रणसंग्राम - एक झुंजार भाग २४ #मराठी_कादंबरी

The story revolves around a political family. Vijay Singh a successful politian, has two children abhishree and aadinath sarpotadar. Abhishree is passionate about politics but aadinath is way faar from it. Everyone support abhishree for her passion b

रणसंग्राम - एक झुंजार भाग : २४

मागील सर्व भाग खालील लिंकवर मिळतील

रणसंग्राम - एक झुंजार revise

मागील भागात -

निहारच्या मृत्यु प्रकरणातुन अभिश्री जरी लगेच सुटली तरी तिला राजकारणात होणाऱ्या गंभीर गोष्टींची झलक मिळाली होती. नेहमीप्रमाणे प्रमाणे विजयसिंह आमदार म्हणुन निवडुन आले. पुढे ३ वर्षात बरेच बदल घडुन आले. आदिनाथ आजही शांभवीची वाट बघत होता. अभिश्रीच्या आर्ट गॅलरीमध्ये बरीच वरदळ वाढली होती. गणपतीच्या मूर्त्यांची मोठी ऑर्डर तिला मिळाली होती. जी पुर्ण करताना तिची तारांबळ उडत होती. त्याच वेळी संपतराव अचानक विजयसिंहांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले.

**********************************

परीतोषने त्याच्या बॅग मधुन एक पाउच काढलं त्यात थंडगार असं रोज मिल्क होतं. अभिश्री टेन्शनमध्ये असली की तो रामबाण उपाय असायचा. त्याने ते रोज मिल्क दक्षला दिलं तिला देण्यासाठी. 

परीतोष घायाळ नजरेनी तिच्याकडे बघत होता आणि ती सपशेल दुर्लक्ष. 

जानते है हम रुठे हो तुम...

जानते है हम क्यों रुठे हो तुम...

बस एक बार झाक जो लो दिलं मे हमारे..

सारे गिले शिकवे भुला देंगे हम..

सर्वांच्या गर्हाड्यात बसुन अभिश्रीकडे बघत परीतोष दबक्या आवाजात शायरी म्हणत गणपतीच्या मुर्त्यांना कलर करत होता. ३ वर्ष तिच्या मागे फिरत फिरत तो आता जवळपास अर्धा आर्टिस्ट आणि पुर्ण वेडा झाला होता. 

"आदी भाई यहा चाहिये था… तुझी शायरी आणि त्याची गिटार भारी कॉम्बिनेशन जमतं. किती दिवस झाले आपली मैफील नाही जमली." दक्ष

"गिटार हातात घेईल तर ना… शांभवी गेल्यापासून त्यानी संगीत, लिखाण सर्वच बंद केलंय. आधी सारख्या गप्पा पण नाही मारत. सारखा काम करतो." नित्या

"ही हॅज बिकम अ कॉर्पोरेट रोबो." परीतोष

अभिश्री पलीकडे खुर्चीवर बसुन परीतोषने दिलेलं थंडगार रोज मिल्क पित होती. तिचं राहिलेलं सगळं काम त्याने अगदी चुटकी सरशी करुन दिलं होतं त्यामुळे ती एकदम रिलॅक्स झाली होती. आदिनाथ - शांभवीबद्दल तिची सुध्दा तेवढीच खटपट सुरु असायची पण आदिनाथ थाक लागु देत नव्हता.

तेवढ्यात परीतोषचा फोन वाजला. हातात रंग असल्याने त्याने तो स्पीकरवर टाकला.

"पऱ्या… आर यू आऊट ऑफ युअर माईंड…? बोर्ड मीटिंग अर्धी सोडुन तू कसा जाऊ शकतो..? सू सू ब्रेक म्हणे… शाळेत आहे का तू…? १५ मिनिटात समोर ये नाहीतर असशील तिथून माणसं पाठवुन उचलुन आणतील तुला." आदिनाथ

