रणसंग्राम - एक झुंजार भाग १८ #मराठी_कादंबरी

Aadinath goes to Shambhavi. She is upset due to her mind block. Abhishree is all set to work with vijaysinha's people for campaign. But she and her friends realise conflicts between their thinking. She asks solution to aadinath. Both talk about their

रणसंग्राम - एक झुंजार : भाग १८

रणसंग्राम - भाग १७

मागील भागात -

अभिश्रीने न राहुन परीतोषला तिच्या प्रेमाची कबुली दिली. पण त्याने ती कबुल नाही केली. परीक्षा संपवुन अभिश्रीने एक छोटी आर्ट गॅलरी सुरु केली. आदिनाथ धावत पळत शांभवीजवळ पोहचला.

----------------------

आदिनाथ कसा बसा शांभवीच्या बिल्डिंगजवळ पोहचला आणि तडक टेरेसवर गेला. समोर शांभवी टेरेसच्या पॅरापेटवर उदास बसुन होती.

"आय ॲम सॉरी शांभवी. मी गुन्हेगार आहे तुझा. माझ्याबद्दल तुला सगळं कळलं असेलच म्हणुन पाठमोरी बसुन आहेस न…?

तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. हवं तर माझं तोंडही बघु नको पण तू तुझं कुठलंही नुकसान नको करुन घेऊ प्लीज.

निघतो मी.." आदिनाथ

शांभवीने त्याचा हात पकडला आणि वळुन त्याच्याकडे बघत एक गोड स्माईल दिली. 

"अरे आल्या आल्या असा निघत काय आहे..? जीव द्यावं वाटत आहे म्हटलं देणार असं थोडी बोलली." 

ती तिच्या कानातला हेडफोन काढत बोलली. 

"म्हणजे मी जे बोललो ते तू…" आदिनाथ

त्याने लगेच तिला घट्ट मिठीत घेतलं. 

"आदी.. काय झालं तुला..?" शांभवी

"तुला काय झालं..? असं का बोलत होती..? किती घाबरलो मी. बघ कसा आलो." आदिनाथ

शांभवी त्याच्या अवताराकडे बघुन खळखळुन हसत होती. क्वचितच कपड्यांची इस्त्री मोडलेला आदिनाथ आज विस्कटलेले केस, पांढरा पैजामा, घरचा टी शर्ट, पायात साधी स्लीपर असा होता. आदिनाथ तिच्या हसण्या कडे गुंग होऊन बघत होता. त्याला तिच्या हसण्यातही सुर ऐकु येत होते. हसु आवरुन ती बोलली.

"मला खुप कंटाळवाणं वाटत होतं. २ दिवस झाले ना सुर लागतोय ना डान्स जमत. सारख्या चुका. क्लासची मुलं हसत असतील मला. संगीत म्हणजे मी आत्मा समजते माझा आणि तेच जमत नसेल तर तुच सांग कसं जगाव वाटणार."  शांभवी

"अच्छा sss… बस एवढंच मला वाटलं असं कोणतं आभाळ कोसळलं."

शांभवी उगाच राग आणत बोलली. 

"माझी गोष्ट छोटी वाटते न तुला..! मग माझा उत्साह परत आणुन दे तेंव्हाच भेटायला यायचं. बोलायचं सुध्दा नाही.

बाय. म्हणत ती खाली निघुन गेली.

"शंभु सॉरी ना… प्लीज असं नको करु."

सॉरीची माळ जपत तो तिच्या मागे मागे खालच्या हॉलमध्ये पोहचला. हॉलमध्ये तिचे मामा फळा पुसत होते. ते शाळेत शिक्षक असुन तिथे मुलांच्या ट्युशण घेत आणि शांभवी तिथेच मुलांना संगीत, डान्स शिकवत. तीचे मामा गोपाळराव स्वतः एक संगीत विषारद होते. संगीताची तालीम तिने त्यांच्याकडुनच घेतली होती आणि पुढे बऱ्याच परीक्षा सुध्दा दिल्या. शांभवी उसणा राग आणचन कोपऱ्यात बसुन होती. आदिनाथ काकुळतीला येऊन तिच्याकडे बघत होता. 

"ए रुसु बाई… सारखी कोणा ना कोणावर रुसुन बसते.

जावई तुम्ही फार लाड पुरवत नका बसु हीचे. आमच्या डोक्यावर बसलीच आहे. तुम्ही तरी धाक ठेवा जरा." 

"काय सांगु मामा तिचं मला धाकात ठेवते." आदिनाथ

"वाहss.. म्हणजे तुमची गत माझ्याच सारखी होणार म्हणायची." गोपाळ मामा

"म्हणजे..?" आदिनाथ

"अहोsss... त्यांना त्यांचं बोलु द्याsss… घरात या तुम्ही. शाळेत नाही जायचं का..?"

