रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 16

मी आता काही फक्त तुझ्या ऑफिस मधे नाही कामाला, बाबांच्या ऑफिस मधे ही मी आता सिईओ आहे, ते बोलले की त्यांच्या कंपनीची मी एम्पलोयी आहे



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 16

©️®️शिल्पा सुतार
........

कॉलेज सुटलं श्रेया निघाली, ती बघत होती काळी गाडी सारखी मागे येत होती, कोण आहे हे? तो मनीष तर नसेल ना? , काय यार, त्याचा काय प्रॉब्लेम आहे? , आता परत घरी सांगितल तर भांडण होतील, नको आता सचिनला आधीच खूप लागल आहे.

श्रेया ऑफिसमध्ये आली,

मनीषचे लोक श्रेयाच्या मागे होते, त्यांनी त्याला फोन केला श्रेया ऑफिस मधे गेली,

आता काय ही जॉईन होते का कंपनीत? छान पण प्रोजेक्ट मीटिंगला इतर ठिकाणी निदान सुंदर लोक तरी दिसतील,

सचिन मिटिंग मध्ये बिझी होता, श्रेया केदार साहेबांना जाऊन भेटली, केदार साहेबांनी मॅनेजरला आत बोलवलं,

"या श्रेया मॅडम रोज दोन तास येतील ऑफिसला, त्यांना ऑफिसचे पूर्ण काम शिकवायचं, सगळं म्हणजे अगदी सगळं, अकाउंट पासून परचेस पासून प्रोडक्शन पर्यंत रोज जेवढ होईल तेवढं, काही घाई नाही श्रेया बेटा, हे जे सांगतील ते थोडं थोडं काम करून बघत , म्हणजे तुला ऑफिसमध्ये काय चालतं याची पूर्ण कल्पना येईल आणि जेव्हा तू नंतर ऑफिस जॉईन करशील तेव्हा काहीच नवीन वाटणार नाही आणि तुला जेव्हा यायचं तेव्हा यायचं कंपल्सरी नाही, परीक्षा असली किंवा घरी जावं असं वाटलं तरी तू नाही आली तरी चालेल",.. केदार साहेब

" मी कुठे बसणार आहे बाबा? ",.. श्रेया

" तुला पुढे कॉमन एरियातच बसावं लागेल, अजून तू रोज येणार नाही ना, नंतर आपण तुझी केबिन तयार करू ",..केदार साहेब

ठीक आहे.. श्रेया बाहेर जाऊन बसली. तिला एक टेबल मिळाला तिने तिचं सामान त्याच्यावर ठेवलं, मॅनेजर दीक्षित यांनी श्रेयाला एक फाईल आणून दिली,.. "आजच्या दिवस तुम्ही हे सगळं वाचा मॅडम, पूर्ण कंपनीची माहिती होती त्यात कंपनीची ",

" ठीक आहे सर ",.. श्रेया

" तुम्ही मला सर म्हणू नका",.. दीक्षित

"मग तुम्ही पण मला मॅडम म्हणू नका, श्रेया म्हणा, मी खूप लहान आहे",.. श्रेया

"ठीक आहे श्रेया",.. दीक्षित

" मी पण तुम्हाला दीक्षित काका म्हणते",.. श्रेया

सचिन मीटिंग मधुन बाहेर आला, समोर श्रेया फाईल मधून काहीतरी वाचत होती, सचिन ती बसली होती तिकडे आला, सगळे आजूबाजूचे मुल मुली उठून उभ्या राहिले, त्यांना बघून श्रेया पण उभी राहिली, सचिन हसून तिच्याकडे बघत होता,.." आत मध्ये ये श्रेया ",

श्रेया त्याच्याबरोबर आत मध्ये गेली

" मग शेवटी मिळाल ना बाहेरच टेबल",.. सचिन

"हो सर",.. श्रेया

सचिन अजूनही तिच्याकडे हसून बघत होता,.. "बापरे डायरेक्ट सर",

" मग आता काय करणार ऑफिसचे नियम पाळावे लागतील, तू काय बाबा केबिनमध्ये बसणारा, आम्ही काय कॉमन एम्पलोयी, नवीन जॉईन झालेले, आम्हाला बॉसचा रिस्पेक्ट ठेवावाच लागेल",... श्रेया