"अरे यार.. काय छळवाद आहे…? या दोन्ही बहिण भावांचा. फुटबॉल करुन ठेवलाय माझा. कधी तो लात मरतो कधी ही. त्याची सेंटिंग बिघडली आता हा माझी होऊ देत नाही. बाप्पा यंदा तरी काही तरी कर रे… या दोन्ही बहिण भावांची सेटिंग लाव जरा.. चौघही जोड्यानी येतो बघ पुढल्या वर्षी दगडुशेठला. माझं लग्न नाही किमान होकार तरी." परीतोष

"अरे… तो भाऊ बरा आहे. जाऊ तरी देतो. ही तर त्याची पण वेळ ठरवते." जोसेफ

"जा बच्चा देव तुझं भलं करो.. आणि हो माझ्या टीमचं प्रेझेंटेशन बघशील कसं होतंय ते. नवीन मुलगी आहे." दक्ष

"ह्मम्म… माहिती आहे तुझ्या नव्या मुली. आम्हाला एक जमत नाही इथे याची महिन्याला कोणीतरी नवीन असतेच. अशे फटके खाशील एक दिवस." परीतोष

"जानी हम लडकीयों के पिछे नही लडकीयां हमारे पीछे आती है…" दक्ष

दक्ष आता आदिषमध्ये खुप छान रुळला होता. कोअर टीमचा टीम लीडर झालेला. पॉलिटिक्स आणि ऑफिस पद्धतशीर रित्या हाताळत होता. परीतोष तिथून ऑफिसमध्ये पळाला.

संध्याकळपर्यंत अभिश्रीचं बऱ्यापैकी काम आटोपत आलं होतं. सर्वांना सुट्टी देऊन ती घरी गेली. विजयसिंह आणि ईश्वरी मधल्या चौकात चहा पीत बसले होते. दोघंही एकमेकांशी न बोलता शुन्यात बघत होते. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

"काय झालंय…? असं नाराज का बरं दिसत आहात…?" अभिश्री

त्यांनी तिला दुपारी संपतराव घरी आल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांच्या मुलीचं स्थळ आदिनाथसाठी आणलं होतं पण तो नाही म्हटला आणि ते निघुन गेले.

"काय...ss पण भाई नाही का म्हटला शांभवीसाठी..?" अभिश्री

"तुला कसकाय माहिती तिचं नाव शांभवी आहे…?" ईश्वरी

अभिश्री आता कोंडीत सापडली होती. तिने आदिनाथ - शांभवीच प्रेम, तिला तिचे वडील आणि राजकारण विषयीचा तिरस्कार, आदिनाथने लपवलेली ओळख हे सर्व त्यांना सांगितलं. आदिनाथने तिच्याकडून वचन घेतलं होतं की ही गोष्ट घरी सांगायची नाही. त्याला कोणालाच दुखवायचं नव्हतं.

विजयसिंह आणि ईश्वरी आता एका विचार चक्रातून दुसऱ्यात शिरले.

"भाई ॲज युजवल त्याच्या रुम मध्ये जाऊन बसला असेल ना..? मी आता नाही थांबणार. समोरुन आलेली संधी का सोडतोय तो..?" अभिश्री

"त्याला थोडा वेळ दे बेटा.." विजयसिंह

"३ वर्ष म्हणजे खुप वेळ झाला बाबा. आता सूत्र आपल्या हातात घ्यायची वेळ आली आहे." अभिश्री

ती तडक वरती त्याच्या रुमकडे गेली. बराच वेळ आवाज देउनही त्याने दार उघडलं नाही. ती रागा रागात घरा बाहेर पडली. आता तिचं डोकं भणभणत होतं. 

विजयसिंह आणि ईश्वरी आपल्या मोठ्या झालेल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींमध्ये आपली काय भुमिका असावी आणि त्यात ते कुठल्या प्रकारे सहभागी होऊ शकतात याचा विचार करत होते.

अभिश्री रागा रागात चालत परत तिच्या आर्ट गॅलरी मध्ये गेली. घरापासून जवळ असल्याने १५ मिनिटात पोहचली.  सर्वांना सुट्टी दिल्याने ती एकटीच होती. विविध गोष्टीत लक्ष घालुन तिने डोकं शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. शेवटी कंटाळून तिथून बाहेर पडली. बराच काळोख पडला होता. अशांत मन आणि अंधार तिला आता बोचत होता. तिला काय वाटलं तिलाच कळलं नाही आणि नकळत परीतोषला व्हिडियो कॉल लागला. परीतोष त्याच्या हॉलमध्ये सोफ्यावर लोळत पडला होता. अभिश्रीचा फोन बघताच तो धपकन खाली पडला. स्वतः ला सांभाळुन लगेच कॉल उचलला.

