रणसंग्राम - एक झुंजार भाग १२ #मराठी_कादंबरी

Abhishree and paritosh have conversation regarding college issues. Both try to figure out to solve the problem. Hardik comes to Pune. Abhishree and her friends enjoys with hardik. Stay in their flat, college campus, pub. Later abhishree brings them t

रणसंग्राम - एक झुंझार भाग १२

( भाग १ ते भाग ११ च्या सर्व लिंक या भागाच्या शेवटी मिळतील)

मागील भागात - 

अभिश्री मध्यरात्री तिच्या मित्रांसोबत परीतोषच्या घरी त्याच्या रुममध्ये गेली व त्याच्या डायरीचे फोटोज् घेतले. पुढचे १५-२० दिवस इलेक्शन कॅम्पेनची तयारी जोमाने सुरु झाली. पण त्यांच्या विरोधात असलेल्या मुलाने गैरमार्गाने कॅम्पेन करण्यास सुरुवात केली.

--------------------

"संध्याकाळी घरी ये…" अभिश्री

" विल सी… वेळ मिळाला तर येईल…" परीतोष

तिचा डोळा लागणारच की आणखी एक मेसेज आला.

"हेय... डार्लिंग… कमिंग पुणे इन ३ टू ४ डेज… लेट्स कॅच अप अँड हॅव फन…" हार्दिक

"ओ ह ग्रेट… एक्साईटेड टू मीट यू अगेन…" अभिश्री

"सेम हीअर…" हार्दिक

"अभिश्रीने मस्तपैकी संध्याकाळपर्यंत झोप काढली.

ती बेडवर अस्ताव्यस्त पडुन होती. जड झालेले डोळे तिने हळु हळु उघडले तर समोर परीतोष तिच्याकडे एकटक बघत खुर्चीवर बसुन होता. स्वप्न समजुन ती त्याच्याकडे बघुन गोड हसली. भानावर येताच पटकन उठुन बसली.

"बावळट…! दचकले ना मी…!"

"किती आवाज दिले… कॅंपेनच्या नावाखाली भटकते नुसती… उचापत्या करत पाय मोडुन घेतला…" परीतोष

(त्यानी एकही आवाज दिला नाही हे तिला कळलं)

"बरं झालं कॅंपेनचं नाव तुच काढलं… तु कॉलेज इलेक्शनमध्ये केलेल्या उचापत्यांच काय…" अभिश्री

"मी काय केलं… कॉलेजची मदत केली मी… खराब झालेलं फर्निचर रीप्लेस करुन नवीन दिलं.." परीतोष

"अच्छा मग हे काय आहे….!"

अभीने त्याला निहार च्यौधरीचे फोटो दाखवले ज्यामध्ये तो मुलांना दारु, सिगारेट, पैसे वाटत होता.

"वॅट द हेल…." परीतोष

"आता म्हण... हे मी केलं नाही. यातलं मला काहीही माहीती नाही." अभिश्री

"सिरीयसली आय डोन्ट नो एनिथींग यार… बीलिव्ह मी…" परीतोष

"रिअली…" अभिश्री

"वेट… मी आत्ता पकडुन तुझ्यासमोर उभा करतो त्याला…" परीतोष

"थांब…" म्हणुन तिने त्याचा हात पकडला…

"बस इथे…"

यस आय बिलिव्ह यू…

"व्हॉट…?" परीतोष

"तू हे काम केल नाहीये आय नो…." अभिश्री

परीतोष पार गोंधळाला.

"पण मग… हे सगळं कोणी… त्या निहारकडे एवढे पैसे असणं शक्यच नाही…!" परीतोष

"एक्झॅक्टली… आपल्या मस्करीत सुरु झालेल्या गोष्टीला कोणीतरी वेगळंच वळण दिलंय. तुझ्या हातचं भावला आता दुसरा कोणी तरी नाचवत आहे.

तू मला त्रास देऊ शकतो पण माझं किंवा इतरांच नुकसान नाही करु शकत.

एनिवे मला फक्त ही गोष्ट तुझ्या कानावर घालायची होती. बी केअर्फुल…" अभिश्री

"हममं… मी सुरु केलंय तर मीच सोक्ष मोक्ष लावेल. त्याची वाट लाऊन त्याला नाही त्याला माघार घ्यायला लावली तर बघ." परीतोष

"वेट वेट… आता बॅक आऊट नाही करायचं… माझ्या आणि आमच्या गँगच्या स्वाभिमानचा प्रश्न आहे. मला आमच्या मेहनतीवर जिंकायचं आहे. आधीचे वर्ष कोणी विरोधक नव्हता फाईन. पण असलेला विरोधक हटवुन आमच्या जिंकण्याला काय किंमत राहील…!" अभिश्री

"हे बघ...तुला वाटते तेवढं सोपं नाहीये हे." परीतोष

"सोपं असावं म्हणुन करतही नाही मी.

