©️®️शिल्पा सुतार
........
........
सचिन श्रेया दोघ हॉस्पिटल मधे पोहोचले, थोड्या वेळाने नंबर लागला, हात व्यवस्थित होता, प्लास्टर काढून टाकलं, बरेच इन्स्ट्रक्शन दिले डॉक्टरांनी, दोघेजण घरी यायला निघाले
सचिन खुश होता,.. "बरं वाटत आहे खूप हाताला, आता नाहीतर खूप अडकल्या सारखं झाल होता श्रेया",
"खुश ना मग आता" ,... श्रेया
हो
श्रेया सचिन घरी आले, हात बरा होता, तब्येत ठीक होती म्हणून सगळे घरचे खुश होते, सचिनने अभिजीत सरांना फोन करून सांगितल सगळ, जेवण झालं,
श्रेया अभ्यास करत होती,.. "श्रेया इकडे ये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, आपण कधी सोबत राहणार ",
" आता लगेच परीक्षा आहे सचिन आणि तू हो म्हटला ना, मी आईकडे जाणार आहे, परीक्षेनंतर मी विचार करीन",.. श्रेया
"याला काय अर्थ आहे, खूप पुढच्या तारखा मिळत आहेत मला",.. सचिन
श्रेया हसत होती,.." अरे मग मी बिझी आहे ना सचिन आता ",..
श्रेया अभ्यास करत होती, सचिन जवळच बसून होता,.." तू इथे नको बसू सचिन ",
" अरे म्हणजे काय? ",.. सचिन
" मला अभ्यास आहे ",.. श्रेया
"मी काही करतो आहे का तुला? , नुसता बसलो आहे ना मी तुझ्या जवळ ",.. सचिन
" नाही तू जाऊन झोपून घे",.. श्रेया
"मला झोप येत नाही एवढ्या लवकर, मी माझ्या ऑफिस च काम करतो, मी तुझ्यासमोर असलो की तुला काही होतं का?",.. सचिन
" हे बघ असं आहे तुझ सचिन, मला अभ्यास करू दे शांत रहा जरा, अजिबात बोलू नको",.. श्रेया
" आता मी एवढा हॅन्डसम आहे त्याला मी काय करणार",.. सचिन
श्रेया हसत होती, इथे काही माझा अभ्यास होणार नाही,
परीक्षा अगदी दोन दिवसावर आली होती, श्रेयाने सकाळी ब्रेकफास्ट करताना सविताताईंना विचारल,.. "आई मी ह्या आठवड्यात घरी आईकडे जाऊ का? माझी परीक्षा आहे",..
हो जा..
श्रेयाने रूममध्ये आल्यानंतर बॅग पॅक करायला घेतली,
"काय सुरू आहे श्रेया? एवढे कपडे कशाला बाहेर काढले?",.. सचिन
"मी आईकडे जाते आहे, आपल झाल ना तस बोलण",.. श्रेया
"अरे पण परीक्षेला अजून दोन दिवस वेळ आहे",.. सचिन
"मग त्याआधी पहिल्या पेपरचा अभ्यास नको का करायला" ,.. श्रेया
" मग आता कॉलेजला जाते आहेस ना तू?",.. सचिन
" हो तिथूनच मी आईकडे जाईल ",.. श्रेया
" हे मला अजिबात आवडलं नाही श्रेया, तू इथे थांब ",.. सचिन
"सचिन अरे मला इथे अभ्यास होत नाही, मला जावु दे, आणि बरं झालं आठवल, इकडे ये, तू माझ्या मागे मागे तिकडे यायचं नाही लगेच, कारण मला अभ्यास आहे ",.. श्रेया
सचिन हसत होता,..." तुला कसा समजला माझा प्लॅन?... जरी मी आलो तरी मी गप्प बसेन",..
