रणसंग्राम - एक झुंजार भाग २५ #मराठी_कादंबरी

Shambhavi and her family meet sarpotadar. Adinath is finally very happy to have Shambhavi back. But she takes promise not to involve her father ever. Abhishree and her gang plans there unique ganesh visarjan. They get worried to see the city analysis

रणसंग्राम - एक झुंजार भाग : २५

भाग खुप उशिरा आल्याने सर्व वाचक किती दुखावले असतील याची मी कल्पना करु शकते. त्यासाठी क्षमस्व पण काही अपरिहार्य कारणास्तव लिखाण कारणं शक्य नाही झालं. कथेला योग्य तो मान आणि वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करेन. 

मागील सर्व भाग खालील लिंकवर मिळतील

Ransangram recap

मागील भागात -

शांभवी निघुन गेल्यानंतर आदिनाथने स्वतःला संपुर्णपणे कामात झोकुन दिलं होतं. परीतोषची त्यामुळे तारांबळ उडत होती. संपतरावांनी आदिनाथसाठी त्यांच्या मुलीचं स्थळ आणलं होतं पण आदिनाथनी ते नाकारलं हे ऐकुन अभिश्रीला राग आला. अभिश्री आणि त्यांची गँग मिळुन एक आगळा वेगळा विसर्जन सोहळा आयोजित करत. त्यासाठी यावेळी आधीपेक्षा अधिक लोक येणार होते. काही लोक लांब ईतर भागातून कामासाठी येताना बघुन अभिश्रीने त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं.

**********************************

"गुड मॉर्निंग… आळशी… उठ आपल्या इंगेजमेंटची तयारी करायची आहे न.. सगळे जमलेत खाली." 

सकाळी सकाळी शांभवीचा गोड आवाज आदिनाथच्या कानात घुमत होता. किल किल्या डोळ्यांनी त्याने आवाजाच्या दिशेने बघितले.. प्रत्यक्ष शांभवी त्याच्या समोर उभी होती. आदिनाथ हसला आणि रोजप्रमाणे स्वप्न समजुन परत झोपला. त्याला पैंजनांचा आवाज येत होता त्यामुळे तो उठला. ३ वर्षांपासून तो शांभवी त्याच्या सोबत असण्याची कल्पना करत होता. पण आजचे भास थोडे वेगळे वाटत होते. रोजप्रमाणे त्याने समोर असलेल्या मोठ्या भिंतीवरील प्रोजेक्टरवर शांभवीचे व्हिडियो फोटो लाऊन दिले आणि स्पीकरवर तिची गाणी. रोज तिचं गाणं ऐकूण आणि चेहरा बघुनच त्याच्या दिवसाची सुरुवात होत. तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आला. पैंजनांच्या आवजासोबत त्याला तिची चाहुल सुध्दा जाणवली. जणु ती तिथून पळत बाहेर गेली. टॉवेल गळ्याताच अडकवून तो रुमबाहेर आला. शांभवीने त्याला मागुन टपली मारली आणि परत पाळली. आदिनाथला आपण आता ठार वेडे झालोय असं वाटतं होतं. पण त्याला त्या जगात रमायला आवडत होतं. वरच्या संपुर्ण मजल्यावर आदिनाथ लपंडाव खेळत होता आणि अचानक ती त्याच्या समोर आली. तिचे मोठे पाणीदार डोळे त्यात भरपुर काजळ, लांब आय लायनर, मोठ्या पापण्यांना काळाशार मस्करा, हलकसं लिपस्टिक, तिच्या हसऱ्या गालांवर खेळणाऱ्या कुरळ्या बटा बघुन तो मोहित होत होता. त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती तिच्या मधाळ आवाजात सुरात हसत खाली हॉलकडे पळाली आणि तो धावत तिच्या मागे. 

"भाई हळु किती दमलास…! एवढं वर्क आऊट नको करत जाऊ…" अभिश्री

शांभवीला शोधत तो हॉलमध्ये आला. ती तर गायब झाली पण समोर सोफ्यावर तिची आई, मामा, मामी आणि त्यांचा मुलगा जयेश बसुन दिसले.

