Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

** रसिका**भाग -५

Read Later
** रसिका**भाग -५

कथेचे नाव - * रसिका *

विषय - कौटुंबिक कथामालिका.

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका.

 

 

भाग - ५

 

रसिकाने तिच्या तीनही मुलांना तिच्या सारखेच शिस्त बध्द जीवन जगण्यास शिकवले. मुले तिच्या पाऊल खुनांवर अगदी व्यवस्थित मार्ग क्रमन करत होती .त्यांची प्रगती बघून रसिका तर आनंदात च होती .तसेच मुलेही आनंदात होती. कारण रविच्या घरचे कलुषित वातावरण आणि रसिकाने दाखवलेले प्रेमाचे,एकोप्याचे जीवन यातील तफावत मुलांना देखील कळून येतच होती.

 

रवीचा अहंकार दुखावला गेला तर होताच,पण रवीचे आणि रसिकाचे तसेही प्रेम विवाह झाले असल्याने कधीतरी त्याला ही रसिकाच्या जुन्या लग्ना आधी च्या दिवसांची आठवण यायचीच.परंतु प्रत्येक वेळी त्याचा अहंकार ,त्यांच्या मध्ये तडजोड, करायला मध्ये आडवा येतच होता.त्यातच त्याच्या घराचे होतेच त्याला तिच्या विरुद्ध भरवून द्यायला.

शेवटी काही झाले तरी,जेथे त्याने जन्म घेतले,जेथे तो लहानच मोठा झाला,जेथे त्याची रक्ताची ,नात्याची,तर माणसे होती सगळी. मग त्यांच्या विरोधात जाणे अवघडच होते त्याच्यासाठी .

 

 

रसिकाने ही त्याला मनोमन समजून घेतले च होते.की रवी तसा इतका तर अव्याहत वृत्तीचा तर नव्हता.पण पुरुषी अहंकार आणि पत्नीचा इशाऱ्यावर नाचणारा., म्हणतील .हे त्याला मान्य होणार नव्हते.हे रसिकाने जाणले होते.

म्हणूनच तिने रवीला तेव्हढी सूट किंवा मोकळीक दिली होती.की," मी जरी आपल्या मुलांना घेऊन वेगळ्या घरात जाणार असेल,तरी ती तुझीही मुले आहेत.त्यांना तू वेळ प्रसंगी भेटू शकतो.पण अगदी समंजसपणे,एक जबाबदार बाप या नात्याने .त्यांचा बाप व्यसनी आहे.किंवा त्यांच्या साठी त्रास दायक आहे याची मुलांना जाणीव होऊ देऊ नको."

रसिकाने रवीला हे ही सांगितले की..." मी तुझ्याशी लग्न केले,तुझ्या मुलांची आई म्हणून तुझ्या घरात प्रत्येक अन्याय अत्याचार सहन करत गेले.पण आता माझ्याकडे येताना जर तू एखाद्या चांगल्या सभ्य मनुष्य सारखा ना येता काहीही गैर वर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुला कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडेल.""....

 

रवीला हे चांगलेच माहीत होते की,त्याच्या कडून ही बऱ्याच चुका झाल्या आहेत.आणि रसिकाचा निर्णय हा मुलांच्या आणि तिच्या वर आलेल्या वाईट परिस्थिती मुळे घेतला गेला आहे....! त्यामुळे त्यानेही प्रत्येक वेळी मुलांना भेटताना प्रसंगाचे,समाजाचे,आणि स्वतःच्या माना पाना चे विचार करून च वर्तन करण्याचे ठरवले .दुरून का होईना ,पण बाप म्हणून मुलांवर आणि पत्नी म्हणून रसिकावर हक्क दर्शवता येत होता.हे ही काही कमी नव्हते.....

 

 

ते ही खरंच आहे की,आज उगवलेला दिवस कुणासाठी कधी थांबतो का..? रात्र ही होणारच असते,निसर्गाचा नियम च आहे तो.... निसर्ग न थांबता फिरतच असते.दिवसामागून दिवस जातच असतात....ऋतुही बदलतात...उन्हाळा,पावसाळा,हिवाळा,जसा ऋतू बदलतो,तसेच मनुष्याचे जीवनही बदलत जात असते,आयुष्यातले चढ, उतार,प्रत्येकला चढावे, उतरावे लागतात.....!

