रणसंग्राम - एक झुंजार भाग ९ #मराठी_कादंबरी

C.M. gave abhishree a responsibility to convince vijaysinha for taking charge of education minister. She asks vijaysinha about their family past. He told abhi few things and fallen ill. She decides to ask everything to karkhanis. She gets a surprise

रणसंग्राम - एक झुंजार : भाग

( भाग ते भाग च्या लिंक या भागाच्या शेवटी मिळतील. )

मागील भागात -

सी. एम. रणदिवे व त्यांच्या कुटुंबाने अभिश्रीचं खुप छान स्वागत केलं. सी.एम.नी विजयसिंहांना मंत्री पदासाठी तयार करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. त्यासाठी तिला तिच्या कुटुंबाचा भुतकाळ जाणुन घेण्यासाठी सांगितले. विजयसिहांनी तिला काही गोष्टी सांगितल्या पण त्यांची तब्बेत त्यामुळे खराब झाली आणि विषय अर्धवट राहिला. हा विषय आता परत घरच्यांसमोर काढायचा नाही असं तिने ठरवलं.

---------------------

"इट्स ओके बेटा... 

याचा जास्त विचार करु‌ नको आता" ईश्वरी

"चिल्ल अभी… होतील ते नॉर्मल लवकर...

बरं माझं एक काम कर ना प्लीज... 

विदिता काकुंच्या नवीन रेसिपी बुकची इडीटेड कॉपी आहे ही, त्यांना देऊन ये ना. मायनर चेंनेस आहेत फक्त. जर लिहिलेलं लक्षात नाही आलं तर समजावशील. आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे रे.." आदिनाथ

कारखानीसांच्या घरी जायचं म्हणताच तिची ट्युब पेटली.

"ओके भाई… लगेच जाते." अभिश्री

"आणि होsss... परीतोषच्या काँटॅक्टमध्ये कोणीतरी आहे. त्यांची स्कल्पचर बनवण्याची ऑर्डर आहे तुझ्यासाठी. ते पण विचारुन घेशील त्याला" अभिश्री

अभिश्री फाईन आर्टच्या शेवटच्या वर्षाला होती. त्यामध्ये विविध धातू, माती, स्टोनचे स्कल्पचर (मुर्त्या) बनवण्यात तिचा हातखंडा होता. तिची कुठलीही मुर्ती अगदी जिवंत असल्यासारखी भासत.

"अरे यार sss... यावेळेस पुन्हा त्या खडुस कडुन ऑर्डर आली का…! डोक्याला शॉट आहे तो माणुस…!

आणि विदीता काकुंच राइट अप वगैरे लिहिणं ठीक आहे. पण आजकाल तुझ्या एफ. बी. वर बऱ्याच रोमँटिक कविता दिसतात…! क्या बात है भाई…?" अभिश्री

"गप्प बस हां तु…!" आदिनाथ

"अरे वाहsss... प्रेम फक्त लिखाणातच आहे की…???" ईश्वरी

"आई प्लीज…!!! मी रेडी होऊन येतो. बाय..."

आदिनाथ लाजुन निघुन गेला.

"भाई का कुछ तो सीन है आई… आपले डिटेक्टिव कामाला लावावे लागतील. मी निघते आता, तिकडेच जाऊन नाश्ता करेन" अभिश्री

"बरंय… लागा कामाला लवकर... आम्हालाही भावी सुनमुख बघायला मिळेल" ईश्वरी

अभिश्री मिष्खीलपणे दबक्या‌ पावलांनी आदिनाथच्या रुमबहेर उभी राहिली. आदिनाथ आत फोनवर बोलत होता. अभिश्री बाहेर दाराजवळ उभी राहुन ते ऐकत होती.

"सॉरी २ दिवस खुप बिझी होतो म्हणुन निवांत बोलता नाही आलं. त्यादिवशी  फॅशन शो च्या ओपनिंगला खुप सुंदर गाणं म्हटलं तु आणि खुप गोड दिसत होतीस. असं वाटत होतं तुझाकडे बघत तुला ऐकत राहावं. 

तुझं गाणं झाल्यावर घरी उशिरा ड्रॉप केलं तर कोणी काही बोललं तर नाही ना…?

