रणरागिणी -१

लेख
विषय - एक दुर्गा अशीही

शीर्षक - रणरागिणी

नागपूर सारख्या महानगरपालिका असलेल्या शहरात राहूनही नैतिक व धार्मिक शहरात वाढलेली अश्विनी संगित विषयात पदवीधर झाली.
विवाह योग्य झाल्यावर स्थळ येऊ लागले.
अश्विनीचे बाबा तिच्या आईला म्हणाले,"अगं, अश्विनीसाठी एक चांगलं स्थळ आलं आहे. मुलगा एकुलता एक असून शिक्षक आहे व चांगलं स्थळ आहे."
अश्विनीची आई म्हणाली,"अहो, अश्विनीला विचारा व मुलाकडे निरोप पाठवा.तिची इच्छा असेल तर पाहण्याचा कार्यक्रम ठेऊ व पसंती झाली तर पुढची बोलणी करूया".
अश्विनीचा पाहण्याचा कार्यक्रम झाला.दोघांचीही पसंती झाली व अश्विनीचा विवाह यथायोग्य पार पडला.
सुखद भविष्याची स्वप्ने पहात अश्विनीने सुहास च्या जीवनात पाऊल ठेवले.नववधूचे सुहास च्या संसारात पाऊल पडले व सुहासच्या आयुष्याचे सोने झाले.
नव्याचे नऊ दिवस सरताच एक दिवस अश्विनी सुहास म्हणाली,"अहो, तुम्ही शाळेत गेल्यावर मी घरकाम आवरते व नंतर मला काहीच काम नसते.
मला काहीतरी शिकण्याची इच्छा आहे."
सुहासने होकार दिल्यावर अश्विनीने घरसंसार सांभाळून प्रिडिएड केले व सोबतच ब्युटीपार्लर चा डिप्लोमा केला.
फावल्या वेळेत ब्युटीपार्लरची कामे करून संसाराला हातभार लाऊ लागली
सुहास व आश्विनी च्या संसारवेलीवर संकेत व अनघा नावाची दोन गोंडस फुले उमलली.
सासू सासरे यांची सेवा,पती,मुले व स्वतःचा छंद जोपासणे, आलेल्या सर्वांचे यथोचित स्वागत करून अश्विनीने अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली.
२००९ साली अश्विनीच्या सासूबाईंचे व २०१० ला सासऱ्यांचे अकस्मात निधन झाल्याने सुहासवर दुःखांचा डोंगर कोसळला.पण अश्विनीने खंबीरपणे साथ दिली.
२०१० ला औरंगाबाद ला स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहायला गेल्यावर अश्विनीने "जैन विविध वस्तू भंडार " नावाने स्टेशनरी दुकान घरातच चालू केले.
हितमितप्रिय स्वभावामुळे अश्विनीला भरपूर प्रतिसाद मिळाला.मुले मोठी झालेली असल्यामुळे अश्विनीला दुकानात लक्ष द्यावयास भरपूर वेळ मिळत होता.
सुहास चेही मोलाचं सहकार्य व मदत,साथ होतीच.
दुकानात विक्रीसाठी लागणारे सर्व साहित्य स्वतः एकटीच गाडीवर जाऊन घेऊन येत होती.
फावल्या वेळेत लेखनाचा छंदही जोपासत होती.
२०२१ साली फेब्रुवारी महिन्यात अश्विनीचा टू व्हीलरचा पार्किंग मध्येच अपघात झाला व हातावर गाडी पडल्यामुळे मनगटावर फ्रॅक्चर झाले.
अश्विनीचे उजव्या हाताचे ऑपरेशन झाले.तिला खुपचं टेन्शन आले.
ती रडायला लागली व सुहास,"अहो माझा काम करण्याचा हातच निकामी झाला."
सुहास ने तिला धीर दिला,"अगं , तुझा हात लवकर बरा होईल आणि आम्हा तिघांचे सहा हात आहेत ना!"
अश्विनीला धीर आला.
सुहास ची तारांबळ होत होती तरीही मनात कोणताही राग न धरता, चिडचिड न करता सर्व कामे जबाबदारीने पार पाडत होता व घरकाम,नोकरी व्यतिरिक्त वेळात घरातील दुकानही सांभाळीत होता.
दोन मुले व पती सुहास यांच्या सहकार्याने, सेवेने अश्विनी भाराऊन गेली.
एक हात बांधलेला असूनही दुसऱ्या हाताने शक्य तेवढी कामे करून सुहासला हातभार लावीत होती.
अश्विनीने हिंमत न सोडता अत्यंत धैर्याने आलेल्या संकटाला सामोरी गेली.स्वत:चा लेखनाचा छंदही जोपासला.
अश्विनी सारखी रणरागिणी सुहासच्या आयुष्यात आली व तिने सर्व पातळीवर स्वतःला सिद्ध केले.
अल्पावधीतच यशस्वी बनली तरीही अहंकाराला जवळ येऊ दिले नाही.
कविता, चारोळ्या, लेख लेखन, विविध ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवित होती व आजही मिळवित आहे.
ऋणानुबंध जोपासणारी,हितमितप्रिय,आयटी कंपनीत मुलगा नोकरीला,मुलगी फॅशन डिझायनर व गणिताचे तज्ञ मार्गदर्शक व आदर्श आदर्श शिक्षक असलेले पती सुहास असे छोटे पण सुखी व आनंदी कुटुंब लाभलेली अश्विनी आधुनिक युगातील खरी रणरागिणीच आहे.
अशा रणरागिणीला त्रिवार वंदन.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद