तडजोड (भाग 1) प्रेमानंतर चे विदारक सत्य

A story about love

तडजोड भाग 1 ( प्रेमानंतर चे विदारक सत्य) 
वेदिका व अजय बालपणी चे मित्र, तसे यांचे एक मेकांशी खुप जमायचे असे नाही पण दोघांचे बाबा मित्र म्हणजे वारसाहक्काने यांची पण मैत्री झाली 
म्हणजे दादा चा मित्र आपला दादा ,
ताई ची मैत्रीण ताई ,
तसे यांचे बाबा मित्र असल्यामुळे यांच्यावर पण मैत्री लादली गेली.

एरव्ही भांडण होण्याचे कारण विषम स्वभाव हे असते पण यांचे उलट होते जर पत्रिका जुळवळी तर यांचे 36 गुण नक्कीच मिळतील असे होते ते. 

लहानपणापासून एकाच वर्गात प्रत्येक गोस्ट सारखी लागायची त्यांना.
 या सेम सेम मॅटर मुळे अनेक वेळा त्यांचे आई बाबा अडचणीत यायचे.

असे करत करत 
भांडत, रुसत, फुगत 
त्यांच्या आयुष्यातील पहिला टप्पा आला 
तो म्हणजे 
दहावीचे वर्ष,

दोघेही खुप हुशार मेहनती 
पण सतत एक मेकांच्या पुढे जाण्याची ओढ,
फक्त अभ्यासात च नव्हे तर इतरही अनेक क्षेत्रात ते एकमेकांना पुरून उरत असे मग नृत्य म्हणू नका की गायन 
मैदानी खेळ असो की बुद्धी ची चतुराई 
त्यांची नेहमी चढाओढ असायची.

दहावीच्या वर्षी देखील त्यांच्यात एकाच मार्क्स चा फरक होता
दोघांचेही घरचे खुश मुलांना मार्क्स चांगले आले म्हणून 
व यांच्यातील वेदिका खुश अजयपेक्षा एक मार्क्स जास्त मिळाला म्हणून,
आणि अजय खुश एकच मिळाला कुठे जास्त मिळाले म्हणून तो खुश 
म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद. 

लग्न घाई कमी असेल इतकी घाई यांना अकरावी प्रवेशाची झाली.
ढीगभर कॉलेज नेटवर बघून झाले 
हा कोर्स नको तो करू 
की अगोदर अकरावी बारावी करू 
पण शाखा कोणती घ्यायची ?
कला चा तर काही संबंध नव्हता 
पण विज्ञान व वाणिज्य मध्ये कुणी जिंकत नव्हते शेवटी सामना बरोबरीत सुटला 

मुलं जे म्हणतील ते .


आता वेदिका व अजय ची वेळ होती तसेही त्यांना याची फारशी जाणीव नव्हती मग सगळे करतात तसे करू अकरावी बारावी करून 
इंजिअरिंग 

दोनी मुलांनी एकमताने सांगितले 
आयुष्यात पहिल्यांदाच एकमत झाले असेल त्यांचे

एकदाचा अभ्यासक्रम ठरला 
मग आता कॉलेज रडारवर 
मोठं पाहिजे 
जवळच पाहिजे 
असे करत करत एका नामांकित कॉलेज वर एकमत झाले

दोन वर्षे मुलांनी मन लावून अभ्यास केला व दोघेही चांगल्या मार्क्स ने उत्तीर्ण झाले 
चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज ला त्यांना ऍडमिशन देखील मिळाले 

आता त्यांना कॉलेज चे वेध लागले 

क्रमशः 

कशी असेल त्यांची कॉलेज लाईफ 
कसे येतील हे दोन टोके एकत्र जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
व मला फॉलो करायला विसरू नका 
धन्यवाद

🎭 Series Post

View all