Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 11

श्रेया आय एम सॉरी तुझ्याशी बोलायला मला मनीषने सांगितलं होतं, नाहीतर मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही,


रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 11

©️®️शिल्पा सुतार
........

श्रेया रडत होती, जरा वेळाने ती बरीच शांत झाली, सचिनने तीला प्यायला पाणी दिलं, तो तिच्याजवळ बसलेला होता,.. "श्रेया ऐकणार आहेस का तू? मला काही तुला त्रास द्यायचा उद्देश नाही, एक मित्र म्हणून प्लीज माझं ऐक, नको बोलू सौरभशी",..

श्रेया गप्प बसून ऐकत होती, तिला राग आला होता, माझ्या हातात नाही तर काय आहे? सगळे कसेही वागतात माझ्याशी, ते म्हणतील ते करणार मी, आई बाबा सचिन सगळे सारखे,

"सचिन एक सांग तू नेहा सोबत चालला गेला तर मी काय करायचं?, ठीक आहे मी आईकडे चालली जाईल ",.. ती बोलली

"तुला एक गोष्ट सांगायची आहे श्रेया, मी नाही राहणार नेहा सोबत",.. सचिन

"का काय झाल?",.. श्रेया

"तिने मला धोका दिला, तिकडे दुसऱ्या मुलाशी लग्न केलं तिने ",.. सचिन

" म्हणून तू मला नाही जाऊ देत आहे का सौरभ सोबत? तुला आता असं वाटत आहे की तुला नेहा मिळाली नाही तर मला पण सौरभ नको मिळायला",.. श्रेया

" तसं काही नाही श्रेया पण सौरभ खरंच चांगला मुलगा नाही तो नक्कीच काहीतरी प्लॅन करतो आहे, तो तुझ्यासोबत राहणार नाही, थोडे दिवस तो फक्त तुझ्याशी बोलेल एकदा आपलं लग्न तुटलं की तो परत त्याच्या आवडत्या मुली सोबत लग्न करेल, तो फक्त थोडे दिवस तुझ्याशी बोलतो आहे समजून घे, मुद्दाम करतोय तो ",.. सचिन

श्रेया त्याच्या कडे बघत होती, तो ही तिच्या कडे बघत होता,... काय आहे हे असं?

श्रेया विचार करत होती की काय करू नक्की काय म्हणतो आहे सचिन उद्या विचारू का सौरभला,

श्रेया आता शांत होती, याला नेहा सोबत नाही रहायच, म्हणजे आता हा आणि मी... शक्य नाही, हा माझ्या जवळ आला तर? आता सगळ क्लीयर झाल आहे, मी विचार करू शकत नाही, मला भिती वाटते, मी आई कडे चालली जाईल,

सचिनही अजून जास्त काही बोलला नाही,.. डिनर करू या का श्रेया?

"नको मला घरी जायच आहे" ,.. श्रेया

सचिन तिच्या जवळ येवून बसला, श्रेया थोडी बाजूला सरकली, सचिनने तिचा हात हातात घेतला,

"सचिन नाही.. प्लीज मला जावू दे", ... श्रेया घाबरली

"श्रेया शांत रहा मी काही करत नाही,.. मला माहिती तुला वाटत की मला नेहा नाही मिळाली म्हणून अस करतोय, श्रेया मला तू खूप आवडते आधी पासून, आय लव यू, मला तुझ्या सोबत रहायच आहे, माझा विचार कर आपण खूप सुखी राहू, आपल लग्न झालं, आणि आपले इतर ऑप्शन चांगले नाही, तर एकमेकांसोबत रहायला काय हरकत आहे? आपल्या घरचे चांगले आहेत त्यांनी काही तरी विचार करून आपल लग्न करून दिल असेल ना, वेड्या सारखं विचार करू नको, चांगल सुरू आहे आपल मला तुझ्या सोबत रहायच आहे",... सचिन

श्रेया काही म्हटली नाही.

" श्रेया मी वाट बघेन तू काय उत्तर देते याची ",.. सचिन

दोघ कार मध्ये येऊन बसले, श्रेया गप्प होती, सचिन तिला समजावत होता, सॉरी श्रेया प्लीज मूड ठीक कर आता, त्याने श्रेयाला जवळ घेतलं, श्रेया पटकन दूर सरकून बसली श्रेया विचार करत होती की सचिन माझ्या बाबतीत खूपच हळवा झालेला दिसतो आहे हा , काय अस खरच प्रेम करतो की काय हा माझ्या वर, कठिण आहे, हा मला सोडणार नाही आता, मला तर आता सचिनची भीतीच वाटायला लागली आहे.