 

 

अति अहंकारी मनुष्य सुध्धा वेळ प्रसंगी,परिस्थिती नुसार त्याच्यातला गर्व , फुगीरी, मोठेपणाा ला मागे सोडण्यास तयार होतो च.

 

       

रासिकाचि मुले लहान ची मोठी झाली,म्हणजेच रवी देखील त्याच्या प्रौढ त्वकडे झुकू लागला होता.

 

रवीच्या लहान बहिणीचे लग्न होऊन,ती तिच्या सासरी गेली होती.रवीच्या भावाचेही लग्न झाले आणि तो परदेशात स्थायिक झाला.रवीच्या आई चे वृद्ध त्वामुळे निधन झाले .आणि रवी चे वडील ही त्याची साथ सोडून त्यांच्या अर्धांगिनी ला साथ सोबत करण्यास हे जग सोडून गेले.

 

रवी इतका मोठा अहंकारी माणूस , निसर्गाच्या काल चक्रा पुढं हतबल व्हायला लागला.

आता त्याला त्याच्या जीवनातील खरी कमी,कमतरता,भासू लागली.

आणि त्याच्या मनाची धाव ,सारखी रसिका आणि मुलांकडे घ्यायला लागली.

 

रसिकाला ही त्याच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज येतच होता.

 

रसिकाला हे ही माहित होते की,एखाद्या मनुष्याला फक्त दारू सारख्या अमली पदार्थाचे व्यसन नसते.तर बऱ्याच लोकांना कसलेही व्यसन नसते,एकदम निर्व्यसनी,निर्विकरी,असतात.पण त्यांना व्यसन असते...त्यांच्यापुरुशी अहंकाराचे....तारुण्याच्या कैफाचे.... नशिबाने मिळत असलेल्या पैशाचे....आणि त्यामुळे असणाऱ्या सधन परिस्थिती च्या गर्व चे.....?!

 

एकवेळ माणूस बाहेरून घेतलेले व्यसन,दावापणी करून,अनेक उपचार करून ,अनेक उपाय योजना करून,ही व्यसने सोडू शकेल,परंतु त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नसानसात असणारा खोटा आभिमान, अंतकरणात असलेली अशुध्ही,आणि ज्ञान, बुद्धी,विचारसरणी मध्ये असलेली विकृती कशी सोडू शकेल...????

 

तर त्याचे उत्तर म्हणजे,....तो व्यक्ती स्वतःच देऊ शकतो.त्याची स्वतःची इच्छा ,त्याचा स्वभाव,आणि त्याच्यावर आल्या असलेल्या परिस्थितीची जाणीव च ,त्या व्यक्तीला बदलू शकते.

 

रासिकाचे तिच्या मुलांवर खुप प्रेम तर असणार च होते,कारण ती त्यांची जन्म दात्री ,जननी होती.

पण रसिकाचे मनात रवी बद्दल ही , जिव्हाळ्याच्या भावनेची मंद ज्योत अजूनही तेवत होतीच.

आणि म्हणूनच रसिकाने रवीला पुन्हा एकदा संधी देण्याचा निश्चय केला.

 

माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागले तर,काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत.माणसामध्ये माणुसकी फक्त जिवंत असली पाहिजे.

रवी मध्ये देखील तो त्याच्या आत्म्याच्या कोपऱ्यात कुठेतरी लपून बसला होता.त्याला फक्त " आपुलकीची जिव्हाळ्याची साद घालण्याची गरज होती.

 

 

रवीने तेच केले, रसिका ची मनापासून क्षमा मागितली,त्याने स्वतः ला परत पहिल्यासारखा चांगला रवी होण्याचे कबूल केले. झाले गेले सर्व विसरून जाऊन एका नवीन आयुष्याची सूरवात करण्या साठी रसिका आणि रवी परत एकदा वचनबध्द झाले....!!!!

***समाप्त***

 

©® Sush

जिल्हा - पुणे.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sush

Writer.Blogger.

Something Different

//