रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 15

मला स्वतःला जाऊन श्रेयशी बोलावं लागेल का? काही वेळेस खरच तिला नसेल राहायचं सचिन सोबत आणि बाकीच्या लोकांना सांगता येत नसेल तर


रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 15

©️®️शिल्पा सुतार
........

एक आठवडा झाला होता कोणी सचिनला ऑफिस मध्ये जावू दिल नव्हत, श्रेया रोज कॉलेजला जात होती, सचिन अगदी कंटाळला होता,.. "मी आता ऐकणार नाही सोमवार पासून जाणार, खूप काम बाकी आहेत " ,..

"ठीक आहे पण दुपारी घरी यायच, निदान हाताला प्लॅस्टर आहे तो पर्यंत तरी आराम कर सचिन " ,.. सविता ताई

सोमवारी सचिन ऑफिस मध्ये आला, नवीन प्रोजेक्टच्या मीटिंग सुरू होत्या, आता रेग्युलर काम सुरू होत तर सचिनला बर वाटत होत,

दुपारी श्रेया ऑफिस मध्ये आली, सचिन काम करत होता,.. "तू काय करतेस इथे?, आम्हाला काम करू द्यायच की नाही काही ",..

" आई बोलल्या येता येता तुला घरी घेवून ये, कंपलसरी आहे, चल आता, अर्धा दिवस काम ठीक आहे, हात दुखला तर" ,.. श्रेया

"थांब पाच मिनिट",.. सचिन

" नाही मी आईंना फोन करेन, आटोप सचिन",... श्रेया

केदार सर भेटायला आले, ते श्रेयाला घेवून गेले, पूर्ण ऑफिस दाखवल,.. छान आहे ऑफिस बाबा ,

सगळ्यांना समजल होत सचिनची बायको आली आहे, सगळे कौतुकाने बघत होते, श्रेया सचिन जवळ येवून बसली,

" झाल फिरून ऑफिस, आवडल का? ",.. सचिन

हो..

"काय म्हटले बाबा? ",.. सचिन

"ते म्हटले मला रोज ऑफिस मध्ये याव लागेल, तीन वाजता कॉलेज सुटत ना थोडं दोन-तीन तास ये रोज ऑफिसला असं म्हटले बाबा, मला खरंच यावं लागेल का ?",.. श्रेया

" हो येत जा ना मग ऑफिसला ",. सचिन

" काय काम असेल? ",.. श्रेया

"ते मला काय माहिती बाबांनी तुला का बोलावलं आहे",.. सचिन

" मला काहीच माहिती नाही ऑफिसमध्ये काय करता, मला टेन्शन आलं आहे, माझी जागा कुठे असेल बसायची? , इथे तुझ्या जवळ बसते मी, तू मला मदत कर ",.. श्रेया

"इथे नाही श्रेया अस बसता येणार नाही माझ्या जवळ",..सचिन

"का पण ?, तुझी केबिन छान आहे",.. श्रेया

"बाहेर टेबल आहेत तिथे बसायचं तू" ,.. सचिन

"तिथे का मी?",.. श्रेया

"अरे म्हणजे न्यू जॉईन होतात त्यांना तिकडे बसाव लागत, लगेच कस अस माझ्या जवळ बसता येईल तुला, मी बॉस आहे इथला ",.. सचिन

" एका रूम मध्ये रहातो ना आपण, मग एका केबिन मधे का नाही? ",.. श्रेया

"तुला माझ्या जवळ रहायच का? ",.. सचिन तिच्या कडे बघत होता

" नाही ठीक आहे मी बसेल बाहेर",.. श्रेया रागात होती, सचिन हसत होता,

" तू आधी तिथे बाहेर बसत होता का? ",..श्रेया

" नाही मी इथे आलो डायरेक्ट",.. सचिन

" मला बर लगेच अस करतोस, पण ऑफिस मध्ये बर्‍याच मुली आहेत सचिन",.. श्रेया बाहेर बघत होती

"हो सुंदर आहेत मुली इथल्या, त्या मला रीपोर्ट करतात",.. सचिन

श्रेयाला राग आला होता,.." मला नाही आवडल हे, त्यांना कोणी लेडी बॉस ठेव",

" कोणीही लेडी बॉस असली तरी मीच असेल बॉस, माझ्याशी काम असत ना इथे सगळ्यांच ",.. सचिन

" त्या आत येतात का? ",.. श्रेया

हो

बोलतात?

