Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 12

श्रेयाला जायच नव्हत, समोर बाबा होते, ती काही म्हटली नाही, आता मी तिकडे गेली तर सचिन मला सोडणार नाही, आता हल्ली खूप त्रास देतो तो,


रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 12

©️®️शिल्पा सुतार
........

सचिन संध्याकाळी घरी आला, श्रेया रूममध्ये नव्हती, त्याला करमत नव्हतं, नक्की श्रेया परत येणार आहे की नाही? काय करू मी? , मला हवी आहे ती, नको बोलायला काही थोडे दिवस तिला, तिच्या मनाच होवू दे, आपोआप समजेल तिला, राहू दे दोन चार दिवस तिकडे, घरचे सगळे गप्प होते, श्रेया जेवली की नाही सविता ताई तिच्याशी फोन वर बोलत होत्या,

"आई मी जेवेन आता तुम्ही काय करता आहात",.. श्रेया

"बेटा आता सचिन घरी आला, आम्ही बसू आता जेवायला, सगळे तुझी आठवण काढता आहेत, आजी शी बोल" ,.. सविता ताई

श्रेया आणि आजी खूप वेळ बोलत होत्या, मीना ताई बोलल्या आजींशी,.. घरी ये लवकर श्रेया

हो आजी..

सविता ताईंनी फोन ठेवला,

" आजी जेवून घ्या आता, मी घेवून येईल श्रेयाला दोन तीन दिवसांनी, सचिन पेक्षा तुम्हाला तिची जास्त आठवण येते आहे ",.. सविता ताई

सगळे हसत होते, सचिन खुश होता, बर झाल आई बोलली श्रेया शी, ती घ्यायला गेली तिकडे तर श्रेया येईल घरी,

दुसर्‍या दिवशी श्रेयाला करमत नव्हत, ती कॉलेजला गेली, तिथे ही बोर झाल, आल्यावर काय करणार झोपून होती ती, मीना ताई दोन वेळा बघून गेल्या, त्यांनी अभिजीत रावांना फोन केला,.. "श्रेयाला करमत नाही इकडे, नुसती झोपून आहे" ,

ते हसत होते,.. "आहे आलेलो इकडे मी आज जावईंच्या कंपनीत बोलतो त्यांच्याशी",

सचिनच्या कंपनीत मीटिंग सुरू होती, अभिजित राव केदार सर बसलेले होते, सचिन समोर होता, काम सुरू होत, मीटिंग झाल्या, आज पुढच पेमेंट करणार होते अभिजीत राव सचिनच्या कंपनीत, ते काय म्हणता या कडे सगळे बघत होते,.... सांगा किती चा चेक देवू? ,

"आधी काम किती झाल ते तरी बघा अभिजीत साहेब",.. केदार साहेब बोलत होते

"अहो काल श्रेयाने सांगितल आहे.. बाबा सचिनचा प्रोजेक्ट थांबला नाही पाहिजे, मला किती काम झाल.. कस झाल.. हे बघायच नाही, ते सचिन राव बघतील, सचिन रावांना त्रास झाला तर श्रेया ओरडेल मला, त्यांनी चेक दिला, मी निघतो आता, चला सचिन राव येतय का घरी? , श्रेयाला करमत नाही, भेटून घ्या तिला ",.. अभिजीत राव

सचिन गप्प होता,

केदार साहेब अभिजीत राव जोरात हसत होते,

" मी येतो नंतर ",.. सचिन

ठीक आहे..

श्रेया बोलली वाटत तिच्या बाबांशी प्रोजेक्ट बद्दल, बर झाल, म्हणजे तिला काळजी आहे माझी, सचिन खुश होता,

खरच रात्री जेवायच्या वेळेत सचिन श्रेयाच्या घरी आला, श्रेया डायनिंग टेबल वर बसलेली होती,.. हा का आला आता? ,

आई बाबा जावून भेटले, जा फ्रेश होवुन या आत, मग आपण जेवायला बसू.