" नाही म्हटलं ना मी ",.. श्रेया
" ठीक आहे मग आज नको जाऊ उद्या जा",.. सचिन
" अजिबात नाही माझं ठरलं आहे मी आईंना विचारलं आहे",... श्रेया
"अरे मी महत्त्वाचा नाही का",.. सचिन
" असं काही नाही सचिन, मी निघते ",.. श्रेया आज खूप खुश होती, कॉलेज झाल्यानंतर ती आईकडे आली, मीनाताई पण तिची वाट बघत होत्या, दोघीजणी खूप गप्पा मारत जेवल्या, सगळे पदार्थ श्रेयाच्या आवडीचे होते , आई मी आता जाते रूम मध्ये आणि जरा अभ्यास करते,
श्रेयाने अभ्यास सुरू केला, तिने मेसेज करून दिला केदार साहेबांना कि ती आता एक आठवडा ऑफिसमध्ये येणार नाही,
सचिन घरी आला , श्रेया शिवाय राहणं अवघड आहे, कधी संपेल हिची परीक्षा, नंतर मी तिला कुठे जावु देणार नाही, फोन करू का तिला? , की तिकडे जावून बघु, नको परत ओरडेन मला ती, त्याने टीव्ही लावला, टीव्हीवरही काही नव्हतं, नंतर सचिन बाहेर येऊन बसला, आजी आजोबा सविता ताई यांच्याशी गप्पा मारत होता तो,
"आपण सगळ्यांनी जायचं आहे फिरायला आजी आजोबा तयारी करून ठेवा",.. सचिन
"कशाला आम्ही सोबत? तुम्ही दोघे जाऊन या ना",.. आजी
"नाही आपण जाऊ सगळे सोबत साक्षी ताई सुद्धा येणार आहे",.. सचिन
सविताताईंनी साक्षीला फोन केला, दोघी मिळून वाढदिवसाचे ठरवत होत्या, साक्षी आता सचिन सोबत बोलत होती, सचिन श्रेया जिकडे गेले होते फिरायला त्या हिल स्टेशनवर जायचा आग्रह सचिनने धरला होता,
श्रेयाची उद्यापासून परीक्षा होती, बराच अभ्यास झालेला होता, रात्री सचिनचा फोन आला... "उद्यापासून पेपर आहेत ना श्रेया?",
हो..
"झाला का अभ्यास सगळा? तुला ऑल द बेस्ट",.. सचिन
"हो जवळजवळ झाला आहे रीव्हिजन सुरू आहे" , .. श्रेया
" लवकर संपू दे तुझी परीक्षा",.. सचिन
श्रेया हसत होती,.." इथे मला टेन्शन आलं आहे आणि तुझं काय सुरू आहे? ",..
" आता मी काही बोललो का? फक्त म्हटलं लवकर संपू दे परीक्षा अस म्हटल, तुझं टेन्शन कमी होण्यासाठीच म्हणत होतो ना मी, तुला काय वाटलं? ",.. सचिन
"काही नाही वाटल.. ठीक आहे, मी ठेवते फोन ",.. श्रेया
जेवताना सुद्धा श्रेया वाचत होती, आई बाबा तिच्याकडे बघत होते,
"पुरे झाला अभ्यास आता व्यवस्थित जेवून घे श्रेया",.. मीना ताई
" हो लास्ट लेसन बाकी आहे नंतर रिव्हिजन करायची आहे अजून दोन तास ",.. श्रेया
" बापरे एवढा वेळ जागरण करायचं नाही, वाटलं तर उद्या सकाळी लवकर उठ",.. मीना ताई
सकाळी श्रेया परीक्षेला गेली, चांगला गेला होता पेपर, तिने कॉलेजहून सचिनला मेसेज केला ,
बाकीचे पेपर ही नीट गेले, श्रेयाची परीक्षा झाली होती,
" आज येणार ना मग तू घरी श्रेया",.. सचिन
" हो येणार आहे",.. श्रेया
सचिन आनंदात होतं,.." मी येऊ का तुला घ्यायला ",
चालेल... श्रेया घरी गेली, जरा वेळ तिने आराम केला, अभिजीत सर संध्याकाळी लवकर आले होते,
"आई बाबा तुम्हीही यायचं आहे आमच्या सोबत सचिनच्या वाढदिवसाच्या",.. श्रेया
" हो येणार आहोत, कधी निघणार आहोत आपण? ",.. मीना ताई
" मी आता घरी गेल्यावर आईंना विचारते आणि सगळं सांगते तुम्हाला",.. श्रेया
चालेल..
