रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 14

केदार साहेब विवेक सचिन ऑफिस बद्दल बोलत होते,.. "नेक्स्ट प्रोजेक्ट आपल्याला मिळेल नक्की, अजून जिवावर येईल आता त्या लोकांना,
रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 14

©️®️शिल्पा सुतार
........

श्रेया सचिन दोघ खुश होते, थोडे कंफर्टेबल होते ते सोबत,

"सांग ना सचिन कशी काय झाली फायटिंग? काय झालं होतं तिकडे, गुंड कसे होते दिसायला?" ,.. श्रेया

"कसे म्हणजे काय? गुंड ते गुंड असतात, वाईट एकदम " ,.. सचिन

"जोरात मारतात का ते?",.श्रेया

"हो खूप जोरात",. सचिन

"काळजी घेत जा ना, तुला बॉडी गार्ड नाहीत का? ",.. श्रेया

"हो ना तेव्हा पोलिस येणार होते सोबत, मीच पुढे गेलो ",.. सचिन

" काय झालं होत नक्की? ",.. श्रेया

"रात्री फोन आला होता की वेअर हाऊस जवळ कोणीतरी लोक फिरत आहेत, आपल्या ऑर्डरच नुकसान करायला आलेले ते, तेव्हा त्या लोकांना पकडलं, तिकडे ही मारामारी झाली, बर्‍याच लोकांना लागल होत, ते कसे आहेत हे बघायला म्हणून मी सकाळी गेलो होतो तिकडे" ,.. सचिन

" रात्री तू काहीतरी काम करत होता ना, तेव्हा हेच बोलत होता वाटत",.. श्रेया

हो..

" बर झालं आठवल, मला एक सांग सचिन मी तिकडे सोफ्यावर झोपली होती ना? मग मी सकाळी कॉटवर कशी आली? तू रात्री माझ्या जवळ आला होता का?, तू नेल होत का मला तिकडे? ",.. श्रेया

" मला काय माहिती?, "... सचिन हसत होता, मला वाटत तू रात्रीची चालतेस, आज लक्ष ठेव नाही तर रात्री माझ्या फॅक्चर हातावर येवून झोपशील,

" एकदम अति होतय, मी का सारखी येईल तुझ्या जवळ? तूच आहे या मागे, मी झोपेत चालत नाही ",.. श्रेया

डॉक्टर आले,.." औषध घेतला आहे का मिस्टर सचिन? बोलत बसू नका झोपा आता",

" उद्या सोडणार का मला घरी डॉक्टर?, काम आहे खूप ",.. सचिन

"मी उद्या सकाळी येतो, मग ठरवू आपण घरी सोडायचं की नाही",.. डॉक्टर गेले

" सचिन झोपून घे, औषध घेतलं आहेस ना तू, रात्री काही लागलं तर सांग",.. श्रेया

सचिन हसत होता ,.." तुला जाग तरी येते का श्रेया? तुला काही सांगायचं... उठवायच म्हटलं म्हणजे सगळं हॉस्पिटल उठून जाईल, तरी तू उठणार नाहीस ",

श्रेयाला राग आला होता,.. "तिने तिकडे तोंड करून झोपून घेतलं ",

" अरे आजारी माणसाशी तरी नीट वागाव ना ",.. सचिन

"ठीक आहे आज थोडं अलर्ट राहील मी बस का? रात्रीची बेल लावते",.. श्रेया

"नको काही लागणार नाही, झोप तू मी पण झोपतो",.. सचिन

सकाळी लवकरच साक्षी चहा नाश्ता घेऊन आली, सचिन उठलेला होता तो बसून पेपर वाचत होता, श्रेया आरामात झोपलेली होती, साक्षी श्रेया कडे बघत होती, सचिन आणि साक्षी दोघ हसत होते,.." छान आहे तुझी बायको, अल्लड आहे जरा, पण तुझी काळजी करते खूप, काल फारच घाबरली होती ती, रडत होती",

"होना मला वाटलच, कालपासून पाच मिनिटे ही कुठे गेली नाही",.. सचिन

"आरामात झोपली आहे पण ही",.. साक्षी

"असंच काम आहे तिचं, सुखी आहे ती",.. दोघांनी चहा घेतला, जरा वेळाने श्रेया उठली समोर साक्षी आणि सचिन बसलेले होते,

" काय झालं उशीर झाला का मला उठायला? ",.. श्रेया

" नाही, काही काम नाही, कर आराम",.. सचिन

श्रेया उठून बसली,.." तू घरी जा श्रेया आवरून ये, दुपारचं जेवण घेऊन ये, मी आहे सचिन जवळ ",

"ठीक आहे सचिन मी जाते ",.. श्रेया घरी आली,

ती येऊन आजी आजोबांना भेटली, ते दोघे खूप चौकशी करत होते सचिनची,

" आज सोडतील त्यांना घरी, हाताला लागलेलं आहे फ्रॅक्चर आहे, बाकी ठीक आहे",.. श्रेया

ज्या लोकांनी हल्ला केला त्या लोकांना पोलिसांनी पकडलेलं होतं, खूप चौकशी करत होते ते, पण नक्की हल्ला कोणी करायला सांगितला ते समजत नव्हतं, सगळ्यांना माहिती होतं हे बहुतेक मनीषच काम असेल, पण काहीही समजलं नाही चौकशीत, बाकीच्या लोकांना सोडून दिला आणि दोन-तीन लोकांना अटक केली, जे मेन होते,

अभिजीत राव पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते, मला त्या लोकांना भेटायचं आहे ज्यांनी हल्ला केला, त्यांना भेटायला परमिशन मिळाली, तिघं समोर बसलेले होते,.. "काय हवं आहे तुम्हाला तिघांना नोकरी पैसा सगळं मिळेल काय विचारतो आहे त्याची नीट उत्तर द्या, कोणी करायला सांगितला होता हल्ला?",

त्यांनी मनीषच नाव सांगितलं, पोलीस इन्स्पेक्टरने सगळं लिहून घेतलं, रेकॉर्ड केल, आपल्याला पोलिस केस करावी लागेल मनीष बद्दल, आत्ताच्या आत्ता त्या लोकांना नोटीस द्या, लगेचच काम सुरू झालं होतं आणि या लोकांना मी सांगितल्याप्रमाणे जास्त त्रास देऊ नका, त्यांची साक्ष महत्वाची, अशा सुपाऱ्या घेऊ नका परत, अभिजित राव त्या लोकांना सांगत होते. बाहेर येवून अभिजीत रावांनी केदार साहेबांना फोन लावला, ते पूर्ण माहिती देत होते,

"मी येतो तिकडे लगेच आपण रीतसर कंप्लेंट करू ",.. केदार साहेब

दुपारी श्रेया हॉस्पिटलमध्ये आली जेवण घेऊन, सविता ताई सोबत येत होत्या, तिने त्यांना येऊ दिलं नाही, आज सोडणारच आहे घरी सचिनला, आई तुम्ही धावपळ करू नका, आजी-आजोबा आहेत घरी,

साक्षी विवेक बसलेले होते सचिन जवळ छान गप्पा करत ,.. "तुम्ही दोघे जा आता घरी, मी आहे सचिन सोबत",

ते दोघ घरी गेले, श्रेया सगळ सामान नीट ठेवत होती, सचिन टीव्ही बघत होता,.. "आज आराम नाही केला का सचिन",

" कंटाळा आला आहे इथे, मला कधी घरी सोडणार आहे श्रेया",.. सचिन

"आज डॉक्टर आले की ठरवणार आहेत ना, असा कंटाळा करून कस चालेल, तब्येत नको का बरी व्हायला ",.. श्रेया सचिन जवळ बसली, फारच फ्रेश दिसत होती ती,

"केस धुतले का श्रेया?",. सचिन तिच्या कडे बघत होता

ती आश्चर्याने सचिन कडे बघत होती,.. "हो तुला कस समजल?",

"काय लावते तू केसांना",.. सचिन

म्हणजे?