"काय काम सुरू आहे? ",.. सचिन

"मी माहिती वाचते कंपनीची, घरी केव्हा जायचं आहे? ",.. श्रेया

"हो जाऊ जरा वेळाने",.. सचिन

" हे बघ आता तीन वाजले आहेत, पाच वाजेपर्यंत निघाव लागेल नाहीतर मी आईंना फोन करेन आणि उद्या डॉक्टर कडे जायचं आहे तर ती अपॉइंटमेंट घेवून ठेव",.. श्रेया

"अरे आता मी तुझा बॉस आहे ना मग तू मलाच काय काम सांगते",.. सचिन

श्रेया हसत बाहेर जाऊन बसली, बऱ्याच मुलींशी तिची ओळख झाली होती, सगळ्या जणी छान होत्या अगदी कॉलेजच्या मैत्रिणी जशा,

साडेपाच वाजता श्रेया आणि सचिन घरी यायला निघाले,

" तुझा बर्थडे कधी आहे सचिन? ",.. श्रेया

" हो आता पंधरा दिवसांनी, आपण फिरायला जाऊया का तेव्हा श्रेया? ",.. सचिन

श्रेया कॅलेंडर बघत होती

काय झालं?..

" माझी परिक्षा संपते का ते बघत होती मी",.. श्रेया

संपते का?

" हो आपण सगळे मिळून जावु छान",.. श्रेया

" सगळ्यांसोबत जायचं का? ",.. सचिन

"हो साक्षी ताई काय म्हटल्या ते ऐकायला आलं ना ते सगळे येणार आहेत तुझ्या बर्थडे साठी आणि आपण सगळ्यांना नाही म्हणून दोघेच कसे फिरायला जाणार",.. श्रेया

" पण मला तुझ्या सोबत फिरायला जायचं होतं ",.. सचिन

"आपण दोघे जाऊन आलो ना",.. श्रेया

" अरे ते असंच गेलो होतो आपण मग आता काय आपण हनिमून ट्रीपला जाऊ ",.. सचिन

श्रेया सचिन कडे बघत होती,

" जावू या ना राहणार ना माझ्या सोबत, सांग ना काय अस? मी रोज तुझाच विचार करतो श्रेया, झाले आता बरेच दिवस लग्नाला ",.. सचिन

श्रेया हसत होती... " दुसर सुचत नाही का काही? ते काही नाही तुझा बर्थडे फॅमिली सोबतच होणार ",...

"ठीक आहे तू म्हणते तसं",.. सचिन मुद्दामून बाहेर बघत होता, नुसते नावाचे बॉस आम्ही बाकी काही मनाप्रमाणे होत नाही इथे,

" ठीक आहे मग नंतर आपण दोघे पण जावु आता ठीक आहे का",.. श्रेया

" पण सारखं जमत नाही ऑफिसचे काम किती आहे तू बघते ना",.. सचिन

" ठीक आहे आपण सगळ्यांसोबतच जाऊ, सगळ्यांसोबत असताना सुद्धा आपल्याला आपला वेळ मिळतोच की",.. श्रेया

दोघे घरी आले, सचिन रूम मध्ये चालला गेला, श्रेया बाहेर बसून सविताताईंसोबत सचिनच्या बर्थडे बद्दलच बोलत होती,.." आपण छान प्लॅन करू आई ",

" अग पण तुमचं नवीन लग्न झालं आहे तुम्ही जाऊन या कुठेतरी ",.. सविता ताई

" नाही मला तुमच्या सगळ्यांबरोबर जायचं आहे" ,...
श्रेया रूम मध्ये आली, तिला खूप काम होते

