Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 13

सचिन खूप खुश होता, चला आता काही प्रॉब्लेम नाही, श्रेया कुठे जाणार नाही, हेच हव होत मला, बहुतेक आमच सोबत रहाण असेल लिहिलेल आमच्या नशिबात



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
........

श्रेया कॉलेज हून दुपारी घरी आली, एवढा विचार नको करायला आता, जावू आपण सचिन कडे, सांगू त्याला मला वेळ दे मी रहाते इथे,

सविता ताई आल्या होत्या, श्रेया त्यांना जावून भेटली, जेवण झाल,.. "निघू या आपण श्रेया? साक्षी येणार आहे ना खूप काम आहेत घरी",

हो आई..

श्रेया किचन मधे गेली, एकदम भरून आल होत तिला, मला आता आई कडे रहाता येणार नाही का कधी?, काय अस,.. ती रडली थोडी, तोंड धुवून पाणी पीत होती, सासर जरी खूप चांगल असल तरी माहेर खूप प्रिय असत मुलींना,

मीना ताई आत आल्या, काय झालं ग श्रेया रडते का तू, त्या श्रेया कडे बघत होत्या, श्रेया येवून भेटली त्यांना,.. डोळ्यात पाणी होत त्यांच्या ही ,... आई मी जाते,

"नीट रहा बेटा मन लाव आता त्या लोकां मध्ये, तुझ्या घरच्या लोकांची काळजी घे" ,.. मीना ताई

श्रेया काही म्हटली नाही, ती बॅग घेऊन आली, श्रेया सविता ताई निघाल्या, संध्याकाळी साक्षी आली, विवेक कामा निमित्त गेले होते, खूप छान वाटत होत साक्षी ताई आली तर, ती श्रेयाच्या मागे होती,

" श्रेया खूप सुंदर दिसतेस तू लग्नानंतर , ठीक चालू आहे ना सचिन सोबत? , तो जर काही बोलला तर मला सांग, बघते मी त्याच्या कडे" ,.. साक्षी

श्रेया नुसती हसत होती

" आई कडे रहायच होत का ग तुला? माझ्या मुळे आलीस का? ",.. साक्षी

" नाही ताई अस काही नाही ",.. श्रेया

" सचिनने बर जावू दिल तुला माहेरी",.. साक्षी

"काल तिकडे होता सचिन हिच्या कडे ",.. आजी

हो का, साक्षी चिडवत होती,.. "अजुन आला नाही सचिन?, एवढा उशीर, एक फोन कर श्रेया पळत येईल सचिन " ,

साक्षीने फोन लावून श्रेया कडे दिला,

" नाही ताई तुम्ही बोला",.. श्रेयाला सुचत नव्हत काय कराव, का अस करताय ह्या ताई,

सचिनने घरचा फोन बघुन फोन उचलला,

काय बोलणार आता,

हॅलो

मी श्रेया बोलते आहे सचिन

" अरे वाह, बोला मॅडम, आज कसा काय फोन केला, लकी आहे मी, अरे तुला आठवण येते की काय माझी, येतो घरी अर्धा तासात, बापरे खूप प्रेम वाढत चालल आपल",.. सचिन

पुरे... श्रेया हसत होती.. साक्षी ताई आल्या आहेत, त्यांनी फोन करायला सांगितला,

साक्षी बघत होती.. "सांग त्याला लवकर ये ",

नाही ताई.... श्रेया काही बोलली नाही ,

" येतो लवकर",.. सचिन

जरा वेळाने सचिन आला, साक्षी जवळ येवून बसला, श्रेया समोर काम करत होता, तो खुष होता,

"श्रेया इकडे ये",.. साक्षी बोलवत होती, ती येवून साक्षी जवळ बसली,.. सचिन आमची कंप्लेंट आहे,

"काय झालं ताई?",.. सचिन

"तुमच नवीन लग्न झाल आहे, आणि तु एवढ्या उशिरा घरी येतोस हे चालणार नाही, श्रेयाला वेळ देत जा जरा " ,.. साक्षी

"ताई मी तयार आहे वेळ द्यायला, मी लवकर येईल, श्रेया चालेल ना" ,.. श्रेया उठून गेली तिथून, साक्षी हसत होती,... नको रे चिडवू तिला

जरा वेळाने विवेक आले, जेवण झाले, सगळे छान बोलत बसले होते, श्रेया आजी जवळ बसली होती, सचिन बघत होता एकदम गप्प आहे ही, नंतर बोलेल मला

" काय प्लॅन आहे मग साक्षी ताई? ",.. सचिन

" यांना तीन दिवस काम आहे मग एक दिवस आम्ही राहू मग निघू",.. साक्षी

"आपण पिकनिकला जावू या फूल डे, चालेल ना",.. सचिन

हो जावू..

