रात्रीचे १२ एक रहस्य कथा भाग 5

I am Lawyer by Profession but writer by heart. I used to write articles, poems, stories, letters etc.on social and legal topics. By my writing, I am always in struggle to throw spot light on various social issues which needs discussion.

कथा वाचत आलेल्या माझ्या सर्व वाचक कुटुंबाचे मनापासून आभार आणि स्वागत. तुमच्या आलेल्या कंमेंटमुळे खूप छान वाटले. कथा खूप इंटरेस्टिंग वाटत आहे, असे कळविले त्याबद्दल धन्यवाद. शेवटपर्यंत कथा अशीच इंटरेस्टिंग राहील आणि तुमचे मनोरंजन होईल, अशी आशा बाळगते. 
 

                          रवी आरोपी असू शकतो का? या प्रश्नाबरोरच भाग एक पासूनच अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नाहीत. पण मला माहिती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्या वाचक कुटुंबाच्या मनात केव्हाची घर करून बसली आहेत. लवकरच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे सुरु होईल.

आता पुढे....

                 कॉन्स्टेबल पाटील रिपोर्ट घेऊन आले. पोस्ट मॉर्टम रिपोर्ट होता तो..., समीरचा. इन्स्पेटर राणे रिपोर्ट वाचत होते.

                 "अरेss..बापs...रेsss.. अहोs पाटील... बघताय का?" इन्स्पेटर राणें

                  "काय साहेब...?" कॉन्स्टेबल पाटील

                   " अहो... समीरच कॉज ऑफ देथ (मृत्यू होण्याचे कारण) बघाss.... विष प्राशन केल्यामुळे मृत्यू." इन्स्पेटर राणें

                  

                   "हा तर भलताच ट्विस्ट आहे...!" कॉन्स्टेबल पाटील

                  

                   तितक्यात एक पोलीस सहकारी फिंगर प्रिंट रिपोर्ट घेऊन आला. "रवीचे फिंगर प्रिंट मॅच झालेत...  साहेब." एक पोलीस सहकारी

                   "गुड जॉब..इन्स्पेटरs..." इन्स्पेटर राणें

                  

                   "आरोपीने कितीही हुशारी दाखवली तरी तो सापडतोचs...आपल्या माहितीप्रमाणे, समीर, रवी आणि रोहन मद्य घेत बसले होते. त्यानंतर रोहन गेला. समीर आणि रवीने मात्र त्यांची पुढची एन्जॉयमेंट चालूच ठेवली होती. त्या रात्री तसेही ते रोहनच्याच बंगल्यात राहणार होते. मग रवीनं डाव साधून समीरच्या ग्लासमध्ये पॉयझन टाकलं, आणि रिपोर्ट प्रमाणे समीर जरा अतीच प्यायला होता. त्यामानाने रवी खूपच नॉर्मल कंडिशनमध्ये होता आणि आपल्याशीही कसं अगदी नीट बोलत होता. सगळं कसं प्लॅन मर्डरसारखं वाटतंय. रवीनं खिडकीची काच आधीच अशा पद्धतीनं ठेवली असावी की एक ठराविक काळानंतर ती समीरच्या डोक्यात पडेल आणि प्रथमदर्शनी असच भासेल की हा खून नसून अपघात आहे." कॉन्स्टेबल पाटील बोलत होते.

                   "काय झालं साहेब... गप्प का.. तुम्ही?" कॉन्स्टेबल पाटील. इन्स्पेटर राणें कसल्यातरी गूढ विचारात होते.

                   "नाही..... काही नाही...!" इन्स्पेटर राणें.  "इतका सहजासहजी आरोपी सापडला ..?" इन्स्पेटर राणें स्वतःशीच बोलत होते.

                   "रवीला अटक करा, मग पुढचं पुढं बघू काय करायचं ते." इन्स्पेटर राणें.

                   "आणि तो सापळा सापडला त्याच काय पुढे?" इन्स्पेटर राणें.

                   "त्याचाही  रिपोर्ट आलाय साहेब... एक २३ वर्षाची मुलगी होती ती साहेब; पुढच्या माहितीसाठी टेस्ट चालू आहेत, रिपोर्ट मिळाले की कळवितो." कॉन्स्टेबल पाटील.

                   "अच्छा.. म्हणजे आता सगळ्याचाच उलगडा लवकर होईल तर..!" इन्स्पेटर राणें. "आणि हो प्रकरणाची माहिती बाहेर जाऊ देऊ नका." इन्स्पेटर राणें.

                    "ओके सर..." बाकीचे सहकारी एकसुरात म्हणाले.

                    तसे ते सगळे रोहनच्या बंगल्याच्या दिशेने निघाले. आज रवीला अटक करायचं होत. पोलीस आले. बंगल्याबाहेर चौथऱ्यावर असलेल्या पाळण्यावर त्या बसल्या होत्या. पोलिसांना पाहून त्या उठून उभ्या राहिल्या. आता अजून काय घडणार होत, या भीतीने त्या पुरत्या ओशाळल्या होत्या. त्यांनी मीना आणि रोहनला आवाज दिला. तसे किचनमध्ये असलेली मीना आणि हॉलमध्ये बसलेला रोहन बाहेर आले.

                   "रोहन, रवी कुठे आहे?...इन्स्पेटर राणें.