हॉलच्या बाहेर अंगणातुन मामींचा आवाज आला.

"बघितलं हे असं.." मामा

मामा हसत तिथुन निघुन गेले. हॉलला लागुनच त्यांचं ४ खोल्यांचं छोटंसं घर होतं. शांभवी, तिची आई, मामा, मामी आणि त्यांचा मुलगा जयेश सर्व तिथेच राहत. शांभवी शाळेत असतानाच तिची आई आणि ती वडिलांना सोडुन मामाकडे आल्या. तिची आई आणि मामी बचत गट चालवुन घरी जमेल तेवढा आधार देत. 

"शंभु यार बोल ना.. तु अशी रुसली की माझं मन कशातच लागत नाही माहितीये न तुला." 

"मग माझा मुड आणुन दे आधी."

"ते कसं..?"

"माहित नाही..? तुलाच करावं लगेल काहीतरी. तोवर माझ्याशी बोलु नको. जा आता.. माझे मुलं येतील डान्स बॅच आहे."

आदिनाथ तोंड पाडुन तिथुन निघुन गेला. जाताना तिची आई व मामींचा निरोप घेतला. आदिनाथच्या साध्या व समंजस वागण्याने तिच्या घरचे खुप प्रभावित होते. वेळोवेळी तो अगदी घरच्यांप्रमाने त्यांच्या मदतीला धावुन येत. शांभवीचा विचार करत तो तयार होऊन ऑफिसला गेला खरं पण मन कशात लागत नव्हतं.

-------------------------

विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आता सुरुवात होऊ लागली होती. अभिश्री आणि तिची चौकडी विजयसिंहांच्या कार्यकर्त्यांची कामाची पद्धत समजुन घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या लोकांना ते फारसं पटत नव्हतं. कॉलेजचा प्रचार त्यांनी खुप वेगळ्या प्रकारे केला होता. विद्यार्थ्यांच्या गरजा, विचार समजुन त्यांनी काम केलं होतं. इथे मात्र मोठे मोठे बॅनर तयार करणं, फ्लेक्सवर प्रिंट करण्यासाठी घोषणा तयार करणं हे सर्व सुरु होतं. अभिश्री आणि तिच्या मित्रांना समजत नव्हतं नक्की काय करावं.

विजयसिंहांचे कार्यकर्ते खुप उत्साहात होते. त्यांची खुप निष्ठा होती. आणि आता तर अभिश्रीला त्यांना पुढे आणायचं होतं त्यामुळे सॅंपलं बॅनर, पिशवी, छत्री, पॅम्पलेट यावर विजयसिंहांचे व तिचे फोटो लावले होते. 

एक बॅनर बघुन तर जोसेफ खाली जमिनीवर लोळुन लोळून हसत होता. अभिश्री तिथे गेली. त्या बॅनरमध्ये विजयसिंह उभे होते आणि त्यांच्या हातातून सूर्याची किरणं निघुन ती अभिश्रीवर पडत होती. ते सर्व फोटोज् खुप विचित्र पद्धतीने क्रॉप केले होते आणि लोकल प्रिंटिंग प्रेस मधुन प्रिंट केले होते.

ते बघुन तिचं डोकंच सटकलं. आता शांत बसणं शक्य नव्हतं.

"चंदु काका हा काय प्रकार आहे..? दरवर्षी तर आपण असं काही करत नाही. बाबाला सुध्दा असा दिखावा आवडत नाहीं."

"होय ताई पण या वेळेस तुम्हाला समोर आणायचं आहे. साहेबांची ही शेवटची निवडणुक आहे. पुढे लोकांनी तुम्हाला तो मान द्यायला हवा." 

चंदु काका म्हणजे प्रचाराचे म्होरक्या. ते फक्त प्रचाराच्या वेळीच जागे होत आणि सर्व सूत्र हातात घेऊन काम करून घेत.

"अहो काका sss.. त्यासाठी आपण त्यांची कामं करु, त्यांच्या गरजा ओळखु. हे असं फोटो लाऊन प्रचार करण्याची गरज नाहीये." अभिश्री

"ताई तुमचे पुस्तकी घोडे इथे नचवता येत नाही. कॉलेजचे मुलं असं करुन मत देतात पण हे गावातले लोक आहेत यांना असंच दाखवाव लागते."

"काका पण.. आता काळ बदलत आहे. आपल्याला त्यानुसार चालावं लागेल."

"मी काय म्हणतो ताई. तुम्ही या भानगडीत पडुच नका न... 