आय नो बाबांच्या नावाचा मला खुप फायदा होतो. पण मला माझी स्वतंत्र आयडेंटिटी हवी आहे." अभिश्री

"यू आर जस्ट बिइंग फूल… पॉलिटिक्समध्ये जिंकण्याला महत्त्व असतं. कसं जिंकता त्याला नाही." परीतोष

"आय डोन्ट केअर... जिंकेल तर स्वबळावर नाही तर नाही सही." अभिश्री

"ॲज यू विश... भोग तु तुझ्या कर्माची फळं. ही घे स्टोन स्कल्पचरची रिकवायरमेंट. लवकर हवी आहे क्लाएंटला." परीतोष

"अच्छा माझ्या बर्थ डे पर्यंत दिली तर चालेल का…!" अभिश्री

"व्हॉट…" परीतोष

"नाही... काही नाही…" अभिश्री

"बरं… माझ्यासाठी खालुन कॉफी घेऊन येशील." अभिश्री

"नोकर किंवा पाळीव नाही मी तुझा.. इतर लोकांसारखा…" परीतोष

"माझा अपराधी तर आहेस न… निहार प्रकरण तुझाच मुळे सुरु झालंय…" अभिश्री

"बरं बरं… हे प्रकरण निस्तरे पर्यंत एन्जॉय.. पण जास्त डोक्यावर चढु नको.. या मागे कोण आहे हे मी लवकर शोधेल.." परीतोष

"तुझ्या आधी मी शोधणार." अभिश्री

"लेट्स सी…" परीतोष

परीतोष कॉफी आणण्यासाठी खाली गेला.

अभिश्रीने त्याची मजा घ्यायची ठरवलं. 

हा खरंच आपल्यावर प्रेम करतो का…! डोळ्यांनी बघु तरी

गरम पाण्यानी शॉवर घेण्यासाठी ती लगेच बाथरुम मध्ये गेली. 

थोड्या वळाने परीतोषने दारावर नाॅक केलं.

"म्हैस आहेस का तु… आणखी किती वेळ पाण्यात डुंबनार… कॉफी ठेवतो पिऊन घेशील. बाय" अभिश्री

"ऐक ना... मला चालता येत नाहीये… स्टिक पण बाहेर आहे… तु आत येना.." अभिश्री

परीतोषला भर ए.सी.मध्ये घाम फुटला.

"लवकर ये… पाय अकडलाय खुप…" अभिश्री

त्याने थरथरत्या हाताने बाथरुमचं दार लोटलं. ती बाथरोप घालुन स्टुलवर बसुन होती.

तिला अ‌सं‌ बघुन त्याची कंडीशन अणखीनंच वाईट झाली. त्याने कसंबसं तिला धरुन उठवलं. तिने मिष्खील पणे त्याला एका बाजुने घट्ट पकडुन ठेवलं. अभिश्रीपेक्षा त्याला चालणे कठीण झाले होते. नुकतंच शॉवर केल्याने तिचा तो सुगंध, ओले केस त्याला वेड लावत होते. तिला हळुच बेडवर बसवुन काही न बोलता तो बाजुला टेरेसवर गेला. एका दमात डीप ब्रिदींग, अनुलोम विलोम, कपालभाती करत स्वतः ला शांत केलं आणि तसाच मागच्या पायऱ्यांनी घरी पाळला.

अभिश्री मात्र त्याची अवस्था बघुन खुप हसु आलं.

खरंच करतो की हा. परीतोषच्या डायरीतील रोज एक पान वाचायचं तिने ठरवलं.

"तुला अलगद उचलताना झालेला तो पहिला स्पर्श अजुनही आठवतो…

आपले हे दुर्मिळ क्षण मी सदैव मनात साठवतो…"

या ओळी फॅशन शो साठी होत्या हे तिला कळलं.

---------------------------

अभिश्रीने ३-४ दिवस भरपुर आराम केला. सध्या त्यांना कुठलीही हालचाल न करता निहारच्या मागे कोण उभं आहे याचं गुप्तपणे निरीक्षण करायचं होतं. पण ३-४ दिवसात तरी तो कुठल्या संशयास्पद व्यक्तीशी ना भेटला ना फोनवर काही काँटॅक्ट केला. 

