रणसंग्राम - एक झुंजार भाग ७ #मराठी_कादंबरी

Abhishree and her friends organized the cultural program. They won trophies and medals in sports. On last day they organized a fashion show where abhishree wore nauvari and had a walk with paritosh. Later vijaysinha and abhishree goes to meet c.m. in

रणसंग्राम - एक झुंजार भाग

(भाग १ ते भाग ६ च्या लिंक या भागाच्या खाली दिल्या आहेत)

मागील भागात -

अभिश्री व तिच्या कट्टा गँगने कल्चरलसाठी संपुर्ण कॉलेज अप्रतिम रित्या सजवले होते व त्यानंतर इलेक्शन कॅंपेनसाठी योजना आखल्या. काही दिवस अभिश्री दिवसा कॉलेजमध्ये तयारी आणि संध्याकाळी आईसोबत चेस प्रॅक्टिस करत होती. फॅशन शोच्या दिवशी कुठल्या तरी कारणाने ती दक्षच्या मागे त्याला मारण्यासाठी पळत होती.

--------------------

दक्षने अभिश्रीच्या हातात फॅशन शो चा शेड्युल दिला.

शेड्युल वाचुन तिचं डोकंच फिरलं.

ती अक्षरशः दक्षच्या मागे जळका तर नाही पण लाकुड घेऊन भर ऑडीटोरियम मध्ये पळत सुटली.

"अरे नालायका… मला हा कॉस्च्युम का दिला तु…! 

बाकी लोकांचे किती सोपे आहेत. नऊवारी कशी नेसतात कधी जन्मात बघितलंय का तु…!

गाढव माणसा…! 

कशी नेसु मी..? आणि घोळात पाय अटकला तर काय करु स्टेजवर…?"

"अगं… घोळ होणारच नाही तर पाय कसा अटकेल…!

आणि नित्या पण साऊथ इंडियन घलत आहे. तुला महाराष्ट्रीयन दिलाय. जोसेफ पण धोती घालेल की तुझ्या सोबत पार्टनर. काकु नेहमी नेसतात की नऊवारी. 

घरी जा sss... पटकन रेडी होऊन ये…!

अभिश्रीने दक्षवर एक जळजळीत कटाक्ष टाकला व याचा बदला नंतर घेईलच असं म्हणुन घरी निघुन गेली.

दक्षने ईश्वरीला आधीच अभिश्रीच्या तयारीची कल्पना देऊन ठेवली होती त्यामुळे ती तयारीत होती. 

तिने अभिश्रीच्या नितळ रंगावर खुलेल अशी एक सुंदर जांभळ्या रंगाची नऊवारी नेसुन दिली. उंचपुरा बांधा केसांचा अंबाडा, कोल्हापुरी साज, नाकात नथ असा मराठमोळा शृंगार ईश्र्वरीने तिला करुन दिला.

आज विजयसिंहांनी आपल्या मुलीसाठी पण मोगर्याचा गजरा आपल्या हातांनी बनवला व तिला माळुन दिला.

एरवी जीन्स, त्यावर लॉंग कुर्ता किंवा शर्ट आणि हाफ जॅकेट घालणारी अभिश्री आज खुप गोड आणि लोभस दिसत होती.

कॉलेजमधुन फोन सुरुच होते. तयारी होताच ती कोलेजसाठी निघाली.

"अहो sss… हा घ्या तुमचा गजरा. या देतो तुम्हाला माळुन." विजयसिंह

ईश्वरी त्यांना ५ मिनिट थांबण्यासाठी सांगुन लाजुन रुममध्ये गेली. ती बाहेर आली ते अगदी तशीच त्या दोघांच्या पहिल्या संस्कृतीक दिनाच्या वेळसारखी त्याच नऊवारीत. विजयसिंह आजही तशेच घायाळ झाले.

व आपले सोनेरी दिवस आठवत बसले.

"अहो sss... एक सांगायचं राहिलं. मी एवढ्यात मुंबईला जाऊन येईल म्हटलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी. पुढच्या प्रचाराची आखणी करावी म्हणतो." विजयसिंह

"हम्मम... या वेळेस अभिला पण घेऊन जावं असं म्हणतेय. एरवी ती त्यांना तुमची मुलगी म्हणुन भेटलेली आहे. पण यावेळी तिच्या राजकारणातील पदार्पणासाठी ही भेट असावी असं मनात आलं." ईश्वरी

"खुपच छान कल्पना आहे ही तर. बोलु आपण तिच्याशी. ही सर्व गडबड आटोपल्या नंतर." विजयसिंह

कॉलेजमध्ये पोहचताच सर्वांच्या नजरा अभिश्रीकडे होत्या, ते बघुन तिला ओशाळल्यासारखे झाले.