दोघ घरी आले जेवलेले नव्हते ते.

श्रेया आत मध्ये चालली गेली, सचिन घरच्यांसोबत बोलत होता, कंटाळा आला पार्टी मधे आम्ही निघून आलो,

"ठीक आहे जेवून घ्या आता" ,.. सविता ताई

तो थोड्या वेळाने आत मध्ये आला, श्रेया बसलेली होती, चल श्रेया जेवून घे, श्रेया उठून बाहेर आली, सचिनने आज दोन ताट केले, एक श्रेयाला दिलं एक त्यांने घेतलं, दोघांनी जेवून घेतलं.

झालेल्या गोष्टीबद्दल अजूनही श्रेया विचार करत होती, ति आत रूम बसली होती, सचिनही आला, तो काही बोलला नाही, श्रेया आत सोफ्यावर झोपायला निघून गेली, इथे याच्या समोर नको बसायला,

दुसर्‍या दिवशी सकाळी श्रेया रेडी होत होती, जावू का कॉलेजला? , सचिन काल नाही म्हटला होता, काय करू, ओरडेल का हा? ,

सचिन बघत होता श्रेया रेडी होती ,

"सचिन मी जावू का कॉलेजला? प्लीज.. खूप महत्त्वाच शिकवता आहेत, मी अभ्यासावर लक्ष देईल" ,.. श्रेया

" किती दिवस आहे कॉलेज?",.. सचिन

म्हणजे?

"परीक्षा कधी आहे तुझी? ",.. सचिन

"अजून बराच उशीर आहे परीक्षेला" ,.. श्रेया

"ठीक आहे जा तू श्रेया, तुझ चांगल वाईट तुला समजत, कोण आहेत तुझे फ्रेंड्स",.. सचिन

"तुला माहिती ना माही राधिका बर्‍याच मुली" ,.. श्रेया

"ठीक आहे लवकर ये",.. सचिन

श्रेया कॉलेजला निघाली, ति विचार करत होती, आधीच मी याच ऐकायला नको होत, जास्त करतो हा, पण माही राधिका अस म्हणतात जस सचिन बोलतो, सौरभशी नको बोलायला, त्याच्या पासून लांब राहू, स्पष्ट सांगू तो दिसला तर की बोलू नकोस म्हणून, मी हे सचिनला सांगणार नाही, पण मला इथे राहायच नाही, काय करू?, मी आता मुद्दाम सचिनला त्रास देईल, म्हणजे तो मला कंटाळेल,

मला कोणी नको सौरभ नको सचिन नको, मी माझी एकटी ठीक आहे, होवू दे त्याच प्रोजेक्टच काम मग मी घरी निघून जाईल, काय करायला हव या साठी? ती विचार करत होती, मुद्दाम सचिनला जे आवडत नाही ते करू या, त्याच रूम खराब करू, अजून सारख आई कडे जाईन मी, कुठे आहे ते सांगायच नाही, घरी मदत करायची नाही, आता तिला ठीक वाटत होत,

कॉलेज झाल सौरभ होता कॉलेज मधे ती बोलली नाही त्याच्याशी, माही राधिकाशी विशेष बोलली नाही ती,

तिकडे ऑफिस मध्ये सचिनला निरोप गेला आज श्रेया बोलली नाही सौरभशी दिवस भर, ती वर्गात बसुन होती, सचिनला आता बर वाटत होत,

ती घरी आली, थोडा वेळ आराम केला, जेवणाची वेळ झाली तरी सचिन आला नव्हता, काय झालं कुठे आहे हा? , आपल्याला काय? का विचार करतेय मी आता त्याचा, पण कुठे आहे हा? , तिने तिचा फोन बघितला सचिनचा मेसेज आला होता, एका ठिकाणी ऑफिशीयल पार्टी साठी तो गेला होता, उशीर येणार होता घरी,

खूप बोर होत होत आज त्याला त्रास द्यायचा होता ना, आता तो उशीरा येईल, कधी देणार त्रास, जावू दे, काय करू ती जेवायला बाहेर गेली, ठरल्या प्रमाणे ती नुसती बसुन राहणार होती पण तिला ते जमल नाही, ती आपोआप सविता ताईंना मदत करत होती, त्यांच्याशी बोलत होती, आजी आजोबांची काळजी घेत होती, बाबांना काय हव नको ते बघत होती, सगळे खुश होते तिच्या वर, ते ही तिची काळजी घेत होते, काही खरं नाही अस, हे लोक चांगले आहेत मला सोडणार नाहीत ते, पूर्ण फसली मी,

