रोहनच्या बंगल्यात एक खून झालेला होता; नव्हे दोन खून, का… तीन खून? एक समीर, दुसराs… हा सापळा आणि… तिसरा कोण…? रोहनचे वडील??? त्यांचा बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. पण त्याचा मागोवा कोणीच घेतला नव्हता. खरंच त्यांचा मृत्यू पडल्यामुळे झाला होता की कोणी ढकलले होते, याचाही खुलासा आता बाकी होता. कथा आता रहस्याच्या एका मोठ्या वळणावर येऊन थांबली आहे. तत्पूर्वी एक छोटासा खुलासा. रात्रीचे १२ ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. सदर कथेतील पात्रे व घडामोडी पूर्णतः काल्पनिक आहेत. त्याचा कोणाही व्यक्ती अगर घटनेशी काहीही संबंध नाही. तरीही साधर्म्य आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा केवळ मनोरंजनासाठी वाचावी. कथेतील काही गोष्टी फक्त वाचकांची उत्सुकता वाढावी यासाठी लिहिलेल्या आहेत. कथेद्वारे अंधश्रद्धेस दुजोरा देणे, हा लेखिकेचा हेतू नाही. तरीही अनावधानाने कोणाच्या भावना अगर विचार दुखावले गेल्यास चूकभूल माफ असावी.
आता पुढे...
जमिनीत पुरलेला सापळा सापडणे, ही गोष्ट काहीतरी भयंकर घटनेला साद घालीत होती. कमलाताईंचा संशय खरा ठरत होता की काय? त्यांचा आता पक्का विश्वास बसला होता. घरात जो काही प्रकार होत होता, तो सगळा भुतबाधेचाच खेळ होता. कमलाताईंनी खूप विरोध करूनही राहत्या घरासाठी रोहनचे वडील 'नानासाहेब' यांनी ही जागा विकत घेतली होती. बंगल्याच्या मागे एक सरकारी हॉस्पिटल होते. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूची खोली आणि बंगल्याची मागील जागा अगदी समोरासमोर होती. त्या खोलीत मेलेल्या माणसांची प्रेत ठेवली जात. बंगल्याची मागची बाजू आणि त्या हॉस्पिटलच्या खोलीची मागची खिडकी रोज जणू नजरेला नजर भिडवत असायची. बागेच्या मागच्या परिसरात जायची रोहन कोणालाही मुभा देत नसे.
रोहन मीनावर फारच चिडला होता. तो मनोमन मीनाला बरंच काही बोलत होता. "हिला कोणी हे उद्योग करायला सांगितले होते?" दातखिळी खाऊन रागाने लालबुंद झालेला रोहन मीनाकडे एकटक बघत होता. सगळ्यांसमोर रोहन बोलू शकत नव्हता. रोहनचा राग पाहून ती हादरली होती.
रोहन आता कानशिलात मारतो की काय? असंच तिला जाणवू लागलं होत. "हे आपण काय करून बसलो. कशाला त्या महादूला पाठवलं खड्डा खोदायला?," असं तिला वाटू लागलं.
रोहनच्या बंगल्यात कधीही न डोकावणाऱ्या आजूबाजूच्या लोकांची आज एकच झुंबड उडाली होती. लोकांच्या त्या बोचऱ्या नजरा रोहनला टोचत होत्या. रोहन आणि त्याच्या घरच्यांची सुटका होणे, आज तरी शक्य नव्हते. इन्स्पेटर राणेंनी सगळ्यांना ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं. एकेकाची अगदी कसून वैयक्तिक चौकशी केली. इन्स्पेटर राणेंनी प्रकरण खूपच उचलून धरलं होत. काही करून त्यांना याचा सोक्षमोक्ष लावायचा होता. आज सापळा सापडला, त्यामुळे तर राणेंचा तर्क अगदी बरोबरss निशाणावर बसला होता. पण मिळेल ते धागेदोरे जोडून अंदाज बांधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ठोस असं काही हाती लागलं नव्हतं. शेवटी इन्स्पेटर राणेंनी सगळ्यांना जायला सांगितलं.
"साहेब, अहो का सोडलं त्यांना?" कॉन्स्टेबल पाटील.
"पुरावाs.. पाटील पुरावाss... ठोस पुरावा मिळत नाही अजूनss... हात बांधलेले आहेत." इन्स्पेटर राणे
"आणि पुरावे लपवायला आरोपी १००% काहीतरी हालचाल करणार आणि चूक करणार; नजर ठेवा सगळ्यांवर. कामाला लागा सगळे. प्रकरणात मोठे आणि पॉवरफुल लोकांचा हात असू शकतो, पाटील. कसं आहे पाटील, रवीचे वडीलही एक नामी आणि पॉवरफुल हस्ती आहेत साताऱ्याचे. एकेकाळी रोहनचे वडील आणि रवीचे वडील फार घनिष्ठ मैत्रीसाठी ओळखले जात होते." इन्स्पेटर राणेंनी बरीच माहिती गोळा केली होती.