एक दिवस दुपारी अभिश्रीचा फोन वाजला.

"अभी मी पुण्यात आलोय…" हार्दिक

"ओह… ग्रेट… कुठे आहेस आत्ता…" अभिश्री

"तुझ्या कॉलेजचं नाव विद्याभवन आहे राईट…! त्याचं एरिया मध्ये आहो…" हार्दिक

"ओके… कॉलेजच्या मेन गेटजवळ एक टपरी आहे तिथे ये तु, मी पण पोहचते लगेच." अभिश्री

"डन…" हार्दिक

हार्दिक आणि अभिश्री काट्ट्यावर भेटले, बाकी चौघही होते. हार्दिक हा अभिश्रीचा मुंबईहुन आलेला फॅमिली फ्रेंड आहे असंच तिच्या मित्रांना सांगितलं. तो सी. एम.चा मुलगा आहे हे सांगण्याचं टाळलं. कारण त्याला कल्पना होती की ही गोष्ट तिच्या मित्रांना कळली तर त्यांना अवघडल्यासारखं होईल. हार्दिकला राजकारणात अजिबात रस नसल्याने तो न्युज किंवा मीडिया वगैरे मध्ये क्वचितंच दिसत. नित्याला मात्र सतत त्याला कुठेतरी बघितलंय असं वाटत होतं.

"मी तुला कुठे तरी बघितलंय…" नित्या

"डारलींग हमारी तस्वीर हर लडकी के दिल में बसती है." हार्दिक 

"हा हा…" नित्या

गरम गरम चहा आणि बन मस्का खाऊन अभिश्री आणि तिची चौकडी हार्दिकला कॉलेज दाखवण्यासाठी घेऊन गेले. अभिश्रीला खुप आश्चर्य वाटत होतं हार्दिकमध्ये थोडा सुध्दा गर्व नव्हता. पहिल्याच भेटीत तिच्या मित्रांशी अगदी साधेपणाने तो गप्पा मारत होता. फिरता फिरता समोर त्यांचा विरोधक निहार च्यौधरी आला.

" कैसन हो मैडम… सब बढिया ना…!" निहार

"हा बढिया तो है सब. लेकीन आप जितना नाही." अभिश्री

"ठीक है फिर चलत है हम…" निहार

हार्दिक निहारला बघुन थोडा विचारात पडला. तो जाताच अभीला विचारलं…

"ए कोण होता हा…" हार्दिक

सर्वांनी मिळुन हार्दिकला निहार विषयी सांगितलं. त्याच्या डोक्यावर नक्की कोणाचा हात आहे ही शोधमोहीम चालु आहे. 

"तो मुंबई चा नाही न…!" हार्दिक

"नो वे… परीतोषने कन्फर्म केलंय. दिल्लीवरुन नुकताच आलाय हा आणि अगदी सर्वसाधारण परिस्थितीचा आहे." अभिश्री

"ह्ममम… ओके…" हार्दिक

सेमीस्टर नुकतंच सुरु झाल्याने सर्वजण अभ्यासात अजुन शिरले नव्हते. इलेक्शन पुर्ण होईपर्यंत ते त्याच कामात राहणार होते. संध्याकाळपर्यंत त्यांचं निवांत कॉलेज फिरुन झाल होतं. अभिश्रीने हार्दिकला थोडं बाजुला नेलं. मग घरी येतोस का…! आय मिन तुला चालत असेल तर... नाहीतर हॉटेल मध्ये वगैरे.." अभिश्री

"यार.. मी इथे चील्ल करण्यासाठी आलोय. डॅड सी.एम झाल्यापासुन तिकडे माझ्याशी सगळे फार फॉर्मल वागतात. तु MLA ची मुलगी असुन तुझ्या ग्रुप मध्ये खुप छान बाॅंडींग तयार केलंय. मलाही असच आवडतं. सो घरी राहिलो तर मजा नाही येणार ॲंड हॉटेल इज बोअरिंग आणि मग ते प्रोटोकॉल्स." हार्दिक

"ह्ममम… एक जागा आहे. जिथे नो प्रोटोकॉल ओन्ली मजा." अभिश्री

"कोणती…" हार्दिक

"चल.." अभिश्री

"गाईज… मीट युअर न्यू गेस्ट मी. हार्दिक. आदरातिथ्य कराल न…!!" अभिश्री

"अरे वाह… अतिथी देवो भव…!!" दक्ष

"हेय sss... पण तू आमच्याच फ्लॅटमध्ये राहणार…" 

"यसsss... बॉईज वर्सेस गर्ल्स." जोसेफ

हार्दिकने सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या त्याच्या सिक्युरिटीची सोय करण्यासाठी इशारा केला. तिने सांगितलं बाबा मॅनेज करतील आणि त्यांची एक्स्ट्रा सिक्युरिटी ही लावली आहे. तो निघाला तेव्हाच मिसेस रणदिवेंनी विजयसिंहांना कळवलं होतं. त्यांना मी. रणदिवेंचा आणि हार्दिकचा बेफिकीरपना माहिती असल्याने त्या दोघांवर नेहमी लक्ष ठेऊन असतं.