" हो, मग त्या शिवाय कस काम होणार ",.. श्रेया

"ठीक आहे मी जॉईन झाली की मी लक्ष देईन त्यांच्या कडे आता",..

" बापरे काही खरं नाही मग ",.. सचिन

काय झालं?..

" आता तू माझी ही बॉस आहेस मला अलर्ट राहावं लागेल",.. सचिन

" हो का मला वाटल माझा बॉस तू असणार, मग मी बसेन या केबिन मधे ",.. श्रेया

"ठीक आहे मी जातो तिकडे त्या मुलींमध्ये",.. सचिन

काही नको..

सचिन हसत होता, छान अस पाहिजे श्रेयाला, मी चिडवणार आता हिला

चल निघू या,

दोघ निघाले रस्त्यात पोलिस स्टेशन मधुन फोन आला,.. "इकडे येता येईल का तुम्हाला सचिन साहेब? दहा मिनिटाच काम आहे" ,

ठीक आहे,..

"पोलिस स्टेशनला चला काका, श्रेया येतो का तू पोलिस स्टेशनमध्ये? लगेच निघू" ,.. सचिन

हो

"तू इथे थांब",.. सचिन

श्रेया गाडीत बसली होती, सचिन आत मध्ये गेला

मनीष आत होता, त्यांच तिथे केस क्लोज करायचा विचार होता, अभिजित सर नव्हते आले, ते बिझी होते, मनीष आत उगीच सचिन सोबत वाद घालत होता,.." मी काही केल नाही सचिन, तुम्ही आमच्यावर केस कशी केली? काय करता आहात तुम्ही हे अस? , तुमच्याकडे आहे का काही प्रूफ? बिझनेस मध्ये असू आपण एकमेकाचे प्रतिस्पर्धी पण इथे मी तुमच नाव घेतलं नाही सचिन, ही केस मागे घ्या , नाही तर आम्ही तुमच्यावर उलटून केस करू",.. खूप मोठ्याने तो बोलत होता, त्याच्या बाजूचे पाच सहा लोक होते त्याच्या सोबत

सचिन ऐकायला तयार नव्हता,.." मी केस मागे घेणार नाही मला आणि कंपनीतल्या बर्‍याच लोकांना लागल आहे",

" अरे पण तो हमला आम्ही केला नाही, काहीही काय, सचिन केस मागे घ्या आत्ता च्या आत्ता ",. मनीष

सचिन उठला निघाला बाहेर आला,.. "तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही" ,

ते लोक सचिनच्या मागे पळत होते,.. सचिन थांब,.. खूप गोंधळ झाला,

श्रेया कारमध्ये बसलेली होती तिचं लक्ष नव्हतं, ड्रायवर काका हाक मारत होते.. "मॅडम ते बघा समोर, त्या लोकांनी सचिन साहेबांना घेरल आहे",

श्रेया घाबरली.. काय सुरू आहे हे? परत काही लागलं सचिनला तर,

ती पटकन गाडीतून उतरली, ड्रायवर काका पळत आले, श्रेया सचिन जवळ आली,.. "सचिन का अस करता हे लोक तुला, गुंड आहेत का हे? ",

"श्रेया तू जा इथून, गाडीत बस",.. सचिन

" नाही जाणार मी, काय सुरु आहे? कोण आहात तुम्ही लोक? सचिनला का त्रास देता आहेत, ती त्याच्या जवळ उभी होती, तसे सगळे लोक बाजूला झाले, आम्हाला त्रास देवु नका, दिसत नाही का किती लागल सचिनला ते, तुमच्या मुळे झाल आहे हे सगळ , आमच्या मागे येवू नका",... चल सचिन, तिने सचिनचा हात धरला ते दोघ ड्रायवर काका आत येवून बसले,.. चला काका घरी.

मनीष समोर उभे राहून सगळं बघत होता, कोण होती ही? , मनीष विचारत होता, सचिनची बहीण आहे का ही?

" नाही त्याची बायको आहे, अभिजीत सरांची मुलगी श्रेया ",..