" हाय sss… आय मीन हॅलो… तुम्ही स्वतःहुन कॉल केला... बोला काय हुकुम." परीतोष

ती थोडी गोंधळली.. आता खोटं कारण काय द्यायचं..?

"आज जे खंडी भर समान आणुन टाकलस त्याचं बिल पाठव सांगण्यासाठी मेसेज करत होते चुकुन कॉल लागला. पटकन पाठव मी ट्रान्स्फर करते." आणि फोन कट केला.

त्याचा ताल बघुन त्याची बहीण भार्गवी बोलली.

"लोक प्रेमात पडतात हे ऐकलं होतं पण खरंच एवढ्या जोरात पडतात हे पहिल्यांदा पहिलं." भार्गवी 

परीतोषला अभिश्रीच्या तुटक वागण्यातील खरे अर्थ आता कळायला लागले होते. तो तेवढ्याच जिद्दीने आणि लाडाने ते झेलत होता. 

अभिश्री तिथेच अंधारात बघत उभी होती. तिला अंधारात घोड्याच्या टापांचा आवाज ऐकु आला आणि त्या दिशेकडून एक आकृती येताना दिसली. सुमसाम अंधारात त्या काळ्याशार अरबी घोड्याचा आवाज सर्वत्र दुमदुमत होता. त्या रुबाबदार घोड्यावर ऐटीत बसलेला परीतोष एका राजकुमारा सारखा दिसत होता. फोनवर तिचा आवाज ऐकून आणि चेहरा बघुन त्याला लगेच कळलं काहीतरी बिनसलंय. तो कधीचा तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि ती एकटक फक्त त्याच्याचकडे बघत होती. 

"जिम बंद असलं तरी तसा हँडसम दिसतो न मी..? हल्ली तुम्हा बहिण भावामुळे एवढी धावपळ होते की वेगळा व्यायाम करावाच लागत नाही." परीतोष

"माझ्या अज्जुकडे ( तिचा घोडा - अजिंक्य )  बघत होती मी. तुझ्यापेक्षा किती तरी रुबाबदार आहे तो. 

का सारखा सारखा त्याला तुझ्या घरी नेतो..? आणि नुसतं बिल पाठव म्हटलं होतं. इथे येऊन डोकं खाण्याची गरज नव्हती. " अभिश्री

"जवळच्यांना द्यायला वेळ कुठे असतो आता तुझ्याकडे. म्हणून बिचारे माझ्याजवळ येतात. आवडतो ना मी त्यांना.  हो न रे अज्जु." परीतोष

अज्जुनेही लगेच मान डोलवून होकार भरला...

"अन् बिलाचं म्हणशील तर किती कॉम्प्लिकेटेड होतं ते. भेटुन सांगावं लागणार होतं. तुझे २० आयटम, वडापाव, चहा, सिगारेट - माझी नाही ड्रायव्हरची, माझी मजुरी, पेट्रोल.. उगाच तुला नीट वाटलं नाही आणि कापले पैसे तर काय करू…? ७ हजार दोनशे त्रेपण रुपये पन्नास पैसे दे." परीतोष

अभिश्रीने लगेच पैसे ट्रान्स्फर केले.

"पन्नास पैसे नाही दिले." परीतोष

"घरी लहानपणीचा गल्ला आहे. त्यातून देईल काढून." अभिश्री

"बरं बरं चल मग आत्ताच जाऊ. देऊन दे पटकन मला कामं आहेत बाबा खुप. पप्पा पॉकेट मनी फार देत नाही मला" परीतोष

"घरी नाही जायचं मला आत्ता. तू अज्जूला घेऊन जा प्लीज.. बाय." ती अंधाराच्या दिशेनी चालत निघाली.