सर्वजण फ्लॅटवर पोहचले. त्याला दोन्ही फ्लॅटच्या मधल्या दरवाज्याची सिस्टीम खुप आवडली. त्याने थोडा वेळ आराम केला. तोवर बाकीच्यांनी जेवण आणि पार्टीची सोय केली. रात्री उशिरापर्यंत त्यांची धम्माल सुरु होती. हार्दिकने अभिला मनातुन थॅंक यू म्हटलं. त्याला पहिल्यांदाच असं मोकळेपणाने जगायला मिळालं होतं. 

रात्रीचे २ वाजलेले, आता परत त्यांना भुक लागली. 

"अभी sss… पुण्याची नाईट लाईफ बघितलीच नाही यार…" हार्दिक

"अरेsss... बस का भाई… लेट्स रॉक देन…" जोसेफ

नाईट लाईफ एंजॉय करण्यासाठी अभी त्यांच्या नेहमीच्या पबमध्ये घेऊन गेली. तिथे परत थोडं खाऊन पिऊन मनसोक्त नाचणं धिंगाणा सुरु झाला. हार्दिक बरोबर असल्याने अभिश्रीला सिक्युरिटी बद्दल जागरुक आणि नीट शुध्दीत राहणं भाग होतं. शिवाला बोलण्यासाठी ती बाहेर आली. सर्व व्यवस्था उत्तम होती. अभीला पार्किंगमध्ये एक जन अमली पदार्थ घेताना दिसला. ते बघुन तिला खुप मनस्ताप झाला. शिवाने त्या मुलाला हकलवुन दिलं. हार्दिक तिच्या बाजुला आला. 

"अश्याच व्यसनांमुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. चिराग जर त्या विळख्यात फसला नसता तर तसं काही झालं नसत." अभिश्री

"आय कॅन अंडरस्टॅंड अभी. पण तू एकटीच सर्व परिस्थिती नाही बदलच शकत. तुला योग्य वेळ आणि ट्रिमेंडस पावर सोबतीला हवी." हार्दिक

"हम्म…" अभिश्री

शिवाने त्यांना सुखरुप फ्लॅटवर पोहचवलं. सकाळचे ५ वाजले होते. नाचुन नाचचन कोणामध्ये काही त्राण उरलं नव्हतं. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो आडवा झाला.

सकाळी ८ वाजता अभिश्रीच्या फोनवर बरेच नोटीफिकेशन आले. ते बघुन ती खडबडुन जागी झाली. तिने जोसेफच्या तोंडावर पाणी मारुन त्याला जागं केलं. 

"ही लोकेशन ट्रॅक कर पटकन." अभिश्री

"एsss.. वेड लागलंय का…! तुला काही होणार नाही पण मला पोलिसात देतील." जोसेफ

"चुप चाप ट्रेस कर." अभिश्री

घाबरत घाबरत. जोसेफ ने त्य नंबरचं लोकेशन ट्रॅक केलं आणि परत झोपला. अभिश्री कुत्सीतपणे हसली. सिक्युरिटीकडुन त्या चौघांना उचलुन गाडीत टाकलं. थंडगार हवेत सर्व तासभर गाढ झोपले. आपण कुठल्यातरी स्वप्नात अहो अशी त्यांची समजुत झाली. 

झोप उघडली तेव्हा सर्वांची आरडा ओरड सुरु झाली. उभ्या जागी चकरा येऊ लागल्या हात पाय थर थर कापत होते.

क्रमशः

( पुढील भाग शुक्रवार दिनांक १६ )

अभिश्रीला अशी कुठली लोकेशन मिळाली होती की ज्यासाठी ती तडक सर्वांना घेऊन निघाली…?

ते लोक अशा कुठल्या ठिकाणी पोहचले जिथे त्यांची अशी अवस्था झाली…?

निहारचं सत्य त्यांना समजेल का…? त्यामुळे टी

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपुर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.सध्या काळ १० वर्ष पुढे सरकल्याने २०१४ सुरु झाले आहे.}

🎭 Series Post

View all