"बापरे किती छान आहे ही , ती काय करते इथे पोलिस स्टेशन मधे, इथे चांगले लोक नसतात, पण खूप काळजी घेते ती सचिनची, हीच ना ती सौरभची मैत्रीण, जबरदस्ती लग्न झाल हीच सचिन सोबत, पण आता चांगली वागत होती ती त्याच्याशी , बहुतेक तो आजारी असेल म्हणून काळजी घेत असेल, सुंदर आहे मुलगी आणि लहान ही, तो बरच वेळ श्रेयाचा विचार करत होता, श्रेयाला मदत करायची का? तिला नसेल राहायच सचिन सोबत तर, काय आहे हे प्रकरण बघायला पाहिजे, त्याने त्याच्या सेक्रेटरीला फोन लावला, श्रेया बद्दल सगळी माहिती मला हवी आहे",..

सचिन श्रेया गाडीत बसले होते,.." तू नव्हत उतरून यायला पाहिजे होत श्रेया ",

"अरे मग काय सुरू होतं तुमचं? आधीच किती लागला आहे तुला, किती लोक तुझ्या मागे पळत होते, काय करत होते ते असं? ",.. श्रेया

" काही करत नव्हते ते लोक, असेच प्रेशराईज करतात ते. मुद्दाम मागे मागे करतात केस मागे घेण्यासाठी, मी येत होतो बरोबर कारमध्ये, घाबरू नकोस हे लोक नाही आहेत तसे मारामारी करण्या सारखे, ते सुपाऱ्या देतात, इथे पोलिस स्टेशनमध्ये काही होत नाही अस ",.. सचिन

"म्हणजे डेंजर आहेत ते लोक, मला भीती वाटते आता हल्ली परत काही भांडण झाले तर? एक तर आईंनी तुझी जबाबदारी माझ्यावर दिली आहे",.. श्रेया

" अच्छा म्हणजे तू माझी काळजी घेणार आहे का यापुढे, मला काय हव नको ते बघणार का? ",..सचिन

"हो, आणि मी सांगेन तेच करायच सचिन या पुढे , आता तुझ्या घरी ही मी जे म्हणेन तेच करतात सगळे, समजल ना ",..श्रेया

"बापरे काही खरं नाही माझ, डेंजर आहे श्रेया मॅडम, बरोबर ताब्यात घेतल सगळ, मला ही घराला ही ",..सचिन

श्रेया हसत होती.

" पण मला आता काळजी वाटते आहे तिथे तो मनीष होता, तो तुझ्याकडे बघत होता तो नक्की तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेन, त्याला आता मला त्रास द्यायला नवीन पॉईंट सापडला",.. सचिन

" माझा आणि त्याचं काय संबंध? ,का मला कॉन्टॅक्ट करेल तो",.. श्रेया

"त्याच्याजवळ तुझी सगळी माहिती असेल आता बघ तो तुला एक दोन दिवसात फोन करेल",.. सचिन

" करू दे त्याला फोन मी बघते जरा त्याच्याकडे, बरं झालं तू मला आधी सांगून ठेवल आणि आता तू माझ्या बाजूने अजिबात काळजी करू नको सचिन, कोणी काही जरी म्हटलं तरी मी तुझ्या सोबतच राहणार आहे, मी कुठेही जाणार नाही",.. श्रेयाने सचिनचा हातात घेतला, सचिन तिच्याकडे बघत होता,

" नक्की ना श्रेया ",.. सचिन

" हो.. काळजी करायची नाही कसली सचिन, मलाही चांगले वाईट लोक समजतात, तुला वाटतं तेवढी लहान नाही मी ",.. श्रेया

"अरे बापरे म्हणजे माहिती आहे का तुला सगळं, चला प्रश्न मिटला, मला वाटत होत कस काय समजवणार मी तुला ",.. सचिन

आता श्रेया त्याला मारत होती,.. "तुझं म्हणजे ना काहीही सुरू असतं सचिन ",

"समजलं का तुला मी काय म्हणतोय",.. सचिन

श्रेया काही म्हटली नाही, ती बाहेर बघत होती,.. माझ्याशी बोलू नकोस.