"आता मेंटल हॉस्पिटलची तयारी पक्की. आई मी जरा डॉक्टरकडे जाऊन येईल म्हटलं… डोकं दुखल्या सारखं होतंय." आदिनाथ

"दुःखल्यासारखं की फिरल्यासारखं…? म्हणजे तसं असेल तर सायकाईट्रीस्टकडे आमची पण अपॉइंटमेंट घे.. कारण हे लोक आम्हालाही दिसत आहेत.." अभिश्री

आदिनाथ बस उडालाच... एवढा मोठा धक्का सहन करणं त्याच्यासाठी शक्यच नव्हतं. तो गोंधळतच त्यांच्याकडे जाऊन सोफ्यावर बसला.

"बेटा.. तुझी अवस्था आम्ही समजु शकतो. हे सगळं अभिश्री आणि तुझ्या आई बाबांनी घडवुन आणलं. एवढे मोठे असुन ते स्वतःहुन अमच्या घरी आले आणि शांभवी व तिच्या आईकडे कात्रजला घेऊन गेले." गोपाळ मामा

"आमची शांभवी खुप नशिबवान आहे. तिला असं घर मिळालं. आम्ही जे ३ वर्षात तिला समजावु नाही शकलो ते त्यांनी एका दिवसात केलं. अशे लोक मिळायला भाग्य लागतं. आमची तर खुप इच्छा होती.. पण शांभवी… " आई (सरिता जाधव)

"इट्स ओके आई मी समजु शकतो." आदिनाथ

"असो… आता सगळं नीट झालंय तर नको जुन्या गोष्टी. नवीन सुरुवात करु.." मामी

आदिनाथची नजर मात्र इकडे तिकडे भिर भिरत होती. 

"भाई.. शांभवीला बघितलं होतं का..?  मग सायकाईट्रीस्ट कडे जावं लागेल." अभिश्री

"जिजु.. ताईचा राग तुम्ही घालवल्या शिवाय ती काही इथे येणार नाही." जयेश

आदिनाथ खट्टू झाला. एवढे सगळे आले मग ती का नाही.

"ए काय रे त्याला त्रास देता. चहा घे बेटा.. आजचा चहा खुप गोड असेल बरं..!" ईश्वरी

समोरुन शांभवी चहाचा ट्रे घेऊन आली आणि आदिनाथचा चेहरा परत खुलला. त्याला खुप काही बोलाव वाटत होतं पण तो फक्त तिच्याकडे बघत होता. त्याला एकही शब्द सुचत नव्हता. सर्वांना त्याची अवस्था बघुन हसु येत होतं. चहा नाश्ता करुन सर्व निघाले. आदिनाथचा चेहरा परत लहान मुलासारखा झाला.

"जिजू आम्ही जात आहो ताई ला घ्या ठेऊन. तेवढाच माझ्या बीचाऱ्याचा जाच कमी होईल."  जयेश

शांभवी आणि आदिनाथला अखेर एकांत मिळाला. दोघंही आदिनाथच्या टेरेस कम स्टडी एरियामध्ये गेले. आदिनाथने तिला कडकडुन मिठी मारली. बराच वेळ दोघंही मन आणि डोळे मोकळे करत राहिले. आदिनाथने कितीतरी दिवसानंतर तिच्या मांडीवर डोकं ठेवलं तिच्या कुरळ्या बटांशी खेळत तिच्याकडे बघत होता.

"नुसताच बघणार का..? बोल काहीतरी.." शांभवी

"भिती वाटते माझ्या बोलण्याने तुला त्रास झाला आणि तू परत निघुन गेली तर मी जगु नाही शकणार." आदिनाथ 

"Shhhhh.. असं अजिबात नाही बोलायचं. यानंतर मी कधीच तुला सोडुन जाणार नाही. हा त्रास मलाही सहन होणार नाही आता. जसा तू मला रोज मेसेज करुन माझ्यासोबत आदृष्यापणे जगत होता तसच मीही जगत होते. जी गोष्ट टाळण्यासाठी मी तुला सोडलं तीची सावली परत तुमच्या आयुष्यात डोकावली." 