श्रेया सचिन रूम मध्ये आले,

" श्रेया इकडे ये, थँक्स तू आलीस, काय झालं एकदम गप्प आहेस आज? , काय विचार चाललाय? ",.. सचिन

"काही नाही सचिन ",.. श्रेया

" तुझे आई बाबा बोलले का काही तुला? , जबरदस्ती पाठवल का इकडे? तुला यायच नव्हत का?",.. सचिन

"नाही अस नाही झाल, ते काही नाही बोलले ",.. श्रेया

मग?

" मी ठीक आहे, एक बोलायच होत ",.. श्रेया

काय झालं?... सचिनला फोन येत होता, ऑफिसचा फोन येत नाही एवढ्या रात्री, काय झालं काय माहिती, श्रेया पाच मिनिट मी बोलतो तुझ्याशी

ठीक आहे,

बराच वेळ सचिन फोन वर होता,

श्रेया आत जावून झोपली,

तो काम करत होता ,..

"सर वेअर हाउस जवळ, काही तरी हालचाल दिसली आठ वाजता",..

" कोण आहे तिकडे?, काय झालं? ",.. सचिन

" पकडल काही लोकांना आम्ही, बहुतेक चोरी करत असावे, त्या एक दोन लोकांनी आपल्या लोकांवर हल्ला केला ",..

" लागल का त्यांना",.. सचिन

"थोडी मारामारी झाली",..

"मी येतो तिकडे आता",.. सचिन

"नको तुम्ही उद्या सकाळी या ",..

" काय उद्देश होता त्यांचा? कोण आहेत ते",.. सचिन

" माहिती नाही ओळखीचे नाही लोक ",..

" ठीक पोलिसांना फोन करा लगेच",.. सचिन

ठीक आहे...

फोन ठेवून सचिन आत आला,.. काय म्हणत होती ही,

श्रेया झोपलेली होती, काय ही इथे सोफ्यावर झोपते, त्याने तिला उचलल कॉटवर झोपवल, तो ही झोपून गेला,

सकाळी श्रेया उठली ती कॉटवर होती, सचिन नव्हता जागेवर, मी रोज झोपते दुसरीकडे उठते दुसरीकडे, काय अस? झोपेत चालते की काय मी? की सचिन सारखं मला उचलून घेतो, काही करत तर नसेल ना हा मला? कशी अशी एवढी झोप लागते पण मला , कुठे गेला हा सचिन? आज विचारणार आहे मी त्याला,

सचिन बाहेर केदार साहेबांशी हळू हळू बोलत होता,.. "आपल्या वेअर हाउस जवळ रात्री थोडी गडबड झाली, कोणी तरी मुद्दाम आपल नाव घेत आहे, चोर पकडले पण त्यांनी आपल्या लोकांवर हल्ला केला, एक दोन लोकांना लागल, मी जातो थोड्या वेळाने तिकडे ",

" एकटा जावू नको, ते फॅक्टरी युनीट जरा गावा बाहेर आहे, अजून धोका आहे " ,.. केदार सर

"हो बाबा येतील इंस्पेक्टर, ऑफिसचे लोक आहेत सोबत ",.. सचिन

मनीषला समजल आपले लोक पकडले गेले, ते तिकडे त्रास द्यायला गेले होते, आता त्यांना पोलिसानी पकडल त्यांनी आपल नाव सांगितल तर तो टेंशन मधे होता,

श्रेया आवरुन बाहेर आली, सचिन अजूनही केदार साहेबांशी बोलत होता, सविता ताई उठलेल्या होत्या, तिने सगळ्यांना चहा दिला,.. "आई मी जाते कॉलेजला ती निघून गेली",

सचिनने आवरल, ऑफिसचे लोक तिकडून निघाले होते,... "बाबा मी बघतो तिकडे काय झालं ते",

"सचिन मी पण येतो",.. केदार साहेब

"नको बाबा, मी पण येतो लगेच वापस ऑफिसला, तुम्ही पुढे जा आज क्लायंट मीटिंग आहे",.. सचिन

सविता ताई, साक्षी काळजीत होत्या,.. "नको जावू तू सचिन, पोलिस जातील ते करतील चौकशी , आपल्याला माहिती आहे हे अस टेंडर साठी खूप दुश्मन आहेत आपले, का रिस्क घेतोस ",..