सचिन येऊन तिच्याजवळ बसला,.. "उद्या तू माझ्यासोबत येणार का डॉक्टरकडे? ",

" किती वाजताची आहे अपॉइंटमेंट? ",.. श्रेया

"संध्याकाळची आहे ",.. सचिन

" चालेल मग ऑफिस मधून डायरेक्ट जाऊया का ",. श्रेया

"चालेल हा हात मला एकदमच अडकल्यासारखा झाला आहे",.. सचिन

"दुखतो आहे का हात",.. श्रेया

"नाही काही त्रास नाही",.. सचिन

संध्याकाळचे जेवण झाले साक्षीताई नसल्यामुळे खूपच मोकळं मोकळं वाटत होतं, माझ्या आईकडेही असं वाटत असेल का मी नसतांना ? आई बाबा तर दोघ एकटे आहेत,

" हो बेटा मुली घरातुन गेल्यानंतर असं वाटतं, उद्या जरा वेळ जाऊन ये तिकडे आईकडे ",..सविता ताई

"नाही उद्या वेळ नाही नंतर जाते परवा",. श्रेया

"काय झालं उद्या काय कार्यक्रम आहे ",.. सविता ताई

" उद्या यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे, बहुतेक प्लॅस्टर काढतील, तुम्ही येणार का आई सोबत ? ",.. श्रेया

"नाही तुम्ही दोघे जाऊन या डॉक्टर कडे ",.. सविता ताई

श्रेया आत आली,.." माझी परीक्षा आहे सचिन पुढच्या आठवड्यापासून, मी ऑफिसला येणार नाही, मी आता एवढ्या दोन-चार दिवसच येइल, चालेल ना",

" ठीक आहे श्रेया",.. सचिन काम करत होता, श्रेया तिकडनं त्याच औषध घेऊन आली.. हे घे पटकन सचिन

" मला काही नको आहे, कंटाळा आला औषधांचा",.. सचिन

" अरे औषध घे चल अस चालणार नाही, बरं वाटलं तर आपल्यासाठी चांगलं आहे" ,.. श्रेया

श्रेया जात होती तिथून सचिनने तिचा हात धरला,.." आपल्या साठी चांगला आहे म्हणजे काय श्रेया?",

आता श्रेया हसत होती, झोप सचिन, हात सोड, मला अभ्यास करू दे, नापास होईल मी अस केल तर, परीक्षा जवळ आहे,

सकाळी श्रेयावरून कॉलेजला निघून गेली तोपर्यंत सचिन झोपलेला होता, बरं झालं जरा आराम करतो आहे हा, तिने त्याला मेसेज करून ठेवला की दवाखान्याची फाईल वगैरे सगळं सोबत घेऊन ठेव आज,

उठल्यानंतर सचिनने फोन बघितला... ठीक आहे

" मग काय ठरलं तुझं श्रेया? सचिनला काय गिफ्ट देणार आहे की काही स्पेशल करणार आहेस? ते तरी सांगा आम्हाला",.. माही राधिका हसत होत्या

" तुमच्या दोघींना काही सांगण गुन्हा आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे",.. खरंतर श्रेयाला खूप हसू येत होतं, पण तिने तसं दाखवलं नाही,

लंच ब्रेक मध्ये त्यांचा डबा खाऊन झाला, सहजच पाय मोकळे करायला त्या कॉलेज कॅम्पस मध्ये फिरत होत्या,

हॅलो समोरून आवाज आला श्रेयासमोर बघत होती कोणीतरी मुलगा समोर उभा होता, हा कोण आहे? सचिन म्हणतो तसं हा मनीष तर नसेल? काय कटकट आहे, याला कॉलेज मधे आत कोणी सोडल, मी ओळखते का तुम्हाला?

" हो त्या दिवशी भेटलो होतो ना पण पोलीस स्टेशनला",.. मनीष

"अच्छा सचिनच्या मागे धावत होते ते तुम्ही लोक होते का? ",.. श्रेया

"मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे श्रेया कॅन्टीनमध्ये येणार का?",.. मनीष

"नाही येणार मी, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे, यापुढे मला भेटायला येऊ नका ",.. श्रेया

"पाच मिनिट मी काय सांगतो ते तरी ऐक",.. मनीष

" तुम्ही इथून जा नाही तर मी सचिनला फोन करेन",.. श्रेया

" आणि त्याने काय होईल? मी सचिनला घाबरतो अस वाटल का तुला, पाच मिनिट बोल श्रेया ",.. मनीष

श्रेया आत येत होती, मनीष तिच्या मागे आला...