थोड्यावेळाने सचिन घ्यायला आला, सचिनला बघू श्रेयाला खूप आनंद झाला होता, सचिन अभिजीत साहेबांन सोबत गप्पा मारत होता, श्रेयाने बॅग पॅक केली मी निघते आता, मी करते फोन उद्या
ठीक आहे
" आपण एक छान मोठी बस केली आहे , तुम्ही तयारी करून ठेवा, उद्या सकाळी या तिकडे",.. सचिन
श्रेया सचिन घरी निघाले, रस्त्यात साक्षीचा फोन आला, साक्षी विवेक आलेले होते, घरी सुद्धा सगळे वाढदिवसाच्या बाबतीतच बोलत होते , उद्या दुपारी आपल्याला सगळ्यांना निघायचं आहे, खूप प्लॅन सुरू होता, काय काय करायचं,
श्रेया खूप बिझी होती, सगळ आठवणीने ती घेत होती, तिने मैत्रिणी सोबत जाऊन सचिन साठी आणि तिच्यासाठी छान कपल वॉच आणला होता,
जेवण झालं, श्रेया रूम मध्ये आली, सचिन बाहेर विवेक सोबत गप्पा मारत होता, बराच वेळ झाला तरी तो आला नव्हता, श्रेयाने झोपून घेतलं, तिला परीक्षा मुळे आराम करायला मिळाला नव्हता, रात्री जाग आली तेव्हा ती सचिनच्या मिठीत होती,
सकाळी सगळ्यांच्या बॅग भरून तयार होत्या, अभिजीत राव मीनाताई सुद्धा इकडे आले होते, सगळे खूप उत्साही होते, साक्षी श्रेया आत तयारी करत होत्या, रूम मधे सचिन श्रेयाची वाट बघत होता, कुठे आहे ही सकाळ पासून? त्याने तिला मिस कॉल दिला, परीक्षा झाल्यावर छान सोबत राहू असं त्याला वाटत होतं, पण कालपासून श्रेयाला त्याच्यासाठी वेळ नव्हता, संध्याकाळी तो स्वतः विवेक सोबत बोलत बसला होता, श्रेया आत आली,.. का केला होता फोन सचिन?
"श्रेया इकडे ये काय चाललं आहे तुझं? माझ्याशी बोलायचं आहे की नाही आज ? काय ठरतं आहे आपलं? ",.. त्याने श्रेयाला जवळ घेतल, पटपट बोल आता सोडणार नाही मी तुला,
"तूच बिझी आहे कालपासून, मी तर तुझी किती वाट बघत होती काल",.. श्रेया
"का वाट बघत होती",.. सचिन
"असंच तुझ्याशी बोलायला",.. श्रेया
" बोल मग आता",.. सचिन
" चल आता उशीर होतो आहे, सगळे पाहुणे आहे घरात",.. श्रेया
" मला सांग ना श्रेया काय प्लॅन आहे आपला?",.. सचिन
"कसला प्लॅन सचिन, सगळ्यांसोबत आपण पिकनिकला जातोय ",.. श्रेया
ठीक आहे... आता सचिन चिडला होता, तो रागाने बाहेर जाऊन बसला, श्रेयाला समजत होतं सगळं, उगीच चिडवल याला,
दुपारी जेवण झाल्यानंतर सगळेजण निघाले, श्रेया बघत होती सचिन कुठे आहे, सचिन तिच्याशी बोलतच नव्हता, तिला वाटत होतं की तो गाडी सुरू झाली होती तिच्या शेजारी येऊन बसेल, मग ती बोलणार होती त्याच्याशी, आपण जास्त ताणलं वाटतं, सचिन रागवला आहे,
मध्ये एका ठिकाणी ते चहा कॉफीसाठी थांबले, तिथे सुद्धा सचिन सगळ्या इतर लोकांसोबतच होता, मधेच तो एकदा दोनदा साक्षी आणि श्रेयाशी येऊन बोलला, पण मुद्दामूनच तो दुर्लक्ष करतो आहे असं श्रेयाला वाटलं, नंतर तिने जरा वेळ झोपून घेतलं, बरोबर संध्याकाळी सगळे फार्म हाऊस वर पोहोचले,
हे तेच हिल स्टेशन होतं जिथे सचिन आणि श्रेया हनिमून साठी आले होते, फक्त आता यावेळी दुसरीकडे ते उतरले होते,
खरं ते फार्म हाऊस सचिनने श्रेयासाठी घेतलं होतं, पण हे जास्त कोणाला माहिती नव्हतं, सविताताई केदार साहेब अभिजीत साहेब यांनाच माहिती होतं, सचिन श्रेयाला सरप्राईज देणार होता,
श्रेयाला इकडे आवडतं म्हणून मुद्दामून सचिनने इकडचा प्लॅन फिक्स केला होता,
पोहोचल्यानंतर सगळे बघतच राहिले किती सुंदर प्रॉपर्टी आहे, अतिशय मोठा परिसर, सुंदर बंगला, भरपूर रूम होत्या आत मध्ये, आधीच माहिती होतं त्यामुळे मदतनीस भरपूर होते, स्वयंपाक झालेला होता,
हवेत खूप सुंदर गारवा होता, अतिशय सुंदर फुल गार्डनमध्ये लावलेले होते, बगीच्या सुद्धा छान मेंटेन होता, स्विमिंग पूल, जुनी झाडी सगळंच होतं तिकडे,
सगळे खाली उतरून फार्म हाऊस बघत होते, सगळ्यांना रूम दिल्या, सचिन रूम मधे सामान घेवून गेला, श्रेया आत आली,.. "सचिन माझ्याशी बोलायचं नाही का तुला?",..
"तसं काही नाही श्रेया तुलाच वेळ नसतो सगळ्यांमधून माझ्यासाठी",.. सचिन
"असं नको ना करायला आपण, प्लीज बोल माझ्याशी, मला नाही सहन होत",..श्रेया रडत होती
"अरे बापरे थांब रडू नको श्रेया, अस करु नकोस, हे सगळे नातेवाईक मला मारतील , एक तर सगळ्यांना तूच आवडते, काय म्हणणं आहे तुझं बोल माझ्याशी, आता का रडतेस, तुला सगळ्यांसोबत यायचं होतं ना पिकनिकला",..सचिन
" छान नाही वाटते का मग सगळ्यांसोबत",.. श्रेया
"चांगलं वाटतं आहे",.. सचिन
" तु हो म्हणत असेल तर आपण नंतरचे पुढचे एक दोन दिवस इथे राहायचं का? ",.. श्रेया
आता सचिन खुश होता तो आश्चर्याने श्रेया कडे बघत होता,.." चालेल ना तुला ",
" हो चालेल ",.. श्रेया
" ठिक आहे मग सगळे गेले तरी आपण एक दोन दिवस इथे थांबू",.. सचिन
"आता तू चिडू नकोस माझ्यावर ",.. श्रेया
" नाही माझा राग गेला एवढी छान ऑफर ऐकुन ",.. सचिन
दोन-तीन दिवसाचे प्लॅनिंग ते करत होते, सचिन खुश होता,
संध्याकाळी जेवायला सगळे जमले, खूप छान गप्पागोष्टी सुरू होत्या, सचिन उठला मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, स्पेशली श्रेयासाठी हे एक सरप्राईज आहे, श्रेया आपण ही जागा आपल्यासाठी घेतली आहे, सगळेजण खूप खुश होते, श्रेयाला विश्वासच वाटत नव्हतं की इतका सुंदर घर आपल आहे, मुळात तिला हे हील स्टेशन खूपच आवडलं होतं
रात्री बारा वाजे नंतर सचिनचा वाढदिवस सुरु होत होता, साक्षी श्रेया ने रात्री केक कटींगचा प्रोग्राम ठेवला होता, जेवण झाल, सगळे गप्पा मारत बसले होते, साडे अकरा नंतर मुद्दाम श्रेया सचिनला आत घेवून आली, तिकडे साक्षी पूर्ण तयारी करत होती, सचिन येवून श्रेया जवळ बसला, आवडल का माझ सरप्राईज? ,
" हो खूप आवडल थँक्स, तू मागच्या ट्रीपला म्हटला होता ना आपण इथे घर घेवू या का " ,.. श्रेया
"हो आता आपल्याला इथे नेहमी येतं येईल यातला अर्धा भाग आपला प्रायव्हेट असेल, अर्धा भागात रिसॉर्ट असेल",.. सचिन
"खूप छान आयडिया",.. श्रेया