"तुझे बाsss…" आदिनाथ

"तो माणुस वडील, नवरा काय माणूस म्हणण्याच्या सुध्दा योग्य नाही. आज १५ वर्ष झाली आम्ही कधी त्यांच्या समोरही नाही आलो आणि त्यांनाही कधी त्याची गरज वाटली नाही. तुझ्या बाबांनी आम्हाला सांगितलं ते तुमच्याकडे आपल्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हाच माझ्या डोक्यात शिणक गेली." शांभवी

"वडील आहेत ते तुझे… तुझी काळजी वाटणारच. जुन्या गोष्टी विसर आता नवीन सुरुवात कर. माणसं बदलतात. आणि तसही चूक त्यांची नव्हती. ती परिस्थिती, वेळ तशी होती." आदिनाथ

"मुळ वृत्ती कधीच बदलत नसते. ती परिस्थिती आणि वेळ त्यांनीच ओढुन आणली होती. दादावर त्यांनी लहानपणापासून स्वतः च्या महत्त्वाकांशांचं ओझं लादलं होतं जे त्याला झेपत नव्हतं आणि त्यामुळे तो नशेच्या आहारी गेला आणि…

तिच्या डोळ्यात पाणी तरळलं..

स्वतः ला सावरुन तिने परत बोलणं सुरु केलं.

"त्यांच्या मुळे मी माझ्या दादाला गमावलं. मला किंवा अमच्या घरी तुमच्या विषयी कधीच तिरस्कार नव्हता. त्या माणसामुळे तुमचं कुटुंब उध्वस्त झालं ज्यात आम्ही कुठेतरी जोडलेलो होती याची आम्हाला खंत वाटते. मी तुला आणि स्वतः ला एवढे दिवस खुप त्रास दिला ते फक्त तुमचं कुटुंब सुरक्षित रहावं म्हणुन. पण माझ्या जाण्याचं भांडवल करुन जर ते परत येत असतील तर मी तसं होऊ देणार नाही.  इथे येतानाही माझी एकमेव अट होती की संपतराव शेलारांच नाव इथे कधीही घेतलं जाणार नाही. त्यांचा तुमच्या आयुष्याशी, घराशी संबंध येऊ द्यायचा नाही अगदी आपल्या लग्नातही नाही. तूही तसं वचन दे." शांभवी

लग्नाचं नाव ऐकताच आदिनाथच्या मनात उकळ्या फुटल्या.

"मला वाटते तू त्यांच्या विषयी फार टोकाचा विचार करते. असो तुला हवं ते वचन घे. मला तू मिळाली म्हणजे सर्वकाही मिळालं. आणि आता हे घर आपलं आहे. " आदिनाथ

थोड्या वेळानी अभिश्री तिथे पोहचली. दोघांनी तिचे मनातुन अभर मानले.

अभिश्री आणि तिची गँग त्यांच्या आगळ्या वेगळ्या  गणपती विसर्जाच्या तयारीसाठी लागली. संपुर्ण खडकवासला विभाच्या एकाच मानाच्या गणपतीचं विसर्जन धरणाच्या पाण्यात होत व इतर सर्व घरगुती, सार्वजनिक गणपती मोठ मोठ्या टाक्यांमध्ये शिरवल्या जात. गणपती विरघळल्या नंतर ती माती घोले गणेश वनात नेऊन प्रत्येक गणपतीच्या मातीत एक मोठ्या झाडाचं रोप लावल्या जात. गेल्या ३ वर्षांपासुन कट्टा गँगने हा उपक्रम सुरु केला होता. नित्या आणि दक्ष दोघांनी मिळुन ही कल्पना सर्वत्र पसरवली. घोले गणेश वनात हा उत्सव ३ दिवस चालत. ज्या कोणाला इच्छा असेल ते लोक गणपती घेऊन तिथे येऊन झाड लावत. ३ वर्षात तिथे तब्बल ५०, ००० झाडे लाऊन त्यांचं संगोपन करण्यात आलं. यावर्षी राज्यातूनच नव्हे तर देशातून बरेच लोक तिथे येणार होते. ही संकल्पना मुळात घोले आजोबांची होती. ३ वर्षापूर्वी नित्याला  त्यांचा interview घेण्याचा योग आला. ४० वर्षापासून शक्य तेवढ्या लोकांना जमवुन ते ही संकपना राबवत. 