आई बाबा ताई पोलिस जावून आले, मला जाव लागेल तुम्ही काळजी करू नका, आपल्या लोकांना लागल आहे, डॉक्टर काय म्हटले ते बघतो , सिक्युरिटी टाइट करतो, बरेच काम आहेत , येतो दुपारी ऑफिस मधे,

सचिन निघाला, इंस्पेक्टर रात्री जावून आले होते तिकडे ते थोड्या वेळाने येणार होते, सचिनला काय माहिती होत अजून बरेच लोक वेअर हाऊसच्या आजुबाजुला होते, इकडून सचिन लगेच शहराबाहेर पडला, तो पर्यंत त्याच्या बरोबरीचे लोक खूप लांब होते, काय त्यात एवढं घाबरण्यासारख तो पुढे गेला, मेन रोड सोडून आत गाडी गेली नेहमीचा रस्ता बंद होता, काय झालं तो बघत होता त्याला लोकांनो घेराव घातला,.... हाच आहे तो त्याला पकडा,

कोणी ओळखीच नव्हत म्हणजे हे काम सुपारी देवून करण्यात आल होत

सचिन सुटायचा प्रयत्न करत होता, थोडी मारामारी झाली, एक दोन लोकांनी त्याला पायावर हातावर मारल, सचिनने चांगला प्रतिकार केला, तेवढ्यात ऑफिस मधले बाकीचे लोक आले तसे ते गुंड पळून गेले, जाता जाता त्यांनी सचिनला ठकलल तो थोडा बाजूला जावून एका खड्ड्यात सचिन पडला, हात दगडावर आपटला, सगळे सचिनला वरती घेत होते, बरच लागल होत हाताला, पाय ठीक होता, लगेच हॉस्पिटल मध्ये आले ते, सचिनला अ‍ॅडमिट केल, हात फॅक्चर होता, पाय ठीक होता त्याचा,

घरी सांगितल सविता ताई केदार साहेब साक्षी विवेक हॉस्पिटल मध्ये आले, आजी आजोबांना सांगितल नाही काही , मीना ताई अभिजीत राव आले, ते घाबरून गेले होते, मीना ताई सविता ताई सोबत होत्या, सविता ताई खूप काळजी करत होत्या, त्या मधुन मधुन सचिनला रागवत होत्या, मी म्हटल होत याला जावु नको, पण नाही माझ कोण ऐकत,

अभिजीत राव पोलिस इन्स्पेक्टर सोबत बोलत होते ते रागाने कुठे तरी निघून गेले, केदार साहेब विवेक नुसते बसुन होते,.. "मी बोललो होतो याला जावु नको एकटा, किती लागल, मला काळजी वाटते" ,

"बाबा काळजी करू नका तुम्ही ",.. विवेक

"साक्षी तू घरी जा आजी आजोबा आहेत घरी" ,.. सविता ताई

क्लायंट आले होते मीटिंग साठी, महत्वाची होती मीटिंग, केदार सर ऑफिसला गेले,

"श्रेयाच काय करू या? ती येईल कॉलेज हून",.. साक्षी

" सांग तिला घेवून ये संध्याकाळी इकडे" ,.. सविता ताई

साक्षी विवेक घरी आले , आजी आजोबा सारख विचारात होते कुठे गेले सगळे, काय झालं सचिनला?

श्रेया घरी आली, कोणी नाही घरात म्हणुन ती आजी आजोबांच्या रूममध्ये आली, तिथे साक्षी बसलेली होती, ती सांगत होती सचिनला लागल थोड साइट वर, ठीक आहे तो अ‍ॅडमिट आहे, घाबरण्यासारख नाही काही,

" काय झालं ताई? कुठे आहेत सचिन? किती लागल आहे त्यांना? साक्षी ताई मला आता जायच हॉस्पिटल मध्ये , मला का नाही सांगत तुम्ही कोणी काही? ",.. श्रेया ऐकत नव्हती, ती रडायला लागली

"श्रेया तू जेवून घे आधी, अग ठीक आहे सचिन ",.. साक्षी

" मला जेवायच नाही, मला पत्ता द्या" ,... श्रेया

" श्रेया ऐक जरा आपण जावू जरा वेळाने",.. साक्षी

आई बाबांना माहिती असेल, तिने तिच्या बाबांना फोन लावला,.." बाबा मला घ्यायला या मला यायच हॉस्पिटल मध्ये" ,.. श्रेया