" तुला काही मदतीची गरज आहे का श्रेया ?, मी आहे तुझ्या साठी ",.. मनीष

"कशाबद्दल बोलता आहात तुम्ही? ",.. श्रेया

" तुला सचिन सोबत राहायचं नव्हतं ना",.. मनीष

" हो आधी, पण आता तसं नाही वाटत आहे मला, सचिन आणि मी खुश आहोत सोबत, तुम्ही प्लीज मला आणि सचिनला त्रास देणार बंद करणार का, आणि मी मागितली होती का मदत तुम्हाला, कशाला मधे मधे करताय, लीव मी अलोन ",.. श्रेया

"मी खरच तुला मदत करायला आलो आहे श्रेया त्यासाठीच मी सौरभला तुझ्याशी बोलायला सांगितलं होतं पण त्या सचिनने सौरभलाही तुझ्या मागणं घालवलं",.. मनीष

"असं काही नाही झालेलं, सौरभ चांगला मुलगा नाहीये, त्याला कधीच माझ्यासोबत राहायचं नव्हतं आणि तुम्ही प्लीज आमच्या प्रायव्हेट गोष्टींमध्ये लक्ष देवू नका, बिझनेस करा व्यवस्थित, हे असं दुसऱ्याला खालच्या पातळीवर जाऊन त्रास देणं कितपत योग्य आहे, तुम्ही का केला सचिन वर हल्ला ",.. श्रेया चिडली होती,

" राग आला का, तू खूपच छान बोलते ग आणि छानही दिसते, मला माहिती आहे की तुला सचिन सोबत राहायचं नाही, तुला चान्स आहे, मदत मिळू शकते तुला माझ्या कडून, विचार कर एकदा ",.. मनीष

" शट अप, तुमची गाडी काल माझ्या मागे होती का, मी माझ्या बाबांना सांगेन सगळ, मला असं वाटतं की तुम्ही निघा आता यापुढे जर माझ्याशी बोलले तर बघा",.. श्रेया

" हा माझा फोन नंबर",.. मनीषने कार्ड दिल

" काही गरज नाही त्याची",.. श्रेयाने कार्ड घेतल नाही, ती आत निघून गेली, हिम्मत कशी होते लोकांची, काय पण एक एक

खूपच अॅटीट्युड बापरे, काय पोरगी आहे ही? सचिनला सांगेल का माझ नाव? नाही सांगणार त्याला लागल तर उगीच त्रास देणार नाही ही,

कॉलेज संपल श्रेया निघाली, बाबांना सांगू का, सांगतेच, तिने अभिजीत सरांना फोन केला,

"कुठे आहेस बेटा?",.. अभिजीत सर

"बाबा मी ऑफिस मध्ये जाते आहे, बाबा मला तुमच्याशी थोड बोलायच आहे",..श्रेया

"काय झालं श्रेया काही प्रॉब्लेम आहे का?",.. अभिजीत राव

हो..

"इकडे येते का आपल्या ऑफिस मधे?",.. अभिजीत राव

" जायला हव.. हो येते मी बाबा",.. श्रेया

तिने सचिनला फोन केला,.. "मी आज बाबांच्या ऑफिस मध्ये जाते आहे, येते थोड्या वेळाने लगेच जावू आपण डॉ कडे, तू तिकडे येशील का?",..

" हो येतो, काय झालं",.. सचिन

" काही नाही त्यांना माझी आठवण येते आहे", .. श्रेया

ठीक आहे

श्रेया ऑफिस मध्ये आली, ती अभिजीत सरांच्या केबिन मधे आली

"काय झालं बेटा? सचिन बाबतीत आहे का काही?",.. अभिजीत सर

"नाही... बाबा मनीष मला त्रास देतो आहे, दोन दिवस झाले माझ्या मागे आहेत त्याचे लोक, आज तो मला कॉलेजला येवून भेटला, तुम्ही सांगा ना त्याला अस नको करूस, सचिनला समजल तर परत वाद होतील, मला नको आहे ते, सचिनला तो नेहमी त्रास देतो" ,.. श्रेया

अभिजीत सरांनी फोन लावला, मनीषला लगेच इकडे बोलवून घ्या ऑफिस मधे, महत्वाच काम आहे,

" मी बघतो बेटा काळजी करू नकोस कस सुरू आहे कॉलेज? ",.. अभिजीत राव

" बाबा परीक्षा आहेत आता, त्या नंतर सचिनचा बर्थडे आहे आपण सोबत करू सेलिब्रेट ",.. श्रेया

हो चालेल..

