राशीचक्र..

राशीचक्र ढोबळ माहिती..
राशीचक्र -

राशीचक्र हा आपल्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय त्यांत बरीचशी लोकं अशी असतात की, पेपर मधील राशीभविष्य वाचून दिवसाची सुरवात करतात.... तर काही लोकं अशी आहेत ज्यांचा या राशीभविष्यावर काडीचा विश्वास नसतो... तर त्यांना आपल्या मेहनत आणि कर्तुत्वावर विश्वास असतो.... असो!......हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा विषय किंव्हा व्यक्तीगत प्रश्न आहे.आपल्याला त्यांत जायचे नाही....
तर पूर्वजांनी कालगणना करण्यासाठी आकाशाचे बारा भाग केले .या भागांना वेगवेगळी नाव दिली त्यालाच राशीचक्र असे म्हणतांत.हे राशिचक्र म्हणजे आपल्या सूर्याचा भ्रमणमार्ग थोडक्यात. या बारा भागात म्हणजे माहिन्यात सूर्य एक एक महिना त्या राशीत मुक्कामी असतो. भारतीय राशीचक्राचा बिंदु स्थिर आहे तर पाश्चात्य लोकांच्या राशीचा बिंदू चल आहे..
एकूण बारा राशीपैकी सहा राशी दिवसा व सहा राशी रात्री अवकाशात असतात .दिवसाच्या राशी सूर्यप्रकाशात असल्यामुळे अर्थात दिसत नाही ..
साधारणपणे १५ एप्रिल ला सुर्य मेष राशीत प्रवेश करतो .म्हणजे मेष पासून सहाव्या क्रमांक पर्यत राशी दिवसा दिसतील ..
त्याच वेळेस सातव्या क्रमांकाची म्हणजे तुळ राशीचा संध्याकाळी आकाशात उदय होईल .म्हणजे एप्रिलला तुळरास पूर्णरात्री अवकाशात दिसेल .
कोणत्या महिन्यांत कोणती रास पूर्णवेळ रात्रीच्या अवकाशात दिसेल याचा ढोबळ अंदाज .
१) एप्रिल - तुळ
२) मे -वृश्चिक
३) जून -धनु
४) जुलै - मकर
५) ऑगस्ट - कुंभ
६) सप्टेंबर - मीन
७) ऑक्टोबर - मेष
८)नोव्हेंबर - व्रुषभ
९) डिसेंबर - मिथुन
१०) जानेवारी - कर्क
११) फेब्रुवारी - सिंह
१२)) मार्च - कन्या

टीप - सदर माहिती नव आकाशनिरिक्षण करणाऱ्या मित्रांनसाठी ढोबळ पणे दिली आहे ..
-चंद्रकांत घाटाळ

🎭 Series Post

View all