एरवी हजार लोकांसमोर भाषण झोडण्यात कधी लाजणार नाही. आज जरा नजर चोरतच ऑडीटोरीअम मध्ये पोहचली.

"हाये ss… आज तो स्टेज को आग ही लग जाएगी जनेमान…! 

तुझ्यासोबत चालताना माझाकडे कोण बघणार पण नाही यार." जोसेफ

"अरे sss.. खरंच बरी दिसतेय का..! सर्वजण एलियन सारखे बघत आहेत माझ्याकडे." अभिश्री

"बरी..! अगं खुप गोड दिसत आहेस. बिन्धास्त जा स्टेजवर. नेहमी वावरते तशी. नित्या पण क्युट दिसत आहे साऊथ इंडियन ब्रायडल लुक मध्ये. मला बॅकस्टेज  मॅनेजमेंट नसतं तर मी पण आले असते." हिमानिका

तिच्या बोलण्याने अभिश्रीला थोडा धीर आला.

थीम प्रमाणे फॅशन शो मध्ये भारतातील विविध पद्धतींचे कॉस्च्युम सर्व कपलसाठी ठरवले होते. पंजाबी, साऊथ, महाराष्ट्रीयन, नॉर्थ.

तिकडुन जोसेफ धावत आला…

"गाईज घोळ झालाय. म्युझीक मध्ये काहीतरी गडबड होतेय. ऑटोमॅटिक दुसरीच गाणी लागत आहे.

यारsss... मलाच बसावं लागेल सिस्टीम जवळ …" जोसेफ

"मग अभीसोबत कोण जाणार रॅम्प वर…! 

तेही आत्ता  एवढ्या वेळेवर….! 

दक्षला पण बॅक स्टेज काम आहे" हिमानिका

"राहुदे अरे... कॅंसल करु माझं." अभिश्री

"नो नो sss.. नो नो sss...  डोन्ट वरी अजुन अर्धा तास आहे. मी पकडुन आणतो कोणाला तरी. तुम्ही सगळे ठरल्याप्रमाणे रॅम्प जवळ उभे राहा." दक्ष

१५-२० मिनिट होऊनही कोणी आलं नाही म्हणुन अभिश्री तिथुन निघणारच की दक्ष परीतोषला घेऊन आला.

बाकी कोणीही वेळेवर तयार होत नसल्याने आणि परीतोषला त्याच्या वेळेस फॅशन शो चा अनुभव असल्याने त्यालाच घ्यायचं ठरलं.

"अरे sss... पण हा कॉलेज पास आऊट आहे कसं चालेल…?" अभिश्री

"अगं कोणी काही नाही बोलणार जा तुम्ही बिंदास्स. गेस्ट ऑफ ऑनर म्हणुन सांगु." दक्ष

 "मस्त व्ही. आय. पी. रो मध्ये बसुन एंजाॅय करत होतो. आता तुझ्यासोबत चालावं लागेल. 

नऊवारी कधी नेसली तरी का या आधी…! 

नीट सांभाळ... माझी इमेज आहे कॉलेजमध्ये अजुनही." परीतोष

"तु जसं काही रोजच धोती घालतोस…! 

नीट चाल.. सुटली तर माझ्या इमेजचा कचरा होईल." अभिश्री

तेवढ्यात रॅम्पवर एन्ट्रीची वेळ झाली. परीतोष अभिश्रीचा हात धरुन रॅम्पवर चालायला लागला. त्याचा झालेला तो अचानक स्पर्श तिला वेगळाच जाणवला. 

नेहमी भांडणाऱ्या परीतोषाचा स्पर्श एवढा प्रेमळ कसा…! 

की मला भास होतोय…?

अभिश्री व परीतोषच्या मराठमोळ्या जोडीकडे बघुन मुलांमध्ये शिट्ट्या सुरु झाल्या. 

अभिश्रीला अगदी शोभेल असा राजबिंडा परीतोष. उंच, धिप्पाड, गव्हाळ रंग, आजच्या फॅशनची वाढवलेली  पण परफेक्टली ट्रिम केलेला बिअर्ड लुक. 