"नाही रे फार जास्त उशीर नाही झाला…" फोनवरील व्यक्ती

"तो व्हिडिओ पण मी मगवुन घेतला. सारखं बघत राहतो तरी मन भरत नाही." आदिनाथ

"गाणं तर तुच कांपोज केलं होतं… मी नुसतं गायले.." फोनवरील व्यक्ती

"आय नो गाणं जरी मी लिहिलं असेल तरी तुझा सुरांमुळे त्यात जीव निर्माण झाला." आदिनाथ

"खरंच…" फोनवरील व्यक्ती

"तुझा गळ्यात सुर साज घालतात. साधं बोलणं हसणं सुध्दा वेड लाऊन जातं.

बरं ऐक ना sss… मी एक गाणं कंपोज केलंय तुझासाठी, म्हणजे आपल्यासाठी. आपण दोघांनी ते डुएटमध्ये गावं अशी माझी इच्छा आहे.

प्लीज प्लीज प्लीज….

टेक युअर टाईम पण मला माहिती आहे तु होच म्हणशील…" आदिनाथ

तेवढ्यात अभिश्रीने मुद्दाम दार बडवलं आणि आत गेली.

"भाई sss… बिझी आहेस का…!! "

आदिनाथ ने गडबडुन फोन ठेवला.

"नाही नाही sss... बोल ना…" 

"ऑफिस मधुन कॉल होता का…?"

"नाही sss.. आय मीन हो अफकोर्स…"

अभिश्रीने विदितासाठी दिलेल्या बुकमध्ये उगाच काही डाऊट विचारले आणि मुद्द्यावर वळली.

"भाई sss... तु आमच्या फॅशन शो ला का बरं आला नाही…???" अभिश्री

"सॉरी अरे sss… त्यादिवशी अचानक फॉरेन क्लाएंट आले होते. तुला सांगितलं पण होतं तेव्हाच." आदिनाथ

अभिश्रीने एक खडा मारुन बघितला.

"अच्छा sss... ॲक्च्युली त्यादिवशी मला तुझी गाडी कॉलेजच्या पार्किंगमध्ये दिसली होती. मला वाटलं मला सरप्राइज देण्यासाठी आला असशील." अभिश्री

आदिनाथ आता चांगलाच गोंधळत होता. त्याचा चेहरा बघुन अभिश्रीला मजा येत होती.

"हो हो sss… आलोच होतो मी संध्याकाळी... तुला सरप्राइज देण्यासाठी पण अचानक परत काम आल्यामुळे निघालो." आदिनाथ

तिने परत मजा घेतली.

"ओह sss... संध्याकाळी का..! मी तर तुझी गाडी दुपारी बघितली होती…!!" अभिश्री

"अरे हा sss… विसरलोच की… दुपारी तर मी नव्हतोच... एक टेक्निशियन पाठवला होता कॉलेजमध्ये, माझी गाडी घेऊन. त्या भार्गवीच्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये. आम्ही टेस्टिंगसाठी काही सॉफ्टवेअर इंस्टॉल केले होते त्यांच्या कंप्युटर लॅबमध्ये. ती बोलली काही तरी प्रोब्लेम येत आहे म्हणुन.

मी नव्हतोच काही…!!

बरं तु गप्पा काय मारत बसली इथे…!

निघ... जायचं न तुला पण…!

मी ही निघतो ऑफिस ला…" आदिनाथ

"हो होsss... निघते…" अभिश्री

आदिनाथने एकदाचा सुटकेचा श्वास सोडला…

अभिश्री जाताच त्याने लगेच भार्गवीला फोन केला.

"भागुsss... बचाले यार इस बार भी…!! प्लीज…!!!

त्याने अभिश्रीने केलेली चौकशी भार्गवीला सांगितली.

हे बघ ती आत्ता तुमच्याकडे येईल उलट सुलट प्रश्न विचारेल. 

प्लीजsss…! तिला तेच सांग जे मी बोललो. शांभवीचं नाव अजिबात येऊ देऊ नको…" आदिनाथ

"ए काय रे sss.. नेहमीचं तुमचं… तुम्ही लोक सारखे घोळ करत राहता आणि माझ्या नावावर खपवता. वैतागले मी तुमच्या तिघांना…!!!

हे बघ..! मला काही झोल जमत नाही. ती खुप चौकशा करुन काहीतरी कढेलंच. ती यायच्या आधीच मी पळते कॉलेजला." भार्गवी

अभिश्री दाराआडुन ऐकत होती..

अच्छा शांभवी काय…!

सिंगर काय..! 

अब अयेगा मजा….!" अभिश्री

अभिश्री तिथुन कारखानीसांकडे जाण्यासाठी निघाली.

त्यांचा बंगला जवळच असल्याने अभिश्री जॉगिंग करत १० मिनिटात तिथे पोहचली.

