त्याच आनंदात संध्याकाळ पर्यंत मग्न होती ती.. डोळ्यासमोर सारखा त्याचा चेहरा येतं होता.. अनु ने आल्यावर विचारलं पण, की वहिनी चेहरा एव्हढा कशाने उजळलाय.. त्यावर चक्क लाजली होती ती.. आणि गाली गुलाब अजूनच गर्द झाले होते..
आई ने अनु ला विभा च्या कामा बद्दल आणि लॅपटॉप बद्दल सांगितले तसे खूश झाली ती.. विभा ला छान अशी प्रतिक्रिया ही देऊन झाली.. विभा आणि ती बराच वेळ लॅपटॉप बघत होत्या मग.. अनु ला बँकेच्या एक्साम द्यायच्या होत्या. त्याची माहिती ही सर्च करून झाली.. दोघींची गट्टी अजूनच घट्ट होत होती.. त्याला शब्दांची गरज नव्हती.. खुणेने, मेसेज ने, हावभावा वरून एकमेकींच्या भावना कळत होत्या..
स्वयंपाक झाल्यावर दोघी सासू सूना टीव्ही वर सीरियल बघत होत्या.. विभाची नजर टीव्ही स्क्रीनवर असली तरी डोक्यात विचार भलतेच चालू होते..
तिने मोबाईलवर मेसेज टाईप करून आईंना दाखवले..
' मी खरंच काम करू का?' असा मेसेज होता.. आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हटले,
" हो! विभा, तुला करायचे आहे ना काम? मग तू कर.. अनुला पण आम्ही शिक्षण त्यासाठीच देतोय... की तिने तिच्या पायावर उभे राहावे. पैसा कमावण्यासाठी म्हणून नाही, पण खंबीर होण्यासाठी.. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी.. तिच्या बाबांची फार इच्छा होती, की आपल्या दोन्ही मुलांनी शिकून खूप मोठ व्हावं... चांगला जॉब करावा पण लवकर गेले... आणि अर्जुनला शिक्षण सोडावं लागलं. पण अनुसाठी मात्र त्याने कसलीही कमी केली नाही.. तिच्या शिक्षणासाठी कधी कधी कर्ज ही घेतलं.. तो शिकला नाही, पण त्याला शिकलेली बायको मिळाली , याचाच आनंद मला जास्त झाला होता... तू नोकरी करावीच असं अजिबात वाटत नव्हतं किंवा तशी इच्छा पण नव्हती ..जबरदस्ती पण नव्हती पण तुला आवडतं तर तू कर.. आम्ही असूच तुझ्या पाठीशी."
तिने मोबाईलवर मेसेज टाईप करून आईंना दाखवले..
' मी खरंच काम करू का?' असा मेसेज होता.. आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हटले,
" हो! विभा, तुला करायचे आहे ना काम? मग तू कर.. अनुला पण आम्ही शिक्षण त्यासाठीच देतोय... की तिने तिच्या पायावर उभे राहावे. पैसा कमावण्यासाठी म्हणून नाही, पण खंबीर होण्यासाठी.. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी.. तिच्या बाबांची फार इच्छा होती, की आपल्या दोन्ही मुलांनी शिकून खूप मोठ व्हावं... चांगला जॉब करावा पण लवकर गेले... आणि अर्जुनला शिक्षण सोडावं लागलं. पण अनुसाठी मात्र त्याने कसलीही कमी केली नाही.. तिच्या शिक्षणासाठी कधी कधी कर्ज ही घेतलं.. तो शिकला नाही, पण त्याला शिकलेली बायको मिळाली , याचाच आनंद मला जास्त झाला होता... तू नोकरी करावीच असं अजिबात वाटत नव्हतं किंवा तशी इच्छा पण नव्हती ..जबरदस्ती पण नव्हती पण तुला आवडतं तर तू कर.. आम्ही असूच तुझ्या पाठीशी."
तिने पुन्हा काहीतरी टाईप केलं आणि आईना दाखवलं.. तेव्हाच काळजात चर्र झालं त्यांच्या, " पण त्यांनी मला स्पष्ट असे काहीच सांगितले नाही..मी त्यांना आवडत नाही का? मला बोलता येत नाही , म्हणून त्यांना माझी लाज वाटते का? माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का? लग्न झाल्यापासून बघते मी..मला बोलता येत नाही पण ते सुद्धा माझ्याशी कधी बोलले नाहीत.."
"नाही ग बाळा! असा विचार पण करू नकोस तू !असाही अबोल आहे तो.पटकन मिक्स होत नाही ... हळूहळू तुझा सहवास लाभेल, तसा मोकळा होईल...तुझी सवय झाली की मग तुझ्या शिवाय जरा सुध्दा दूर होणार नाही..."