"खूप छान वास येतो",.. सचिन

याने कधी घेतला माझ्या केसांचा वास जावु दे...

"झाल का घरच काम?" , .. सचिन

" मला काहीच करायच नसत फक्त डबा भरला",.. श्रेया

"आजी आजोबांची आठवण येते खूप ",..सचिन

" हो ते ही आठवण काढता आहेत",.. श्रेया

" आज कॉलेजला सुट्टी झाली तुझी ",.. सचिन

"हो उद्या जाईल मी, बहुतेक आज संध्याकाळी घरी सोडतील तूला, पण ठिक वाटत ना? नाही तर घाई नको करायला आपण ",.. श्रेया

"ठिक आहे मी, माझा लॅपटॉप दे ना ",.. सचिन

" नाही ऑफिसच काम नाही करता येणार, आराम कर, थोड्या वेळ झोपतो का?",.. श्रेया

"नको मला कंटाळा आला आहे",.. सचिन

"माझ्याशी बोलत बस, पुढे काय झाल तु निघाला मग मारामारी कशी झाली ते सांग ",.. श्रेया

" अरे हो ते मी तिकडे गेलो, रस्ता बंद होता, काय झालं ते मी बघत होतो, अचानक त्या लोकानी मला धरल, ते मला मारत होते, मी कसातरी सुटलो, तेवढ्यात ऑफिसचे लोक आले, त्या लोकांनी मला ठकलल मी दगडावर जावून पडलो, म्हणून हाताला लागल",... सचिन

श्रेया घाबरून ऐकत होती, ती त्याच्या हाताकडे बघत होती, बापरे कठिण आहे हे, तिच्या डोळ्यात पाणी होत, सचिन तिच्या कडे बघत होता,.." श्रेया काय अस? इकडे ये",.. श्रेया सचिनच्या मिठीत होती, ठीक आहे ना तू? , तू एवढी हळवी आहेस का?

" का करतात अस लोक? पैसे एवढे महत्त्वाचे आहेत का माणसा पेक्षा",.. श्रेया

"बघ ना",.. श्रेया अजूनही सचिन जवळ होती,

" सोड सचिन" ,..

"नाही थांब अशी जवळ",.. सचिन

" हे हॉस्पिटल आहे कोणी येईल सरक सचिन",.. श्रेया

" घरी गेल्यावर काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे, इथे नको सदोदित मिठी मारायला, कोणी ही येत",.. सचिन

" मी अस म्हटल का? तू सगळ्या गोष्टी अति करतोस सचिन, चल आता जेवण करून घे, आणि आराम कर", ... दोघ जेवायला बसले, खूप लागल आहे तुझ्या पायाला

"ठीक आहे मी आता काळजी नको करू",.. सचिन

"मी नाही करत काळजी",. श्रेया

"म्हणून काल रडत होती का ",..सचिन

नाही..

" साक्षी ताईने सांगितल ",.. सचिन

श्रेया मुद्दाम पाणी घ्यायला उठली

"सांग श्रेया का रडलीस तू",. सचिन

"अरे अस नाही सचिन, मला नाही माहिती",.. श्रेया

" तू प्रेम करतेस का माझ्या वर?",.. सचिन

"मला नाही माहिती",.. श्रेया

\" श्रेया आय लव यु, इकडे ये ना ",.. सचिन

" सचिन किती बोलणार आहेस, आता जेव शांत पणे ",.. श्रेया

श्रेयाला तिच्या बाबांचा फोन आला होता ती बोलत होती, नंतर तिने सचिन कडे फोन दिला

"पकडल का त्या लोकांना बाबा ",.. सचिन

" हो आहेत तिकडे पोलिस स्टेशनमध्ये, ते सांगत होते मनीषच काम आहे हे ",.. अभिजीत राव