दोघंही रॅम्पच्या शेवटी पोहचले व आता वळुन परत जाण्याची वेळ आली तोच अभिश्रीच्या सॅंडलची हील तुटली असं तिला जाणवलं आणि ती तिथेच स्तब्ध झाली. 

समोर २००० लोक. कॉलेजची इभ्रत. आता चालायचं कसं. 

सॅंडल काढुन चालावं…? 

की न काढता जमेल…? 

एका क्षणात असंख्य प्रश्न अभिश्रीच्या मनात सुरु झाले. ती तिथेच डोळे मिटुन उभी राहिली.

आता नुसता उभं राहणे हा पर्याय नव्हता. सॅंडलंचे बेल्ट घट्ट असल्याने ती काढणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने पाऊल उचलुन शक्य तेवढ्या सरळ चालायचं असं ठरवलं. तिने पाय उचलण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिच्या लक्षात आलं तिचे पाय जमिनीवर नसुन तीच हवेत आहे. 

डोळे उघडताच समोर परीतोषचा चेहरा.. त्याने तिला उचलुन घेतले होते. आयुष्यात पहिल्यांदाच तिला असा कोणाचा तरी स्पर्श झाला होता.

परीतोष तिला अलगद हातात घेऊन समोर बघुन  तथटस्थपणे चालत  होता आणि अभिश्री एकटक त्याच्याचकडे बघत होती. परीतोषने अभिश्रीला उचलताच सर्वत्र टाळ्या आणि शिट्ट्या सुरु झाल्या कोणाला कळलही नाही की ही अकस्मात झालेली गोष्ट होती. 

त्याने तिला अलगद खाली ठेवले तोवर ती फक्त त्याचा स्पर्श जाणवत होती.

"चालता येत नाही तरी फुशारक्या कशाला मारायच्या. बस लोकांच्या पुढे पुढे मिरवायचं.. " असं नेहमीप्रमाणे बड बडत तो तिथुन निघुन गेला.

पण तिला आज त्या बोलण्याचा राग नाही आला. 

कार्यक्रमाची गडबड आटोपुन सर्वजण आपापल्या घरी निघाले. रात्री उशीर झाल्यामुळे शिवा अभिच्या सिक्युरिटीसाठी थांबुन होता. त्याने तिला घरी सोडले.

अभिश्री अजुनही परीतोषच्या स्पर्शाच्या धुंदीत होती. पलंगावर लोळत ती त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होती.

तेवढ्यात तिच्या रुमच्या दारावर नाॅक झालं. विजयसिंहांनी तिला आवाज दिला.

तीने दार उघडले.

"थकली का बेटा.."

"नाही रे sss... बाबा.. बोल ना.."

"तसं... ही गोष्ट एवढ्यात ठरवायची नव्हती आपल्याला पण योगच आले. आजंच ईश्वरी बोलत होत्या तुझी आणि आपले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत रणदिवे यांची भेट करुन देण्यासाठी. माझा तसं पुढच्या आठवड्यात जायचा विचार होता पण ते परवापासुन १५ दिवस दौऱ्यावर असतील त्यामुळे आपल्याला उद्याच मुंबईला जावं लागेल. तु आधी पण भेटली आहेसच त्यांना १-२ वेळ. आपल्या घरी आणि पार्टीमध्ये. मी आज त्यांच्या कानावर घालुन ठेवलंय तुला भेटण्यासाठी घेऊन येण्याबद्दल." विजयसिंह्

हे ऐकताच अभिश्रीला चांगलाच धक्का बसला.

"बाबा... अरे sss... मी काय बोलणार त्यांना. अजुन तर मी काहीच काम केलेलं नाहीये. मी भेटले तेव्हा ते सी. एम. नव्हते." अभिश्री

"अगं बेटा कॉन्टॅक्ट अशे आधी पासुनच जोडावे लागतात. ५-५ वर्षानंतरची आखणी आजचं करावी लागते. आदिनाथला कधी राजकारणात उतरायचं नव्हतं पण तुझी इच्छा आहे तर सुरुवात आत्ताचं करावी लागेल." विजयसिंह

"पण बाबा मी त्यांच्याशी काय बोलु..?" अभिश्री

"जास्त विचार करु नको. आय नो युवर पोटेन्शियल. समोर आली की योग्य ते बोलशील तु. झोप आता उद्या निघु लवकर." विजयसिंह

अभिश्रीच्या मनात आता वेगळेच वादळ सुरु झाले. सी. एम. समोर आपण कसं जायचं हेच विचार करत तिला झोप लागली.