षटकोनी आकाराचा भव्य बंगला समोर एका बाजुला विविध फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड. छोटी शेतीच जणु व दुसऱ्या बाजुला मोठा स्विमिंग पूल, बंगल्याभोवती जॉगिंग ट्रॅक. 

अभिश्रीने हिमनीकाला फोन लावला.

"हिमा… टाईम टू युज आर ट्रमकार्ड. आपण डिस्कस केलेले कॉलेज इलेक्शन कॅंपेनचे डिटेल्स मला व्हॉट्स ॲप कर ना लगेच." 

अभिश्री आत गेली. प्राबोध कारखानीस डायनिंगमध्ये चहा घेत होते. 

"हॅलो काका…" अभिश्री.

"अरेsss.. ये ये बेटा… अगं अभिश्री अलीये…" प्रेबोध

"हाय काकु… ही घ्या तुमची फायनल कॉपी" अभिश्री

"चलाsss... आदिनाथनी बघितलं ना मग आता पब्लिश करायला मोकळी" विदिता

"काय काकु तुम्ही पण…! एवढे कुकरी बुक्स लिहिता तरी पण भाईकडुन चेक करुन घेता…! काही चेंजेस पण नसतात फारसे." अभिश्री

"आदिनाथ म्हणजे माझा लकी चार्म आहे. माझं पाहिलं बुक त्यानीच तर लीहुन दिलं होतं. तेही अगदी शाळेत असताना. अमर भाऊजींच प्रतिबिंब दिसतं त्याचात. आणि तू ते सगळं पुढे एफ. बी., यू ट्यूबवर टाकुन दिलं. नाहीतर आमचे रत्न परीतोषचा तर लिखाणाशी काही संबंध नाही आणि भार्गवी काय m. b. b. b. s. शिवाय दुसरं काही शिरत नाही तिच्या डोक्यात" विदिता

"आज सकाळी सकाळीच‌ आली का स्वतःच कौतुक करुन घेण्यासाठी …!" परीतोष

"अरे अभी sss... हा अपोझिशनवाला आपल्यात काय करत आहे…!" प्रबोध

"म्हणजे डॅड…!" परीतोष

 "हो मग sss…! मी कॉलेज इलेक्शनमध्ये अभीकडुन असणार. 

बेटा... आम्हा सर्व ट्रस्टीजकडुन तुला फुल्ल सपोर्ट असेल. याला एरवीच हरवु आपण." प्रबोध

"ओहहsss... गाॅड... धिस इज द लिमिट ऑफ पॅंपरींग…!" परीतोष

"यु आर जस्ट जेलस..." अभिश्री

"हा हा sss…. इन युअर ड्रीम्स... चालु द्या तुमचं हितगुज. मी जातो वरती जिमसाठी. आई माझा शेक पठवशील" परीतोष.

"काकु मला पण नाश्ता" अभिश्री

"ओके.." विदिता

"अभिश्रीने कारखानीसांना तिच्या कट्टा गँग सोबत ठरवलेल्या कॉलेज विषयीच्या कल्पना सांगितल्या. त्यांना खुप आवडल्या व आपण त्या नक्की राबवु असंही सांगितलं.

विदीता नाश्ता घेऊन आली. अभिश्रीने थोडं संकोचतच कालचा सर्व वृत्तांत सांगितला. विजयसिंहांना पुन्हा‌ शिक्षण मंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी सी. एम.नी तिच्यावर सोपवली हेही सांगितलं.

"सॉरी काकु काका पण काल बाबाची झालेली अवस्था बघुन हा विषय घरी काढण्याची माझी हिम्मत होत नाहीये. पण बाबाला पुन्हा शिक्षण मंत्री पदासाठी तयार करायचं की नाही हे समजण्यासाठी भुतकाळातील गोष्टी जाणुन घेणे आवश्यक आहे. 

प्रबोध व विदीता दोघांमध्ये एक निरव शांतता निर्माण झाली." अभिश्री

"बरोबर आहे तुझं... 

घरी हा विषय नको परत. आम्ही सांगतो तुला. पण तुझ्या बाबाला मंत्री पदासाठी तयार करता येईल की नाही हे फक्त आदिनाथच सांगु शकतो." प्रबोध कारखानीस

"म्हणजे…"  अभिश्री

"कारण त्याच्याच साठी त्यांनी मंत्रीपद सोडलं…" प्रबोध

"भाई साठी…!!!"