" माहिती होत आपल्याला, पुढे काय ",.. सचिन

"केस केली त्यांच्यावर ",.. अभिजीत राव

"ठीक आहे बाबा, डेंजर होते ते लोक, तुम्ही ही काळजी घ्या ",.. सचिन

त्यांनी फोन ठेवला,

" सचिन आता काय त्या लोकांना समजल कंप्लेंट केली तर अजून मारामारी होईल का?",.. श्रेया

" काही होणार नाही तू घाबरू नकोस श्रेया ",.. सचिन

"सचिन तू औषध घेतल का? आराम कर बर, उगीच बोलत बसतोस",.. श्रेया

हा सचिन किती बोलतो, मला सोडणार नाही हा , इथे हॉस्पिटल मध्ये इतक आहे घरी काय करेन, सारख तो आमच्या दोघांबद्दल बोलतो, पण मला छान वाटत त्याच्या सोबत,

ते दोघे बोलत होते तर तेव्हा अभिजीत राव आणि पोलीस इन्स्पेक्टर आले, श्रेया उठून उभी राहिली, काय काय झालं ते सचिन त्यांना सांगत होता, पोलिस लिहून घेत होते, श्रेया तिच्या बाबांसोबत बाहेर बसली होती,

"बाबा तुम्ही काळजी करतात ना माझी आणि सचिन ची",..श्रेया

"हो बेटा" ,.. अभिजीत राव

"बाबा सचिन चांगला आहे" ,.. श्रेया

"हो बेटा नीट रहा त्याच्या सोबत" ,.. अभिजीत राव

"हो बाबा, त्या गुंडांना शिक्षा व्हायला हवी, त्यांनी परत सचिनला मारल तर",.. श्रेया

"अस होणार नाही घाबरू नकोस तू ",.. अभिजीत राव

संध्याकाळी सचिनला घरी सोडल, सचिन तयार होत होता, श्रेया त्याला मदत करत होती, श्रेया सामान घेत होती, सगळे घरी आले, अभिजित राव ही सोबत होते, ते केदार साहेबांशी काही तरी खूप हळु हळु बोलत होते, जरा वेळ बसुन ते घरी गेले,

श्रेया सचिन सोबत रूम मध्ये होती, आजी आजोबा बसलेले होते, ते खूप काळजी करत होते, श्रेया त्यांना कशी मारामारी झाली ते सांगत होती, आजी यांनी पण मारल गुंडांना, सचिन हसत होता

"तू होती का तिथे श्रेया ",.. आजी

" नाही आजी पण मला यांनी सांगितल ",.. श्रेया

"अजून काय काय सांगितल तुला सचिनने?",.. साक्षी येवून मागे उभी होती, बर्‍याच गप्पा झालेल्या दिसताय,

" गम्मत म्हणून ठीक आहे सचिन, पण जरा काळजी घेता येत नाही का तुला? ",.. आजी रागवत होत्या

" स्वयंपाक झाला आहे चला, तू इथे जेवतो का सचिन की येतोस तिकडे",.. साक्षी

तिकडे येतो..

सचिन येवून बसला डायनिंग टेबल वर, केदार साहेब, साक्षी, विवेक, सविता ताई सगळ्यांना बर वाटत होत,

" आधी याच ताट द्या",.. आजी सांगत होत्या

" एवढ काही झाल नाही आजी, मी जेवतो सगळ्यांसोबत",... सचिन

केदार साहेब विवेक सचिन ऑफिस बद्दल बोलत होते,.. "नेक्स्ट प्रोजेक्ट आपल्याला मिळेल नक्की, अजून जिवावर येईल आता त्या लोकांना, अभिजित साहेब प्रयत्न करता आहेत आपल्या साठी",

" हो काल पासुन त्यांची खूप धावपळ होते आहे",.. विवेक

" उद्या लागेल बहुतेक प्रोजेक्ट चा रिजल्ट",.. केदार साहेब

"हो तरी पण सचिन तू धावपळ करणार नाहीस समजल ना",.. सविता ताई

"ऑफिस मधे जावू शकतो ना?",.. सचिन

"नाही सोमवार पासून",.. सविता ताई

आई प्लीज..