"श्रेया आता जे पोलीस स्टेशन मध्ये झालं ते घरी सांगू नको",.. सचिन

"नाही मला माहिती आहे घरचे काळजी करतात, तू पण अशा बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवतो का?",.. श्रेया

"आधी कुठे होती तू माझ्या आयुष्यात, आता तू आल्यापासून काही झालं नाही, एवढीच मारामारी झाली आहे",.. सचिन

"यापुढे माझ्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवायची नाही",..श्रेया

" हो चालेल तू म्हणशील तसं ",.. दोघं घरी आले, सविता ताईंना बरं वाटलं, चला जेवुन घ्या,

नको आता चहा घेतो आम्ही,..

" आई मी ऑफिस जॉईन करणार आहे ",.. श्रेया

" कधीपासून? ",.. सविता ताई

"ते माहिती नाही, आज बाबा आले की संध्याकाळी त्यांना विचारते, जास्त वेळ नाही थांबणार एक दोन तास थांबेल तिकडे",.. श्रेया

" बर झाल या सचिन कडे लक्ष दे तिकडे",.. सविता ताई

हो..

" तुला बरं वाटत आहे का सचिन?",.. सविता ताई

"हो आई एकदम बर आहे आणि हे काय तु मला लगेच दुपारी घरी बोलवुन घेतलं, तू सांगितल्या प्रमाणे तुझी असिस्टंट मला किती ओरडली ऑफिस मध्ये, लगेच घाबरून घरी आलो मी ",.. सचिन

"काहीही काय सचिन, नाही आई मी काही बोलली नाही यांना",.. श्रेया

सविता ताई हसत होत्या.. " हो थोडे दिवस आराम कर सचिन, हाताला प्लॅस्टर आहे तुझ्या ",

" साक्षी ताई कुठे आहे? ",.. सचिन

" ती पण कामानिमित्त गेली बाहेर, जा आता आराम कर सचिन, श्रेया तू लक्ष दे याच्यावर, आत जावून ऑफिसचे काम करत बसेल नाही तर हा ",.. सविता ताई

मनीष ऑफिस मध्ये होता, समोर त्याचा असिस्टंट बसला होता, सुरुवातीला ते ऑफिसच्या कामाबद्दल बोलत होते, त्यांना नवीन प्रोजेक्ट सचिनच्या कंपनीला मिळाला हे समजलं होतं, त्यात सचिनने त्यांच्यावर केलेली केसही मागे घेतली नव्हती, मनीष रागात होता, या सचिनच छान सुरु आहे दोन दोन मोठे प्रोजेक्ट आहे हातात, श्रेया सारखी बायको आहे, सासुरवाडीची पार्टी मोठी आहे, अभिजीत सरही त्यांना जाऊन मिळाले, काही तरी कराव लागेल,

थोड्यावेळाने मीटिंग झाल्यानंतर तो त्याच्या मोबाईलवर श्रेयाची माहिती बघत होता, सौरभची मदत झाली नाही काही, आता जरी परत सांगितलं त्या सौरभला तर तो नाहीच म्हणतो,.. म्हणतो तुमच्या भानगडीत मला पाडू नका

मला स्वतःला जाऊन श्रेयशी बोलावं लागेल का? काही वेळेस खरच तिला नसेल राहायचं सचिन सोबत आणि बाकीच्या लोकांना सांगता येत नसेल तर? सचिन आणि अभिजीत सर तिला काही सुच देत नसतील, ती अडकली असेल तिकडे,

संध्याकाळी केदार सर घरी आले, श्रेया टेंशन मधे होती,.. "बाबा मी खरच यायच का ऑफिस मधे?",

हो..

"काय काम असेल? ",. श्रेया

"मी सांगतो उद्या",.. केदार साहेब

"मला काहीही येत नाही बाबा, मी काय करणार आहे तिकडे",.. श्रेया

"तू सचिनला घ्यायला येते ना मग एक दोन तास थांबत जा ऑफिस मधे, नाही तर तुला नंतर करायच आहे सगळ काम",.. केदार साहेब

"ठीक आहे, पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे माझी बाबा, परीक्षा असली की नाही येणार मी ",.. श्रेया

"चालेल, टेंशन नको घेवू कामाच, मला माहिती आहे तू हुशार आहेस",... केदार साहेब

साक्षी विवेक आले होते, जेवण झाल, ते चौघे टेरेस वर बसलेले होते, मस्त क्रीम पार्टी सुरू होती, सचिन श्रेया आमच्या कडे या तुम्ही, हो नक्की येवू ताई, आम्ही उद्या निघतोय,

"आपल्याला पिकनिक ला जायच होत ना",.. सचिन

" नंतर पुढच्या वेळी, आहेस ना आता सचिन तुझा बर्थडे, आपण छान साजरा करू",.. साक्षी

चालेल..