श्रेया... बाबानी आवाज दिला.

श्रेया समोर आली, सचिनला आत नेल , त्याला टॉवेल दिला तो फ्रेश होवुन आला, दोघ जास्त बोलत नव्हते, जेवायला बाहेर आले ते , इतक्या वेळ आरामात बसलेली श्रेया आता ताट करत होती, आई बाबा आश्चर्याने बघत होते, ती सचिनला काय हव ते बघत होती, जेवण झाल बाबा सचिन खूप बोलत होते, श्रेया मीना ताई येवून बसल्या, मीना ताई छान बोलत होत्या, श्रेया नुसत ऐकत होती,

"चला आराम करा मुलांनो आता ,थांबताय ना तुम्ही इथे सचिन राव",.. अभिजीत राव

हो

म्हणजे?.. हा सचिन जात नाही का घरी? माझ्या रूम मध्ये थोडा छोटा काॅट आहे, कस झोपणार, प्लीज घरी जा सचिन, काय हे?

सचिन उठला, त्याने त्याची बॅग घेतली, तो श्रेया कडे बघत होता , श्रेयाला राग आला होता,

श्रेया सचिन रावांना आत ने

श्रेया सचिन आत आले, श्रेयाने दार लावल,

"आज बोलायच नाही का माझ्याशी श्रेया? , तुला आठवण येत होती ना माझी म्हणून मी आलो",.. सचिन

"कोणी सांगितल की मला आठवण येत होती, काहीही",..श्रेया

"तुझे बाबा म्हंटले सचिन राव घरी या आज, श्रेया आठवण करते आहे, एक दिवस झाला माहेरी येवून लगेच आठवण येते माझी, खूप प्रेम दिसतय " ,.. सचिन

" काही येत नव्हती मला तुझी आठवण, बाबा अति करतात, कुठे झोपणार तू? इथे सोफा ही नाही?" ,.. श्रेया

" मी तुझ्या जवळ ",.. सचिन

" सचिन नाही.. तू घरी का गेला नाही, इथे तू खाली झोप मी माझ्या कॉटवर झोपेन",.. श्रेया

का अस?

" तुमच्या कडे कस तु तुझी जागा सोडत नाही, इथे माझ्या घरी ही माझी जागा आहे",.. श्रेया तिच्या जागेवर झोपली, सचिन तिच्या बाजूला येवून झोपला, श्रेया पटकन उठली.. "सचिन काय हे जा ना तू घरी",

" मी जाणार नाही, तुझ्या जवळ थांबणार, सचिनने कॉटवर अजून आरामात झोपून घेतल, तुझ ब्लँकेट छान आहे, हा टेडी बेअर किती मस्त, तुला आवडतात का सॉफ्ट टाॅइज, तुझी रूम किती डेकोरेट केली तू ",.. सचिन

श्रेया चिडून उभी होती.

सचिन इकडे तिकडे बघत होता त्याला शो केस मधे फोटो चे अलबम दिसले, तो ते घ्यायला उठला, श्रेयाने त्याला अडवल, सचिन नाही माझे फोटो बघायचे नाहीत,

"दाखव ना तुझे फोटो लहान पणीचे प्लीज ",.. सचिन

" नाही चांगले नाहीत ",.. श्रेया

दाखव,

" नाही सचिन मी ओरडेन",.. श्रेया

"हळू श्रेया तुझे आई बाबा म्हणतील काय सुरु आहे इकडे, फोटो दे" ,.. सचिन

तू हसशील

"नाही हसणार मला माहिती आहे तू लहान पणी गोलु मोलु असशील" ,.. सचिन

श्रेयाने दोन तीन अल्बम दाखवले बरेच फोटो होते, शाळेचे, गॅदरिंगचे, वाढदिवसाचे, खूपच गोड दिसत होती श्रेया, काही काही फोटोत तर दोन वेण्या होत्या,