"येताना आलो रे… पण आता अंधाराची जाम भीती वाटतेय… मला येऊ दे न तुझ्या सोबत.." परीतोष

अभिश्री पुढे पुढे चालत होती आणि परीतोष तिच्याकडे बघत उलटा चालत होता. आधी कधीही तिच्या चेहऱ्याकडे न बघणारा तो आज तिला मन भरुन न्याहाळत होता. गणपतीच्या दिवसात सोयीस्कर जाण्यासाठी घातलेला जुना ढगळ ट्रॅक पँट-टी शर्ट, दिवसभर मुर्त्या बनवुन कपड्यांवर, हातांवर कुठे रंग तर कुठे मातीचे डाग, सकाळी कधीतरी गडबडीत अर्धवट बांधलेले केस, नावालाच असलेला शृंगार, तरीही त्याच्यासाठी ती जगातील सर्वात सुंदर मुलगी होती. एवढ्या कमी वयात तिचं करिअर, राजकारण, सोशल वर्क सारख्या क्लिष्ट गोष्टी ती धडाडीने शिकत होती. रात्रीच्या अंधारात तो तिच्या चेहऱ्यावर चमकणारं ते तेज बघुन सुखावत होता. 

ती इकडे तिकडे बघत असुन सुद्धा तो तिच्याचकडे बघत आहे हे तिला कळत होतं. तिने एका झटक्यात त्याच्या नजरेला नजर भिडवली. तिच्या तीक्ष्ण नजरेचा झटका लागुन तो ७-८ पाऊल मागे अजिंक्यवर जाऊन आदळला. ती खळखुळन हसली. तिला असं हसताना पाहुन तो मंत्रमुग्ध होऊन तिथेच अजिंक्यवर रेलुन बसला. हसता हसता अचानक तिच्या डोळ्यातुन पाणी यायला लागलं आणि चेहरा उदास झाला.

"ओये… अगं मी असाच गमतीत पडलो.. लागलं नाही काही…" परीतोष

त्याच्या लक्षात आलं ती खाली झोपलेल्या अजिंक्यकडे बघुन रडत होती. 

"घोडे तर असं खाली फार कमी झोपत असतात न रे…? आराम पण उभ्यानेच करतात. मग हल्ली हा का बरं थकतो..? मागे डॉक्टर चेक करुन गेले तेव्हाही तुम्ही लोकांनी नीट काही सांगितलं नाही.." अभिश्री

तिला रडताना बघुन त्याला खुप त्रास होत होता. तिला लगेच मिठीत घ्यावं आणि शांत करावं असं त्याला वाटत होतं.

"स्टॉप क्राईंग नाउ.. तुझं रडणं किती चुकीचं आहे कळतय का तुला..?" तो मोठ्याने बोलला.

"आलास न परत तुझ्या मुळ वागण्यावर. माझे इमोशन्स आहे त्याच्या बाबतीत.. तुला त्याची काय कदर..?" अभिश्री

"तुझे इमोशन आहेत हे मान्य... पण त्याचं काय… असं रडून तू त्याचा अपमान करत आहेस.."

"म्हणजे..?"