"साहेब मला काय वाटतं, रवीनेच मारलं असणार समीरलाs...! बघितलं का किती घाबरला होता ते..." कॉन्स्टेबल पाटील.
"अच्छा... अजून काय वाटतं?'' इन्स्पेटर राणे
"तसं नाही साहेब. मला आपलं वाटलं; आणि आम्ही त्यांच्या क्लासमध्ये चौकशी केली... तिथं तर भलतीच चर्चा होती." कॉन्स्टेबल पाटील.
"अरे होs… तुम्ही गेला होतात नाss... काय खबर तिथली?" इन्स्पेटर राणे
"ते म्हणजे असं झालं, मीना रवीलाही आवडत होती." कॉन्स्टेबल पाटील.
"अरेच्या ...., असं पण आहे का?" इन्स्पेटर राणे.
"हो, आणि सगळ्यांना वाटत होत मीना आणि रवीच होईल लग्न. तसं काहीतरी होत पण त्यांच्यात. पण पुढं झालं काय नेमकs… ह्याची काय खबर नाय; आणि अचानक रोहन आणि मीनाच्या लग्नाची बातमी पसरली. मला वाटत तोच राग काढला असेल रवीने. समीरचा खून करून रोहनला लटकवायचं. रवीचा मीनावरचा राग अजुनपण दिसतो, असही ऐकायला आलय साहेब." कॉन्स्टेबल पाटील.
"अरे वा.. पाटीलss तर्क चांगले लावायला लागले की तुम्ही. तुम्ही म्हणता तसं असूही शकत आणि नसूही शकत. शेवटी काय तर पुरावा हवा." इन्स्पेटर राणे.
"खरंय... साहेब." कॉन्स्टेबल पाटील.
रोहन आणि रवीची पार धांदल उडाली होती. पोलीस स्टेशनच्या बाहेर दोघांची कुजबुज चालली होती.
"तू काही बोललास का रे पोलिसांना?" रोहन आरोपीसारखा रवीला विचारत होता.
"नाही काहीच नाही बोललो आणि तू काय सांगितलंस?" रवी
"नाही मीही काही सांगितलं नाही..!" रोहन
"आणि पोलिसांना कळलं तर?" रवी अजूनही घाबरलेलाच होता.
"नाही काही कळणार. आपण करू काय ते; तू फक्त तुझ्या वडिलांच्या कानावर झाला प्रकार घाल, हवं तर सातारहून बोलावून घे इथं पुण्यात तात्यांना." रोहन
"हम्म..." रवीची बोलती वळली होती.
मागून आलेल्या मीनाने रोहन आणि रवीच बोलणं ऐकलं होत. "काय बोलताय तुम्ही. काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं पोलिसांना? हा काय प्रकार आहे सगळा? हे बघा जे पण खरं काय आहे ते आपण पोलिसांना सांगायला हवं.'' मीना
"तू ना जरा गप्पच रहा. आज आपण तुझ्यामुळे इथं अडकलोय. काय गरज होती गंs.. मागच्या बाजूला जायची...!; आणि आता खबरदार या विषयात डोकं घालशील तर; तुझे फुकटचे सल्ले तूज्याकडेच ठेव." रोहनच्या रागाचा पारा चढला होता. रोहनचा इतका राग आज पहिल्यांदाच मीनाने पाहिला होता.
"बघत काय बसलीस, राहते का आता इथे. जा गाडीत जाऊन बस." रोहन
"नसलेलं डोकं कोण या बायकांना चालवायला लावत रे रवी?," रोहनची तणतण चालूच होती. हे ऐकून गाडीच्या दिशेने चालत निघालेली मीना मागे फिरली. पण आत्ता योग्य वेळ नाही म्हणून तिने ऐकून घेतलं.
"नसलेलं डोकं?", "बायकांना कमी समजतात ही पुरुष जात, बायकांच्या बुद्धीचा आवाका माहित आहे का यांना; म्हणे नसलेलं डोकं..!" मीनाची चिडचिड झाली होती; ती मनात जोरजोरात बोलत होती. ती तशीच गाडीत जाऊन बसली.
"अरे त्या बिचारीला का बोलतोस उगाच; तिची काय चूक?" रवी रोहनचा राग शांत करण्याचा प्रयत्न करीत होता.
"सगळा घोळ घातलाय तिने." रोहन
"तू नको तणतण करुस आपण मार्ग काढू. मी उद्या तात्यांशी बोलतो." रवी.
"चल निघुयात." रवी
"हम्म..." रोहन
तसे ते घरी पोहोचले. रोहन गाडी चालवत होता. बंगल्यात घुसला तस त्यानं कचकून ब्रेक मारला.
"अरे काय झालं रोहन?" रवी ओरडला.
रोहन एकटक घड्याळाकडे पाहत होता.
"अरे काय पाहतोयस रोहन?" रवी.