आम्ही सगळं बघतो. तुम्हीच जिंकणार याची फुल्ल गॅरेंटी. २५ वर्ष झाले साहेबांना जिंकुन देत आहो आम्ही. आता पुढे तुम्हाला पण देऊच की. बस आम्ही जे सांगतो तेवढं करायचं आणि तेवढंच स्टेजवर बोलायचं. अन् हो जरा युनिफॉर्म घालुन येत जा तुम्ही सगळे पोरं."

त्यांना काही समजलं नाही.

"अरे म्हणजे मुलींनी साडी अन मुलांनी पांढरा कुर्ता पैजामा. कॉलेजची भातुकली विसरा आता. हेच खरं राजकारण आहे. शिकवु आम्ही तुम्हाला हळु हळु."

एवढं ज्ञान पाजळुन चंदु काका निघुन गेले. त्यांच्यात आलेला अनुभवाचा अहम पणा अभिश्रीला जाणवला. 

त्या सर्वांचा चांगलाच हिरमोड झाला होता. गँग सोबत मिळुन नवनविन अश्या योजना त्यांनी आखल्या होत्या आता त्यांचा काही उपयोग होईल असं दिसतं नव्हतं. राजकारण म्हणजे हेच का..? यांच्याच साच्यात राहुन काम करायचं असेल तर मग शिकुन उपयोग काय..? अशे बरेच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते. एकमेकांना काही न बोलता ते लोक त्यांच्या घरी निघाले.

अभिश्री वैतागुनच घरी हॉलमध्ये बसुन होती. आदिनाथ लॅपटॉपवर काम करण्याचा प्रयत्न करत होता पण सारखं लक्ष फोनकडे होतं आणि चित्त थाऱ्यावर नव्हतं. शांभवी त्याचा फोनकट करत होती. अभिश्रीच्या ते लक्षात आलं.

"ह्ममम…! वहिनी रुसली वाटते परत." अभिश्री

आदिनाथ डोकं धरुन बसला होता.

"सांग तर काय झालं..? मे बी आय कॅन हेल्प..!" अभिश्री

आदिनाथकडे तसही काही पर्याय नव्हता. त्याने त्याचा सावळा गोंधळ तिला सांगितला. अभिश्रीला खुप हसु आलं. 

"किती क्यूट आहे वहिनी. तुला अशीच जिरवणारी बायको हवी होती." 

"माझी मजा घेण्यासाठी विचारलं का तू मला…?" आदिनाथ

"नाही रे… 

ह्ममम… मला तिचा एकझॅक्ट प्रोब्लेम कळलाय. माझ्यासोबत असं नेहमीच होते अरे. तेच ते रूटीन झालं की कंटाळवाणं होतं. मलाही बरेचदा ब्रश हातात घ्यावासा वाटत नाही. करु यावर विचार एक दिवस दे." अभिश्री

"अगं ए… नक्की काय करणार तू..? सांग तर.. काही उपद्व्याप करु नको माझी आई. नाहीतर नेहमीसाठी बोलणं टाकेल ती. तू राहु दे मीच लोटांगण घालुन मनवेल तिला." आदिनाथ

"अरे.. माझा भोळा सांब.. मुलींच्या नुसतं मागे लागण्याची काही होत नाही. त्यांना मनातुन खुश केलं पाहिजे. ते तू माझ्यावर सोड. तुझा प्रोब्लेम मी सोल्ह्व् करेन तू बस माझी अडचण सोडव." अभिश्री

"नो वे.. डोन्ट गीव्ह मी दॅट पुअर लूक. राजकारणाच्या भानगडी तुझ्या तू निपटवायच्या." आदिनाथ

भाई भाईsss.. करत तिने दुपारी चंदु काका बरोबरचा किस्सा सांगितला. तिचे पोस्टर इमॅजिन करुन तो खुप हसला. कसं बसं स्वतः ला सावरत त्याने थोडा विचार केला.

"हे होणारच होतं. त्यांना बदल नको आणि तुम्हाला इन्स्टंट रिवॉलुशन हवंय. ते अर्थात तुमचं ऐकणाराच नाही. काही मुद्दे पटले तरी त्यांचा इगो ते मान्य करु देणार नाही." आदिनाथ

"मग आम्ही आता काय त्यांच्या रुळावर चालायचं का..? "

"थोडं किचकट आहे हे हाताळणं. बघ तुला असं काही करता येईल का..? ते तुमचं ऐकणार नाही पण ते लोक ज्यांच ऐकतात तुम्ही त्यांना पटवा." आदिनाथ

"म्हणजे बाबा…?" अभिश्री

"नाही. बाबांनी अशे नवीन मुद्दे त्यांच्यासमोर मांडले तर ते आपल्या मुलीची बाजु घेत आहेत असं होईल. तुमच्यातील दरी आणखी वाढेल.

