** रसिका**

रसिका अजून जगत आहे

*

कथेचे नाव;_**रसिका*

विषय - कौटुंबिक कथामालिका

फेरी ;_राज्यस्तरीय करंडक कथामलिका

* रसिका भाग - १*

            अनाथ आश्रम मध्ये हजार पाचशे च्या साथ संगती मध्ये वाढलेली रसिका लहान पना पासून शालेय शिक्षणात हुशार होती.तिला शिक्षणामध्ये आवड असल्याने प्रत्येक शैक्षणिक कामा मध्ये अगदी उत्साहाने भाग घ्यायची.आणि नेहमी प्रथम क्रमांकाने येण्यासाठी मनापासून प्रयत्न करायची.

रसिकाचे शिक्षण प्रेम आणि हुशारी.यामुळे अनाथआश्रमाच्या विश्वस्त यांनी तिला तिच्या मनाप्रमाणे भरपूर शिकू द्यावे,यासाठी पुढील शिक्षणासाठी पुण्या मध्ये एका लेडीज हॉस्टेल मध्ये राहण्याची सोय करून दिली.आणि तिला आवड असणाऱ्या इंजिनियरिंग च्या अभ्यास क्रमासाठी एका नामांकित कॉलेज मध्ये ॲडमिषण करून दिले.

रसिका आता पुण्यात छान रमली होती.आणि तिच्या आवडीच्या इंजिनियरिंग च्या अभ्यासात मन लावून प्रगती करत होती.म्हणता म्हणता दोन तीन वर्ष संपून गेली.आणि कॉलेज मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल तिला मेरिट वर लगेच जॉब मिळण्याची तरतूद ही केली गेली होती.

रसिकाची अभ्यासू वृत्ती, मन मिळवू स्वभाव,संयमी आणि निर्धारी व्यक्तिमत्त्व ,तिच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्याच मित्र मैत्रीणीना लुभवायचा.याच दिवसामध्ये रसिका ची ओळख लेडीज हॉस्टेल च्या जवळपास राहणाऱ्या रवी , सोबत झाली. रवीही त्याचे कॉलेज चे शेवट चे वर्ष संपण्याची वाट बघत असताना त्याची आणि रासिकाची ओळख कधी मैत्री मधून प्रेमा मध्ये बदलत गेली हे त्यांनाही कळून आले नाही.

रवीला तर रसिका बघता क्षणी पासून खूप आवडली होती.त्यातच तिची हुशारी, कष्टाळूपणा,आणि प्रत्येक काम कसे चिकाटीने करणे,हे त्याने चांगलेच हेरले होते.आपल्याला जीवन साथी हवी असेल,तर रसिका सारखीच हवी.असे त्याला मनोमन वाटू लागले होते.आणि त्यासाठी त्याने रसिकाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न चालू केले.त्यातच रसिका अनाथ आश्रम मधून संगोपन होऊन आलेली आहे,हे तर त्याच्या साठी फायद्याचेच झाले होते.कारण अनाथ आश्रम चे विश्वस्त रवी सारख्या चांगल्या घरातील मुला शी रसिका चे लग्न लावून देण्यात कधीच हरकत घेणार नाहीत.हे निश्चित च होते.

वरचेवर काहीतरी करणे काढून रवी त्याच्या मित्र मैत्रीणीना त्याचे घरी बोलवायचा त्या ग्रुप मध्ये रसिका ही असायची आणि त्या निमित्ताने तिला रवीच्या घरचे म्हणजे त्याचे आई वडील,त्याच्या पेक्षा लहान असलेले बहीण अन् भाऊ,यांना भेटायची.रवीच्या घरचे वातावरण तिला दिवसेंदिवस आवडू लागले होते.आणि आई वडील बहिण भाऊ अशी रक्ताची नाती आपल्यालाही मिळावीत,अशी इच्छा तिच्या अंतर मनात जागृत झाली होती.

रसिका बद्दल रवीच्या घरच्यांना सर्व महिती समजूनही त्यांनी काहीही आढेवेढे न घेता, रवीला रसिका सोबत लग्नासाठी संमत्ती देऊन ही टाकली...दोघांची शिक्षणे ही पूर्ण झाली...आणि रसिकाला जॉब ची ऑफर ही मिळाली च होती.

सगळे कसे छान मना सारखे होत होते.कोणालाच कसलाच प्रॉब्लेम वाटत नव्हता. सगळे कुटुंब किती आनंदात दिसत होते.

रसिका च्या मनातील तिच्या संसाराची चार चाकी आलीशान गाडी व्यवस्थित पने मार्गस्थ होण्याच्या. पथावर होती.

   

रसिकाला तिचा हा नवीन संसार,नवीन नाती, नवीन जॉब,आणि एकंदरीतच सगळे जीवन नवीन मिळाल्या सारखे वाटत होते.खुप खुप आनंदात होती रसिका....!!

लग्ना च्या पहिल्या वर्षात रसिका चे आई होण्याचे स्वप्न ही पूर्ण झाले ..आणि आता रसिका एका सुंदर. ,गोजिरवाण्या मुलीची आई झाली होती.

         आयुष्या मध्ये सगळेच कसे मना सारखे व्हायला लागले की,कधी कधी स्वतः चीच नजर लागते का काय माहित नाही.पण हळू हळू ही संसाराची चार चाकी आलीशान गाडीही कुरकुर करायला लागते.प्रगती पथावरील माना पणाची वळने,जागोजागी रुसव्या फुगव्या चे खाच खळगे,अहंकार, इभ्रतीच्या,नावाचे स्पीड ब्रेकर म्हणजे जरा जास्तीचे उंचवटे, ह्या संसाराच्या चार चाकी आलीशान गाडीला सरळ मार्गी स्मुथली ,शांत पने पळण्यास त्रास दायक होतात.....

......आणि मग आयुष्याचा हा जीवन प्रवास किती जीवघेणा,किती किचकट आणि क्लेशदायक. होऊन जातो.....

.....आणि मग रसिका. सारख्या सुंदर मनमिळाऊ, निर्धारी व्यक्तींनाही संयमाची,सहनशीलतेची, ढाल पेलवत पेलवत स्व अस्तित्वाचे युद्ध लढावेच लागते...!!

उर्वरित कथा भाग - २ मध्ये

©®Sush

पुणे जिल्हा.

🎭 Series Post

View all