" बाबा मी ऑफिस जॉईन केल, दोन तास असेल काम सुरुवातीला",.. श्रेया

"छान झाल बेटा, मग काल काय काम केल? , आणि आज लगेच सुट्टी झाली तुझी, केदार साहेब, सचिन राव ओरडतील तुला",.. अभिजीत राव

" नाही बाबा नाही रागवत ते कोणी मला, चांगले आहेत, बाबा मी काल कंपनीची माहिती वाचली, थोड काम केल,
बाबा मला पैसे हवे थोडे, मला सचिन साठी गिफ्ट घ्यायच आहे",.. श्रेया

" अरे वाह, किती पैसे हवे, घेवून जा, हे घे तुझ डेबिट कार्ड",... अभिजीत राव

" कोणत कार्ड आहे हे बाबा?",.. श्रेया

"तु या ही कंपनीत ही सिईओ आहेस बेटा, तुझी बरीच सॅलरी आहे या कार्ड वर जपून वापर ",.. अभिजीत राव

" नको बाबा हे कार्ड, थोडे हवे पैसे",.. श्रेया

" असू दे तुझ आहे सगळ",... अभिजीत राव

चहा झाला दोघ बसले होते, तेव्हा मनीष आणि त्याचे मॅनेजर दोघ आले, मनीष यायलाच तयार नव्हता पण जरा धमकी दिल्यामुळे तो तिथे आला होता , तो आत आला केबिन मधे, श्रेयाच्या बाजूला खुर्ची वर येवुन बसला, तो श्रेया कडे बघत होता, माझी कंप्लेंट केली वाटत हीने,

अभिजीत सर रागाने मनीष कडे बघत होते,.. "काय ऐकतो आहे मी मनीष, तुम्ही लोक श्रेयाच्या मागे मागे करत आहात का दोन दिवसापासून?, श्रेयाने मला सांगितल, कालही तुमची काळी गाडी तिचा पिछा करत होती आणि आज मनीष तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये गेले होते? काय प्रॉब्लेम आहे, का करत आहात तुम्ही अस? काही समजेल का?",..

"ते तुम्ही आमचं नाव केस मध्ये उगीच गुंतवलं, आम्ही काहीही केलेलं नाही, सचिनवर हल्ला केलेला नाही, हेच श्रेयाला सांगायचं होतं, तिला मदत करायची होती ",.. मनीष

" काही गरज नाही तिला सांगायची, जे काही बोलायचं असेल ते माझ्याशी बोलत जा यापुढे, जर श्रेया किंवा सचिन किंवा आमच्या कोणाच तुम्ही लोकांनी नाव घेतलं तर माझ्याकडून कोणी वाईट नाही",.. अभिजीत राव

सचिन ऑफिस आला खाली, त्याने श्रेयाला फोन केला,

" सचिन पाच मिनिट वर ये ना ",.. श्रेया

सचिन आला, मनीष बसलेला होता,.." श्रेया इकडे ये",

काय झालं?,

" हा मनीष का आला इथे? ",.. सचिन

" त्याला बाबांनी बोलवलं, चांगल रागवल आता, मनीष आज कॉलेज मधे आला होता, मला भेटायला, त्याला मला मदत करायची आहे ",.. श्रेया

कसली मदत?

" तुझ आणि माझ लग्न जबरदस्तीने झाला आहे, त्यामुळे तो मला मदत करणार होता तुझ्यापासून दूर जाण्यासाठी",.. श्रेया

सचिन बघतच बसला,.." सिरियसली का करतोय हा अस? ",.