"आता तू तब्येत सांभाळ" ,.. साक्षी

श्रेया विचार करत होती कधी आहे आज सचिनचा बर्थडे? विचारून बघू आपण आईंना, काय काय करायच,

दोघ रूम मध्ये आले, सचिन श्रेयाच्या मागे मागे होता,

"काय आहे सचिन?, झोप आता " ,.. श्रेया

"तुला रहायच ना माझ्या सोबत श्रेया" ,.. सचिन अगदी हळू आवाजात बोलत होता, यार या श्रेयाशी अस बोलतांना माझा कॉन्फिडन्स का लुज होतो,

"ते इथे नाही ऑफिस केबिन मधे रहायच होत मला तुझ्या सोबत , तिथे तर तू नाही म्हटला मला, जुनियर नवीन जॉईन झालेली बोलला, बाहेरच टेबल मला अस बोलला ",.. श्रेया

" सॉरी श्रेया, पण इथे का नाही रहायच माझ्या सोबत ? इकडे ये ना" ,.. सचिन ने तिचा हात धरला

" नाही सचिन जावून झोप हात सांभाळ",.. श्रेया

"अरे मिठीत तरी घे मला थोड" ,.. श्रेया जवळ आली, तिने सचिनला मिठी मारली

" श्रेया छान वाटत तुझ्या जवळ",.. सचिन

" हो सरक आता मला अभ्यास आहे, परीक्षा जवळ आली माझी",.. श्रेया

काय अस?

"औषध घेऊन झोप आता तू सचिन, मी आत बसून करते थोडा वेळ अभ्यास, नंतर येईल तुझ्याजवळ झोपायला" , ... श्रेया

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर साक्षी आणि विवेक घरी निघाले, सगळे इमोशनल झाले होते, जरा वेळाने आवरून श्रेयाही कॉलेजला गेली, केदार साहेब आणि सचिन सोबत जाणार होते, ते थोडे उशिराने घरातुन निघाले,

श्रेया लंच ब्रेक मध्ये नुसती बसलेली होती, तिच्या मैत्रिणी माही राधिका काहीतरी गप्पा मारत होत्या, श्रेया सचिनचाच विचार करत होती, सचिनचा वाढदिवस आहे तर काय गिफ्ट घ्यायचं?

"काय विचार करते आहे श्रेया?",.. माही

"सचिनचा वाढदिवस आहे, मी काय गिफ्ट घेऊ त्याला?",..श्रेया

"तू कशाला काही घ्यायला पाहिजे, नुसतं त्याच्याकडे हसून बघितलं तरी त्याला गिफ्ट मिळाल्यासारखं वाटेल",.. राधिका

"अगदी अति होत आहे, नीट सांगणार आहे का आता तुम्ही दोघी?",.. श्रेया

माही राधिका वेगवेगळ्या वस्तू सुचवत होत्या, शर्ट, परफ्युम, चॉकलेट, वॉलेट.. खूप भारी भारी आयडिया होता त्या दोघींकडे, तुम्ही दोघ कॉफी डेट वर जा, सरप्राईज प्लॅन कर, फिरायला जा, मुव्ही डेट,... श्रेयाची हसून पुरेवाट झाली होती, पुरे आता, काय तुम्ही दोघी,

सगळ्या क्लासमध्ये गेल्या, श्रेया विचार करत होती खरंच इतर काही गिफ्ट घेण्यापेक्षा आपण सचिन सोबत तेव्हाच नवीन आयुष्य सुरू केलं तर? यापेक्षा जास्त मोठ त्याला वाढदिवसाच्या गिफ्ट काय असेल?, किती दिवस आहेत अजून वाढदिवसाला ते बघावं लागेल, कस वाटेल सचिन सोबत काय माहिती ? , सचिन खूप छान आहे, मला जमेल का अस त्याच्या सोबत....
सचिन खूप मागे मागे करतो पण , काय होईल नक्की? , ती एकटी हसत होती. सचिनचा विचार करून श्रेयाला एकदम लाजायला झालं होतं.


🎭 Series Post

View all