ईरा वाचक स्पर्धा आणि मानधन योजना

वाचकांनो, आता तुम्हालाही संधी ईरावर मानधन मिळवण्याची.

नमस्कार, ईरा वाचक समूहात आपले स्वागत आहे. लेखकांप्रमाणेच वाचकांनाही काही उपक्रम देऊन कार्यरत असण्यासाठी आणि सोबतच योग्य तो सन्मान मिळण्यासाठी ईरा नेहमीच प्रयत्नशील आहे. म्हणूनच आपण या नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पेजवर दिलेली आहे, इथेही देण्यात येईल.


सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार, ईरा सोबत आपण जोडला गेलात आणि वाचनातून ईरा लेखकांवर भरभरून प्रेम केलंत त्याबद्दल आपले मनस्वी आभार. तुम्ही आहात म्हणून ईरा आहे हे सत्य डावलून चालणार नाही.

तर या उपक्रमात आपला अधिकाधिक सहभाग असावा यासाठी ईरा फेसबुक पेजवरील सर्व ब्लॉगवर जास्तीत जास्त प्रतिक्रिया द्या, लाईक द्या. जेणेकरून तुमचा सहभाग दिसेल. ज्याचा जास्त सहभाग त्याचे नाव आमच्याकडे नोंदले जाईल. फक्त प्रतिक्रिया नाही तर प्रत्येक ब्लॉग नजरेखालून घालावा, म्हणजे लाईव्ह स्पर्धेत तुम्हाला उत्तरं देण्यास सोपं जाईल.

ईरा पेजवरील ब्लॉग दिसण्यासाठी manage follow setting मध्ये जाऊन fevorite निवडा म्हणजे सर्व ब्लॉग तुम्हाला दिसतील.

पेजवर सतत active रहा म्हणजे विजेत्यांची घोषणा, महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल.

स्पर्धा खालीलप्रमाणे:-


वाचकहो, तयार व्हा, आता ईरावर विविध स्पर्धा आणि मानधन प्राप्त करण्याची योजना वाचकांसाठी सुद्धा..!!!

वेगवेगळ्या योजनेमार्फत आपण लेखकांना त्यांच्या लिखाणाबद्दल मानधन देत असतो, पण वाचकवर्ग हा सुद्धा ईराचा महत्वाचा भाग आहे, वाचकवर्गाचे योगदान अमूल्य आहे, म्हणूनच वाचकांसाठी आम्ही खालील स्पर्धा तसेच योजना जाहीर करत आहोत.

उत्कृष्ट टिप्पणी:
वाचक एखाद्या ब्लॉगला पसंत करतात, पण सोबतच वाचकांनी दीर्घ आणि कथेचा सार सांगणारी कमेंट केली तर लेखकाचा उत्साह वाढतो. म्हणूनच तुम्हाला आता ईरा पेजवर येणाऱ्या जास्तीत जास्त ब्लॉग वर पूर्ण ब्लॉग वाचून कमेंट्स द्यायच्या आहेत.(फेसबुक पेजवर अथवा app वर). प्रत्येक आठवड्याला दर रविवारी विजेता जाहीर होईल. विजेत्यांना ईरा तर्फे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घरपोच दिले जाईल.

व्हिडिओ स्पर्धा:
समाजात वावरताना अनेक घटना, प्रसंग दृष्टीक्षेपात येतात. जसे की आई आणि बाळाचं सुंदर नातं, रस्त्यावर रोमांचक खेळ करणारे व्यक्ती, एखाद्या पक्ष्याचे घरटे बनवणं इत्यादी. तुम्हाला अश्याच काही घटना आपल्या कॅमेऱ्यात व्हिडिओ द्वारे कैद करायच्या आहेत आणि आम्हाला त्या मेसेंजर वर पाठवायच्या आहेत. उत्कृष्ट विडिओ पेजवर येतील, त्याला चांगला प्रतिसाद आला तर विजेत्यांना मिळेल 200/- मानधन. हे विडिओ कुठेही शेयर केलेले नसावेत, forwarded नसावेत, स्वतः काढलेले असावे.

प्रश्नोत्तरी स्पर्धा:
ईरा पेजवर दर रविवारी रात्री 9:30 वाजता लाईव्ह द्वारे प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न त्या आठवड्यात पेजवर प्रकाशित झालेल्या ब्लॉग वर विचारले जातील. जो वाचक अधिकाधिक प्रश्नांची बरोबर उत्तरं देईल त्याला मिळेल 300/- मानधन. त्यासाठी तुम्हाला पेजवर प्रकाशित होणारा प्रत्येक ब्लॉग लक्षपूर्वक वाचावा लागेल.

या स्पर्धेत अधिकाधिक वाचकांना सहभागी होता यावे यासाठी आम्ही एक whatsapp ग्रुप बनवत आहोत जिथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील. इच्छुक वाचकांनी मेसेंजर वर "वाचक स्पर्धा" असे पाठवावे, तुम्हाला आम्ही ग्रुप मध्ये ऍड करू.

चला तर मग, वाचकांनो आता तुम्हीही ईरा वर सक्रिय व्हा, वाचन करा आणि मिळवा बक्षिसे आणि मानधन..!!!