रौद्र.

ईरा शब्दांच जग —एक स्वप्न.
कथेचे नाव:- रौद्र!
विषय- आणि ती हसली
*फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा!
रौद्र!
किंचन या भागात तसा नवीनच होता. कामाच्या निमित्ताने येथेच स्थायीक झाला होता. त्याचे नवीनच लग्न झाल्याने त्याच्यावर त्याच्यावर आधारलेली अनुप्रिया,या गावात आली होती. नवीन असूनही नव्या उन्मादात ते रमले होते .
सकाळीच एक नायक, "खेकडे घेता का?" असं विचारत होता. पण त्याने नायकाला नकार दिला.अनुप्रियाची इच्छा होती, परंतु नांगी मोडलेले ते खेकडे किंचनला “निर्जीव” वाटले.”आणि ती हिरमुसली!”
पण कलाकार आणि कलंदर वृत्तीचा किंचनला तस्सेच नांगा उभारलेले ,काळ्या पाठीचे खेकडे बरे वाटत. आणि आता तर त्याच्या संसाराच्या वेलीवर फुल उमलणार होते. यावेळी तर त्याला अनुप्रिया साठी भरदार, रसदार , काळ्या पाठीचे खेकडे खाऊ घालण्याची इच्छा होती.
एवढ्यात ,आणून हाती आणून दिलेला चहाचा कप तोंडाला लावून तो अनुकडे मिस्किल नजरेने पहात, चहाचे घोट घेऊ लागला .एक कापडी पिशवी खिशात टाकून ,हाती सळई घेऊन, तो ओढ्याच्या दिशेने चालू लागला. घाणेरीची पानंद ओलांडून ,बेटा मध्ये आला. बेटावरून त्याने ओढ्यात नजर टाकली . तिथे साठलेल्या पाण्यात त्याला चमचमणाऱ्या मासोळ्या खाली बोलावू लागल्या .हाताने तोल सावरत तोही दहा- बारा फुटाची दरड उतरून खाली आला . शिकारीला सुरुवात झाली . जिथून पाण्याचा प्रवाह धावतो, त्याच्या साधारण सात फूट उंचीवर खेकड्याचे घळणे होती. तो एखाद्या घळणात हात घाली तर दुसऱ्या बाजूला खेकडे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत. वर आलाच तर ,हाताने पाठीवर तळवा ठेवून तो त्याला पकडे. नाही आला तर दुसरा हात घालून त्याला ओढून बाहेर काढी.बघता-बघता कापडी पिशवी खेकड्याने फुगू लागली. तसा तोही उतरणीला सरकू लागला.
जडावलेल्या पिशवी मुळे त्याने मानही वर केली नव्हती.. आत्ताही साधारण मान वर केली, आणि तो विस्मयचकित झाला! तिथे ओढ्याची रुंदी वाढवून जवळ-जवळ शंभर -एक फुटाच्यावर होती ! तर मध्येच पाण्याच्या पात्राने स्वतःसाठी दोन वाटा केल्या होत्या. जिथे वाटा फुटतात ,तिथे जांभळीचा एक वृक्ष उभा होता आणि गलेलठ्ठ जांभळाचे घड जमिनीच्या दिशेने घरंगळत होते .त्याने मोहित झालेल्या माशांचा घुईईईई असा आवाज वातावरणाला संगीत देत होता. मावळतीचे सोन-पिवळे ऊन पानापानावर सळसळत होते. अरे बापरे ! त्याची नजर वर गेली ... फांदीवर त्याच्या पिशवी एवढ्या आकाराचे मधाचे पोळे! त्याने ते काढण्याचा निश्चय केला . तो जांभळीकडे सरकू लागला. पाण्याच्या प्रवाहाने सहा -सहा इंच उंचीचा रेताड चिखलाच्या पायऱ्या तयार झाल्या होत्या. त्यावर चढून जाताना पाय घसरू लागले. म्हणून त्याने आपली पिशवी, गवताच्या गलगाला जाम बांधली आणि नेटाने वर चढू लागला. चिखल माखल्या पायाने तो जांभळी वर चढण्याचा प्रयत्न करू लागला .पण पाय घसरू लागले ,तशी त्याने पॅन्ट काढली आणि झाडावर चढला ...
मधाच्या पोळ्याच्या फांदीवर घाव घालणार ,इतक्‍यात त्‍याची नजर समोर गेली. आभाळ भरून आले होते ,विजा कडाडत होत्या. मघापासून त्याच्याकडे लक्षच नव्हते .बघता-बघता वादळी पावसाचे नर्तन सुरू झाले .टपोरे थेंब पाण्यावर ताशा वाचवू लागले. त्याने घाव घेतलेल्या पोळ्याची डहाळी सुटली! आता माशा सर्वत्र विखुरल्या .. त्याच्या अंगाभोवती पिंगा घालू लागल्या..आता पॅन्ट काढून वर चढण्याचा त्याला पश्चाताप झाला! क्षणाक्षणाला वेदना काळजा लढत होत्या! खाली उडी मारणे भाग होते. पाऊस जोरदार वेगाने, मोठ्या थेंबाने बरसत होता, .भिजण्याची दाट शक्यता होती .
त्याने खाली खाली उडी मारण्यासाठी नजर टाकली. जागा हवी ना पाय ठेवण्यासाठी ? परंतु पाणी, तेही ओढ्याचे, सर्वत्र पसरले होते !खेकड्यांची पिशवी गला गला हेलकावे देत होती . त्याने पाण्यात उडी टाकून पिशवी आणि मधाचे पोळे वाचवण्याचा ठाम निर्णय घेतला ...