"मग आता मला काय मिळेल एवढं छान गिफ्ट दिल्याबद्दल?, खरंतर तू मला गिफ्ट द्यायला पाहिजे माझा बर्थडे आहे तर, मलाच तुला घ्यायला लागलं सगळं ",.. सचिन
श्रेया बॅगेतून सामान काढत होती, सचिन तिच्या मागे जाऊन उभा राहिला, आटोप जा आता कपडे बदल आणि माझ्या जवळ ये,
श्रेया बारा वाजायची वाट बघत होती, पाच मिनिट बाकी होते, मला सगळ्यात आधी सचिनला विश करायचा आहे, तिने वळून त्याला मिठी मारली,.. सचिन आय लव यू
"मस्त आहे हे बर्थडे गिफ्ट श्रेया, कायम लक्ष्यात राहील, लव यु टु, पुढे काय? ",.. सचिन
"तू म्हणशील ते सचिन",.. श्रेया
" नक्की ना",.. सचिन
हो... एक दोन मिनिटं बाकी होते, चल आता बाहेर
आता कशाला? ,
" बर्थडे आहे तुझा, केक कापायचा आहे",.. श्रेया
तेवढ्यात बारा वाजले श्रेयाने त्याला बर्थडे विश केलं,... श्रेया थँक्स
सगळे वाट बघताय,
दोघेजण बाहेर आले, खूप छान डेकोरेशन केलं होतं तेवढ्या वेळातही साक्षीने
सचिन केक कापायला उभा राहिला, तो बघत होता श्रेया समोर उभी होती, त्याने पुढे जाऊन श्रेयाला इकडे आणलं, दोघांनी मिळून केक कापला
" वाढदिवस तर सचिनचा आहे ना मग श्रेया का केक कापते आहे",.. सगळेजण मुद्दाम चिडवत होते,
"आता आम्ही दोघं एकच आहोत ना म्हणून",.. सचिन
बरेच गिफ्ट मिळाले सचिनला, तो सगळ्यांचा आशीर्वाद घेत होता,
"चला आता झोपा उशीर झाला आहे, उद्या परत छान पार्टी आहे",.. सविता ताई
श्रेया सचिन रूम मध्ये आले, कुठे आहे आता माझं गिफ्ट लवकर दे श्रेया, तिने त्याला कपल वॉच दिला, किती छान आहे हे, दुसरे घड्याळ कोणासाठी आहे? ",.. मुद्दाम सचिन विचारत होता,
माझ्यासाठी
" माझ्यासोबत तुझाही बर्थडे आहे का? ",.. सचिन
" मग आपण सोबत आहोत ना",.. श्रेया
खरं का
हो
श्रेयाने सचिनला एक चिठ्ठी दिली, सचिन चिठ्ठी वाचत होतं त्यात श्रेयाने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती, नंतर तिने त्याला एक चॉकलेट आणि गुलाबाचं फुल दिल,
" माझे खूपच लाड चालू आहेत आज, पण तुला माहिती आहे ना मला काय हवं आहे",.. सचिन
श्रेया काही म्हटली नाही, सचिन तिच्याजवळ आला,.. "थँक्यू सगळ्या गिफ्ट बद्दल, मला खूपच स्पेशल फील होतं आहे, आता पुढे काय?",
श्रेया लाजली होती, सचिनने श्रेयाला उचलून घेतलं, दोघे एकमेकांसोबत रमले होते,
दुसऱ्या दिवशी श्रेया उठली,
" लवकर नको बाहेर जायला श्रेया, माझ्यासोबत थांब ना",.. सचिन
दोघ दुपारी जेवणाच्या वेळी बाहेर आले, संध्याकाळी छान पार्टी होती, त्यासाठी सगळे जण ठरवत होते काय करायचं ते, संध्याकाळी छान डिनर प्लॅन केला होता त्यांनी,
जेवण झालं
जेवण झालं
" आता उद्या सकाळी आपण निघू",.. सविता ताई
" आई मी आणि श्रेया मी अजून दोन-तीन दिवस इथे राहतो आहोत",.. सचिन
चालेल सकाळी बाकीचे सगळे निघाले, साक्षी ताई विवेक याना थांबायचा खूप आग्रह केला सचिनने, पण ते गेले त्यांना लगेच घरी जायच होत,
ते गेल्यानंतर श्रेया आणि सचिन बराच वेळ गार्डन मध्ये बसले होते,.. "छान वाटत आहे ना सचिन इथे",.