कारखानीसांनी तिला पुढच्या सर्व घटना सांगितल्या. अमर, गायत्री गेल्यानंतरची विजयसिंहांची अवस्था, आदिनाथचे त्यांना सावरणे व त्यानंतर त्याच्या मनात जाणवलेली राजकारणाची चीड, आदीषची भरभराट, गुन्हेगारांना दिलेली शिक्षा. 

"खरंच खुप भयंकर आहे हे सगळं. आमच्या अपघातात काका काकी गेले एवढंच मला तेव्हा समजलं. पण यामागे असा काही कट असेल याची कधी कल्पना ही नाही केली. ज्या पद्धतीने हे घडलंय त्यामुळे तुम्ही लोकांनी हा विषय परत न काढणं ही साहजिकच होतं. आज कळलं मला की भाईला राजकारणाचा एवढा तिटकारा का आहे." अभिश्री

"हममम्… असो ही वाईट आठवण आपण काळा आडंच राहु देऊ. तु त्याचा विचार आता करु नको आणि ओझही बाळगु नकोस. खुद्द सी. एम. नी तुला एक जबाबदारी दिली आहे. ती पार पाड. तुझ्यात त्यांना नक्कीच तसं काही दिसलं असेल. त्यामुळे तु आता फक्त भविष्याचा विचार कर." प्रबोध

"हो काका… तुमच्या बोलण्याने थोड हलकं वाटतंय" अभिश्री

"खरंच… मलाही छान वाटतंय. रणदिवे तुझ्या पाठीशी आहेत. तुझं करीयर खुप ब्राईट आहे. निर्भिडपणे पार पडशील तु सर्व. आणि आम्ही सगळे अहोच सोबत." विदीता.

"थॅक यू काकु… चला निघते नी. कटलेट खुप छान  झालेत.

अरे sss…. मला परीतोष बरोबर बोलायचं होतं. त्याच्या एका क्लाएंटला स्टोनची मुर्ती बनवुन हवी होती. त्याच्याशी बोलुन डायरेक्ट घरी जाते. इथे आणखी थांबले तर तुमच्या हाताच्या जेवणाचा मोह आवरणार नाही." अभिश्री

"अच्छा ठीक आहे. आज तसा स्पेशल मेन्यु आहे, घरी डब्बा पाठवते… 

परीतोष रुममध्ये असेल. जिम झालं असेल एव्हाना." विदिता

"अरे वाह sss.. ग्रेट…!

पाठवा डब्बा. जाते मी वरती. बाय…" अभिश्री

अभिश्री वरती परीतोषच्या रुमकडे गेली. तिने नाॅक केलं पण काही उत्तर मिळालं नाही. तिने थोडं आत डोकावलं तर तो दिसला नाही. भार्गवीच्या रुममध्ये ती नेहमी जात. 

बारावी पर्यंत त्या दोघी एकाच वर्गात होत्या आणि जिवलग मैत्रिणी सुध्दा पण ती पुस्तकी किडा असल्याने अभ्यासात जास्त रमत. परीतोषच्या रुममध्ये ती फार कमी वेळा आलेली. संपुर्ण रुम ही अंतरिक्षीय थीमने डेकोरेट केलेली. गडद निळ्या रंगाची आकाशगंगा त्यामध्ये सुर्यमालेतील विविध ग्रह भिंतींवर पेंट केले होते. अभिश्रीला ते बघुन नेहमी खुप उत्साही वाटत पण तो तिला लगेच रुममधुन हकलवुन देत. 

आज ती निवांतपणे सर्व न्याहाळत होती. अचानक समोर कपाटाचा एक दरवाजा उघडा दिसला पण त्यामागे कपाट नव्हतं. तिने ते दार पुर्णपणे उघडलं. त्यामागे आणखी एक रुम होती. ती आत शिरली खरी पण समोर जे दिसलं ते बघुन तिचे डोळे विस्फारले. तिला आपण काय बघत अहो यावर विश्वासाचं बसत नव्हता….

क्रमशः

( पुढील भाग शुक्रवारी दिनांक .) 

परीतोषच्या त्या आतल्या रुममध्ये असं काय असेल की अभिश्री स्तब्ध झाली…?

शांभवी कोण आहे हे अभिश्री कसं शोधुन काढणार…?

आदिनाथ अभिश्रीची मदत करण्यासाठी तयार होईल का…?

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}

लेखन - रेवपुर्वा

रणसंग्राम १

रणसंग्राम २

रणसंग्राम ३

रणसंग्राम ४

रणसंग्राम ५

रणसंग्राम ६

रणसंग्राम ७

रणसंग्राम ८

🎭 Series Post

View all