मला नाही रहायच इथे, मी उद्या सचिनशी भांडण करते, ती रूम मध्ये आली, जरा वेळ अभ्यास केला, नंतर ती झोपली, रात्री उशीरा सचिन घरी आला, श्रेया आत सोफ्यावर आरामात झोपलेली होती, खूप शांत छान दिसत होती ती , सचिन तिच्या जवळ जाऊन बसला तिच्या चेहर्‍यावरून केस बाजूला केले, खूप गोड दिसत होती ती, तो तिच्या कडे बघत बसला, ही कधी हो म्हणेल मला की सौरभ कडे जाईल, मला नाही वाटत इथून जाईल ही, मी नाही जावू देणार हिला, नाही तरी तो पोरगा चांगला नाही, आणि आज श्रेया त्याच्याशी बोलली नाही, बर झाल, त्याने पुढे होवुन तिच्या कपाळावर किस केल, इथे नको थांबायला हिच्या कडे बघत असा त्रास होतो, तो आत गेला चेंज केल झोपून घेतल,

सकाळी श्रेया उठली, आधी बाहेर जावुन बघितल, सचिन आलेला होता, तिला बर वाटल, केव्हा आला हा काय माहिती, ती तयार झाली, कॉलेजला निघून गेली, थोड्या वेळाने सचिन उठला, उशीर झाला वाटत, श्रेया गेलेली दिसते कॉलेजला,

श्रेया कॉलेजला आली, आज सौरभ त्याच्या ग्रुप सोबत कॅन्टीन मध्ये बसलेला होता, बाकीचे सांगत होते सौरभ श्रेया बघ, हो बोलतो दुपारी तिच्याशी, सगळ्यांना तीच लग्न झालं याच आश्चर्य वाटत होत,

"त्या श्रेयाच लग्न झाल तरी तू का तिच्या मागे आहेस सौरभ?", .. एक मुलगी बोलली, सौरभ काही बोलला नाही,

काल श्रेया माझ्याशी बोलली नाही तर मनीष खूप रागवला मला रात्री, त्याने मदत केली नाही तर इलेक्शन कस लढणार? काहीही झाल तरी श्रेयाच लग्न मोडायला हव,

श्रेया घरी यायला निघाली, मला कुठेच राहायचं नाही ना सचिन सोबत ना सौरभ सोबत मी आजच बोलते सचिन सोबत, तो समोर असतो तर चांगलं वाटत नाही,

घरी आल्यावर तिने सचिनला फोन केला,... मला बोलायच आहे तुझ्याशी थोड

" हो येतो लवकर घरी",.. थोड्या वेळाने सचिन आला, चहा झाला तो आत आला, श्रेया रूम मध्ये होती, तिच्या चेहर्‍यावर टेंशन होत,.. "बोल काय झालं श्रेया? " ,

श्रेया गप्प होती,.. "मला डिव्होर्स हवा आहे सचिन" ,

सचिन तिच्या कडे बघत राहिला,

"हो बरोबर ऐकल तु मला नाही राहायच इथे",.. श्रेया

" काय झालं?" , .. सचिन

"सगळे माझ्या कडे तुझी बायको म्हणून बघतात, मला मोकळ रहाता येत नाही, तुझ्या घरचे नीट वागतात माझ्याशी , मला वाईट वाटत, मला जे आवडत ते करता येत नाही, मला गिल्टी वाटत" ,.. श्रेया

"इथून जावून काय करणार सौरभ सोबत राहणार का?",.. सचिन

"नाही, तू नाही म्हणतो ना त्याच्याशी बोलायला, मी कोणा सोबत नाही रहाणार, कोणी नको मला, मी माझी माझी राहीन, तू काळजी करू नकोस, मी सांगेन बाबांना की सचिनला मदत करा, त्याचं प्रोजेक्ट बंद करू नका, माझे बाबा माझ ऐकतात ते प्रोजेक्ट बंद करणार नाही",.. श्रेया

" माझ्या सोबत रहा श्रेया, काय म्हणण आहे तुझ नीट सांग",.. सचिन

"नाही ते शक्य नाही सचिन, मी नाही रहाणार इथे",.. श्रेया

"जर मी तुला जाऊ नाही दिलं तर काय करणार? ",.. सचिन

"तू मला अस करू शकत नाही तू दिलेला शब्द पाळ, तुला मी अस केल असत तर, तू बोलला होता प्रोजेक्टच काम झाल की तू मला जावू देशील, मी करते ना तुझ प्रोजेक्टच काम सांगते ना बाबांना",.. श्रेया