" बेटा मी बाहेर आहे येतो थोड्या वेळाने, तू घरी थांब",.. अभिजीत राव

"नाही बाबा मी जाते पुढे, पत्ता द्या ",.. श्रेया तशी बाहेर गेली, तिच्या कारने निघाली, तिला खूप रडू येत होत, किती लागल किती नाही सचिनला, काय झालं नक्की? ती हॉस्पिटल मध्ये आली, सविता ताई.. मीना ताई बाहेर बसल्या होत्या, त्यांना बघून अजून श्रेया रडायला लागली,.. "मला का नाही सांगितल सचिनला लागल तर, कुठे आहेत सचिन?, बाबा कुठे गेले आहेत?",..

"ते गेले पोलिस स्टेशनमध्ये",.. चौकशी सुरू होती, कोणी केला हल्ला त्याची,

ती रूम मध्ये आली, सचिनला सलाईन सुरू होती, हात पॅल्स्टर मधे होता, पायाला बॅन्डेज होत, बापरे काय हे, ती आत येवून भिंती जवळ उभी राहिली, तिला काही सुचत नव्हत, ती सचिन कडे बघत होती, तीला बघून सचिन उठून बसला होता,.." श्रेया काय झाल? ठीक आहे मी, इकडे ये, शांत हो" ,

श्रेया पटकन पुढे झाली, तिने सचिनला उठू दिल नाही,.. "काय हे कस काय झाल सचिन?",.. खूप काळजी करत होती ती, मला का नाही फोन केला , दुखतोय का हात, कुठे लागल अजून,

"हो मग दुखतोय हात, पायाला लागल",.. सचिन

" कश्याला गेला होता तू तिकडे उगीच हीरो असल्या सारख करतोस, आता अजिबात गडबड नको मला, शांत आराम कर सचिन" ,.. ती तिथे त्याच्या जवळ बसुन होती, डोळ्यात एकदम काळजी होती तिच्या,

"तू रडली का श्रेया",. सचिन तिच्या कडे बघत होता

"मी कशाला रडेल काहीही सचिन",.. श्रेया

चेहरा दिसतो आहे हिचा रडल्या सारखा, माझी काळजी करत असेल ही, छान वाटत पण ही आली तर, नाही तर खूप बोर होत होतं इथे हॉस्पिटल मधे.

जरा वेळाने डॉक्टर आले, ठीक आहे सचिन उद्या सोडून देवू घरी, आराम करावा लागेल पण थोडे दिवस ,

सविता ताई, मीना ताई घरी गेल्या, सविता ताई डबा घेवून येणार होत्या, श्रेया गेली नाही ती सचिन जवळ बसुन होती,

"तू जेवली का आज श्रेया",.. सचिन

नाही..

"मला पण भूक लागली काही तरी खावू या",.. सचिन

श्रेयाने चहा बिस्किट मागवले, दोघांनी चहा घेतला. थोड्या वेळाने अभिजीत राव आले, ते श्रेया सचिन जवळ होते, सचिन थोड झोपला होता,

श्रेया अभिजीत राव बाहेर येवून बसले,

"काय झालं बाबा कशी काय झाली मारामारी, खूप लागल आहे सचिनला, मला काळजी वाटते ",.. श्रेया

"अग ते लोक ना मूर्ख नुसते, कामा साठी करतात अस, दुसर्‍याच नुकसान झाल तर बर होईल अस वाटत त्यांना",..अभिजीत राव

"कोण आहेत ते बाबा? मला यांना काही व्हायला नको",.. श्रेया

" काही होणार नाही बेटा, मी आहे ना ,.... मनीष इंटरप्राईजेस ",.. अभिजीत राव

हेच ते लोक वाटत ज्यानी सौरभला माझ्याशी बोलायला पाठवल होत, बापरे कठिण दिसतय हे..." काय पण अस बाबा? एवढे श्रीमंत सगळे, एखाद काम कमी मिळाल तर चालणार नाही का बाकीच्यांना?, किती लागलाय यांना ",