नाही तरी तो घेणे भाग होते कारण मधमाशा फक्त मांडीला चाऊन थांबयल्या तयार नव्हत्या. त्यांचा हल्ला तोंडाकडेही सरकला होता. तोंडावर आलेल्या थव्याचा हल्ला थोपवण्यासाठी त्याने जोरदार वेगाने आपल्या हाताचा पंजा फिरवला .डोळ्यांची उघडझाप झाली आणि निसर्गाचे रौद्रभीषण तांडव पाहून त्याच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले!
साधारण चार ते पाच फूट उंचीची पाण्याची लाट ओढ्याच्या दिशेने, दोन्ही सीमा भरून खाली सरकत होती .आता खाली उडी मारणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण होते ! त्याने झाडाचा अंदाज घेतला. अजून वर सरकण्यासाठी , तो भरभर चढला . अजुन एक फांदी वर! आता खाली उडी मारून मृत्यूला मिठी मारण्यापेक्षा, मधाच्या माशा चावणे , त्याला गोड वाटले.
त्याने विचार केला , वर कोणती तरी ताल फुटले असेल,तर पंधरा-वीस मिनिटात पाण्याचा निचरा होईल किंवा सम पातळीत पाणी येईल. तेव्हा घरी जाता येईल. इथेच बसून राहू. तोवर मधमाशांचा पिच्छा सोडवण्यासाठी त्याने मधाचे पोळे खालच्या फांदीवर टाकले .पण तेही वेडे तिथे न थांबता खालच्या फांदीवर थांबले. तेव्हा त्याची पिशवी वर नजर गेली. तर पिशवी पाण्याच्या प्रवाहावर खाली - वर सरकवण्याचा प्रयत्न करत होती. पण बंदाची गाठ पक्की असल्याने ती निघत नव्हती .तरी त्यातील एक-एक खेकडा मात्र तोंडातून बाहेर येऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद लुटत होता! त्यांच्या पोटातील काळीज तुटत होते!
घोंघावणाऱरा वारा कानात साद घालत होता .अनुप्रिया- अनुप्रिया -अनुप्रिया! पाण्याची पातळी वाढत वाढत मधाच्या पोळ्या पर्यंत सरकत होती . मधाचा थेंब थेंब पाण्याच्या प्रवाहात पाझरत होता! सारेच पोळं पाण्यात पडले असते तर बरे झाले असते! पण समाधानाची बाब आहे ना? निम्या तरी माशा अजून पोळ्या भोवती घोंगावत होत्या. त्यांचा ससेमिरा चुकला .पण मनात एक वेगळीच कल्पना चमकून गेली! त्याची अनुप्रिया मात्र त्याच्या अंकुरा सोबत चार भिंतीच्या आडोशाला सुरक्षित सुरक्षित आहे !त्याने खाली पाहिले ,पाण्याच्या ताला बरोबर हेलकावे देत ,पाण्याची पातळी वाढेल तशी पोळं स्वतःची सुटका करून घेत होते. झाली सुटका! गेले वाहून !कोरड्या आसवांचे दोन-तीन थेंब गालावरून घसरले..
आत्ताशी त्याला शंभूमहादेवाची आठवण आली.. पाणी चौफेर सारखे झाले होते. आता पाण्यात पडण्यास हरकत नव्हती. अन्यथा काळोख झाला असता. रात्र येथे काढता येणे शक्य नव्हते. त्यांनं पाहिले लाकडाचा एक छोटा ओंडका त्याच्या झाडाच्या दिशेने येत होता. त्याने त्यावर उडी मारण्याचा निर्णय घेतला! वेगवान पाणी कापत जाण्यापेक्षा ओंडक्यावर बसून पाणी कापणे चांगलेच ! थोडा वेळ लागेल, पण जीवाची शाश्वती! त्याने नेम धरून त्यावर उडी मारली. त्यातच ओंडक्यावर वर नांग्या पसरून बसलेल्या विंचवाने डंख मारला! पावसाच्या पाण्याने भिजलेल्या बोटांना वेदना झाल्याच नाहीत! फक्त त्याचा होणारा काळा निळा रंग डोळ्यात खुपू लागला !त्याने तो विषारी जीव पाण्यात फेकला.
ओंडक्यावर मांड टाकून तो हळूहळू पाणी कापू लागला . हाताच्या पंजात जीव नव्हताच, पण इलाज नव्हता ! रात्री होईल तशी प्रिया दारात, तसेच मस्तकात पिंगा घालत होती! ओंडका काठाच्या दिशेने सरकू लागला...
आता त्याच्या लक्षात आले, तो जर आणखी पाचशे फूट खाली सरकला, तर तेथेच धबधबी आहे ! तीस फूट! उंचावरून पाणी खाली कोसळते! त्यात जर आपण सापडलो, तर कपाळमोक्षच ! त्या मुळे तोंडावर सूर मारण्याच्या तयारीने तो उभा राहिला .... पण ठणणण करणारा एक दणका कपाळावर आदळला! ओढ्याच्या काठावर आडव्या वाढलेल्या पिंपळवृक्षाची बुलंद फांदी त्याच्या कपाळावर आदळली! व तो बेशुद्ध झाला !
तो जेव्हा शुद्धीवर आला ,तेव्हा घड्याळात आठ वाजले होते आणि त्याची अनुप्रिया त्याला घामेजलया झोपेतून उठवत होती. त्याच्यानंतर त्याने \"हा\" काळ्या पाठीच्या खेकडयाचा रस्सा तिला खायला घातला , \"आणि ती हसली\"!

समाप्त*
*© प्रा. मदन एस. वास्कर*
*जिल्हा - कोल्हापूर*