" आपली दोघांची पहिली चॉईस चुकली आहे श्रेया, आपण एकमेकांसोबत बरोबर आहोत, नेहा सोड सौरभ सोड फक्त माझा विचार करून बघ एकदा, मी रिक्वेस्ट करतो, झाल आहे ना लग्न आता नीट राहू ना आपण ",.. सचिन

सविता ताई बोलवायला आल्या, दोघ गप्प बसले, जेवायला बाहेर गेले, श्रेया तीच तीच काम भरभर करत होती, सगळ्यांची काळजी घेत होती, आजी आजोबा खूप खुश होते, बाबा ऑफिसच श्रेयाला सगळ सांगत होते, श्रेयाला जेवताना ठसका लागला, सगळे पाणी द्यायला पुढे आले, आजी आजोबा खूप काळजीत होते,

मी ठीक आहे, कोणी काळजी करू नका, श्रेया वेगळी गप्प होती, काय करू मी, चांगले आहेत हे लोक, साधे एकदम, सचिन किती काळजी करतो माझी, मला नक्की काय हव आहे तेच समजत नाही,

सचिन त्याच्या विचारात होता, श्रेया खरच जाणार का इथून, आई बाबा आजी आजोबा खूप मन गुंतवून बसले हिच्यात, माझ ही प्रेम आहे हिच्यावर, माझ्यापासून दूर जाईल ही या विचारानेच घाबरायला होतं, मी नाही जावू देणार श्रेया ला नाहीतर मी पण जाईल हिच्या सोबत ही जिथे तिथे मी, काही वाटलं तर तिच्या आई-वडिलांची मदत घेऊ,

उद्या मोहन आणणार आहे सौरभचे कॉल डिटेल्स ते दाखवू आपण श्रेयाला तेव्हा तिला समजेल, खरं तर ती बरोबर बोलते आहे असंच ठरलं होतं की ती सौरभ सोबत राहणार पण तो सौरभ चांगला नाही,

सकाळी श्रेया उठली, तयार झाली कॉलेजला जाण्यासाठी, सचिनही उठला होता तो त्याचं काम करत होता लॅपटॉप वर, श्रेयाला त्याच्यासमोर आवरतांना कसंतरीच वाटत होतं, हा सचिन समोर असला की कसं तरीच वाटतं, तो का बघतो माझ्या कडे,

काय करू आईकडे जाऊ का? याला नको सांगायला आपण कॉलेज नंतर आईकडे चालल जाऊ, श्रेयाने तिची जास्तीचे लागणारे इम्पॉर्टंट बुक्स घेतले, समजा इकडे परत नाही आलो तरी चालेल, ती कॉलेजला निघून गेली

सचिन ऑफिस मध्ये आला, काम सूरू होत नंतर त्याला सौरभचे कॉल डिटेल्स मिळाले, त्यात तो बराच वेळ मनीष सोबत बोलत असल्याचं समजलं, हीच आयडिया होती त्याची आधी श्रेयाला फसवायचं, या सौरभला गाठून त्याला धमकी देऊन सगळं त्याच्याकडून बोलून घ्यायला पाहिजे आणि ते श्रेयाला सांगायला पाहिजे
त्याने फोन फिरवला आणि सगळं तो समोरच्याला सांगत होता, काहीतरी ठरलं त्यांचं, आता सचिनला बरं वाटत होतं

कुठे आहे ही श्रेया? काही समजत नाही काय करते? दुपार झाली त्याने फोन केला, श्रेया तिच्या आईकडे आलेली होती

"आईकडे काय करते आहेस तू श्रेया?",.. सचिन

"मी आईकडे आहे, इथेच राहणार आहे मी, मला तिकडे तुझ्या समोर कसं तरी वाटतं",.. श्रेया

" काय कसंतरी वाटतं",.. सचिन

"सचिन आपण नको बोलू या मी फोन ठेवते",.. श्रेया

" श्रेया एक मिनिट ऐकून घे घरी ये मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे",.. सचिन

" मला कुठेही यायचं नाही आणि तुझं काहीही ऐकायचं नाही, मला थोडी शांती हवी आहे",.. श्रेया

" तू जर आली नाहीस तर मी तिकडे येईल तुझ्या वडलांना फोन करून सगळ सांगून देईल",.. सचिन

