** रसिका ** भाग_२

रसिका आजही जगत आहे

*

कथेचे नाव;_**रसिका*

विषय - कौटुंबिक कथमालिका

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालीका.

*रसिका भाग - २*

कसे असतात ना हे समाजातील उच्च भ्रू लोकं , स्वतःच्या माना पाणा साठी,समाजातील स्वतःचे स्थान अधिकच उंचावण्यासाठी ,किती सोयीस्कर पणाने माणुसकी वाऱ्यावर सोडतात ना..!

रसिका तिच्या सौंदर्या मुळे ,तिच्या हुशारी अन् तिच्या उच्च शिक्षणा मुळे,तिच्या गलेलठ्ठ इन्कम म्हणजे पगाराच्या रकमे मुळे च रवीच्या घरच्यांनी पसंत केली होती.मग ती कोणत्या वंशाची आहे,कोणाची वारसदार आहे की नाही,याबद्दल त्यांना कसलीही भ्रांत ,किंवा काळजी नव्हती.

एका स्त्री मध्ये असणारे सगळे सद्गुण रसिका मध्येही होतेच की,मग अजून काय पाहिजे होते त्यांना.याउलट खुप मोठ्या नामांकित खानदानाची सून करून आणली असती तर " नाकापेक्षा मोती जड" अशी समाजाकडून उपेक्षा होऊ नये याचीच काळजी घेतली जाते ना बहुतेक उच्चभ्रू कडून..?!!

रसिका सोबत रवी चे लग्न लावून त्याच्याघरच्यांनी फक्त स्वतःच्या खोट्या मना चा मोठेपना समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता.रसिका बद्दलत्यांच्या मनात काडी मात्र ही आपले पणाची ,सद्गुणी मुलीच्या प्रयत्नांच्या परकाष्ठेची जाणीव ही नव्हतीच....

........हे पूर्ण पने सिद्ध झाले ते,रसिकाला परत दुसरीही मुलगीच झाली तेव्हा.पहिल्या मुलीच्या जन्मानंतर रवीच्या घरच्यांनी त्यांची तोंडे नाराजीच्या वाकड्या दिशेला फिरवली च होती.पण आता ह्या वेळेस मात्र दुसरीही मुलगीच झाल्याने त्यांच्या पुढे वंशवृद्धी चा जनुकाय गहन इभ्रतीच्चा प्रश्नच उभा राहिला होता.

.......आणि मग सुरू झाली ,रसिकाच्या अस्तित्वाची,स्वाभिमानाची परीक्षा....

रोजचं एक नवीन परीक्षा, रोजच एक नवीन संघर्ष,रोजच एक नवीन युद्ध.

का...?? कशासाठी...??

तर फक्त स्वतःचे स्वत्व सिद्ध करण्यासाठी.....

स्वतः च्या. नशिबाने घेतलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण,पास. होण्यासाठी.....

सौंदर्य,शिक्षण,मानपान,पैसा असून ही फक्त संसार टिकवण्यासाठी....

स्वतःचे मुलींच्या भवितव्या वर समाजाची वाईट नजर फिरू नये म्हणून जपण्यासाठी....

रवीच्या घराचे आता रसिकाला शारीरिक च. नाही तर मानसिक,नैतिक,ही. त्रास द्यायला लागले होते.

घरा मध्ये घरकामाला नोकर चाकर असूनही कामाचा व्याप संपता संपत नव्हता.रसिकाला दोन छोट्या मुलीचे करून मग कामावर जावे लागायचे.तिला जास्तीत जास्त मानसिक त्रास होण्यासाठी कुजकट बोलणे,टोमणे मारणे,नको त्या कारणावरून वाद उपस्थित करून वादाचा शेवट, वंशवृद्धी,वर म्हणजे मुलगा न असण्यावर आणून सोडणे.

आणि याउलट रसिकाने मात्र सगळा त्रास गप गुमान,सहन करणे.

" पौरुषत्वाची खरी ओळख तू तुझ्या बायको रसिका मुळे,समाजाला आणि नातेवाईकांना करून देऊ शकत नाही." असे रवीच्या मनावर रोजनरोज कोरले जायचे.