"हो मागच्यावेळी आपण आलो होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण आपल्या हनिमूनसाठी इथे यायच आणि तेही स्वतःच्या घरात",.. सचिन
"मग तू तेव्हाच ठरवलं होतं का की आपण सोबत राहणार आहोत ते",.. श्रेया
" हो आपलं लग्न झालं तेव्हाच वाटत होतं की आपण दोघं सोबत राहणार",.. सचिन
" म्हणून तु मला लग्नाच्या दिवशी पळून जाऊ दिलं नाही का",.. श्रेया
" बहुतेक असच असेल, तेव्हाच तू मला खूप आवडली होती, अल्लड भांडकुदळ",...सचिन
श्रेया चिडली होती,.." अजून तशी आहे मी ह सचिन, उगीच माझ नाव नको घेवू ",
" तुझ नाव नाही घेणार मग काय करणार आता? , काय विचार आहे श्रेया आता? इथे तर कोणीच नाही फार्म हाऊस वर, आपण आपल्या प्रायव्हेट एरियात आहोत",... सचिन जवळ आला, श्रेयाने त्याला ढकलला, श्रेया पुढे पळत होती, सचिन तिच्या मागे गेला, एका हाताने त्याने तिला ताब्यात घेतल, उचलून घेतलं, तो श्रेयाला घेऊन रूम कडे जात होता... सोड सचिन,
" शक्य नाही ते श्रेया, या पुढे इथे ही घरी ही माझच ऐकाव लागेल तुला",.. श्रेयाच्या हातात काही नव्हत, सुंदर आयुष्याला सुरुवात झाली होती.
समाप्त
.........
.........
सचिन वर हल्ला झाला होता ती मनीष विरुद्धची केस सचिनने जिंकली, त्या बद्दल मनीषला शिक्षा झाली , सचिनचा प्रोजेक्ट जो लॉस मधे होता तो आता प्रॉफिट मधे सुरू होता, श्रेयाने ऑफिस काम जोरात सुरू केल होत, तिला ही सचिनच्या बाजूची केबिन मिळाली होती, आठवड्यातुन दोन दिवस ती अभिजीत सरांच्या ऑफिस मधे ही जात होती, बरीच शांत झाली होती आता श्रेया ,
आज श्रेया अभिजीत सरांच्या ऑफिस मधे आली, तिच काम सुरू होत
"श्रेया बेटा धावपळ होते का तुझी? दोन दोन ऑफिसच काम बघते तू",.. अभिजीत सर
"नाही बाबा काही विशेष नाही माझ्या साठी हे",.. श्रेया
"हुशार आहे माझी मुलगी",.. अभिजीत राव
"बाबा मी लवकर निघते आज",.. श्रेया
काय झाल?
"सचिन सोबत फिरायला जाते मी मुव्ही डिनर साठी ",.. श्रेया
" ठीक आहे, पैसे हवे का?",.. अभिजीत राव
" आहेत बाबा", ... श्रेया अभिजीत रावांना येवून भेटली,... बाबा थँक्स
"काय झालं आता?",.. अभिजीत राव
"बाबा खरच तुम्ही माझ्या साठी योग्य चांगला निर्णय घेतला होता ",.. श्रेया खुश होती,
" याला म्हणतात ना मोठ्या लोकांचा अनुभव ",.. अभिजीत राव
हो बाबा..
सचिनचा फोन येत होता, श्रेया घाईने निघाली... हळू ग जरा, काय घाई आहे? , सचिन राव पुढे थोडी निघून जाणार आहेत ... अभिजित राव हसत होते. ते खुश होते.
......
वाचकांचे खूप खूप आभार, लव यु.
......
वाचकांचे खूप खूप आभार, लव यु.