"तो काय तुझा पाळीव प्राणी आहे का?? वयाच्या चौथ्या वर्षी पासुन रेसमध्ये फक्त जिंकत आलाय तो. भारतात वर्षभरात होणाऱ्या क्लासिक रेसचा चॅम्पियन आहे तो. Guineas, indian oak, durby.. आणि आपल्या पुण्यातल्या St. Leger चा तर किंग आहे तो. He is an ultimate warrior. एक योध्दा मरणाला सामोरे जाण्यासाठी कधीच घाबरत नसतो आणि तो जन्मतःच योध्दा आहे. जुन्या काळातील लढाईत खेळल्या जाणाऱ्या घोड्यांची रेअर ब्रीड आहे त्याची. अमर काकांनी ही गोष्ट फक्त डॅडला सांगितली होती. त्या वेळी ५ लाख किंमत देऊन ऑक्शन मध्ये घेतला होता त्यांनी. विजय काका रागावतील म्हणुन मुद्दाम त्यांना सांगितलं नाही. तू त्याचाशी किती attached आहे हे माहिती आहे मला. तो गेला तरी त्याचे अंश आपल्यात कायम राहतील. गेल्या ५ वर्षात कधी नॅचरल कधी आर्टिफिशियल ब्रिडींग करुन आमच्या फॉर्ममध्ये २०० मुलं आहेत अजिंक्यचे. सगळेच त्याच्या सारखे योद्धा. डॉक्टरनी सांगितलंय काही वर्ष आहेत त्याच्या कडे अजुन पण यंदाची रेस शेवटची. पुढे रेस मध्ये नाही उतरता येणार. त्याची शेवटची मॅच जिंकायची आहे आपल्याला. म्हणूनच हल्ली त्याच्यासोबत जास्त वेळ घालवतो. गायत्री काकींनी त्याला दिलेलं नाव त्यानी आयुष्यभर सिध्द केलंय.  तुझं रडणं कळतं त्याला आणि ते नक्कीच आवडत नाहीये त्याला." परीतोष

अभिश्रीने नकळत परीतोषला मिठी मारली. तो तिच्या भावना जपण्यासाठी तिच्या माघारी एवढं काही करत असेल याचा तिला अंदाजही नव्हता. प्राण्यांना बोलता येत नसेल तरी भावना समजतात.  अजिंक्य लगेच उभा राहिला आणि त्यांच्या जवळ गेला. दोघंही ओशाळले.

कमाॅन चॅम्प लेट्स रेस म्हणत तिघही धावत घरी पोहचले. तिने परीतोषला आदिनाथबद्दल कल्पना देऊन ठेवली. 

-----------------------------------

संपुर्ण विभागात गणपतीची जय्यत तयारी सुरु झाली. अभिश्री आणि तिची चौकडी त्यांच्या ऑफिस मध्ये जमली. नवक्रांती युवापक्षाचं ऑफिस म्हणजे जणु कॉलेजचा कट्टाच. मोठं मोठे हॉल,ओपन एअर थिएटर, झाडांची, मुला मुलींची हिरवळ. तिथे Mpsc, upsc, बांधकाम, मेडिकल, मॅनेजमेंट, कृषी, तंत्रज्ञान, पर्यावरण, उद्योग, स्त्री सशक्तीकरण, न्याय अशा अनेक डिपार्टमेंटमध्ये शिकत असलेले किंवा शिकुन झालेले मेंबर्स, कोणी पार्ट टाईम, कोणी फुल टाईम काम करत. त्यांच्या ऑफिसचं नावंच त्यांनी नवक्रानती 24x7 असं दिलं होतं. प्रत्येकाच्या सोयीचं आणि आवडीच काम असल्याने १००% प्रॉडक्टीव्हीटी मिळत. गँगमध्ये फक्त पॉलिटिक्स जॉईन करणारे लोक सामील न करता त्यांनी सरकारी - खाजगी नोकरी, उद्योग अशा सर्व धाग्याना जोडुन काम करायचं ठरवलं होतं. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कुठलही बंधन तिथे नव्हतं.

सगळे एका झाडाखाली बसले असताना खबरीलाल नित्या नेहमीप्रमाणे धावत पळत न्युज घेऊन आली. तिने एका न्युज चॅनलवर रिपोर्टर म्हणून काम सुरु केलं. तिच्या ज्वलंत न्युजमुळे चॅनलच्या c.e.o.चं बी. पी. नेहमी हाय होत. TRP साठी चालणाऱ्या टवाळ आणि टुकार न्युज दाखवण्यावरून तिचा त्यांच्याशी नेहमी वाद होत. सहसा नित्या चॅनल ऑफिसमध्ये आली की ते कुठेतरी लपुन बसत.