तेव्हापासुन कट्टा गँगने त्या संकल्पनेचा जल्लोष सुरु केला आणि त्या १०० झाडांच्या माळराणाचं वृंदावन केलं. 

यंदाच्या उत्सवाची तयारी पूर्ण जोशात सुरु झाली. ३ दिवस घोले वनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात. मॉडर्न, वेस्टर्न, ट्रॅडिशनल प्रकारे संगीत, नृत्य, विविध प्रकारचे लाईव्ह काॅंसर्ट परफॉर्म होत. यंदा आदिनाथ - शांभवीने जोड्याने डूएट गायलं. कार्यक्रमाची सर्व मॅनेजमेंट अगदी सुरळीतपने पार पडली. अभिश्रीचे सर्व मित्र, नातेवाईक, दूरचे जवळचे लोक ३ दिवसात तिथे येऊन गेले पण परीतोष मात्र एकदाही आला नाही. संध्याकाळी समारोपापर्यंत तिने वाट बघितली पण तो काही आला नाही. आता तिथे फक्त तिची चौकडी राहिली होती.

मैं जहाँ रहूं,मैं कहीं भी हूँ,

तेरी याद साथ है.

किसी से कहूं, के नहीं कहूँ,

ये जो दिल की बात है,

कहने को साथ अपने

इक दुनिया चलती है,

पर चुपके इस दिल में तन्हाई पलती है,

बस याद साथ है

तेरी याद साथ है ।

"जो… तोंड फोडेल आता तुझं. एवढ्या चांगल्या गाण्याला श्रद्धांजली देऊ नको. फुटका भोंगा बंद कर." हिमानिका

"जानेमन.. भावना समजुन घे. तुला जीजूंची आठवण येत असेल न म्हणुन म्हणत आहे. बघ ३ दिवस झाले भेट नाही तुमची. बाकी लोक काय त्यांना कुठे असते कदर प्रेमाची." जोसेफ आणि इतर सगळे अभिश्रीला चिडवत आपापल्या घरी पोहचले. तिला मात्र काही केल्या चैन पडत नव्हतं. एरवी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मागे मागे फिरतो आणि आता साधं फिरकलाही नाही.

त्याला बरं नसेल का की खुप काम असेल..? की माझ्या मागे फिरुन कंटाळला आता…? अशे बरेच प्रश्न तिच्या मनात डोकावत होते.

-------------------------------

नवक्रांती ऑफिसचं काम आता बरच वाढलं होतं. आपल्या विभागाव्यतिरिक्त त्यांना आता संपूर्ण शहराच्या व्यवस्थेमध्ये डोकावायंच होतं. 

"ऑनलाईन रिसर्च खुप झालाय.. आता त्या लोकांच्या सिस्टीममध्ये घुसुन काम करावं लागेल फिजीकली आणि टेक्निकली." अभिश्री

"ते कसं..?" नित्या

"कदिरन…" अभिश्री

नित्या चमकली.. तिच्यातील रिपोर्टरला कदिरनच्या गुढ व्यक्तिमत्त्वाबद्दल एक वेगळीच उत्सुकता होती.

"ओह… देवाला परत भेटता येईल आता. वाह.. मजा आयेगा. मी तर त्यांची पहिली भेट कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या त्या इंद्रायणी नगरच्या एवढ्याशा खोलीत जी गॅजेट्स होती ती एखाद्या रॉ, सीबीआय, आर्मी इंटेलिजन्स कडेही नसतील." जोसेफ

"हममम.. ही इज रिअली युनिक पर्सन.." दक्ष

"चलो… आपल्या रिकवायरमेंट्स त्यांना पाठवुन देऊ आणि निघते मी. आमचं पिल्लू उठेल आता." हिमानिका

कदिरनने तेव्हा म्हटल्याप्रमाणे हिमानिकाचं त्याच मुलाशी लग्न झालं आणि आता १ वर्षाची एक गोंडस मुलगी. कधी घरुन तर कधी ऑफिसमध्ये येऊन ती नवक्रांतीचं मॅनेजमेंट उत्तमरित्या सांभाळत होती. 

"आणि हो आपल्या इथे कोणीही होतकरू कामासाठी, शिक्षणासाठी आले तर ते नाराज होऊन नको जायला. त्यादिवशी तो छोटा मुलगा चहा घेऊन आला त्यांचं काय झालं. किती लांबून येतात ते लोक. सध्या शक्य तेवढ्या लोकांना तर मदत करु." अभिश्री

"ऑन इट बेबी… २ दिवसात सोलुषण रेडी असेल." दक्ष

कदिरनने १५ दिवसात सर्व analysis करुन त्यांना लिस्ट आणि डिटेल्स पाठवले आणि पुढच्या १५ दिवसांनी त्यांना भेटणार असा निरोप दिला. Analysis बघुन गँगमध्ये खळबळ उडाली. 

अभिश्री आणि तिची चौकडी थेट विजयसिंह आणि दळवींकडे जाऊन पोहचली.

"ह्ममम.. हे असं काही असेल याचा अंदाज होताच मला. पण परिस्थिती आधीपेक्षा बरीच बिकट झाली आहे. तुम्ही तुमच्या विभागात कार्यरत राहुन काम केलं तर त्या मानाने सुख समाधानात राहाल पर जर तुम्हाला ही बाहेरची संपूर्ण परीस्थिती बदलायची असेल तर एका रणसंग्रामला सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल." पी. ए. दळवी

बराच वेळ गहण चर्चा आटोपून सर्व बधीर होऊन घरी परतले. अभिश्रीची अवस्था तशीच होती. तिचं चित्त थाऱ्यावर आणण्यासाठी कोणाशी तरी बोलाव वाटत होतं. आदिनाथला सध्या डिस्टर्ब करायचं नव्हतं. खुप दिवसांनी तो आता परत आनंदी होता. दुसरा आणि रामबाण ऑप्शन म्हणजे एकच जो तिला कितीही वाईट अवस्थेत हसवू शकत होता. मॅडम गाडी घेऊन थेट कारखानीसांच्या घरी पोहचल्या.

"अरे.. ये बेटा.. यंदाचा गणेशोत्सव अप्रतिम झाला."  प्रबोध कारखानीस

"थँक्यू काका.. भार्गवी एवढ्यात भेटली नाही म्हटलं बघावं काय हाल हवाल." अभिश्री

"अगं तिचं काय.. वाया गेलीये ती मुलगी. आधी पुस्तकातून डोकं निघालं नाही आणि आता पेशंटमध्ये. तू बसं न.. चहा आणते." विदिता कारखानीस

"आणि बाकी सगळे कुठे आहे." अभिश्री

परीतोषच्या वडिलांना तिचा ओघ कळला. पण परीतोषचे वडील ते असच कसं सोडणार.

"बाकी म्हणजे… स्टाफ म्हणायचं आहे का…? आहेत की ते.. पाहुणे वगैरे तर आलेच नाही एवढ्यात." प्रबोध कारखानीस

तिला आता काही उत्तर सुचेना. त त… प प.. करत कसतरी बोलली.

"नाही ते.. ॲकचुली... परीतोषला अमच्या ऑर्डर बद्दल विचारायचं होतं. पार्टी ऑफिससाठी लॅपटॉप आणि स्पेशल सॉफ्टवेअर सांगितले होते. बरेच दिवस झाले दिसला नाही तो. वाटलं वर्क लोड असेल. भाई सध्या सुट्टीवर आहे तर." अभिश्री

"छे… कसला आलाय वर्क लोड.. रिकामा तर बसुन असतो ऑफिसमध्ये.. टवाळक्या करत. आपल्या गौरीला आता बरच काम पुरतं त्या नावाखाली कोणीतरी मैत्रीण पी. ए. म्हणुन लावली तर बसतो तिला ट्रेनिंग देत." प्रबोध मिष्खीलपणे साधे पणाचा आव आणत तिला बोलले.

हे ऐकून अभिश्रीचा तिळपापड झाला. 