"अरे तो सापळा… तो सापळाss....! घड्याळावर लटकलंय बघ...!" रोहन हळूहळू काहीतरी पुटपुटत होता. रोहनने डोळे बंद केले आणि पुन्हा पाहिलं तर तो नजरेचा खेळ होता. घडल्याचा काटा पुढे सरकला. "टिक..टिक ..टिक..." घड्याळ वाजू लागलं. रात्रीचे १२ वाजले. त्या घड्याळ्यातून काहीतरी पडल्याचं दिसलं. कागदाचा गोळा होता त्यात एक दगड. मीनाने ते उचललं. चिठठी उघडली, त्यात होत एक रक्तानं लिहलेलं एक वाक्य....."आता तुझी बारी......"
"काय आहे मीना?'', रोहन
"अहो हेss.. हे बघ ना....!" मीना. मला का हे..? म..मी काय केलय ?" मीना त..त..प..प.. करीत होती; तिच्या तोंडून कसाबसा आवाज निघत होता. ती प्रचंड घाबरली होती.
"अग थट्टा केली असेल कोणीतरी?" नको उगाच फाजील विचार आणू डोक्यात. जा तू आत." रोहन.
"कोण करतय हे सगळं? या प्रकरणाचा आता छडा लावल्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही? कोणीतरी जवळचाच माणूस सगळं करीत आहे. ज्याला सगळं माहीत आहे?" रोहन संशयाने रवीला तावातावात बोलत होता.
रोहनचा फोन वाजला. इतका उशीरा फोन. "हॅलो...मी रोहन देशमूख..." रोहन
"काय बोलतो मी, ते फक्त ऐका. रवीवर पोलिसांना संशय आलाय. माहिती देण्याचं काम केलं. सांभाळून रहा." फोनवर तिकडून एका माणसाचा आवाज येत होता. त्यानं फोन ठेवला. कोण बोलत होत, कोणाचा फोन होता काही कळायला मार्ग नव्हता.
" काय रे रोहन; कोण होत?" रवी
" नाहीs कोणी नाही...!, चल आत जाऊ." रोहन
सगळे झोपले. रोहन आणि मीनाला काही झोप लागत नव्हती. "फोन कोणाचा होता?" याच विचारात रोहन होता. दोघेही छताकडे पाहत होते. वीज गेली. "अरे यार शीट... लाईटला पण आत्ताच जायचं होत." रोहन
"मी मेणबत्ती घेऊन येते." तशी मीना खाली गेली.
तिने मेणबत्ती घेतली. तितक्यात कोणीतरी श्वास घेत असल्याचा आवाज तिला आला. तिनं आवाजाकडे डोळे फिरवले. एक सावली उभी असल्याचं तिला दिसलं. ती घाबरली. ती उलटी फिरून पळू लागली. आता ती सावली तिचा मागे हातात सुरा घेऊन पळू लागली. जिवाच्या आकांताने मीना ओरडू लागली, "मला वाचवा...मला वाचवा..".
रोहन पळतच बाहेर आला. मीना घाबरून रोहनच्या गळ्यात पडली. "काय झालं? अग... काय झालं.... " रोहन
"तो मला मारेलss... तो मला मारेलsss..." मीना आरडाओरडा करीत होती.
कमलाताई आणि नंतर रवी बाहेर आले. झाला सगळा प्रकार मीनाने सांगितला.
"मीना वहिनी.. तुम्हाला भास झाला असेल." रवी.
"नाही भास नव्हता तो..." मीना ऐकायला तयार नव्हती. "मला कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मी खरंच सांगते रोहन माझ्यावर विश्वास ठेव." मीनाला धाप लागली होती तरी ती बोलतच होती.
रवी आता रोहनच्या संशयाचं भूत बनला होता. रवी असं काही करेल यावर त्याचा विश्वास तर बसत नव्हता; पण परिस्थितीही आता रवीच्या विरोधात होती. गुन्हेगार खरंच रवी होता का? ती चिठठी खरंच मीनासाठी होती का? की तिनं दुसऱ्याला आलेली चिठठी उचलली होती? मीनावर होणार हल्ला हा तिचा भास होता की सत्य परिस्थिती? जाणून घेण्यासाठी कथा पूर्ण वाचा. इकडे इन्स्पेटर राणेंसाठी प्रकरण अधिकच गुंतागुंतीच होत चाललं होत. रवी आरोपी असेल… तर मग आधीचे खूनही त्यानेच केले होते का? आणि तो सापळा कोणाचा होता. सापळा तर रोहन बंगल्यात राहायला येण्यापूर्वी पुरलेला होता, असा रिपोर्ट पोलिसांना आला होता. रोहनच्या वडिलांचा मृत्यू आणि हा सापळा याचा काय ताळमेळ होता का? एक ना अनेक प्रश्नाची उत्तरे अजून बाकी आहेत. सगळ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मला फॉलो करा.
कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि इच्छुक असल्यास कथा नावासहीत शेअर करा. साहित्यचोरी हा कायद्यानं गुन्हा आहे. कथेबद्दलचे सर्व हक्क लेखिकेने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. आशा आहे कथा तुम्हाला आवडत असेल. तुमचा असलेला हा प्रतिसाद लेखनाला नवीन उमेदी देतो. खूप खूप आभार.
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा