! आणि घरात कोणालाच कसलच कौतुक नसेल तर म आत्मविश्वास पण ढासळतो! त्यापेक्षा असं हे व्हरचुअल, सोशल मीडिया लाईफ खूप सुंदर वाटत! लोकं आपले फोटोला लाईक करतात आणि कौतुक करतात ना तेव्हा मन सुखावत!

मी : ह्म्म्म....

( मला नक्की काय बोलावं सुचेना.माझ्या अंदजाप्रमाणे विषय जरा गंभीर वाटतोय ! एकटेपणा ?? घरात कोणाला हीच कौतुक नाही ?? दूरचे न दिसणारे लोकं जवळचे वाटतात?? )

मोनिका :" ये ना, आपला मस्त फोटो काढू एक, लगेच शेअर करीन मी, म बघशील तू कसे धडाधड लाइक्स मिळतील! ये की!"

मी : हो हो....

( बऱ्याच वेळ ह्या , न त्या वेग वेगळ्या पद्धतीने वेग वेगळे चेहरे आणि हावभाव करत मोनिका फोटो काढत राहिली, जो पर्यंत तिच्या मनासारखा छान, सुंदर फोटो येत नाही तोवर आमचं फोटो शूट म्हणजे सेल्फी शूट चालूच होते!  दामले बाई मी! अखेर आला एक फोटो तिला हवा तसा.)

मोनिका : " हे बघ.... मस्त ना?? काय दिसतोय आपण! सुंदर ! शेअर करते फोटो सोशल मीडिया वर!

मी : हो ग !

( महागड्या फोन वरून फोटो झकास आला होता....मी तर स्वतःला ओळखलच नाही! मी ही एवढी सुंदर दिसते हे मला आजच कळल!  नितळ कांती, रेखीव नाकी डोळी, गुलाबी गोड गाल, आणि हनुवटी तर अगदी नाजूक!)

मी : " फोन छान आहे तुझा, फोटो खूपच छान येतात ग ह्यात."

मोनिका : " म्हणजे काय, माझा फोन मार्केट मधला लेटेस्ट मॉडेल आहे, आणि कॅमेर मध्ये फोटो साठी ब्युटी फिकेशन तर बेस्ट आहे ह्यात!"

( आत्ता आलं माझ्या ध्यानात! ही संतूर मम्मी नाही. मला वाटल साबण वापरल्याने  ही प्रत्येक फोटोत एवढी सुंदर दिसते!! आमच्या सेल्फी मध्ये मी सुद्धा संतूर मम्मी दिसत होतें )

मी:" आपल्या गप्पांच्या नादात ७ वाजून गेले ग.... चल मी निघते आता....खूप छान वाटलं तुला भेटून! आपण पुन्हा भेटूया नक्की. माझ्या घरी कधी येशील तू?"

मोनिका : "येस , नक्की नक्की येईन मी ! भेटू पुन्हा लवकर!

मोनिकाच्या घरून निघताना मला कळलं तिचा एकटेपण दूर करण्यासाठी तिने सोशल मीडियावरचे आयुष्य स्वीकारलं होतं! त्या खऱ्या वाटणाऱ्या खोट्या दुनियेत ती तासंतास  हरवून जात असे! स्वतः चे मन रमवत असे.

तिचं रिअल लाईफ आणि सोशल लाईफ म्हणजे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू,आयुष्यातली तिची दोन रूप! फोटो वर मिळालेल्या काही लाइक्स आणि कॉमेंट्स मध्येच ती तिचं सुख शोधत होती! नुस्तं माणसाचे फोटो पाहून त्याच्या मनाचा ठाव घेणं आणि त्याची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आपण कधीच नाही समजू शकत!

© तेजल मनिष

मोनिका सारखि किती तरी लोकं आपला एकटेपणा आणि दुःख विसरण्यासाठी ह्या सोशल मीडियावरचे आयुष्य जगत असतात! तिथे तासंतास मन रमवतात! आपल खरं रूप लपवतात!  त्यामागचा हेतू कोणाची फसवणूक करणे कधीच नसतो,ते खरंतर स्वतःचीच फसवणूक करत असतात.