थिंक थिंक. 

तुमच्या चौकडीशी चर्चा कर." आदिनाथ

अभिश्री रात्री बराच वेळ फोनवर मित्रांशी चर्चा करत होती. त्यांच्या आणि आदिनाथ - शांभवीच्या अडचणीबद्दल . पण दोन्हीसाठी नीट असा काही पर्याय निघाला नाही. झोपता झोपता तिच्या डोक्यात त्याच गोष्टी फिरत होत्या. 

अभिश्रीला अचानक सकाळी ४ वाजता जाग आली. तिच्या डोक्यात काहीतरी चमकलं आणि तिने तडक आदिनाथचं दार बडवलं.‌ त्याने कंटाळुन दार उघडलं. आता ही मुलगी आपल्या कडुन काहीतरी अतरंगी करवुन घेणार हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. 

"भाई दोन्ही प्रोब्लेमचं सोलुशन मिळालं. आधी तुझं निस्तरु."

आदिनाथला घेऊन ती तिच्या चौकडीकडे गेली आणि त्यांना सुध्दा जिप्सीमध्ये कोंबलं.

जोसेफ मागच्या मागे झोपेत बडबडत होता. त्याचं आदिनाथ समोर बसुन आहे तिकडे लक्ष नव्हतं.

"भाई आणि वहिनीला हीच वेळ मिळते का यार भटकण्यासाठी. आता पुन्हा ट्रॅक करायचं का..?"

आदिनाथने मागे वळुन जोसेफची कॉलर पकडली. "यानंतर जर तु असले उलट धंदे करताना दिसला तर तुला सायबर क्राईमकडे देईल लक्षात ठेव. टेक्नॉलॉजीला तुमच्या सारख्या मुलांनी स्वतःच्या सोईच साधन बनवलंय. "

आदिनाथ सॉफ्टवेअर एक्स्पर्ट होता पण त्याचा वापर हा लोकांच्या चांगल्यासाठीच आणि योग्य मार्गाने व्हावा हा त्याचा नियम होता. आजच्या काळात ही टेक्नॉलॉजी वापरणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखं आहे. याची त्याला जाणीव होती. असंख्य लोकांचं खाजगी आयुष्यात डोकवणं हे बोटांचा खेळ होऊन बसलाय.

जोसेफ कॉलर सरळ करत पुटपुटला.

"स्वतः ची बहिण माझ्या उरावर बसुन उलटे काम करुन घेते. तिला काही म्हणत नाही आणि माझ्या गरिबाचा छळ."

"अभी.. परीतोषची एक ऑर्डर होती तुझ्यासाठी. तो येईल बहुतेक आज तुझ्या आर्ट गॅलरी मध्ये." आदिनाथ

"त्याला सांग डिटेल्स मेल करायला मी घेईल बघुन." अभिश्री

"तुमच्यात नक्की काय सुरु आहे..? गोव्याचं भांडण अजुन निपटलं नाही का..? तेव्हापासुन फार कमी सोबत दिसता.. म्हणजे खोड्या पण काढत नाही." आदिनाथ

"भाई जस्ट लिव्ह इट.. आय डोन्ट वाॅना टॉक अबाऊट हीम एनी मोअर." अभिश्री.

"बरं राहिलं… पण आपण जात कुठे आहो हे तर सांग.." आदिनाथ

"कळेल कळेल लवकरच कळेल.." अभिश्री

तेवढ्यात अभिश्रीच्या मोबाईलवर मेसेज आला…

"हॅलो बेटा. तुला शक्य असेल तर लवकरात लवकर मुंबईला येऊन भेट. खाजगी काम आहे."

तो मेसेज होता सी. एम. लक्ष्मीकांत रणदिवेंचा.

क्रमशः

( पुढील भाग दोन दिवसात देण्याचा जरुर प्रयत्न करेन. सध्या कथेमध्ये खुप कड्या जोडाव्या लागत असल्याने उशीर होत आहे. )

अभिश्रीला त्यांच्या आणि आदिनाथच्या प्रोब्लेमचं काय सोलूषण मिळालं होतं.

ती सर्वांना कुठे नेत होती..?

परी तोष चा विचार तिने खरंच मनातुन काढून टाकला का..?

सी.एम.नी अभिश्रीला मुंबईला कशासाठी बोलावलं असेल…? 

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ  सरकल्याने २०१५ सुरु झाले आहे.}

रणसंग्राम

लेखन : रेवपुर्वा

🎭 Series Post

View all