" हो पकडल त्या लोकांना अजिबात काळजी करू नको मी आहे" ,... अभिजीत राव

"तुम्ही घरी जा बाबा मी आहे इथे" ,.. श्रेया

"नाही मी आहे" ,.. अभिजीत राव

"बाबा सकाळ पासून धावपळ होते आहे तुमची, घरी जा, वाटलं तर उद्या या ",.. श्रेया

अभिजीत राव घरी गेले

साक्षी विवेक डबा घेऊन आले, ते जरा वेळ बसलेले होते,
श्रेया खूप कामात होती ती सचिन कडे नीट लक्ष देवून होती, सचिन ही ठीक होता, जरा वेळाने साक्षी आणि विवेक घरी गेले

श्रेयाने सचिनला जेवायला दिल,

" तू जेव श्रेया की घरी जाते",.. सचिन

" नाही मी इथेच थांबणार आहे, हो जेवते आधी तू जेव" ,... श्रेया

" मी एकट जेवणार नाही",.. सचिन

"अरे मेडिसिन घ्यायचे आहेत आटोप",... सचिन जेवत होता, थोड्यावेळाने श्रेयाने ही जेवून घेतलं

"सचिन तुझी मजा आहे ना, आता मस्त माझ्या कडून सेवा करून घेतोस तू" ,.. श्रेया

" हो का, अस का, बर बघतो तुझ्या कडे, चल माझे पाय दाबुन दे",.. सचिन

" तब्येत सांभाळ जरा सचिन, उगीच माझ नाव घेतोस",.. श्रेया हसत होती , ती बाजूच्या कॉटवर झोपली,

"तू काल काहीतरी सांगत होती ना मला, तेव्हा फोन आला ",.. सचिन

काही नाही..

" अरे आता काय हे? सांग श्रेया ",.. सचिन

" अरे ते असंच जावू दे ",.. श्रेया लाजली होती.

सचिन बघत होता,.." तिकडे येवू का मी जरा",

नको..

" पटकन बोलणार का आता",.. सचिन

"ते मी हे सांगत होते काल की मी रहाते तुझ्या जवळ सचिन ",.. श्रेया

सचिन श्रेया कडे बघत होता.. खर श्रेया

" हो सचिन आपण राहू सोबत, पण मला थोडा वेळ दे",.. श्रेया

"आता मिळाला ना वेळ बरोबर, पण कसा काय हा विचार केला तू?",... सचिन

" असच, मला वाटल तू छान आहे, आणि उगीच मी चीड चीड करत होती, मला समजत नव्हत काय करायला हव, आई बाबा तू आजी आजोबा घरचे सगळे चांगले आहेत आपल्या, काही प्रॉब्लेम नाही, सॉरी ",.. श्रेया

" मला लागल म्हणून एवढ सुरू आहे का हे? ",.. सचिन

"नाही मी कालच ठरवल होत, खर एकदम ",.. श्रेया

" तू कन्फ्युज होतीस, नाही तर आपल्या दोघांना ही एकमेका सोबत आवडतं, आपण दोघं कंफर्टेबल आहोत अॅज अ फ्रेंड, होईल बरोबर सवय एकमेकां सोबत राहतांना, हेच असेल अरेंज मॅरेज ",.. सचिन

" हो मी पण तोच विचार केला की कोणातरी सोबत राहायचं आहे, तर तू चांगला आहेस, ओळखीचा आहेस",.. श्रेया

" हो का अजून सांग माझ्याबद्दल",.. सचिन

" नाही सचिन असं नाही",.. श्रेया हसत होती

सचिन खूप खुश होता, चला आता काही प्रॉब्लेम नाही, श्रेया कुठे जाणार नाही, हेच हव होत मला, बहुतेक आमच सोबत रहाण असेल लिहिलेल आमच्या नशिबात, मी खूप छान सांभाळेल श्रेयाला, प्रेमाने राहील तिच्या सोबत, श्रेया इकडे ये ना, एकदा थोड मिठीत घे मला, श्रेयाने पुढे येवून सचिनला मिठी मारली.

"लागल आहे म्हणून जास्त करतोस तू सचिन" ,.. श्रेया

सचिन हसत होता,.. "औषधा सोबत ही पण ट्रीटमेंट गरजेची आहे मला ",..

श्रेयाने त्याला मारल

आई आई ग खूप लागल..

"सॉरी सचिन.... सॉरी, जास्त लागल का? माझ्या लक्ष्यात राहील नाही तुला लागल ते",.. श्रेया

सचिन हसत होता... आता मी गैरफायदा घेणार लागल आहे याचा, श्रेया कडून लाड करून घेणार.