सचिनने बरेच फोटो त्याच्या मोबाईल मध्ये काढून घेतले, श्रेया नाही म्हणत होती, तिने सगळे अल्बम आत मध्ये ठेवून दिले, सचिन खूप हसत होता,

"हे असं आहे तुझं सचिन मी म्हणत होती ना की नको बघू माझे फोटो",.. श्रेया

"फारच गोड आहे तुझे फोटो अगदी तुझ्या सारखे, छान वाटत तुझ्या घरी, तुझे आई बाबा माझे लाड करतात, तुझा कॉट थोडा छोटा आहे का?",.. सचिन

" हो ना आपण दोघं कसे मावणार?" ,.. श्रेया

" तसा कपल साठी ठीक आहे हा कॉट, मधे उशी ठेवता येणार नाही एवढच",.. सचिन हसून श्रेया कडे बघत होता

" मला माहिती आहे तू मुद्दामून आला आहे इकडे सचिन ",.. श्रेया

" अरे तुझ्या बाबांनी सांगितलं मला यायला",.. सचिन

" माहिती आहे किती वेळा तेच ",.. श्रेया

" दुसऱ्यांच्या घरी वेगळंच वाटतं ना, तुला असंच वाटतं का माझ्या रूममध्ये",.. सचिन

हो

"होईल सवय हळूहळू ",.. असं सचिनने म्हटलं श्रेया त्याच्याकडे बघत होती, सचिनने तिला जवळ ओढल,
श्रेयाला खूपच धडकी भरली होती, माझी खरोखरच सुटका नाही माझी , आई-बाबांना सचिन खूप आवडतो, काय करू मी, ... सचिन सोड मला , तू जा इथून घरी

" आई बाबांना बोलवू का",.. सचिन

" तू खूप गैरफायदा घेतो आहेस जावई असल्याचा",.. श्रेया

"हो श्रेया.. सोड ना आता राग, मला तू हवी आहेस, मला तुझ्या सोबत रहायच आहे, आय लव यू",.. सचिन

श्रेया एकदम त्याच्यापासून बाजूला सरकली, त्या बाजूला हात ठेवून सचिन तिच्या जवळ सरकून बसला , श्रेयाला उठायला जागा नव्हती,

" तू खूप छान आहे श्रेया तुझ्या कडे बघुन मला काही सुचत नाही",.. त्याने पुढे येऊन श्रेयाला मिठी मारली , आता श्रेया खूप घाबरली होती, काय बोलतो आहे हा अस, सोड मला,

त्याने तिच्या गालाला हात लावला, श्रेया मागे झाली, श्रेया उठत होती जागेवरून, त्याने उठू दिल नाही,

"बोल ना श्रेया तुला मी आवडतो का",.. सचिन

" सचिन नको मला जावु दे" ,.. श्रेया रडवेली झाली होती,

" श्रेया जो पर्यंत तू सांगत नाही तुला मी आवडतो का, मी तुला इथून उठू देणार नाही" ,.. सचिन

श्रेया तरी उठली, बाहेर जावू शकत नव्हती ती, आई बाबांची रूम समोरची आहे, ते लगेच बाहेर येतील मला परत आत पाठवतील,

काय करू कुठे झोपू मी? एक मोठी चेअर होती तिच्या रूम मध्ये, त्यावर बसुन पुस्तक वाचायची ती, श्रेया उठून चेअर वर जावुन बसली, नको झोपायला सचिन जवळ जास्त करतो तो,

सचिन तिच्या मागे गेला.. चल तिकडे श्रेया

"नाही मला नाही थांबायचं तुझ्यासोबत",.. श्रेया

"मी काही करणार नाही तुला, झोप तिकडे",.. सचिन

"नाही श्रेया गेली नाही",.. खूप घाबरली होती ती.