ती सकाळी रुम मधुन खाली आली तेव्हा ईश्वरी आणि विजयसिंह मॉर्निंग वॉक वरुन परत आले होते. आदिनाथ ही नुकताच क्लब मधुन टेनिस खेळुन परत आला. अभिश्रीने आज व्यायामासाठी सुट्टी घेतली होती.

चहासाठी सर्व डायनिंग मध्ये बसले.

"ह्म्ममम… एका मुलीला टेंशन आलेलं दिसतंय." ईश्वरी

"आई फार लवकर होत नाहीये का हे…?" अभिश्री

"अगं तुला काय लगेच आमदारकीला थोडी उभं करणार... 

एक कॅज्युअल भेट आहे ही." ईश्वरी

"मला तर दुसरीच शंका येतेय. तिकडे जाऊन त्यांनाच ४ गोष्टी सांगुन येईल ही…" आदिनाथ

"भाई sss... प्लीज हा…!" अभिश्री

"अगं गम्मत केली…!

खुप जेन्युन पर्सन आहेत ते. अगदी डाऊन टू अर्थ. आमचे बरेच टेक्निकल पेटंट त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अप्रुव्ह करून दिलेले. नवीन विचारांणा कौतुकाने बढावा देतात ते. डोन्ट वरी." आदिनाथ

घरच्या वातावरणाने अभिश्रीचं दडपण थोडं कमी झालं.

दोघेही नाश्ता करुन घरुन निघाले. १२ वाजता विजयसिंह व अभिश्री मुंबईमध्ये सी. एम. ऑफिस समोर पोहचले. अभिश्रीच्या मनातील धड धड आता परत वाढली. 

अपॉइंटमेंट आधीच घेतल्यामुळे त्यांना लगेच सी. एम. ऑफिसमध्ये बोलावले. वडिलांच्या मागे मागे अभिश्री थोडी दबकत आत शिरणार तोच आतुन एक शिपाई आला आणि सी. एम. सरांनी तिला बाहेर बसण्यासाठी सांगितलं आहे असा निरोप दिला. 

ती समोरच्या बेंचवर बसली. दाराची उघडझाप होताना काही लोकांचे वाद विवादाचे आवाज कानावर येत होते. तासभर होऊन गेला. त्यांच्यातील बरेच लोक एक एक करुन बाहेर पडत होते.

थोड्या वेळाने विजयसिंह, सी. एम. व इतर काही मंडळी ऑफिस बाहेर आले. विजयसिंहनी तिला मेसेज केला.

"मंत्रालयात अर्जंट काम आलंय त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागत आहे. तासाभरात काम आटोपलं तर तुझी भेट होईल त्यांच्याशी नाहीतर पुढल्यावेळी भेटशील. तोवर तु जवळपास फेरफटका मारुन ये."

तिने ठीक आहे म्हणुन रिप्लाय केला पण मनातुन खुप नाराज झाली. पार्किंगमध्ये बराच वेळ एका झाडाखाली स्वतःची समजुत काढत बसली.

"सी. एम. आहेत ते पुर्ण राज्याची जबाबदारी पेलतात. असंच कसं भेटतील माझ्या सारख्या मुलीला. स्वतःच्या बिझी शेड्युल मधुन वेळ देऊन, माझ्याकडुन आज त्यांना कुठलाही फायदा होणार नाही. त्यासाठी मला स्वतःला त्या लायक बनवाव लागेल. 

"अभिश्री sss... अभिश्री सरपोतदार…"

या हाकेने ती विचारातुन बाहेर आली.

चेहरा झाकलेली एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर बाईक थांबवुन उभी राहिली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले.

"अगं माझ्या मागे बस आधी.. इथुन निघु मग बोलु आपण."

"माफ करा पण मी ओळखलं नाही तुम्हाला." अभिश्री

"ओहsss... अम सो सॉरी... मी माझा परिचयचं नाही दिला तुला."

क्रमशः

(पुढील भाग परवा सोमवारी प्रकाशित करण्यात येईल)

अभिश्रीला तिथे ओळखणारी व्यक्ती कोण होती …?

तिची आणि सी. एम. ची भेट होईल का…?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

रणसंग्राम भाग १

रणसंग्राम भाग २

रणसंग्राम भाग ३

रणसंग्राम भाग ४

रणसंग्राम भाग ५

रणसंग्राम भाग ६

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.आता काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}

रणसंग्राम - एक झुंजार

लेखन : रेवपुर्वा


 

🎭 Series Post

View all