" मग माझ्यासोबत कुठे यायला नको का म्हणतात ते? त्यांच्या मित्राकडे, फिरायला जायला नाही म्हणाले.. माझ्या माहेरी पण नाही आले..." तिचा मेसेज वाचून काय बोलावे कळले नाही त्यांना.. तिच्या शंका, तिचा आरोप चुकीचा होता असेही नव्हते.. पण त्याची ही काही कारणे असतील..
" काही भलता सलता विचार नको करूस?? अग जरा वेळ दे त्याला.. आणि फिरायला जायचे म्हणशील तर दुकान बंद ठेवावे लागेल. आणि सध्या त्याच्यावर कर्ज आहे.. कर्जदार पैशासाठी तकादा लावतात... म्हणून सध्या तो नाही म्हणत असेल.. बस थोडे दिवस वाट बघ.. तो नाही बोलत तर तू प्रयत्न कर..सतत त्याच्या आजूबाजूला रहा.. त्याला तुझी सवय होऊ दे..." आईने समजावले तसे तीने मान डोलावली..
" विभा.. अर्जून आला बघ.. जेवायला घे.. अनु ला पण बोलावं.." आई म्हणाल्या तसं उठली ती..
"दादा आज उशिर झाला यायला.." अनु ने ताटावर बसत विचारले..
" हो.. नारू अण्णा आले होते.. त्यांच्याशीच बोलत होतो..." अर्जून ही तिच्या बाजूला बसला.. आई आणि विभा समोर बसल्या होत्या.. रात्री सगळे एकत्र च जेवायचे.. त्यामुळे त्या त्याची वाट पाहत थांबल्या होत्या..
"काय म्हणत होते नारू अण्णा??" आईन विचारले, तसे एक क्षण थांबला तो खायचा... नजर विभा कडे वळली.. तिच्या समोर सांगावे की नाही, हा विचार करत होता बहुतेक...
"अर्जुन... विभा आता आपल्या घरातलीच आहे... तिच्या पासून काय लपवायचे? जे काही आहे ते सांग.. तिलाही आपल्या घरातल्या गोष्टी माहीत असायला हव्यात आता...." आई
"हम्म... नारू अण्णांना पाच सहा दिवसात पैसे परत हवेत... त्यांचा मुलगा शिक्षणासाठी लंडन ला जातोय.. तेच सांगत होते ते.."
" मग? आता कसे करायचे?"
" बघू होतील जमा... तसे दुकान चांगले चालले आहे.. पैसे ही बऱ्या पैकी जमले आहेत.. थोडे फार कमी पडतात ते नंतर घ्या म्हणून सांगू.."
" तू म्हणत होतास ना.. कुठल्या तरी लग्नाच्या आणि पूजेच्या सामाननाची मोठी ऑर्डर मिळणारे म्हणून? त्याचे काय झाले?"
"अजून काही फोन नाहीं आला त्यांचा.. बघू कदाचित उद्या येईल.. मग काही टेन्शन नाही राहणार! अनु!"
" हां दादा..? "
" तू स्टडी टूर ला जायला नकार दिलास??" अर्जुन ने विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे असा प्रश्न पडला अनुला..
"दादा ते..!"
"काय ते? तुला काय वाटल, तुझा दादा दोन हजार रुपये पण देऊ शकत नाही का?? "
" नाही दादा तसे नाही.. पण..!"
" काही पण बिण नाही.. उद्या पैसे घेऊन जा.."
"नको ना दादा.. मला नाही जायचे.." ती खाली मान घालून म्हणाली..
" का? मार्क असतात ना त्याला.. त्यावर च प्रोजेक्ट बनवायचा आहे ना? आणि सगळे जातायत मग तू का नाही सांगितलेस?"
"मी कव्हर करेल ना परीक्षेत मार्क.."
" ते काही नाही.. उद्या पैसे घेऊन जायचे.. आणि भरून टाकायचे.. हे शेवटचे वर्ष आहे तुझे.. नंतर ही संधी थोडी मिळणारे..?" त्याने जरबेने म्हटलें आणि तीने होकार दिला.. त्याला कसं कळलं हा ही विचार मनात आला.. पण त्याला कळण ऐव्हढ काही अवघड नव्हत.. कारण त्याच्या दुकानाच्या बाजूलाच तीची मैत्रीण राहायची.. आणि ती दुकानात यायची तेंव्हां सहज चौकशी करायचा तो अभ्यासाची..
" ते ठिक आहे दादा.. पण तू सांगितले नाहीस, विभा ने ते ऑफिस चे काम करायचं की नाही? " आईने मध्येच विचारले. आणि विभाचा घास घशात अडकला..
आता आई तीने विचारलेले सगळेच सांगतात कि काय त्याला, हा प्रश्न मनात उठला.. तो न कळून एकदा आई कडे आणि एकदा विभाकडे पाहत होता..