सचिनने लॅपटॉप उघडला, तो जरा वेळ त्याच काम करत होता, श्रेया तिकडे खुर्चीवर झोपली, बराच वेळ झाला होता, सचिन तिच्या जवळ गेला, पडेल ही अशी इथून, त्याने तिला उचलून कॉटवर झोपवल तो तिच्या जवळ झोपला, कधी नीट होणार हे काय माहिती? ,

सकाळी श्रेया उठली ती सचिनच्या बाहुपाशात होती, कस काय उठणार आता? ओह माय गॉड, सोड मला सचिन, मी तिकडे झोपली होती ना, सचिन उठला अजून श्रेयाला जवळ घेवून झोपला, तो हसत होता, श्रेया चिडली तिने त्याला बाजूला ढकलल ती उठून बाथरुम मधे निघून गेली,

जरा वेळाने सचिन रेडी झाला, तो श्रेया बाहेर आले, श्रेया नाश्ता रेडी का ते बघत होती, तिचा डबा घेत होती, सचिन तिच्या मागे होता किचन मधे ,.. "सचिन प्लीज तू डायनिंग टेबल वर जावुन बस, मला का त्रास देतोस तू काल पासुन, आज इकडे यायच नाही रात्री सांगून ठेवते" ,

सचिन हसत होता,.. "घाबरलीस का? मी येणार तुझ्या जवळ झोपणार" ,

आई बाबा आले, दोघ गप्प बसले, सचिन बाहेर जावुन बसला, आई बाबां सोबत चहा नाश्ता झाला, श्रेया कॉलेज ला निघाली, सचिन ऑफिस मधे आला, अभिजित राव मीना ताई खुश होत्या, सचिन अस श्रेयाच्या मागे मागे करतो ते बर वाटल त्यांना

मनीषच्या केबिन मध्ये सौरभ समोर बसलेला होता, मनीष रागाने त्याच्याकडे बघत होता,.. "एवढेही काम झालं नाही तुझ्याकडून सौरभ म्हणे कॉलेजचा लीडर",

"त्या सचिनला समजून गेलं सगळं की मी का बर श्रेयाच्या मागे आहे, मोठे लोक ते, त्याने माणूस लावून मला कॉलेजमधनं उचललं आणि त्याच्या ऑफिस मध्ये बसून ठेवलं होतं, मला श्रेयासमोर खरं सांगावं लागलं",.. सौरभ

"बरं झालं आता तुझा काही उपयोग नाही, तू गेला तरी चालेल",.. सौरभ उठून चालला गेला.

सौरभ गेला मनीष विचार करत होता आता काय करायचं, जाऊ दे जे झालं ते झालं, संध्याकाळी दुसर्‍या प्रोजेक्टची मीटिंग होती, तिथल्या कामाच बघू आपण, दुसरा प्रोजेक्ट आपल्याला मिळालाच पाहिजे

या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी सचिनच्या ऑफिसमध्येही मीटिंग सुरू होती, प्रेझेंटेशन कॅल्क्युलेशन तयार होत, सगळ नीट आहे की नाही ते बघण सुरू होतं, संध्याकाळी सचिनही प्रोजेक्टसाठी सबमिशन करायला गेला, तिथे मनीष आणि त्याची टीम हजर होती, सचिनला बघून मनीष च्या कपाळावर आठ्या होत्या, ज्याने त्याने आपल्या फाईल सबमिट केल्या, चार पाच दिवसात रिजल्ट होता,

ऑल द बेस्ट सचिन,

थँक्स मनीष, सेम टु यु

सचिन त्याच्या कामात होता, तो तिथून निघून गेला

खूप अकडतो हा सचिन ,.. मनीष त्याच्या कडे बघत होता.

आज सचिन घरी गेला, आजी आजोबा सविता ताई पुढे बसलेले होते ,

"आम्हाला कंटाळा आला आहे सचिन, श्रेया कधी येणार? काय म्हटली ती?",.. आजी

सचिन काही म्हटला नाही, काय करते काय माहिती श्रेया?