" नाही मी ऐकणार नाही काही ",.. सविता ताई

जेवण झाल सचिन हळू हळू आत आला, औषध घेतले तो टीव्ही बघत होता, श्रेया मोबाईल मधे बघून नोट्स लिहीत होती, उद्या कॉलेज आहे का?

"हो आणि ह्या नोट्स सबमिट करायच्या आहेत",.. श्रेया

"नको जावू ना तू कॉलेज ला, मी काय करू घरी एकटा ",.. सचिन

" सांगते ना महत्वाच काम आहे ते, घरी आहेत सगळे आई साक्षी ताई, आजी, आजोबा",.. श्रेया

"केव्हा येशील तू?",.. सचिन

मी दुपारी..

"नोट्स देवून लगेच ये ना प्लीज",.. सचिन

"सेकंड लास्ट आहे ते लेक्चर, आधी कस देणार, काय झालं सचिन? काय अस? ",.. श्रेया

" मला तुझ्या सोबत रहायच ",..सचिन

"रोज जाणार मी कॉलेजला, अस करायच नाही ,मला मदत कर त्या पेक्षा वाचून सांग मला मी पटापट लिहिते नोट्स ",..श्रेया

"ठीक आहे दे इकडे ",..सचिन

लिहून झाल श्रेयाने बॅग पॅक केली ,ती सचिन जवळ येवून बसली,... इथे झोप तू माझ्या जवळ,

"हो आज इथे झोपते मी, तिकडे गेली तरी आज तुला काही मला उचलता येणार नाही ना ",..श्रेया

"मी अस करत नाही, तू रात्रीची इकडे तिकडे फिरते ",..सचिन

सकाळी श्रेया रेडी होती, सचिन तिच्या कडे बघत होता,... श्रेया इकडे ये, छान दिसतेस तू

"हो माहिती आहे मला",.. श्रेया

"बापरे किती अकडते तू ",.. सचिन

श्रेया हसत होती

लवकर ये..

हो.

दुपारी प्रोजेक्ट आपल्याला मिळाल असा मेसेज आला ऑफिस मधून, सचिन खूप कामात होता, लॅपटॉप फोन सतत सुरू होता, घरचे सगळे रागवत होते, साक्षीने त्याचा फोन काढून घेतला, लॅपटॉप ठेवून दिला,

दुपारी श्रेया आली, सचिन आराम करत होता, तो तोंड फिरवून झोपला,

"काय झाल सचिन",.. श्रेया

"मला करमत नाही, कोणी काम करू देत नाही, तुझा फोन दे महत्वाचा फोन करायचे आहे",.. सचिन

"नंबर माहिती आहेत का?",.. श्रेया

"हो तिथे पेपर वर लिहिले आहेत",.. सचिन

"घरचे ओरडतील मला मी नाही देणार फोन ",.. श्रेया

"दार लावून घे, तू आत आहे तर येणार नाही कोणी, फक्त दोन फोन करतो",.. सचिन

"नाही अरे काय अस? आराम कर",... श्रेया

" काय हव तुला श्रेया? फोन वर बोलू दे ना मला प्लीज ",.. सचिन

" ठीक आहे मग मला त्या बदल्यात नंतर आई कडे जावु द्यायचा दोन तीन दिवस ",.. श्रेया

ठीक आहे

" माझ्या मागे यायच नाही ",.. श्रेया

" ते माहिती नाही, तुझी रूम छान आहे, तुझा कॉट छोटा आहे मस्त",.. सचिन

" जावू दे मग ",.. साक्षी ताई सचिन बघा ऐकत नाही, फोन मागतो आहे

" सॉरी नाही येणार मागे, दे फोन ",.. सचिन

" ठीक आहे पाच मिनिट वापर आणि हळू बोल नाही तर मला बोलणे बसतील ",.. श्रेया

सचिन फोन वर बोलत होता, जोरात काम सुरू होत.

🎭 Series Post

View all