"गाईज sss… आपलं या वेळचं गणेश विसर्जन आमच्या चॅनलवर लाईव्ह स्ट्रिम होणार आहे. आपल्या मागच्या दोन्ही वर्षाच्या आगळ वेगळं विसर्जनच्या क्लिप्स फुल्ल व्हायरल होत आहेत. महाराष्ट्र बाहेरुन सुध्दा लोक येणार आहेत आपल्या ३ दिवस विसर्जन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. त्यांचे गणपती घेऊन. इंडियाज फर्स्ट इकोफ्रेंडली विसर्जन महोत्सव." नित्या

"वाह… जबरदस्त… तीन वर्षांपूर्वी सुरु केलेली आपली मोहीम आता मोठं रूप घेतेय. मजा येईल.. येऊ दे जेवढे येतील त्यांना. सर्वांची सोय करु." अभिश्री

"ताई चहा घेता का.."

विटक, जुने, फाटके कपडे घातलेला एक १४-१५ वर्षांचा मुलगा तिथे चहा घेऊन आला.

"मस्त एकदम फक्कड चहा बनवतो रे तू तर… नविन लागला का कामाला..?" अभिश्री

"हो ताई... आमची टपरी होती आधी.. पण.. आता इथेच…"  मुलगा

"शाळेत नाही जात का तू..?" नित्या

तिथून साधारण २०-२२ km लांब भागात त्या मुलाच्या आई वडिलांची चहा, नाष्ट्याची टपरी होती. शाळा झाली की तो टपरीवर घरचांना हातभार लावायचा.. पण गुंडांचा त्रास, पोलीस हफ्ते, महाग समान या सर्व कारणांमुळे ती बंद पडली आणि आता ते तेवढं अंतर चालत येऊन इथे मिळेल ते काम करतात. 

नित्याने लगेच बाहेर जाऊन चौकशी केली. 

"अशे बरेच लोक आहेत रे... जे त्यांच्या भागात बऱ्याच लांबून येतात कारण त्यांच्या राहत्या ठिकाणी वाजवी काम आणि मोबदला मिळत नाही." नित्या

"आपण किती स्वार्थी आहोत. आपल्याच विभागातील लोकांचा विचार केला. अर्थात ते लोक इथे येऊन काम करतात हे गैर नाही पण एवढ्या लांब येऊन त्यांची फरफट योग्य नाही. आणि जे लोक इथे येऊ शकत नाही ते कशे जगत असतील…?" अभिश्री 

"पण इतर विभागातील लोकांसाठी आपण काय करु शकणार..? त्या विभागातील आमदार, नगरसेवक असतीलच की.. ते बघतील..आपल्या अंडर नाही…" जोसेफ

"मग ते आणावं लागेल…लवकरच…. लेट्स स्टार्ट वर्किंग ऑन अवर न्यू मिशन." अभिश्री

"अरे यार.. आत्ताच तर जरा सेट झालो होतो. परत गोवा ट्रीप करावं म्हटलं.. जगू देत जा यार माणसाला…" जोसेफ

---------------------------------------

"अप्पा.. बाजी उलटी पडली की… आदिनाथ तर नाही म्हणाला… आता कसं…?" अज्ञात व्यक्ती

"शांतता… एकाग्रता… संयम… सगळं ठरवल्या प्रमाणे होईल." संपतराव शेलार

-------------------------------

"गुड मॉर्निंग… आळशी… उठ आपल्या इंगेजमेंटची तयारी करायची आहे न.. सगळे जमलेत खाली." 

सकाळी सकाळी शांभवीचा गोड आवाज आदिनाथच्या कानात घुमत होता. किल किल्या डोळ्यांनी त्याने आवाजाच्या दिशेने बघितले.. प्रत्यक्ष शांभवी त्याच्या समोर उभी होती. 

क्रमशः

कट्टा गँगचा आगळा वेगळा विसर्जन सोहळा नक्की कसा असेल..? तीन दिवस त्यात असं काय चालणार..?

अभिश्रीचा पुढचा प्लॅन काय असेल.. शहराच्या इतर विभागातील अधिकारी तिची मदत करतील का...?

संपतरावांची पुढची खेळी आता काय असेल?

शांभवी खरंच त्यांच्या आलीये का…? त्यांची इंगेजमेंट खरंच होईल का..?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१८ सुरु झाले आहे.}

रणसंग्राम - एक झुंजार

लेखन : रेवपुर्वा

🎭 Series Post

View all