"काय.. यासाठी तो एवढे दिवस फिरकला नाही त्यात प्रोग्रामला सुध्दा नाही. बघतेच आता." एवढं बोलून ती तडक आदिष सोफ्टेककडे निघाली.

"अहो… काय झालं.. अभि चहा न घेताच का निघुन गेली..? असं काय बोलले तुम्ही." विदीता कारखानीस

"अगं.. काही नाही छोटीशी गंमत." प्रबोध

"हे काय वय आहे का मुलांसोबत गंमत करायचं…?" विदिता

"बरंsss... तुझ्यासोबत करतो चल.." प्रबोध

"ह्ममम्.. म्हातारपण आलं तरी खोडसाळपणा काही गेला नाही." विदिता

"मॅडम तुमची जादूच अशी आहे की वय भुलवते.. त्यात आमची काय चूक..?" प्राबोध

"पुरे.. आवरा जरा.. मुलांना चान्स द्या आता" विदिता

(मनातल्या मनात) "तेच तर केलंय.." प्रबोध

--------------------------------

परीतोष त्याच्या केबिनमध्ये नवीन पी. ए. मुळे वैतागुन बसला होता.

"गौरी… व्हॉट यार… जरा लवकर ट्रेन कर या मुलीला ऐन वेळी कॉन्फरन्स मध्ये गोंधळ होतो. त्यात दर वेळी त्या वाकड्या तोंडाच्या सेल्फी काढत बसते आणि हॅश टॅग हॅश टॅग. नाहीतर दुसरं कोणी बघ प्लीज. आणि हो मेकप आणि शॉपिंग न येणाऱ्या मुली सिलेक्ट करत जा जरा." 

"काहीतरीच असतं तुझं… आदी आला की होईल अरे नीट सर्व.. तू कॉन्फरन्स continue कर." गौरी

तेवढ्यात त्याला त्याच्या डॅडचा मेसेज आला. 

"धूमकेतू पाठवलाय.. all the best…" परीतोष थोडा कन्फ्युज झाला. कामात त्याने दुर्लक्ष केलं. आणि will talk later रिप्लाय दिला.

त्यांनी ohh yes yes sure... म्हणुन खुप साऱ्या हसण्याच्या स्मायली पाठवल्या.

अभिश्री ऑफिसच्या दिशेने निघाली. 

"तुझ्या सहवासाचं जणु व्यसनच लागलंय...

तू जवळ असण्यानी भिरभिरणारं मन आता अकांत करु पाहातंय…

भेटीची ओढ थांबवणं काय असतं आज मला कळलं..

माझ्यावर निखळ प्रेम करणं हे बस तुलाच जमलं…"

थोड्या वेळात ती ऑफिस बाहेर पोहचली. तिने परीतोषला आधी मेसेज केला. No reply. मग ७-८ कॉल केले ते त्याने कट केले. 

परीतोष त्यांच्या खुप महत्त्वाच्या डेलीगेट्स बरोबर ऑनलाईन कॉन्फरन्सवर होता. त्याच्या चेअर समोरच्या भिंतीवर मोठ्या प्रोजेक्टरवर सर्व दिसत होते.

अभिश्रीने ऑफिस केबिन मधल्या लॅंडलाईनवर कॉल केला एका मुलीने कॉल उचलला.

"सर बिझी आहेत. मी त्यांची पी. ए. बोलत आहे. थोड्या वेळाने कॉल करा"

आता तिचा पारा १०० क्रॉस झाला. तिने तडक जाऊन त्याच्या केबिनचं दार जोरात उघडलं आणि सर्व भिंती हादरल्या.

 क्रमशः

शांभवी सरपोतदार कुटुंबाला संपत रावांपासुन दूर ठेऊ शकेल का..?

कदिरनने analysis मध्ये असं काय दिलं असेल की लहान मोठे सर्वच विचारात पडले...?

अभिश्रीच्या अशा अचानक येण्याने परीतोषची काय तारांबळ उडेल ..?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१८ सुरु झाले आहे.}

रणसंग्राम - एक झुंजार

लेखन : रेवपुर्वा

🎭 Series Post

View all