घरातल्या ह्या अशांत वातावरणामुळे रवी दारू पिऊ लागला,दारू पिऊन त्याचा राग तो रसिकावर काढू लागला.शिवीगाळी,अभद्र शब्द,बोलू लागला.आणि तिचे प्रतिउत्तर आले तर मारहाण ही करू लागला.

वारंवार फक्त दोन मुलींचा आणि समाज आपल्यालाच नावे ठेवील याविचाराने तिला सगळे सहन करावे लागायचे.त्यासाठी स्वतःचा जॉब,नोकरी टिकवणे मात्र तिच्यासाठी खुप आवश्यक झाले होते.

आणि म्हणून रसिका कामाच्या ठिकाणी अजूनही प्रगती करत च होती.कंपनीकडून तिच्या हुषारीचे पारितोषिक म्हणून बढतीच्या संधी बहाल केल्या जात होत्या.

काहीही असले तरी आपले मनोबल खचू द्यायचे नाही.कामामध्ये कसलीही दिरंगाई होऊ द्यायची नाही.यामुळे कामाच्या ठिकाणी मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वाचा छान प्रभाव टिकून होता.

सहकर्मचाऱ्यांकडून झालेली छोटीशी चूक ही ती तत्परतेने हेरायची.त्यामुळे कामाच्या ठिकाणी तिचा दबदबा ही होता.

रोज सकाळी ऑफिस ला वेळेत हजर होण्यासाठी तिला घरातून निघताना तारे वरची कसरत् करावी लागे.

पण त्याही पेक्षा कितीतरी भयानक कसरत तिला ऑफिस वरून घरी परत जाण्यासाठी करावी लागे.ऑफिस मध्ये जबाबदार,आदरणीय, प्रभावी व्यक्तिमत्वाची रसिका घरी जाताना मात्र घाबरलेली,भेदरलेली असायची.घरी जायला उशीर झाला तर काय होईल याच धास्तीने ती परतायची आणि कधी एकदा स्वतःचे मायेच्या कवेत मुलींना घेईल असे तिला व्हायचे.

दिवसामागून दिवस गेले आणि रवीने परत एकदा रसिका कडे तिसऱ्या मुलाची अपेक्षा केली.घरातील सगळे अशांत वातावरण शांत होईल ह्या आशेने आणि तिच्या कडे विरोध दर्शविणे हा पर्यायच नाही आहे या विचाराने तिला ही तो निर्णय घ्यावा लागला.

     रसिकाला तिसरा मुलगा झाला.आणि " वंशवृद्धी" हे एक खोटे, अंधश्रध्दे चे,मूर्खपणाचे, नतभ्रश्ट समाजाचे ,रवीच्या घरच्यांचे आणि रविचे विक्षिप्त बुरसटलेले विचार आतातरी बदलतील या आशेमध्ये रसिका जगत आहे......!!!

स्त्री म्हणून जन्म घेतल्या पासूनच प्रत्येक स्त्रीला दोन परस्पर विरोधी जीवन जगावे लागते....

आणि म्हणून,आजची स्त्री उच्च शिक्षित असूनही परावलंबी आहे कारण ,तिच्यातल्या आत्मकेंद्रित पना मुळे, अगतिकते मुळे....

आजची स्त्री जबाबदार,प्रतिभावंत असूनही परावलंबी आहे,कारण तिच्यातल्या कौटुंबिक कर्तव्य निष्ठेमुळे,त्यागामुळे.....

आजची स्त्री आत्मनिर्भर ,समृध्द असूनही परावलंबी आहे,कारण तिच्यातल्या असुक्षिते च्या भावनेमुळे.....

 आजची स्त्री अनाथ तसेच घरंदाज खानदानी असूनही परावलंबी आहे कारण,तिच्यातल्या संयम आणि सहन शीलते मुळे.......

आजची स्त्री मेहनती,सामर्थ्यवान असूनही परावलंबी आहे कारण, तिच्या कोमल मना च्या मातृत्वा मुळे....!!! 

पुरुष प्रधान संस्कृतीने समजलेले स्त्रीचे दुय्यम स्थान च तर तिचे सामर्थ्य ही आहे. होय ना....!!!

उर्वरित कथा भाग 3 मध्ये

©®Sush

जिल्हा पुणे.

🎭 Series Post

View all