"येईल आजी एक दोन दिवसात ती, आज बोललो ना आपण तिच्याशी , नवीन आहे तिच्या साठी हे सगळ, राहू देवू तिला एक दोन दिवस" ,.. सविता ताई

"सचिन जा आवरून ये जेवायला बसू आपण",..

सचिन आत आला खरच श्रेया शिवाय आता भकास वाटत आहे घरात,

त्याने श्रेयाला फोन केला ती नोट्स लिहीत होती,.. काय करतेस श्रेया?

" थोडी बिझी आहे, मी अभ्यास करते आहे, तू कुठे आहेस सचिन? ",.. बापरे इकडे तर येणार नाही ना हा, श्रेया काळजी करत होती

" रस्त्यात आहे, येतो तिकडे थोड्या वेळात तुझ्या जवळ ",.. सचिन मुद्दाम तिला चिडवत होता

"सचिन तू मला मुद्दाम त्रास देतोस ना, अजिबात यायच नाही इकडे, हे बघ माझ्या रूम मध्ये जागा नाही" ,.. श्रेया

" झोपलो की काल छान तू माझ्या मिठीत होतीस ",... सचिन हसत होता

श्रेया चिडली, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही... तिने फोन ठेवला, काय अस करतो हा अस काय माहिती? ,

सचिन बाहेर आला, सविता ताई साक्षी सोबत बोलत होत्या,.." सचिन आला बोल त्याच्याशी ",

" सचिन मी येते उद्या तिकडे विवेकच काम आहे दोन तीन दिवस ",.. साक्षी

" अरे वाह ताई ये ",.. सचिन

"श्रेया कुठे आहे?" ,.. साक्षी

"ती माहेरी गेली आहे येईल उद्या",... दोघ बराच वेळ बोलत होते

"आई तू उद्या श्रेयाला घेवून येशील का? ताई येते आहे",.. सचिन

"हो मी जाते उद्या, श्रेया कॉलेज हून आली की घेवून येईन तिला",.. सविता ताई

आता सचिन खूप खुश होता, आई गेली तर श्रेया येईलच

श्रेया सकाळी नाश्ता करत होती, मीना ताई सविता ताई फोन वर बोलत होत्या, अभिजित राव समोर बसले होते,.." हो चालेल मी सांगते श्रेयाला तयार राहील ती ",

" श्रेया दुपारी तुझ्या सासुबाई येणार आहेत आवरून ठेव घरी जा दुपारी" ,.. मीना ताई

श्रेयाला जायच नव्हत, समोर बाबा होते, ती काही म्हटली नाही, आता मी तिकडे गेली तर सचिन मला सोडणार नाही, आता हल्ली खूप त्रास देतो तो, कस सांगू आईला, ती ऐकणार नाही, बाबांना सांगून देईन, नक्की काय करायच आहे मला आज निर्णय घ्यावा लागेल,

अभिजीत राव ऑफिस ला निघाले,.. "जायच नाही का आज श्रेया कॉलेजला? ",

"जाते बाबा दहा मिनिटात",.. श्रेया

"चल इकडे ये आज माझ पिल्लू निघून जाईल सासरी" ,.. श्रेया येवून भेटली, नीट रहा तिकडे श्रेया चांगले आहेत लोक, काळजी करायची नाही कसली,

हो बाबा..

बोलू का श्रेया विचार करत होती, तिची हिम्मत झाली नाही, ती कॉलेज मध्ये आली, आज खूप गप्प होती ती, घरी येतांना ती विचार करत होती, आई, बाबा, सचिन, सचिनच्या घरचे सगळे खूप चांगले आहेत, जावू दे मी जाते तिकडे घरी, उगीच हो नाही करण्यात काही अर्थ नाही, कोणा सोबत तर रहायच आहे, हे अरेंज मॅरेज आहे यात अस होत असेल, होईल ओळख सचिन शी, मी या पुढे नीट वागेन सगळ्यांशी.

🎭 Series Post

View all