अभिजीत सर ऐकत होते श्रेया सचिन काय बोलता आहेत ते.... " या सचिन राव, मनीष म्हणतोय तुम्हाला दोघांना सोबत रहायच नाही",...

" असं काही नाही बाबा, आम्हाला सोबत रहायच आहे",... श्रेया सचिन दोघ सोबत बोलले,

" मिस्टर मनीष यापुढे तुम्ही आमच्या कुठल्याही गोष्टीत मध्ये मध्ये नाही केले तर बरं होईल, मला किंवा श्रेयाला या पुढे अस भेटायला येवु नका, चल श्रेया उशीर होतो आपल्याला",... सचिन

" बाबा मी निघते",.. श्रेया

" सचिन राव ठीक आहेत ना तुम्ही?",.. अभिजीत राव

"हो आता जातोय डॉक्टर कडे ",.. सचिन

" डॉक्टर काय म्हटले ते सांग नंतर ",.. अभिजीत राव

हो बाबा..

श्रेया सचिन गेले

" समजलं ना तुम्हाला मनीष, निघा तुम्ही आता ",.. मनीष पण चालला गेला

श्रेया खाली आली, तिची गाडी तिने घरी पाठवून दिली, गाडीत अजूनही सचिन चिडलेला होता,.." या मनीषची हिम्मत कशी होते, मी त्या दिवशी तुला म्हटलं होतं ना हा नक्की मनीष एक दोन दिवसात तुला भेटायला येईल",

" म्हणून तर मी आज बाबांना लगेच सांगितलं, त्याला रागवलं आता त्याची आपल्याशी बोलायची हिम्मत नाही होणार",.. श्रेया

"तू मला का नाही सांगितल? ",.. सचिन

" मला वाटल तू परत भांडण करशील",.. श्रेया

" करायला पाहिजे भांडण, अभिजित सर नसते समोर अस बघितल असत मनीष कडे ",.. सचिन

" म्हणून मी बाबांना सांगितल, मला अजिबात नको अस काही व्हायला",.. श्रेया

" बाबांनी मला डेबिट कार्ड दिल",..

"कशासाठी? ",..

"मी आता काही फक्त तुझ्या ऑफिस मधे नाही कामाला, बाबांच्या ऑफिस मधे ही मी आता सिईओ आहे, ते बोलले की त्यांच्या कंपनीची मी एम्पलोयी आहे, या कार्डवर माझी सगळी सॅलरी आहे, मला खर्चासाठी",.. श्रेया

"बापरे मॅडम दोन दोन कंपनीत आता सॅलरी घेतील, आय एम सॉरी श्रेया, मी तुला याआधी कधीच विचारलं नाही की तुला खर्चाला पैसे लागतात का? मी विचारायला हवं होतं",.. सचिन

" तसं काही नाही सचिन मला जर पैसे लागले असते तर मी विचारले असते",.... याच्या गिफ्टचे पैसे याच्याकडूनच कसे घेणार, म्हणून श्रेयाने ते पैसे तिच्या बाबांकडे मागितले होते

" माझ्या आई बाबांना खूप आठवण येते आहे माझी, आता हल्ली दोघ एकटेच आहेत ना ते ",.. श्रेया

"तुला वाटत असेल तर तुझ्या आई कडे जावून ये दोन दिवस",.. सचिन

श्रेया आश्चर्याने त्याच्या कडे बघत होती,.. "खर का? परीक्षा आहे आता, मला तिकडं आईकडे जायच आहे",

"चालेल किती पेपर असतील? ",.. सचिन

पाच आहेत...

" ठीक आहे,.. मजा आहे बाबा एका मुलीची, आईकडे जाणार, डेबिट कार्ड मिळाल, सिईओ काय? ",.. सचिन

श्रेया खूप हसत होती.... पुरे सचिन

"या एवढ्या गडबडीत आपल लग्न झाल आहे, मला तू हवी आहेस हे विसरू नकोस, थोडा वेळ जरा माझा ही विचार कर ",.. सचिन तिच्या कडे बघत होता, श्रेया बाहेर बघत होती, तिची सचिन कडे बघायची हिम्मत झाली नाही... काही खरं नाही माझ...


🎭 Series Post

View all