                   "आहेs..नाssss... साहेब... गेस्ट रूममध्ये... तिसऱ्या मजल्यावर...., अंघोळीला गेलाय." रोहन तुटक तुटक बोलत होता.

                   "रवीला बोलावं..," इन्स्पेटर राणें. आज खाकीतला साहेब काटेकोरपणे त्याची ड्युटी बजावत होता. ज्याला ना बड्या हस्तींचा डर होता ना परिणामांची फिकीर....! त्याला फक्त आता एका पीडितेला न्याय द्यायचा होता.

                   "बोलवतो साहेब..पण झालं तरी काय.." रोहनच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते; आणि तो जरा घाबरालाही होता. 

                   "रवीला समीरच्या खुनात अटक करायला आलोय आम्ही..." इन्स्पेटर राणें.

                   "काय...?, ते कसं शक्य आहे...? नाही, असं नाही होऊ शकत..? हे बघा साहेब तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय...! माझं जरा ऐका..."  रोहन आता पुरता गार झाला होता. तो स्वतःही काय बोलत होता याचही त्याला आता भान राहील नव्हतं.

                   "रोहन आम्हाला आमचं काम करू देत. सगळे पुरावे रवीच्या विरोधात आहेत." इन्स्पेटर राणें.

                   "पाटील चला आत...." इन्स्पेटर राणें.

                   तितक्यात आवाज झाला. सगळ्यांच्या नजरा वरच्या दिशेने वळल्या. तसे सगळे तिसऱ्या मजल्याच्या दिशेने पळू लागले. सगळे रवी राहत असलेल्या खोलीत आले. समोर पाहिलेले दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. रोहन जोरजोरात आरडा ओरडा करू लागला. बाथरूममधल्या गिझरचा स्फोट होऊन रवी भाजला होता. रवीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. रोहन तर गळूनच गेला होता.

हॉस्पिटलमध्ये रवीवर उपचार सुरु झाले.

                    रोहनने ताबडतोब तात्यांना पुण्यात बोलावून घेतलं. तात्यांनी शिक्षणासाठी रवीला पुण्यात पाठविले होते. त्याला राहण्यासाठी एक मोठा फ्लॅटही घेतला होता. पण तो कायम रोहन आणि समीर सोबतच राहायचा. पुण्याचा लगाव लागण्याने त्यानं इथंच राहायचा हट्ट धरला होता, त्यामुळे इच्छा नसतानाही तात्यांनी त्याला परवानगी दिली होती. आणि आज त्यांचा एकुलता एक मुलगा मरणाच्या दारात उभा होता. आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार रोहनने त्यांच्या कानी घातला. तात्या फार चिडले होते, कारण रवीने त्यांना काहीच कल्पना दिली नव्हती. रोहनने रवीला बजावून सांगितलं होत की झाल्या प्रकरणाबद्दल तात्यांना सांग; तरीही त्यांनी तात्यांना काहीच सांगितलं नव्हतं, याच रोहनला फारच आश्चर्य वाटत होत. आता हॉस्पिटलमध्ये थांबण्यातही फारसा अर्थ नव्हता. पण तात्या हलायच नाव घेत नव्हते. रोहन तात्यांची परवानगी घेऊन घरी निघाला. मीना आणि आईची त्याला काळजी वाटत होती. मित्रभाव जसा जपायचा होता, तसं एका मुलाचं आणि नवऱ्याचही कर्तव्य त्याला बजावायच होत.

                    झाला प्रकार अजूनही तसाच रोहनच्या डोळ्यासमोर उभा होता. तो कित्येक तास एकटाच बसून होता. मीना आणि कमलताईंनीही त्याला काही जाऊन बोलणं टाळलच. आणि फोन आलाच..! समीर गेल्याची बातमी रोहनला समजली. तरीही रोहन तसाच बसून होता; जणू की त्याच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं होत.  डॉक्टरांनी  शर्तीचे प्रयत्न केले, तसा दमच तात्यांनी भरला होता; पण शेवटी होयच तेच झालं होत. घड्याळाचा टोला चुकला होता. ते घड्याळ जणू रोहनकडे बघून हसत होत. रात्रीचे १२ वाजले होते......!  

                     रवी एक आरोपी होता का? रवीच्या जाण्यानं आपली कथा इथेच संपली का? तर नाही.... रवीच अशा प्रकारे जाण... एक अपघात होता की अजूनही ते एक कथेचं रहस्यच आहे? कथेची पात्र हळूहळू कमी होऊ लागली आहेत, पण कथेची गुंतागुंत मात्र अधिकच वाढत चालली आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तरे पटापट कंमेंटमध्ये द्या आणि कशी वाटत आहे ही रहस्यमयी कथा नक्की कळवा.

                      

                     कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि इच्छुक असल्यास कथा नावासहीत शेअर करा. साहित्यचोरी हा कायद्यानं गुन्हा आहे. कथेबद्दलचे सर्व हक्क लेखिकेने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. आशा आहे कथा तुम्हाला आवडत असेल. तुमचा असलेला हा प्रतिसाद लेखनाला नवीन उमेदी देतो. खूप खूप आभार.

                              

                       कथा वाचल्याबद्दल धन्यवाद.

🎭 Series Post

View all