" ठीक आहे सांगून दे त्यांना, नाही तरी मी सांगणारच होती आज की मला सचिन कडे जायचं नाही त्यापेक्षा तू सांगशील ",.. श्रेया

" श्रेया एक मिनिटा ऐकणार का थोडं महत्त्वाचं आहे, मी तुला घ्यायला येतो आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे एक चान्स दे",.. सचिन

ठीक आहे

सचिन तिला घ्यायला आला,.. आई मी जाते आहे

श्रेया निघाली, मीनाताईंना काही वाटलं नाही, अशीच ती मधून मधून एक दोन तास येत होती नेहमी,

सचिन आणि श्रेया एका ऑफिसमध्ये आले, दोघं आत मध्ये गेले खुर्चीवर सौरभ बसलेला होता दोन-तीन लोक त्याच्या आजूबाजूला बसून चौकशी करत होते, सचिन श्रेया समोर उभे होते

फटाफट सांग सौरभ यांना सगळ..

श्रेया आय एम सॉरी तुझ्याशी बोलायला मला मनीषने सांगितलं होतं, नाहीतर मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, मला तुम्ही लोक जाऊ द्या, मी यापुढे तुमच्या कुणाच्या आयुष्यात इंटरफेअर करणार नाही, त्या लोकांनी सौरभ कडून पेपर वर लिहून घेतलं, सौरभ उठून निघून गेला, सचिन श्रेया घरी आले

बाहेर सगळ्यांसोबत नेहमीप्रमाणे चहा घेतला, सचिन बिझी होता, सविता ताई, आजी, श्रेया बोलत बसल्या होत्या,

श्रेयाने सविता ताईंना विचारलं,.. "आई मी थोडे दिवस माझ्या आईकडे जाऊन राहू का?",

"ठीक आहे बेटा, सचिन काय म्हणतो आहे",.. सविता ताई

श्रेया काही म्हटली नाही, सगळे सचिन कडे बघत होते,... हा नक्की नाही म्हणेल,

"जाऊन ये, दोन-तीन दिवसात वापस ये श्रेया",.. सचिन

ठीक आहे

"तुला करमेल का पण सचिन? आम्हाला ही करमणार नाही श्रेया शिवाय ",... आजी

" आता काय करणार आजी, ठीक आहे, आपण बोलत बसू एकमेकांशी",.. सचिन

आजी, सविता ताई हसत होत्या, श्रेया लाजली होती,

दुसर्‍या दिवशी सकाळी श्रेया तिचं सामान घेऊन कॉलेजला गेली, ती तिकडून आई कडे जाणार होती, खुश होती ती,

रस्त्याने ती सचिनचाच विचार करत होती, काय चाललं आहे हे, सचिन फुल माझ्या मागे लागला आहे, काय करू आता,

दुपारून श्रेया घरी आली तिच्याकडे दोन-तीन बॅग होत्या,

"अरे वा आज कसं काय एवढं सामान आणलं तू? ",.. मीना ताई

"आई मी आता इथे दोन-तीन दिवस राहणार आहे",.. खरं तर तिला इथेच थांबायचं होतं, पण लगेच सांगणार कसं

संध्याकाळी बाबा घरी आले, ते चहा घेत होते, श्रेया जवळ येऊन बसली,

श्रेया रहायला आली इकडे ",.. मीना ताई

"अरे वाह, सचिन राव नाही आले का श्रेया मागे",.. अभिजित राव त्यांचे त्यांचे हसत होते,

"बाबा सचिनच्या कंपनीतल्या प्रतिस्पर्धी त्या माणसाचं नाव काय आहे ? तुमचं सचिनचा प्रोजेक्ट व्यवस्थित सुरू ना",.. श्रेया

" मनीष इंटरप्राईजेस... हो ठीक सुरू आहे, का बेटा सगळं का विचारते आहेस",.. अभिजीत राव

" बाबा तुम्ही सचिनला मदत करा, प्रोजेक्ट बंद करू नका",.. श्रेया

" अरे वाह आज एकदम नवर्‍याची बाजू घेतेस, छान वाटल ऐकुन ",.. अभिजीत राव

तस नाही बाबा..

" ठीक आहे नाही करणार बंद प्रोजेक्ट तुझ्या नवर्‍याचा, हे सगळ तुमच्या दोघंच आहे, अजिबात काळजी करायची नाही बेटा, अजून काही",... अभिजीत राव

काही नाही बाबा..

श्रेयाला टेंशन आल होत, आई बाबा खुश आहेत सचिन वर.