वाचनातून लिखाणाकडे

About Writing


मला लहानपणापासून वाचनाची आवड होती.अभ्यास ही करायला आवडत असे.अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके चांदोबा, इसापनीती ,गोष्टींची पुस्तके इ.वाचत असे.वाचलेल्या चांगल्या गोष्टीं लक्षात ठेवत असे.हे सर्व वाचताना  मला खुप आनंद होत असे.वाचन हा माझा आवडता छंद च झाला.वाचनाचे वेडचं लागले.

कथा,कादंबऱ्या,आत्मचरित्र, माहितीपर पुस्तके असे सर्व वाचू लागले.दिवसेंदिवस वाचनाची भुक वाढत गेली. कधी आनंद तर कधी माहिती साठी,ज्ञानासाठी वाचन सुरू राहिले.

  वाचन सुरू असल्याने शब्दसंपत्ती वाढली ,विचार मांडता येऊ लागले.मनातले कागदावर उतरण्यास मदत झाली .मनात आलेले विचार शब्द रुपात लिहू लागली .चारोळी, कविता लिहिण्यास जमू लागले.

 मी खुप मोठी लेखिका किंवा कवयित्री नाही .

पण लिखाणातून मी माझ्या भावना व्यक्त करत राहिले आणि इतरांना ते आवडू लागले.चांगल्या प्रतिक्रिया मिळत गेल्या.त्यामुळे लिखाण करण्यास आत्मविश्वास वाढला.आपण लिहीलेले इतरांना आवडते,त्यांना वाचून आनंद होतो आणि यामुळे मी आनंदी होते.

 

" दिसा माजी काही तरी ते लिहावे । प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।।


याप्रमाणे वाचन तर अखंडीत सुरू चं आहे पण आपल्या ज्ञानानुसार काही तरी लिहीणे पण सुरू आहे.आपण लिहीलेले इतरांनी ही वाचावे असे वाटू लागले.

खुप जणांना वाचनाची आवड असते.पुस्तके विकत घेऊन , लायब्ररी चे सभासद होऊन वाचन करतात.आता तर पीडीएफ स्वरूपात पुस्तके वाचायला मिळतात. सोशल मीडियावर वर साहित्य संबंधित अँप्स,ग्रुप्स असतात त्याद्वारे आपण इतरांचे लिखाण वाचू शकतो आणि आपण ही आपले लिखाण शेअर करू शकतो.

माझे लिखाण वाचून मला माझ्या मैत्रीणीने ब्लॉग लिहीण्यास सांगितले. अगोदर मी इतरांचे ब्लॉग्स वाचण्यास सुरुवात केली.ब्लॉग राइटिंग काय असते ? कसे लिहायचे? हे सर्व जाणून घेतले.मगं आपणही ब्लॉग लिहू शकतो हे ठरविले.

\"माझा छंद\" या नावाने ब्लॉग तयार केला .त्यात चारोळ्या,कविता, लेख इ. लिहायला सुरुवात केली.


" जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी शिकवावे । शहाणे करून सोडावे सकल जन ।।"


आपल्याला जे माहिती असते,कळते,समजते ते आपल्या परीने ,आपल्या शब्दांत लिहीते आहे .

जसा वाचन करतांना आनंद होतो तितकाचं आनंद लिहीतांना होत आहे.आपण छान छान लिहावे आणि ते वाचतांना इतरांनी आनंदी होणे असे वाटते. 

माझे ब्लॉग्स इतरांनी वाचावे म्हणून मी माझे फ्रेंड्स ,नातेवाईक ,ओळखीतील व्यक्ती यांना सांगितले. काहींना आवडले ,काहींनी छान प्रतिक्रिया दिल्या ,काहींनी सजेशन्स दिले.त्याप्रमाणे बदल करत मी लिहीते आहे.

ब्लॉग लेखन करून मी वाचनाबरोबर लेखनाचा ही आनंद घेत आहे.

आणि आता इरा परिवाराची सदस्य झाली तेव्हा पासून वाचनाची भूक तर खुप वाढली पण लिहिण्याची प्रेरणा ही मिळत आहे.
इरावर सर्व जण खुप चांगले साहित्यिक, रसिक,सुज्ञ वाचक आहेत.
लेखक तर कमालचं आहेत.
कथामालिकांची शंभरी गाठणारे लेखक आहेत.
सर्व जण खुप अप्रतिम लिहीत असतात.
सर्वांच्या लिखाणाला छान छान कमेंट्स मिळत असतात.
इरा ची टीम वेगवेगळे उपक्रम राबवून सर्वांच्या कलागुणांना वाव देत असते.
संजना मॅडम खुप मदत करीत असतात ,सर्वांच्या अडीअडचणी सोडवत असतात.
सारंग सर ही आपण पाठविलेल्या लिखाणात चांगले बदल सांगून आपले लिखाण चांगले बनविण्यासाठी मदत करीत असतात आणि लिखाणाला प्रोत्साहन देत असतात.

इरावर प्रोत्साहन तर मिळतेचं पण आपल्या लेखनाला पैशाच्या स्वरूपात ही आनंद मिळत असतो.आपल्या कष्टाचे काही तरी फळ मिळते यात खुप मोठे समाधान!

इराच्या लेखकांनी असेचं छान छान लिहीत रहावे यासाठी खुप खुप शुभेच्छा ..